नवे वर्ष, नवे पर्व


वर्धापनदिन विशेषांक आवडला


रेल्वेमधे महिला डब्यातील सुरक्षा वाढविण्याची गरज

हल्ली बातम्यांमधे किंवा वृत्तपत्रांमधे वारंवार स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराची बातमी दिसते. अशा बातम्या वाचून एका बाजूला त्या पिडीत स्त्री विषयी सहानुभूती, अनुकंपा तर वाटतेच; परंतु याशिवाय तिला नाहक त्रास देणार्‍या आणि तिच्यावर अत्याचार करणार्‍या त्या गलिच्छ आरोपीबद्दलही कमालीची चीड येते. हल्लीच CST ते मस्जिद बंदर दरम्यान महिला डब्यामधे एकट्या तरूणीला पाहून तिच्या जवळ जाणार्‍या त्या गुन्हेगाराविषयी वाचले. अकस्मात हा माणूस असा एकट्या डब्यात आपल्या जवळ येतोय हे पाहताच सहाजीकच कुणीही घाबरेल आणि नक्की काय करायचे हे सुचणारही नाही. पण प्रसंगावधानाने त्या तरूणीने रेल्वेची चेन खेचली. पण तरीसुद्धा भीतीने हिने चालत्या ट्रेनबाहेरच उडी घेतली. यावरूनच आपल्याला कळते की त्या असहाय्य तरूणीची काय बिकट अवस्था झाली असेल. 


हा प्रसंग अक्षरश: डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्या नराधमाविषयी तीव्र संताप आला. अशा मोकाट आरोपींना लवकरच जेरबंद करायला हवे असे मनापासून वाटते आणि त्याला कठोर शिक्षा मिळावी असे वाटते; याशिवाय रेल्वेनेसुद्धा महिला डब्यातील सुरक्षितता वाढवावी असेही वाटते, नाहीतर यासारख्या आणि काही वर्षांपूर्वी घडलेल्या जयबाला प्रकरणासारख्या (जिने आपले पाय गमावले) अतिशय कटू बातम्या कानावर येतील. असे घाणेरडे आणि खालच्या पातळीचा गुन्हा करण्यासाठी माणसं धजाऊ तरी कशी शकतात याचेच आश्चर्य वाटते. जर आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होताना दिसली, की सहाजीकच अशी कृत्ये करायला कुणीही धजाऊ शकणार नाही. रेल्वे प्रशासन याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करेल अशी आशा वाटते.   

पुस्तकाप्रमाणेच जबरदस्त असा फास्टर फेणे...


लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी पडली की आमची बच्चे कंपनीची जवळच्या वाचनालयात रोजचीच खेप असायची. दिवसा आदल्या दिवशी वाचनालयातून घेतलेलं पुस्तक वाचून पुढचं पुस्तक कधी एकदा हातात घेतो असं व्हायचं. आणि त्यात पण भा.रा. भागवतांचं फास्टर फेणे म्हंटलं की पुस्तक वाचायला अजूनच धमाल वाटायची. त्यावेळी आम्हाला वाटायचं ह्या पुस्तकासारखाच खर्‍या आयुष्यात एखादा फेणे आला तर काय मजा वाटेल त्याचे सगळे किस्से ऐकताना! पण तरीही कळायचं की अरे अशी पुस्तकातली पात्रं थोडीच खरी होतात? अजूनही त्या सुंदर आठवणी मनात ताज्या आहेत. एव्हाना शिक्षण संपल्यावर पुसटसा का होईना पण ह्या सगळ्या पात्रांचा विसर पडत चालला होता. पण अचानक एक दिवस टी.व्ही. चालू असताना फास्टर फेणेचे प्रोमोज लागले. ऐकून एक-दोन क्षण आम्ही एकमेकांकडे बघितलं सुद्धा. खरोखरच फास्टर फेणेचा चित्रपट येतोय का? आणि पुन्हा तोच प्रोमो बघून आणि नेटवर बघून स्वत:ची खात्री करून घेतली आणि तेव्हाच ठरवलं की हा चित्रपट आपण बघायचाच.  फास्टर फेणे सारखा सुपर्ब ऍक्शनपट पाहण्यातली मजा औरच असणार आहे हे तेव्हाच कळलं होतं, आता उत्सुकता होती ती चित्रपट रिलीज होण्याची. दैनिक प्रत्यक्षमधे या चित्रपटाविषयी वाचलं आणि सिनेमा पाहिला देखील. पुस्तकाप्रमाणे हा चित्रपटही अफलातून आहे. नावाप्रमाणेच ’फास्टर’ असणारा फेणे एक मोठ्ठा घोटाळा सोडवतो आणि खरोखरच एक नायक ठरतो. या चित्रपटातील एक एक प्रसंग अक्षरश: आपल्या अंगावर येतात आणि प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवतात. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्या वेळचा पुस्तकातला बनेश फेणे आज टेक्नॉलॉजीच्या युगात कसा असेल, तस्साच  अगदी तो वाटतो. शीतावरून भाताची परीक्षा करणारा हा नायक म्हणजेच अमेय वाघ या भूमिकेला अगदी तंतोतंत न्याय देतो. या चित्रपटातील बाकीची पात्रं म्हणजे अंबादास, भू-भू ही सुद्धा फास्टर फेणे प्रमाणेच आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात राहातात. एकंदरीतच हा सिनेमा सुपर्ब आहे हे वेगळं सांगायला नकोच. मला हा सिनेमा प्रचंड आवडला. ह्याचा जर पुढचा पार्ट आला तर सोन्याहून पिवळच. 

Blood Donation @ Shushrusha Hospital

आताच्या #MumbaiFlood चीच गोष्ट आहे. सकाळी जरा कामाला बाहेर पडलो होतो. पावसाने एव्हाना जोराचा वेग पकडला होता. अचानक माझ्या मोबाईल वर कॉल आला. समोरची व्यक्ती दादरच्या #ShushrushaHospital मधून बोलत होती. "एका #ब्लडकॅन्सर च्या पेशंटला urgently #blood हवे आहे. तुम्हाला शक्य असेल तर प्लीज तुम्ही या...". पाऊस तर प्रचंड कोसळत होता, हॉस्पिटल तसं लांब होतं, पण emergency होती म्हणून मी मागचा पुढचा विचार न करता तिथे गेलो. मी पावसात छत्री असूनही पूर्ण भिजलो आणि तसच #रक्तदान केलं. रक्तदान केल्यावर मनाला जो आनंद मिळतो तो शब्दातीत असतो याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतलाच असेल. देवाने मला ही संधी दिल्याबद्दल मी अंबज्ञ आहे!  


भारतीय जवानांना सलाम

बेधुंद.... ह्या पावसांत

वळण...


कोरडी छत्री