विड्याच्या पानाच्या उत्पति कथा

10:55:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 विड्याच्या पानाच्या उत्पति कथा 🍃

🍃 समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले.भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.✍🏻

🍃विड्याची पाने महत्व🍃

🍃 या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.✍🏻

🍃विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" सहवास असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या मधोमध "सरस्वती देवीचा" वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे "महाविष्णूचा" वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या मागीलबाजूस "चंद्रदेवता" वास
असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मधे "परमेश्वरा" चा वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाखाली "मृत्युदेवते"चा वास असतो.
या कारणाने ताम्बूलसेवन करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या देठात "अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी" राहतात.म्हणून पान
 सेवन करतांना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी ने.✍🏻

🍃 विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.
यासर्व देवतांचा विडयाच्या पानामधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोण त्याही कारणे विडयाची पाने घरा बाहेर जाऊ देऊ नयेत.
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत .✍🏻

0 comments:

लेकीसाठी वैकुंठातुन

08:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments


भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.
काही काळजी आहे का संसाराची?पोरींची?तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले,आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत.योग्य वेळ येवू द्यावी लागते.परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले.तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला. 
अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला म्हणाले, नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तु तुकाराम महाराजाची मुलगी आहे. भागिरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांच जीवन पुन्हा पुर्ववत सुरु झालं.भजन किर्तन नामस्मरण नित्य सेवा सुरु झाली. 
भागिरथीचं यलवडी गाव जवळच होतं पण येणंजाणं नव्हतं.देहुची माळीण भाजी विकायला यलवडीला जायची. राञी देहुमध्ये झालेलं आपल्या बापाचं,तुकाराम महाराजांच किर्तन ऐकण्यासाठी भागिरथी माळीणबाईची आतुरतेने वाट पाहायची.महाराजांच किर्तन, उपदेश ऐकून भागिरथीचे डोळे बापाच्या आठवणीनं भरून यायचे.माळीणबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं,महाराजाचं रोज दर्शन होतय या भावनेनं भागिरथी कृतकृत्य व्हायची.
अखेर तो दिवस आला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा.फाल्गुन वैद्य द्वितीया, सोमवार चा दिवस होता. प्रथमप्रहर,प्रात:काळ.बीजेच्या दिवशी शेवटचं किर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला.भागिरथी ला सांगाव,पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही.म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहु गावचं रत्नं गेल.
देहु गाव शोकसागरात बुडून गेल.सर्व निश्चल बसलेले.कुणाच कशात लक्ष लागत नाही.
पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीणबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली. आणि जड पाऊलाने भागिरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माळीणबाई का आली नाही?माळीणबाई तुझा चेहरा का उतरला?असा प्रश्न भागिरथीने माळीणबाईला विचारला.जड अंतकरणानं माळीणबाई म्हणाली,भागिरथी तुझे बाबा माझे गुरू,जगतगुरू तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले.
आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागिरथी धायमोकलुन रडु लागली.परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचाराणं भागीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला.आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकुन तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले.नारायणाची परवानगी घेऊन भुतलावरच कार्य पुर्ण करण्यासाठी महाराज भागिरथीच्या घरी आले.
भागिरथी असा आवाज दिला.वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकुन भागिरथीने धावत येवून तुकाराम महाराजांना कडकडुन मिठी मारली,आनंदाश्रु घळघळ वाहु लागले.भागिरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती ञास करून घेतलास.तशी भागिरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय?कुणासाठी जगावं?तुकाराम महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला.भागिरथी म्हणाली,बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवन करते.महाराज म्हणाले भागिरथी मी आता न जेवणा-या गावी गेलो.आपल्या भागिरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत,परत हाक मारू नको अशी विनंती केली.तशी भागिरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय अस वाटु देऊ नका,मी हाक मारणार नाही.भागिरथीला आशिर्वाद दिला.
भागिरथीच जिवन परिपूर्ण झालं.हे बाप-लेकीच अलौकिक नातं आहे.मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते.बाप आपलं दु:ख आईच्या ह्रदयासमान लेकीला सांगुन मन हालक करत असतो.जगतगुरू तुकाराम महाराज आणि भागिरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं ह्रदयस्पर्शी उदाहरण आहे.म्हणून अस म्हणतात कि बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत,कारण एका *लेकीसाठी* एका बापालाही *वैकुंठहुन* यावा लागली होत!!

0 comments:

निष्ठा

08:28:00 Nandan Bhalwankar 0 Comments


जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपूरास गेले. तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे त्यांना समजले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता, गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, "इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का ?"

त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -"ही काय, हीच की जनी ! चोरटी ! माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करत्येय ! अन वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय."

त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. 

तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले.

त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की , "तूच जनी आहेस का ?"
यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली, "होय बाबा मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा ?". 

तिच्या या उत्तराने अन तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते.

मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, "हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोवऱ्या निवडून वेचून दया. तुमी एव्हढं काम करा अन मग हिथून जावा. "

आता गोवऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, "त्यात काय इतका विचार करायचा ? अगदी सोप्पं काम आहे. "

आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणारया शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली.
कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, " अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा अन त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ' *विठ्ठल,विठ्ठल'* आवाज येईल ती गोवरी माझी. अन ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची !"

जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलुन आला अन त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या अन काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून ' *विठ्ठल विठ्ठल'* असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही, 'आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वसतो आहे' हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी सारया गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन वर जनाईला ती खोटे ठरवत होती.

गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, "या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का ? एकदम साधी गोष्ट आहे. मी ह्या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच ह्या गोवऱ्यात सुद्धा असतो !"
कबीर चकित होऊन जनाबाईचे बोलणे ऐकत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

*एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी ह्यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे.* *भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.*

0 comments: