Movie Reviews & Other Stuff
कथा : दर्पणातले ‘दडपण’
लेखक: नंदन भालवणकर
दिलीपची माणगावला बदली झाली होती. फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्याच्या अशा बदल्या होतच राहात. बायको अंजली आणि छोटू हर्षल मुंबईलाच राहात होते. दोन दिवसांनीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असताना ताबडतोब माणगावला जावे लागल्यामुळे तो थोडा नाराज होता. पण अंजली हर्षल सोबत त्या दिवशी स्वतः तिथे येऊन दिलीपला सरप्राईज व्हिजीट देणार होती.
फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दिलीपला राहायला दोन मजली मस्त छोटा बंगलाच दिला होता. समोर मस्त गार्डन आणि निसर्गरम्य वातावरण जरी असले, तरी तो बंगला जरा आडवाट्यालाच होता. त्यात मागे जंगल. रात्री अशा ठिकाणी एकट्या राहणाऱ्या माणसाला भितीच वाटली असती; पण दिलीपला नोकरी मुळे अशा ठिकाणी एकटं राहण्याची सवय होती.
दिलीपीचे प्राण्यांवर भारी प्रेम. बंगल्याच्या आवारात भटकणाऱ्या एका कुत्र्याशी त्याची लगेचच गट्टी जमली. त्याने लगेच त्याचं ‘रॉकी’ म्हणून नामकरणही केलं. रॉकीलाही दिलीपचा फार लळा लागला. दिलीप बंगल्यात शिरल्यावर लगेच शेपूट हलवतच रॉकी त्याच्या मागेमागे घरात गेला आणि बंगलाभर फिरायला लागला.
दिलीपचा आज नवीन जागी कामाचा पहिलाच दिवस असल्यामुळे तो खूपच उत्साही होता. त्याला टापटीप राहण्याची भारी आवड असल्यामुळे मुलींसारखाच तो बराच वेळ आरशासमोर स्वतःला एरवी अनेक अँगल ने बघत उभा असायचा. त्याचं असं आरशासमोर उभं राहणं पाहून अंजली नेहेमी त्याला हसायची. आज नवीन जागी कामाचा पहिलाच दिवस असल्याने तो अजूनच जास्त वेळ आरशासमोर उभे राहून स्वत:ला बघणार होता.
अंघोळ करून बाहेर आल्यावर रॉकीच्या भुंकण्याचा जोराचा आवाज झाला. थोड्या आडवाटेला बंगला असल्यामुळे शांत वातावरणाला पार हादरून टाकणारा तो आवाज वाटत होता. आवाज वरून येत होता. जिना चढून दिलीपची पावले ‘त्या’ खोलीच्या दाराजवळ जाऊन पोचली. आता कानठळ्या बसतील इतका त्या कुत्र्याचा आवाज मोठा झालेला जाणवत होता. दिलीप ने दार ढकलले. समोर रॉकी दिसला. समोर आरश्यात पाहून तो जोरजोराने भुंकत होता. का कुणास ठाऊक, पण बंगल्याची ‘ती’ खोली त्याला जरा वेगळीच वाटली… जणू काही कुणीतरी तिथे राहात आहे असा भास व्हावा. समोर डावीकडे कोपऱ्यात एक मोठे कपाट ठेवलेले. कपाट जितके मोठे, तितकाच मोठा आणि थोडा तिरपा आरसा कुणीतरी त्याला टेकवून ठेवला होता. खोलीत शिरल्या शिरल्या अगदी कुणाचेही लगेचच लक्ष वेधले जावे असा तो ठेवला होता. बराच काळवंडलेल्या, धूळ लागलेल्या अशा आरशात रॉकी स्वतःला पाहून भुंकत होता. खोलीचे दार उघडल्याचा जरी आवाज झाला, तरीही रॉकी एकटक त्या आरशातच बघून भुंकत होता.
दिलीपला वाटले की रॉकी आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून त्या प्रतिबिंबाला दुसरा एक कुत्रा समजून त्याच्यावरच भुंकत आहे. म्हणून रॉकीला उचलण्यासाठी तो आता हळूहळू त्या आरशाच्या दिशेने पुढे पुढे सरकायला लागला. हळूहळू दिलीपचे प्रतिबिंब त्या तिरप्या ठेवलेल्या आरशात आता उमटायला लागले. तो आता रॉकीच्या मागे उभा होता. त्याने एकदा आरशात स्वतःला पाहिले. मग रॉकीला उचलून तो त्या खोलीच्या बाहेर आला. रॉकी अजूनही मागे वळून वळून त्या आरशाकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता. भुंकणे सुरूच होते. खाली आल्यावर दिलीप ने त्याला जेव्हा खाली सोडले, तेव्हा पुन्हा धावतच तो तेवढ्याच वेगाने भुंकत वरती गेला.
दिलीप ने कंटाळून मान हलवली आणि तो पुन्हा जिन्याच्या दिशेने वर जायला निघाला. जिना चढताना त्याला आता एक गोष्ट जाणवली. जोरदार भुंकणाऱ्या रॉकीचा आवाज पूर्णपणे थांबला होता. असे कसे झाले? दिलीपच्या मनात प्रश्न पडला. सहाजिकच रॉकी ‘त्या’ खोलीच्याच दिशेने गेला असणार असे त्याला वाटले म्हणून त्याने पुन्हा ‘त्या’ खोलीचे दार ढकलले. पहिल्यांदी ते उघडले नाही… जणू काही कुणीतरी आतमधून कडी लावली आहे…
“आता ह्याला काय झालं”, दिलीप पुटपुटला. आता जरा अजून जोरात ते ढकलले तेव्हा ते उघडले. दार उघडले जातानाच त्याने “रॉकी” अशी हाक घातली… पण … खोलीत कुणीच नव्हते. “रॉकी गेला तरी कुठे.. ” दिलीप बाहेर येऊन त्या मजल्यावरील बाकीच्या खोल्यांचा शोध घेत होता. पण त्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. “अरे.. हा कुठे गायब झाला.. ” दिलीप थोड्या आश्चर्यानेच बोलला. “बहुतेक त्याच खोलीत असेल... ” असे म्हणून पुन्हा तो ‘त्या’ आरसा ठेवलेल्या खोलीत शिरला.
आधीप्रमाणेच आताही तिथे कुणीच नव्हते. त्याचे लक्ष पुन्हा त्या आरशाकडे वेधले गेले. अगदी त्याच्याही नकळत तो त्या आरशाकडे चालत गेला. स्वतःचे प्रतिबिंब पाहू लागला… पाहातच राहिला.. जणू काही बाहेरील जगाशी त्याचा संपर्कच तुटला. “ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग… ” दिलीपच्या मोबाईलची रिंगटोन वाजायला लागली.
‘त्या’ खोलीत एक वेगळीच शांतता जाणवत असे. एरवी त्याच्या ह्याच रिंगटोनचा लहान आवाज असल्यामुळे बरेच वेळा फोन आलेला त्याला समजायचा नाही. अंजली त्यामुळे वैतागायची. पण आज तो आवाज त्या खोलीची शांतता भेदणारा वाटला. दिलीप भानावर आला. जणू काही थोड्या वेळासाठी तो ह्या जगात नव्हताच. लगेच कामावर जायची आठवण झाली. झरझर पायऱ्या उतरून तो खाली आला.
रॉकी… अचानक त्याला आठवले. रॉकी कुठे आहे ? पुन्हा त्याने रॉकीला हाक मारली. नो रिस्पॉन्स. लगेचच पुन्हा त्याची पावले जिन्याकडे वळली. पहिली पायरी चढताच त्याने स्वतःला रिमाईंड केले. कामावर जायचे आहे. त्याने पाय मागे वळवला. पण… पुन्हा त्याला रॉकीची आठवण आली. रॉकी कुठे गेला असेल ह्याचे आश्चर्य वाटण्यापेक्षा त्याला आता चिंता वाटू लागली होती. “अचानक हा जाऊच कुठे शकतो ? आणि ते ही का ? त्या आरशात काही … “ आणि तो थबकला. “नाही नाही. आरशासारखा तो आरसा. त्यात काय असणार? छे छे” असे त्याने स्वतःच्याच घाबरलेल्या मनाची व्यर्थ समजूत घालायचा प्रयत्न केला.
आता तो जिना चढताना त्याची पावलं हळूहळू पुढे पडत होती. बहुतेक त्याला त्याचे मन वर न जाण्याचा सल्ला देत असावे. “रॉकी” … रॉकीला आवाज देताना त्याचा आवाजही थोडा घाबरलेला येत असल्याचे त्याचेच त्याला जाणवले. तो वरच्या मजल्यावर आला. समोर मोठा पॅसेज आणि एखाद्या भयानक राक्षासाप्रमाणे “आ” वासून दार उघड्या असलेल्या काही खोल्या. आता मात्र ‘त्या’ खोलीचे दार उघडेच होते. कदाचित त्यालाच ते स्वतःकडे बोलावत होते. आताही नकळतच त्याची पावले त्या दाराकडे खेचली जाऊ लागली. पण आता दबकत दबकत तो चालत होता. मधेच “आपल्या कुणीतरी मागे तर नाही” या विचाराने त्याच्या अंगावर काटा येत होता.
घाबरतच त्याने ‘त्या’ खोलीचे दार ढकलले. समोर नेहेमीप्रमाणे तो आरसा तिरपा बसला होता. आताही खोलीत कुणीच नव्हते. त्या आरशात असे काय होते काय माहीत, पण त्याला बघणारा अगदी नकळत त्याच्यात स्वतःला बघण्यासाठी धडपडत असे. दिलीप पुन्हा आरशासमोर उभा राहिला… पाहातच राहिला. त्याने स्वतःला भानावर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण … बहुतेक यावेळीही तो फोलच ठरला.
“भू… भू … भू भू” कुत्र्याच्या ओरड्याने हा पुन्हा भानावर आला. अजूनही तो आरशासमोर बसलेला होता. आरशात स्वतःलाच पाहात होता. पुन्हा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. “रॉकी.. ” आता हा पूर्ण भानावर आला. आवाज खालून येत होता. हा धावतच खाली आला. बहुतेक बंगल्याबाहेरच्या बागेतून आवाज येत होता. हा तस्साच धावत बाहेर आला आणि ह्याला धक्काच बसला.
आता बाहेर रात्र झालेली होती. “इतके कसे वाजले? मी तर आरश्यासमोर सकाळी बसलो … ओह माय गॉड… म्हणजे मी दिवसभर त्या आरश्यासमोरच …” दिलीपला काय चाललंय ते काहीच कळेना. “म्हणजे मी ऑफिसला गेलोच नाही की काय?”... पुन्हा गार्डन मधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. “रॉकी.. रॉकी” हाका मारतच हा बाहेर गार्डनमधे गेला. कधी एकदा रॉकीला बघतो असे ह्याला झालेलं. त्याला लांबूनच एक कुत्रा दिसला. रात्र झालेली. गार्डनमधल्या अंधुक दिव्यात ह्याला नीट दिसले नाही. तो आणखीन जवळ गेला. पण .. तो कुत्रा रॉकी नव्हता. हा असा अचानक आलेला बघून तो कुत्रा मागच्या जंगलात पळून दिसेनासा झाला. पुन्हा भयाण शांतता …
दिलीपचं डोकं गरगरत होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. “दिलीप शांत हो .. शांत हो.. थिंक.. थिंक.. ” तो स्वतःलाच समजावत होता. “पहिल्यांदी ऑफिसला फोन करतो. तिथे बोलायला हवे… अरे पण मला ऑफिसमधून एकही फोन कसा आला नाही? सकाळपासून अंजली आणि हर्षूशीही बोललो नाही… तिचा पण फोन कसा आला नाही? कदाचित मी त्या आरशासमोर होतो म्हणून …. “ दिलीपच्या अंगामधून पुन्हा एकदा भीतीची शिरशिरी गेली. आता तो पुरता घाबरला होता. बहुतेक त्याला समजलेलं. किंबहुना हळूहळू पटत चाललेलं… “येस.. हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे … रॉकी सुद्धा आरश्यात बघितल्यामुळेच … “ पुढचे शब्द त्याला मनातही उच्चारावेसे वाटत नव्हते. ‘त्या’ खोलीत ठेवलेल्या दर्पणाचं आता एक वेगळंच ‘दडपण’ दिलीपला जाणवत होतं. आता त्या खोलीत पाऊलच ठेवायचं नाही.. खोलीतच काय वरच्या मजल्यावरही जायचं नाही… त्याने मनाशी पक्के केले. “आधी मला अंजलीला फोन केला पाहिजे…” असे म्हणून त्याने फोन काढायला खिशात हात घातला.. पण बहुतेक अजून सहन करायचंच त्याच्या नशीबात लिहिलेलं. खिशात फोन नव्हता.
“आता फोन कुठे राहिला ?” मनात दोन चार शिव्या हासडून चरफडत तो बोलला. बंगल्यात शोधू लागला. पण दिवसभर तो वरच्याच खोलीत होता. फोन खाली कसा सापडणार ? हे माहीत असूनही त्याचे मन वर जायला धजावत नव्हते. “ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग” त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. अंधारात एखादा आशेचा किरण दिसावा तसा आनंदित होऊन तो त्या आवाजाचा मागोवा घेत राहिला. पण … रिंग वरच्या मजल्यावरूनच वाजत होती. धावतच हा जिन्याकडे गेला आणि पुन्हा थबकला. तो जिना म्हणजे त्याला आता एक सापळाच वाटू लागला होता. “एवढ्या मोठ्या आवाजात फोनची रिंग कशी वाजतेय ? मला खाली कसे ऐकू येत आहे ?”.. हा विचार करतो न करतो तोच अचानक दिवे गेले. ह्याने नकळत एक जोराची किंकाळी फोडली.
आता बंगल्यात बाहेरचा चंद्रप्रकाश सोडता सर्वत्र अंधारच होता. हा अजूनही जिन्याच्या बाजूलाच उभा होता. आता मोबाईलची रिंग वाजणे बंद झाले होते. सर्वत्र भयाण शांतता. ह्याची पाचावर धारण बसली होती. ह्याच्या मनात आले सरळ बंगल्याबाहेर धूम ठोकूया. हा विचार येतो न येतो तोच एका कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला. काळीज चिरून जाणारा हा आवाज आधीच्या सगळ्या वातावरणात अधिकच भर घालत होता. “रॉकी ! नक्कीच हा रॉकीचा आवाज आहे !” दिलीप ने बरोब्बर ओळखलं. “नाही, आता काय तो सोक्षमोक्ष लावलाच हवा.” आहे नाही तो धीर एकवटून त्याने ठरवले. तसाच अंधारात चाचपडत तो जिना चढून वर गेला.
समोर काहीच दिसत नव्हते. फक्त ‘त्या’ खोलीच्या दारातून चक्क दिव्याचा प्रकाश येताना दिसला. बंगल्यात बाकी कुठेच वीज नसून इथेच कशी काय हा विचार करायलाही त्याचे डोके ताळ्यावर नव्हते. तो पुन्हा आधीच्यासारखाच त्या खोलीकडे आकर्षिला गेला. ह्यावेळी तो स्वतःला थांबवू शकला नाही. जे जे काही घडत होते, त्यामधे त्याने आता स्वतःला झोकून दिलेले होते. ‘त्या’ खोलीत शिरल्यावर पुन्हा एकदा समोर त्याला ‘तो’ आरसा दिसला. कुत्र्याचे भुंकणे चालूच होते. नेहेमीप्रमाणेच ह्याची पावलं त्या आरशाकडे खेचली गेली.
ह्याने आरशात पाहिले. आता त्याला त्या आरशात काहीतरी वेगळेच दिसत होते. तो स्वतःला आरशात पाहूच शकत नव्हता. हे नक्की काय चालले आहे? हे भयावह स्वप्न आहे की सत्य, हा विचार करण्यापलीकडे त्याचे डोके जाऊन पोचले होते. आता त्याला आरशात रॉकी दिसत होता.. तसाच भुंकत. जसं काही तो दिलीपला स्वतःकडे बोलवत आहे.. ह्याने एक हात पुढे केला… आणि …
अंजली त्या रात्रीच दिलीपकडे यायला निघालेली. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दिलीपला सरप्राईज द्यायचे म्हणून ती स्वतः माणगावला जाणार होती. खूप प्लॅन्स केलेले. म्हणूनच तिने मुद्दाम त्याला फोन केला नव्हता. सोबत हर्षलही त्याच्या लाडक्या डॅडला भेटायला येणार होता. मॅरेज अनिव्हर्सरी निमित्त दुकानातून एक स्पेशल केक घेऊनच ती सकाळी बंगल्यावर पोचलेली.
“वॉव ममा डॅडला किती मोठं होम मिळालं आहे ना..” हर्षू खूपच आनंदी आणि उत्साही दिसत होता. हातात असणाऱ्या त्याच्या टेडीबेअरला सुद्धा बंगला दाखवत होता. अंजलीने त्याला छान स्माईल दिलं आणि बंगल्याची डोअरबेल वाजवली. कधी एकदा दिलीपला भेटून त्याला सरप्राईज देतेय असं झालेलं तिला. उत्साहाच्या भरात पुन्हा लागोपाठ दोन दोन बेल वाजवल्या. कुणीच दार उघडलं नाही. “हा अजूनही झोपलाय की काय” अंजली मनात म्हणाली. पुन्हा चार बेल जोरात वाजवल्या. काहीच रिस्पॉन्स नाही. आता दरवाज्यावर ती जोरात थाप मारायला जाणार होती. पण दारावर थाप मारताच ते उघडलं गेलं. “अरे काय हा असा.. दरवाजा उघडा काय ठेवला आहे… ह्याला काही आहे की नाही… जाऊदे. दिलीsssप दिलीsssप” ती हाका मारायला लागली. “दिलीप आम्ही आलोय… सरप्राईज”. पण कुणीच ओ दिली नाही. छोटू हर्षल मोठ्या घरात धावतच इथे तिथे बागडत खेळायला लागला.
“ममा.. हे बघ. वर पण घर आहे” असे म्हणून धावतच जिना चढत वर गेला. अंजली खालीच होती. “ममा … हे बघ… लवकर ये.. ” हर्षू वरून ओरडला. “काय रे?? आले. एक मिनिट.”. नवीन घर आवडलेलं दिसतंय… अंजली मनात म्हणाली. ती अजूनही दिलीपला खाली शोधत होती. “आम्ही येणार होतो हे ह्याला माहिती होतं की काय? पण कसे शक्य आहे? मी तर कुणालाच बोलले नव्हते.” तिच्या मनात येऊन गेले. “दिलीप दिलीप” … तिने हाक मारायचे सुरूच ठेवले. “आमची हाक ऐकून हा लपला की काय? हंहंहं… बहुतेक तसेच असेल.”. खाली कुणीच नव्हते. बाहेर गार्डन मधे पण कुणी दिसले नाही. हा लवकर गेला नसेल ना ऑफिसला ? “हर्षू… बाबा भेटले का वर?” जिन्यातून ओरडून अंजली विचारत होती. हर्षूने पण रिप्लाय नाही दिला. “हर्षू.. हर्षू” ती हाका मारत वरच्या मजल्यावर आली. ‘त्या’ खोलीचे दार अर्धे उघडे होते. का कुणास ठाऊक, पण तेच दार तिने ढकलले.
समोर एक मोठा आरसा ठेवलेला. त्याच्या पायथ्याला हर्षूचा टेडीबेअर पडलेला दिसत होता. बाजूलाच एक मोबाइल फोन सुद्धा पडला होता. बहुतेक दिलीपचाच होता तो. “बापरे केवढा मोठा आरसा.. असा तिरपा का ठेवलाय इथे?” तिच्या मनात आले. ती पुढे चालत आली. हळूहळू तिचे पूर्ण प्रतिबिंब आरशात दिसू लागले. नेहेमीप्रमाणे आरशात पाहात तिने चेहेऱ्यावर आलेली केसाची बट एका हाताने मागे सारली. तेवढ्यात तिला आरशात तिच्या प्रतिमेमागे दिलीप हसत उभा असलेला दिसला. खाली हर्षलही आश्चर्याने आणि किंचित भितीने तिच्याकडे बघत उभा होता. दिलीपच्या मागून एक कुत्रापण हळूच तिच्याकडे आरशातून डोकावला.
“अच्छा! तर तुम्ही सगळे इथे आहात तर… आणि काय रे दिलीप हा कोण कुठचा कुत्रा पाळलास... ” ती अजूनही आरशामधे बघूनच बोलत होती. आरशामधे दिलीप हसला. हर्षू अजूनही तिच्याकडेच बघत उभा होता. कुत्र्याने एव्हाना शेपूट हलवायला सुरुवात केली होती. “हॅपी अनिव्हर्सरी डार्लिंग.. ” आरशातल्या दिलीपकडे बघून ती म्हणाली आणि गर्रकन मागे वळली..…पण …
तिला फक्त खोलीचं उघडलेलं दारच दिसलं. “अरे? गेले कुठे ?” असे म्हणून ती पुन्हा मागे वळली. आता पुन्हा ती आरशात बघत होती. आता आरशातील दिलीप हसत होता. न बोलता. हर्षू अजूनही चमत्कारिकच बघत होता. तो कुत्रा भुंकायला लागला होता. खाली पडलेला हर्षूचा टेडी तिने हातात घेतला आणि पुन्हा ती गर्रकन मागे वळली. पुन्हा उघडा दरवाजा सोडून तिला काहीच दिसलं नाही…
आता पुन्हा मागे आरशात वळून पाहण्याचं तिचं डेअरींग झालं नाही. त्या दर्पणातील एक विचित्र ‘दडपण’ तिला जाणवलं. तिला दरदरून घाम फुटला. हातातला टेडिबेअर गळून खाली पडला. ती सारे एका क्षणात समजून गेली. तिला धावायचं होतं.. त्या खोलीच्या बाहेर पडायचं होतं. पण ती धावणार इतक्यात ते दार आपोआप बंद झालं. कडी लागली…. अगदी कायमची.
… पुढे त्या खोलीतून फक्त तिच्या घाबरून कर्कश ओरडण्याचा थोडा वेळ आवाज झाला. मग पुन्हा तशीच भयाण शांतता. ते सारे आता एका वेगळ्याच विश्वात वावरत होते…. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी…. त्या खोलीतील रहस्य तसंच लपवून तो बंगला पुन्हा ऐटीत उभा राहिला… नव्या कुणाची तरी वाट पाहात.
-----------------
गुरुवारी श्री हरीगुरुग्राम येथे असताना अचानक फोन आला आणि मला सांगितलं गेलं की मला कोल्हापूर मेडिकल कॅम्पला जायचे आहे. त्याआधी बर्याच श्रद्धावान भक्तांकडून या कॅम्पबद्दल ऐकले होते, वाचले होते, त्यांचे सुंदर अनुभव ऐकून ह्या कॅम्पबद्दल खूपच उत्सुकता होती. तिथे जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. कसा असेल हा कॅम्प? सगळं कसं वेगळच वाटत होतं.
पुढल्या दिवशी सकाळी तयार होऊन actual कॅम्प साईटला सर्वजण आपापल्या बसमधून निघाले. थंडीची अगदी कोवळी पहाट असल्यामुळे शिरशिरी आणणारी थंडी होती. बोलतानाही तोंडातून वाफा निघत होत्या. बसमधून उतरल्यावर कॅम्पसाईटकडे जाण्यासाठी सर्वजण निघाले. मी पहिल्यांदीच जात असल्यामुळे खूपच उत्सुकता होती, तिथलं वातावरण, गावाकडे असणारी घरे, गावकरी, शाळकरी मुले, सगळं कसं वेगळच वाटत होतं. थोडं पुढे चालल्यावर, actually कॅम्प दिसला! बर्याच मोठ्या जागेवरती डोंगरांच्या कुशीत त्या कॅम्पचा मांडव उभारला होता. अजून थोडं पुढे गेल्यावर प.पू. नंदाई आणि सुचितदादांची निळी bus दिसली आणि मनात म्हंटलं ’आल, सद्गुरु निवास जवळ आलं!’. याआधी नुसतं फोटोतच सगळं पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्षात कोल्हापूरचं सद्गुरु निवास पाहाणार होतो! आणि तेवढ्यात, लांबूनच प.पू. नंदाई आणि सुचितदादा भक्तांचे स्वागत करताना दिसले. वा! किती बरं वाटलं त्यांना बघून! नंदाईच्या प्रेमळ ’हरी ॐ बाळा’ने कॅम्पची मस्त सुरुवात झाली. सद्गुरुनिवासच्या बाजूला काही अंतरावर main stage उभारण्यात आला होता. त्यासमोरील मोकळ्या मैदानात अनेक कापड बांधलेली बोचकी गावाच्या नावाप्रमाणे sort केली होती. जुने ते सोने या योजनेअंतर्गत भक्तांनी दिलेले कपडे या गरजू आणि गरीब गावकर्यांना मिळणार होते! याशिवाय स्वत:च्या hygiene साठी कंगवे, फण्या, अंगावरचे, केसावरचे औषध, टूथपावडर, जलशुद्धीकरण द्रव्य, गॅमा बंझीन, साबण, वॉशिंग पावडर, general वापरासाठी स्वेटर्स, गोधड्या, लहान मुलांना लोकरीपासून बनविलेली खेळणी, शाळेचे युनिफॉर्मस, टोप्या, स्लीपर्स, दोरीच्या उड्या, रिंग्स, फुटबॉल, सुका मेवा मिळणार होते. हे सगळं मिळताना त्या गावकर्यांच्या चेहेर्यावरील समाधान, आनंद हा पाहाण्यासारखाच असतो. या वर्षी ८२ गावांमधील तब्बल ६७८० कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घेतला.
आल्या आल्या त्यांना टोप्या व बिस्कीटे दिली जातात. रांगेत असताना ही मुले बापू-आई-दादांची त्यांनी स्वत:हून तयार केलेली गाणी म्हणत असतात. किती सुंदर वाटतो तो सोहोळा! कॅम्पमध्ये या विद्यार्थ्यांना मोफत चपला, मेणबत्या, काडेपेट्या, पेनाचा बॉक्स, शाळेत खेळण्यासाठी बॅट, बॉल व गणवेशाचे वाटप केले जाते व नंतर त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी, त्यांच्यावर उपचार केले जातात. सर्वात शेवटी सर्वांचे लाडके प.पू. नंदाई व सुचितदादा या मुलांना ’अन्नपूर्णा प्रसादम’ योजनेअंतर्गत स्वत:हून गरमागरम जेवण वाढतात!
0 comments:
Post a Comment