General

Hearsch Bakery चा बर्गर....

05:22:00 Nandan Bhalwankar 0 Comments


काही दिवसांपूर्वीच आमच्या office मध्ये एका व्यक्तीचे promotion झाले, त्यानिमित्त, आमच्या team मधल्या सर्वांसाठी Hearsch Bakery चा बर्गर आणला होता, खूपच चविष्ट होता तो, खाता खाताच ही blog post लिहावीशी वाटली,


भारत हा food म्हणजेच खाण्य़ाचा बराच शौकीन आहे. विविध खाद्यपदार्थ, मसाले, फळे, भाज्या, पीके इथे मुबलक प्रमाणात येतात आणि परदेशातून मागवलेही जातात. शिवाय विविधतेतून एकता या तत्त्वावर उभा असलेला असा हा भारत देश, त्यामुळे वेगवेगळ्या जाती, धर्मातले खाद्यपदार्थ येथे बनवले जातात आणि खाल्ले जातात, एवढेच नव्हे, तर international recepies चा देखील अस्वाद घेतला जातो.









आजकाल आपण पाहातो, टी. व्ही. वर वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे programmes दाखवले जातात, त्यात नवनवीन recepies कशा बनवायच्या, त्या बनवताना कोणते जिन्नस घ्यावे, खाद्यपदार्थ चविष्ट वव रुचकर होण्यासाठी कशा योग्य प्रमाण त्यांचा वापर करावा हे सर्वकाही दिलेले असते. उदाहरणच द्यायचे झाले तर झी मराठी वरचा ’आम्ही सारे खवय्ये’, ’रुचिरा’, ’मेजवानी’, तसेच पूर्वीचा संजीव कपूरचा ’खाना खजाना’ ही सगळी उदाहरणे आपल्या रोजच्या वापरातीलच आहेत. याशिवाय आजकाल खाद्यपदार्थ बनवण्यासाठी देखील competition सुरु झाल्या आहेत. मास्टर शेफ सारखा प्रसिद्ध कार्यक्रम तर अख्या जगात प्रसिद्ध आहे, जो याच गोष्टींशी निगडीत आहे. त्याचे परीक्षण करण्यासाठी सुप्रसिद्ध असे जजेस/ शेफ आहेत. काही शेफ्स नी तर स्वत:ची उपहारगृहे भारताबाहेरही उघडली आहेत आणि ती व्यवस्थीत चालू आहेत. उपहारगृहांवरुन लक्षात आलं, आजकाल लोक घरच्या खाण्यापेक्षाही Hotel ला जाणच जास्त पसंत करतात, त्यामुळे Hotels ची संख्य़ाही शहरामध्ये झपाट्याने वाढीस लागली आहे. वेगवेगळे आणि आवडते मुबलक पदार्थ एकाच ठिकाणी मिळत असल्याकारणामुळे Hotels ही सगळ्यांची गरजेची जागा बनत चालली आहे. थोडक्यात काय, तर खाद्यपदार्थ हा एक हळुहळू व्यवसाय बनत चालला आहे, व प्रत्येक जण त्याचा पूरेपूर उपयोग करत आहे, खाण्यासाठी आणि खाणे बनविण्यासाठी सुद्धा!

प. पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू (Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi) देखील खाण्याचे खूप शौकीन आहेत. चिकन व इतर नॉन व्हेज पदार्थांसारखेच subway sandwitch ला देखील त्यांची पसंती जाते. 

You Might Also Like

0 comments: