Movie Reviews
टेलिव्हिजन वर पूर्वी ’आपण ह्यांना पाहिलत का?’ हा कार्यक्रम पाहिला असेल. का कार्यक्रम पाहताना कधीकधी मला एक प्रश्न पडायचा - ह्या हरवलेल्या लोकांचे काय होत असावे? ते कुणाला मिळत तरी असावेत का? आणि कुणाला हे हरवलेले लोक आढळलेच, तर त्यांचं पुढे काय होत असावे? कोण त्यांना त्यांच्या घरी नेण्यासाठी, घरच्यांना कळवण्याची दक्षता घेत असावे का? त्यात जर हरवलेली व्यक्ती मुकी असली तर मग काय विचारायचीच सोय नाही. पण ’बजरंगी भाईजान’ हा चित्रपट पाहताना मला माझ्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर मिळालं.
मूळची पाकिस्तानात राहात असलेली, पण तिच्या आईबरोबर भारतात येऊन तिथेच हरवलेली मुकी मुलगी बजरंगी भाईजानला मिळते आणि ह्या बजरंगी भाईजानच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. त्या मुलीचा धर्मच वेगळा असल्यामुळे तिच्या चालिरीती, वर्तणूक ही सगळीच वेगळी असते. शिवाय ती मुलगी आली कुठून, कोण आहे याचा काहीच पत्ता नाही, त्यात तिच्या मूकपणामुळे काही समजायलाच मार्ग नसताना एकेका प्रसंगातून त्या मुलीविषयी आपोआप मिळालेली माहिती सर्व प्रेक्षकांना थक्क करते. ती मुलगी पाकिस्तानमधली आहे हे कळल्याबरोबर अगदी कशाचीही पर्वा न करता हा बजरंगी भाईजान इंडियन बॉर्डर बिनधास्त क्रॉस करतो आणि पाकिस्तानात घुसतो (ती तर पाकिस्तानी आहे, मग मी का मदत करावी? असा विचार न करता). त्यानंतर त्या मुलीच्या फॅमिलीच्या शोधात असलेला असा तो पाकिस्तानचा जवळपास ’वॉन्टेड’ बनतो. या सगळ्या शोध मोहिमेत झालेली मजा, त्या मुलीला शोधण्यासाठी जिवाचं रान करणारा बजरंगी भाईजान, साक्षात श्रीह्नुमानाचा सच्चा आणि कट्टर भक्त असणार्या ह्या बजरंग भाईजानला खोटं बोलण्याची नसलेली सवय, पोलिसांना हातोहात चकमा देऊन त्या मुलीला शेवटी तिच्या घरी सुखरूप पोहोचवण्यामधे बजरंगीला मदत करणारा एक रिपोर्टर, आपली परत मिळाल्यावर मुलीच्या झालेल्या आईची झालेली अत्यानंदाची स्थिती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे.
या चित्रपटामुळे सोशल मिडियाचा प्रभाव, त्याची ताकदही सुस्पष्ट झाली. ह्या हरवलेल्या मुलीच्या सोशल मिडियावर टाकलेल्या शूटींगमुळे त्या मुलीचे आई-वडील तर परत मिळालेच, शिवाय अख्खा भारतच नव्हे, तर पाकिस्तानही या विधायक कार्यात बजरंगी भाईजानला पाठिंबा देता झाला आणि शेवटी अत्यंत मानाने बजरंगी भाईजानला पाकिस्तान ते भारताची बॉर्डर कॉस करता आली. एक खूपच उत्तम, आपल्या डोळ्यांत पाणी आणणारा, आणि आपल्या देशावर सच्चे प्रेम करायला लावणारा हा चित्रपट अगदी नक्की पाहायलाच हवा!!!
Aniruddha BapuNandai and Suchitdada distributing material KMHC2016
Nandai and Suchitdada distributing material KMHC2016
Nandai and Suchitdada distributing material KMHC2016
06:11:00
Nandan Bhalwankar
0 Comments
06:11:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuKolhapur Medical Camp 2016
Kolhapur Medical Camp 2016
Kolhapur Medical Camp 2016
02:11:00
Nandan Bhalwankar
0 Comments
02:11:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuKolhapur Medical Camp 2016 Satsang
Kolhapur Medical Camp 2016 Satsang
Kolhapur Medical Camp 2016 Satsang
01:41:00
Nandan Bhalwankar
0 Comments
01:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuKolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
01:41:00
Nandan Bhalwankar
0 Comments
01:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuKolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
01:41:00
Nandan Bhalwankar
0 Comments
01:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuKolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
01:41:00
Nandan Bhalwankar
0 Comments
01:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuKolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
01:41:00
Nandan Bhalwankar
0 Comments
01:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Kolhapur Medical and Healthcare Camp website
00:29:00
Nandan Bhalwankar
0 Comments
00:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Movie Reviewsएअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift
एअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift
04:05:00
Nandan Bhalwankar
0 Comments
04:05:00 Nandan Bhalwankar 0 Comments
हल्लीच रिलीज झालेल्या ’एअरलिफ्ट Airlift’ या चित्रपटाविषयी वाचले, आणि त्याबद्दलचे रिव्ह्यूजही पाहिले, लगेचच चित्रपटही पाहिला. हा चित्तथरारक चित्रपट पाहताना अगदी प्रत्येक प्रेक्षक रंगून गेला आणि चित्रपटाच्या कथानकाच्या बरोबर प्रवाहात वाहात गेला. एक जबरदस्त विषय, तितकाच जबरदस्त चित्रपट, थ्रिलर आणि रोमांचकारी कथानक, जीवंत वाटणारे कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय या अशा सगळ्या उत्तमोत्तम गोष्टीत प्रेक्षक अलगद गुंफला जातो आणि या चित्रपटाच्या पार मोहात पडून त्याकडे ओढला जातो. चित्रपटाचे नाव वाचून साधारणत: एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनचे चित्रण असावे असा आपला अंदाज खरा ठरतो, पण हा अंदाज इतक्या थरारकपणे आणि परखडपणे मांडला आहे की त्याची भेदकता प्रेक्षक संपूर्ण चित्रपटापर्यंत अनुभवतो.
’एअरलिफ्ट’ ही एका ’रणजीत कट्याल’ नामक भारतीयाची कहाणी आहे, ज्याचा कुवैतमधे स्वत:चा जम बसवलेला बिझनेस आहे. १९८० - १९९० च्या दशकामधे इराक आणि कुवैत या दोन्ही सत्तांमधील संघर्षामधे प्रत्येक कुवैती भरडला गेला. इराकमधील सैन्यदलाने अत्यंत क्रूरपणे आणि अमानुषपणे कुवैती नागरिकांवर सत्ता गाजवली आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया न दाखवता हल्ला चढवला. कुवैत मधे तेव्हा स्थायिक असलेल्या जवळपास पावणे दोन लाख भारतीयांना ’अचानक’ स्वदेश आठवला आणि त्यांना मायदेशी परतण्याची निकडीची गरज निर्माण झाली. पण इंडियन एंबसीचेसुद्धा इराकी सैनिकांनी हात बांधून ठेवले असल्यामुळे एवढ्या भारतीयांना स्थलांतरीत करणे हे निव्वळ अशक्य होऊन बसले. इकडे आड आणि तिकडे विहिर अशा विचित्र परिस्थितीत अडकलेल्या सार्या भारतीयांना आता या रणजीत कटियालचाच आधार वाटू लागला. स्वत:ला अगदी सहज भारतात परत जाणे शक्य असणार्या कटियालने तसे न करता संकटात अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला फिजीकली आणि मेंटली सपोर्ट दिला आणि नकळत त्यांचा तो लिडर बनला. एवढ्या सार्या भारतीयांना अशा आणीबाणीच्या परिस्थीतीत सुरक्षित ठेवणे हे जवळपास अशक्यप्राय होते, तरीही त्याने सगळ्यांना सांभाळलं, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या अडकलेल्या भारतीयांसाठी, त्यांना स्वदेशी परत पाठवण्यासाठी शक्य असेल ती सगळी मदत तो करत होता. मनात धगधगती जिद्द असल्यामुळे स्वत:च्या फसलेल्या प्रयत्नांनीही तो निराश न होता शेवटी त्याने हाती घेतलेले हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफूल करून दाखवले.
या चित्रपटातील काही व्यक्तीरेखा आणि प्रसंगही जरूर नमूद करावेसे वाटतात. कटियालच्या ऑफिसात केवळ एक आसरा म्हणून घुसलेला, सदैव तक्रार करणारा आणि असमाधानी असलेला वृद्ध गृहस्थ, त्याचा चित्रविचित्र संवादामुळे नकळतच चित्रपटात घडणारे हलके विनोद, तसेच त्याच्या वर्तनामुळे आलेला राग प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटपर्यंत जाणवतो. कटियालच्या या रेस्क्यु ऑपरेशनमधे खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलेली त्याची बायको, तिचा ताकदीचा अभिनय, कटियालला परोपरी मदत करणारा आणि स्वत:ची नुकतीच लग्न झालेली बायको या आणीबाणीच्या प्रसंगात हरवली असतानाही केवळ एका कुवैती नागरीकाम्च्या सुटकेसाठी पासपोर्टवर तिचा पती दर्शवणारा साजीद; सगळ्या भारतीयांच्या सुटकेबरोबरच एका असहाय्य कुवैती स्त्रीच्याही पाठी खंबीरपणे उभा राहणारा आणि तिला कुवैतमधून सहीसलामत बाहेर काढणारा कटियाल; एकीचे बळ मिळते फळ या म्हणीप्रमाणे शेवटच्या चेकपोस्टला इराकी सैन्याला शस्त्ररहीत भारतीयांच्या सहाय्याने चारलेली धूळ; तसेच चित्रपटातील काही संवाद मनाला अतिशय भावतात आणि कायम लक्षात राहतात.
’एअरलिफ्ट’ हा वॉर थ्रिलर सिनेमा खरोखरीच सुपर्ब आहे. सर्वांनी अवश्य बघावा असा आहे. हा चित्रपट चालू असताना काही प्रसंगांना टाळ्या वाजवायला आपसूकच हात पुढे सरसावले. हा चित्रपट संपल्यावर काही प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावलेल्या जाणवल्या - नक्कीच देशप्रेमामुळे. प्रेक्षक बाहेर जाण्यासाठी उभे तर राहिले, पण पार शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे पाय थिएटरबाहेर निघेना. हे या चित्रपटाचे यश आहे असे वाटते. तर हा असा सुंदर चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी कोणत्याही प्रेक्षकाने दवडू नये असे मनापासून वाटते.
Aniruddha BapuAniruddha Bapu Nandai at Vitthal Mandir Vadala
Aniruddha Bapu Nandai at Vitthal Mandir Vadala
Aniruddha Bapu Nandai at Vitthal Mandir Vadala
23:28:00
Nandan Bhalwankar
0 Comments
23:28:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Movie Reviews’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली
’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली
02:00:00
Nandan Bhalwankar
0 Comments
02:00:00 Nandan Bhalwankar 0 Comments
’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली
’तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय?’ असे वाक्य नवीन वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना मला एकाने विचारले. खरे सांगायचे तर माझा गेल्या वर्षीचा संकल्पच पूर्ण झाला नव्हता. तर या वर्षी अजून कुठला नवीन सकल्प करणार? वरील प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकला असेल. शिवाय प्रत्येक नवीन वर्षी नवनवीन संकल्प केला असेल.
प्रत्येक वर्षीच्या एक जानेवारीला आपण प्रत्येकच ’एक किंवा अनेक गोष्टी आपण वर्षभर करणार’ असे मनोमन ठरवत असतो. ठरवल्यानंतर पुढचे थोडे दिवस ते कटाक्षाने पाळतही असतो. पण दिनांक २० जानेवारी २०१६ च्या दैनिक प्रत्यक्ष मधे प्रसिद्ध झालेल्या कवितेत म्हंटल्याप्रमाणे काही दिवसातच आपल्या संकल्पाचे तीन-तेरा वाजलेले असतात. ह्या कवितेतीअ व्यक्ती ही सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. नवीन वर्षी थंडी असल्यामुळे गारवा आणि निद्रा यांची दाट युती होते आणि अंगावरच्या उबदार शालीखाली पहुडायचे असल्यामुळे सकल्प उद्यावर ढकलला जातो. असे करता करता पुढला ऋतु उगवतो. उन्हाळ्यात रात्रीची झोप नाही म्हणून आणि पावसाळ्यात चिखलात चालवत नाही म्हणून संकल्पाचा विसर पडतो. असेच दिवस जातात आणि पुढलं वर्ष उगवते. ही कविता वाचत असताना ती आपल्यासाठीच लिहिली आहे की काय असे प्रत्येकालाच वाटले असेल. कवितेतील ओळी वाचून ओठावर नकळतच हसू आले. संकल्प जरी केला तरी त्यासाठी सातत्य, निश्चय आणि योग्य प्रयास यांची जोड आवश्यक असते. तरच केलेला संकल्प सत्यात उतरू शकतो. नाहीतर ’ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीनुसार परत सालाबादप्रमाणे नवीन वर्ष उगवते.
वास्तविक पाहाता चांगला आणि योग्य संकल्प करणे हे खरोखरीच चांगले. पण नुसता विचार जितका सोप्पा असतो, कृती तितकीच कठीण व आवश्यक असते. नाहीतर संकल्पाच्या दोर्याच्या गुच्छामधील दिवसागणीक एक एक धागा गळून पडतो आणि शेवटी हाती काहीच लागत नाही. माझ्या दहावीला पु. ल. देशपांडे यांच्या ’बटाट्याची चाळ’ मधील एक धडा होता. त्या लेखातील पंत वजन कमी करण्याचा संकल्प करतात. हे करताना ते ज्या ज्या प्रसंगातून जातात ते वाचून आपले हसू आवरता आवरत नाही आणि इतके करून त्यांचे वजन वाढलेलेच आढळते. ही कविता वाचून मला त्याचीच आठवण झाली.
संकल्प केला तरी तो सत्यात उतरवणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. ’प्रत्यक्ष’ मधील ही कविता सार्या वाचकांनाच आनंद देऊन गेली, शिवाय थोडा विचारही करण्यास भाग पाडले, हे या कवितेचे विशेष आणि कविता लिहिणार्या व्यक्तीचे मनापासून अभिनंदन!!
Aniruddha BapuAniruddha Bapu at Shree Vishnu Sahastranaam Pathan
Aniruddha Bapu at Shree Vishnu Sahastranaam Pathan
Aniruddha Bapu at Shree Vishnu Sahastranaam Pathan
07:53:00
Nandan Bhalwankar
0 Comments
07:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuAniruddha Bapu at Vishnu Sahastranaam Pathan
Aniruddha Bapu at Vishnu Sahastranaam Pathan
Aniruddha Bapu at Vishnu Sahastranaam Pathan
07:53:00
Nandan Bhalwankar
0 Comments
07:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuVishnu Sahastranaam at Gurukshetram
Vishnu Sahastranaam at Gurukshetram
Vishnu Sahastranaam at Gurukshetram
05:53:00
Nandan Bhalwankar
0 Comments
05:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuAniruddha Bapu at Shree Harigurugram 2
Aniruddha Bapu at Shree Harigurugram 2
Aniruddha Bapu at Shree Harigurugram 2
04:29:00
Nandan Bhalwankar
0 Comments
04:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments
’बंध नायलॉनचे’ Excellent #marathi #Movie
23:57:00
Nandan Bhalwankar
0 Comments
23:57:00 Nandan Bhalwankar 0 Comments
’बंध नायलॉनचे’ - Excellent #marathi #Movie
सध्याच्या फास्ट युगात तंत्रज्ञानाच्या अति वापरामुळे नात्यांमधील रेशमी भावभावनांचे धागे विरतात, ते नायलॉनचे बनून जातात, अशा वेळेस technical-smart गोष्टीच आपोआपच आपले मित्र-नातलग होऊ पाहतात... आणि नकळत आपणच स्वत: एक यंत्र बनू लागतो. पण शेवटी माणूस हा माणूस आहे आणि रोबोट हा रोबोट...... अशा हटके संकल्पनेचा ’बंध नायलॉनचे’ हा चित्रपट एक सुंदर कलाकृतीच आहे!
Movie Trailer : https://www.youtube.com/watch?v=2hnaHRvisyo
Subscribe to:
Posts (Atom)
Interests
Total Blog Pageviews....
God doesn't own a phone, but I talk to Him
He isn't on Facebook, but still He is my best friend
He is not on Twitter, but I still follow Him
- Aniruddha Only for you.... I am B.Tech. in Computer Technology from V.J.T.I., Mumbai and working with Reliance Foundation. For me my Sadguru - Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi, M.D. Medicine is the ultimate, he is my best'est' friend, philosopher and guide.
Nandan Bhalwankar
Archive
-
▼
2016
(
103
)
-
▼
February
(
20
)
- बजरंगी भाईजान
- Nandai and Suchitdada distributing material KMHC2016
- Kolhapur Medical Camp 2016
- Kolhapur Medical Camp 2016 Satsang
- Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
- Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
- Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
- Kolhapur Medical Camp 2016 Satsang at Village
- Kolhapur Medical and Healthcare Camp website
- एअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift
- Nandai
- Aniruddha Bapu videos
- Aniruddha Bapu Nandai at Vitthal Mandir Vadala
- ’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली
- Aniruddha Bapu at Shree Vishnu Sahastranaam Pathan
- Aniruddha Bapu at Vishnu Sahastranaam Pathan
- Vishnu Sahastranaam at Gurukshetram
- #Exponent Group of #Journals #website
- Aniruddha Bapu at Shree Harigurugram 2
- ’बंध नायलॉनचे’ Excellent #marathi #Movie
-
▼
February
(
20
)
Multilingual Blogs
-
-
-
Global Hybrid Warfare6 years ago
-
-
-
-
Om Krupasindhu Shri Sainathay Namaha10 years ago
-
ପ. ପୂ. ସଦ୍ଗୁରୁ ଅନିରୁଦ୍ଧ ବାପୂ11 years ago
Some of My Favorite Stuff....
My Favourite Blog List
-
-
-
-
-
-
-
-
-
-
Testing facebook Embedding11 years ago
-
-
-
-
0 comments:
Post a Comment