Movie Reviews

बजरंगी भाईजान

04:24:00 Nandan Bhalwankar 0 Comments

टेलिव्हिजन वर पूर्वी ’आपण ह्यांना पाहिलत का?’ हा कार्यक्रम पाहिला असेल. का कार्यक्रम पाहताना कधीकधी मला एक प्रश्न पडायचा - ह्या हरवलेल्या  लोकांचे काय होत असावे? ते कुणाला मिळत तरी असावेत का? आणि कुणाला हे हरवलेले लोक आढळलेच, तर त्यांचं पुढे काय होत असावे? कोण त्यांना त्यांच्या घरी नेण्यासाठी, घरच्यांना कळवण्याची दक्षता घेत असावे का? त्यात जर हरवलेली व्यक्ती मुकी असली तर मग काय विचारायचीच सोय नाही. पण ’बजरंगी भाईजान’ हा चित्रपट पाहताना मला माझ्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर मिळालं. 

मूळची पाकिस्तानात राहात असलेली, पण तिच्या आईबरोबर भारतात येऊन तिथेच हरवलेली मुकी मुलगी बजरंगी भाईजानला मिळते आणि ह्या बजरंगी भाईजानच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. त्या मुलीचा धर्मच वेगळा असल्यामुळे तिच्या चालिरीती, वर्तणूक ही सगळीच वेगळी असते. शिवाय ती मुलगी आली कुठून, कोण आहे याचा काहीच पत्ता नाही, त्यात तिच्या मूकपणामुळे काही समजायलाच मार्ग नसताना एकेका प्रसंगातून त्या मुलीविषयी आपोआप मिळालेली माहिती सर्व प्रेक्षकांना थक्क करते. ती मुलगी पाकिस्तानमधली आहे हे कळल्याबरोबर अगदी कशाचीही पर्वा न करता हा बजरंगी भाईजान इंडियन बॉर्डर बिनधास्त क्रॉस करतो आणि पाकिस्तानात घुसतो (ती तर पाकिस्तानी आहे, मग मी का मदत करावी? असा विचार न करता). त्यानंतर त्या मुलीच्या फॅमिलीच्या शोधात असलेला असा तो पाकिस्तानचा जवळपास ’वॉन्टेड’ बनतो. या सगळ्या शोध मोहिमेत झालेली मजा, त्या मुलीला शोधण्यासाठी जिवाचं रान करणारा बजरंगी भाईजान, साक्षात श्रीह्नुमानाचा सच्चा आणि कट्टर भक्त असणार्‍या ह्या बजरंग भाईजानला खोटं बोलण्याची नसलेली सवय, पोलिसांना हातोहात चकमा देऊन त्या मुलीला शेवटी तिच्या घरी सुखरूप पोहोचवण्यामधे बजरंगीला मदत करणारा एक रिपोर्टर, आपली परत मिळाल्यावर मुलीच्या झालेल्या आईची झालेली अत्यानंदाची स्थिती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे.


या चित्रपटामुळे सोशल मिडियाचा प्रभाव, त्याची ताकदही सुस्पष्ट झाली. ह्या हरवलेल्या मुलीच्या सोशल मिडियावर टाकलेल्या शूटींगमुळे त्या मुलीचे आई-वडील तर परत मिळालेच, शिवाय अख्खा भारतच नव्हे, तर पाकिस्तानही या विधायक कार्यात बजरंगी भाईजानला पाठिंबा देता झाला आणि शेवटी अत्यंत मानाने बजरंगी भाईजानला पाकिस्तान ते भारताची बॉर्डर कॉस करता आली. एक खूपच उत्तम, आपल्या डोळ्यांत पाणी आणणारा, आणि आपल्या देशावर सच्चे प्रेम करायला लावणारा हा चित्रपट अगदी नक्की पाहायलाच हवा!!!    



   

You Might Also Like

0 comments: