Movie Reviews

’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली

02:00:00 Nandan Bhalwankar 0 Comments

’सालाबादप्रमाणे’ ही कविता तंतोतंत पटली

’तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय?’ असे वाक्य नवीन वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना मला एकाने विचारले. खरे सांगायचे तर माझा गेल्या वर्षीचा संकल्पच पूर्ण झाला नव्हता. तर या वर्षी अजून कुठला नवीन सकल्प करणार? वरील प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकला असेल. शिवाय प्रत्येक नवीन वर्षी नवनवीन संकल्प केला असेल. 

प्रत्येक वर्षीच्या एक जानेवारीला आपण प्रत्येकच ’एक किंवा अनेक गोष्टी आपण वर्षभर करणार’ असे मनोमन ठरवत असतो. ठरवल्यानंतर पुढचे थोडे दिवस ते कटाक्षाने पाळतही असतो. पण दिनांक २० जानेवारी २०१६ च्या दैनिक प्रत्यक्ष मधे प्रसिद्ध झालेल्या कवितेत म्हंटल्याप्रमाणे काही दिवसातच आपल्या संकल्पाचे तीन-तेरा वाजलेले असतात. ह्या कवितेतीअ व्यक्ती ही सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. नवीन वर्षी थंडी असल्यामुळे गारवा आणि निद्रा यांची दाट युती होते आणि अंगावरच्या उबदार शालीखाली पहुडायचे असल्यामुळे सकल्प उद्यावर ढकलला जातो. असे करता करता पुढला ऋतु उगवतो.  उन्हाळ्यात रात्रीची झोप नाही म्हणून आणि पावसाळ्यात चिखलात चालवत नाही म्हणून संकल्पाचा विसर पडतो. असेच दिवस जातात आणि पुढलं वर्ष उगवते. ही कविता वाचत असताना ती आपल्यासाठीच लिहिली आहे की काय असे प्रत्येकालाच वाटले असेल. कवितेतील ओळी वाचून ओठावर नकळतच हसू आले. संकल्प जरी केला तरी त्यासाठी सातत्य, निश्चय आणि योग्य प्रयास यांची जोड आवश्यक असते. तरच केलेला संकल्प सत्यात उतरू शकतो. नाहीतर ’ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीनुसार परत सालाबादप्रमाणे नवीन वर्ष उगवते. 

वास्तविक पाहाता चांगला आणि योग्य संकल्प करणे हे खरोखरीच चांगले. पण नुसता विचार जितका सोप्पा असतो, कृती तितकीच कठीण व आवश्यक असते. नाहीतर संकल्पाच्या दोर्‍याच्या गुच्छामधील दिवसागणीक एक एक धागा गळून पडतो आणि शेवटी हाती काहीच लागत नाही. माझ्या दहावीला पु. ल. देशपांडे यांच्या ’बटाट्याची चाळ’ मधील एक धडा होता. त्या लेखातील पंत वजन कमी करण्याचा संकल्प करतात. हे करताना ते ज्या ज्या प्रसंगातून जातात ते वाचून आपले हसू आवरता आवरत नाही आणि इतके करून त्यांचे वजन वाढलेलेच आढळते. ही कविता वाचून मला त्याचीच आठवण झाली. 

संकल्प केला तरी तो सत्यात उतरवणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. ’प्रत्यक्ष’ मधील ही कविता सार्‍या वाचकांनाच आनंद देऊन गेली, शिवाय थोडा विचारही करण्यास भाग पाडले, हे या कवितेचे विशेष आणि कविता लिहिणार्‍या व्यक्तीचे मनापासून अभिनंदन!!    

You Might Also Like

0 comments: