Movie Reviews
आज ३१ डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस.... ३१ डिसेंअर म्हंटले की सर्वांना आठवतो तो उत्साह, जल्लोश. आदल्या रात्री ऑफिसमधून बसने घरी जात असताना साधारण असाच काहीसा विचार माझ्या मनात आला. आणि त्याच क्षणी माझ्या समोर आली ती जत्रा. रस्त्याच्या उजवीकडे ही जत्रा अगदी उत्साहात चालू होती, सगळे जण आनंदात दिसत होते. Giant Wheel, Rainbow, Round fast train अशा काही राईड्स् अगदी समोरच दिसल्या. पाहूनच मला उत्साहाचे भरते आले.
अगदी खूप वर्षांपूर्वी मी Giant Wheel मधे बसलो होतो. काय धम्माल आली होती तेव्हा. ’अरे तू लहान आहेस का?’,’अशा जत्रांना जायला वय काय तुझं?’,’जत्रेत तू एकटाच जाणार काय?’ यासारखे अनेक प्रश्न मला लोकांनी केले होते. पण या पलीकडे जाऊनही आपल्याला त्या जत्रेतून मिळणारा आनंद कैक पटींचा आहे, त्यामुळे बाकीचे काय म्हणतील हा विचार मी पहिल्यांदी बाजूला सारला आणि मी त्या जत्रेत जायचचं असा मनात ठाम निर्धार केला.
इथे ’आयुष्यावर बोलू काही’ (Aayushyawar Bolu Kahi) ह्या अल्बममधील गाणं आठवलं -
मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा
वेळ पाहूनी खेळ मांडणे ना मंजूर
आपण बर्याचदा मला काय हवे आहे हे विचार करण्यापेक्षा लोक काय म्हणतील हा विचार करत असतो. यापेक्षा मला आनंद कुठल्या चांगल्या गोष्टीपासून मिळणार असेल, तर मी बाकी कुठला विचार का करायचा? मला त्या जत्रेत जाण्याची इच्छा झाली आणि मी गेलो. अगदी मनात आल्यावर लगेच एकटाच गेलो आणि खरं सांगतो, काय धम्माल आली तिथे मला...
शिरल्या शिरल्या समोरच दिसले ते जायंट व्हील. त्या अजस्त्र पाळण्यात बसताना पोटात गोळाच येतो. खालून पाहताना पार गगनाला भिडलेला तो पाळणा बघून एक क्षणभरच मनाचा थरकाप उडाला, पण मी त्यात बसायचं ठरवलं होतं आणि मी त्यात बसलोच. तो अवाढव्य पाळणा आणि त्यात बसलेली ती ’केविलवाणी’ माणसे पाहून थोडी भिती वाटली, पण तीसुद्धा एक क्षणच. त्यानंतर जो तो झुला अफाट आकाशात गेला तो पार क्षितीजाच्या रेषेलाच जाऊन भिडला असे जाणवायला लागले, हळुहळू जमीनीवरील माणसे आणि जत्रेतील बाकीचे खेळ छोटे छोटे होत गेले... आणि परत तो झुला आता जमिनीच्या दिशेने गोल गोल फिरू लागला. बापरे, त्या क्षणाला काय वाटले म्हणून सांगू! माझ्या पोटातील एक एक अवयव माझ्या गळ्यात येतोय की काय असे मला वाटू लागले. पण ते फीलींग भन्नाट होतं, सॉल्लिड होतं. असे बरेच राऊंडस् जेव्हा त्या पाळण्याने घेतले तेव्हा एकदम भारी वाटत होतं. आणि शेवटी तो झुला हळुहळू थांबला. त्यातून बाहेर आल्यावर मला मी एखादा स्टंट केलाय की काय असे मला जाणवू लागले. पण तो स्टंट लै भारी होता. मी एकदाच नाही, तर परत एकदा झपाटून मी त्या झुल्याची सफर अनुभवली. खूप मजा आली मला. दिवस एन्जॉय केला मी.
मी जेव्हा त्या मोठ्या झुल्यावर होतो तेव्हाच तेथे वरती बसून मी जत्रेतील खालचे खेळ पाहून घेतले होते. पुढे कुठे जायचे हे तेव्हाच मी मनाशी निश्चित केले. त्यानुसारच मी पुढच्या खेळाकडे गेलो. ती एक मोठ्ठी वर्तुळाकार राईड होती. सर्वजण एका खळग्यात बसले की ते यंत्र चालू होणार होतं आणि वायूवेगाने ते गोल गोल फिरणार होतं. त्या आकाशझुल्यामधे आणि याच्यात एकच फरक होता, तो झुला आकाशात होता तर हे यंत्र जमिनीवरच गोल गोल गिरक्या घेत होते पण प्रचंड वेगाने. येथेही आधीच्याप्रमाणेच मजा आली. अगदी शब्दांत सांगता न येणारी मजा. एक वेगळीच अनुभुती या जत्रेतून मला मिळत होती.
पुढे कशाकशात बसू असे मला झाले. तिथे एक रेनबो पाळणा होता. समुद्राच्या अजस्त्र लाटांवर जशी एक मोठी नौका हेलखावे खाईल, त्याप्रमाणे हा झुला जमिनीवर सारखे हेलखावे खात होता. यामधेही तेच. अगदी तोच थरार. ती भन्नाट अनुभुती.
या जत्रेत फिरताना माझे वेळेचे भान हरपले होते, शेवटी मला घरून फोन आला आणि मी जागा झालो. आपल्याला आता ती जादूई दुनिया सोडावी लागणार या विचाराने किंचीत नरवस व्हायला झाले, पण त्या जत्रेत मी परत जाऊ शकतो या विचारानेच मला एक वेगळाच आनंद झाला. जणू काही तो भरभरून वाहणारा आनंद मी पोत्यात अगदी कोंबून कोंबून भरला आणि त्या जत्रेत एक कटाक्ष टाकून मी निघालो, तिथे परत जाण्यासाठी.
Aniruddha Bapu#SPECIAL #ANNOUNCEMENT on Samir dada's blog
#SPECIAL #ANNOUNCEMENT on Samir dada's blog
00:50:00
Nandan Bhalwankar
0 Comments
00:50:00 Nandan Bhalwankar 0 Comments
GUT BACTERIA : GUT FLORA
02:37:00
Nandan Bhalwankar
0 Comments
02:37:00 Nandan Bhalwankar 0 Comments
मानवी शरीरात काही चांगले बॅक्टेरिया देखील असतात... चांगले बॅक्टेरिया?? हो, हे चांगले बॅक्टेरिया मानवी शरीरात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावतात, तसेच आपले स्वास्थ्य-आरोग्य संतुलित राखण्याबरोबरच निरोगी शरीररही प्रदान करतात.... चला तर मग शरीरातील या चांगल्या बॅक्टेरिया बद्दल अजून माहिती जाणून घेऊया डॉ. अनिरुद्ध जोशी (सद्गुरु श्री अनिरूद्ध बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या http://www.aarogyamsukhsampada.com/gut-bacteria-gut-flora/ या वेबसाईटवर....
Movie ReviewsRanichi Baug (पाहिली राणीची बाग)
झरझर मी तिकीटे काढली आणि ’मी किती लवकर तिकीटे काढली’ या अविर्भावात बाकीच्यांची वाट बघत थांबलो. लगेचच बाकीचे आले. थोडं फोटो शूट झालं, पण बाग दीड तासात बंद होणार असल्याकारणाने स्वच्छंदी मनाला वेळीच लगाम घातला. नंतर थोडं पुढे गेलो तर बागेच्या आतमधे जाण्यासाठी हीss भलीमोठ्ठी रांग.... समोरच अजून एक तिकीट घर दिसलं. मला एकदम दचकायलाच झालं! मी नक्की तिकीटं तरी कसली काढली?? पाठी वळून बघितल्यावर कळलं की अरे मी चुकून बागेच्या प्रिमायसीस मध्येच स्थित ’भाऊ दाजी लाड’ या संग्रहलायाची तिकीटे काढली होती.... सगळे खो खो हसत सुटलो... आमचा छोटू सुद्धा याला अपवाद नव्हता बरं का... त्या तिकीटांचे पैसे अगदी थोडे असले, तरी थोडे का होईना वाया गेले या कल्पनेमुळे मी मनाशीच ठरवलं, बागेतून फेरी मारून आल्यावर या संग्रहालयाला भेट द्यायची.
मग मी राणीच्या बागेची तिकीटे काढली आणि आम्ही त्या अजस्त्र लाईनीचा एक भाग झालो. थोड्या वेळाने रांग पुढे सरकल्यावर आम्ही आतमधे जायच्या गेटपाशी आलो. ह्या सगळ्या प्रकारानंतर आणि वेळ अगदी थोडा राहिल्यामुळे आम्हाला आत जाण्याची अगदी घाई लागून राहिली. गेटच्या बाजूला पाहिले तर सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या! जणू काही प्लास्टिकचेच गेट बनवले आहे की काय असे मनाला चाटून गेले. तिकीट दाखवून आम्ही आत जाणार, तेवढ्यातच एका लेडी पोलिसने आम्हाला अडवले! "पाण्याची बाटली तुम्ही नाही नेऊ शकत!", धुसफुसतच तिने सांगितले. आता आमच्या लक्षात आले, त्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या का ठेवल्या आहेत ते. पण छोट्या सुमेधसाठी पाणी तर लागणारच! मग काय करणार? पोलिस ऐकेचना. शेवटी थोडी हुज्ज्त घातल्यावर बहुदा तीही कंटाळली आणि आम्हाला टपरवेअरची बाटली नेण्याची परवानगी मिळाली. सुटलो बाबा...
आत पहिले पाऊल टाकले आणि समोर पाहिलं तर तोंडाचा आsss झाला. एवढं मोठ्ठ पार्क, त्यात तीन ठिकाणी जाणारे तीन वेगवेगळे मार्ग, सगळं पाहून तरी कसं होणार? शेवटी जास्त विचार करण्यातच वेळ जाईल म्हणून जास्त लोकं ज्या मार्गाने पुढे जात होते, त्या गर्दीत आम्हीही नकळतपणे घुसलो. त्या बागेत अवाढव्य पिंजरे होते, पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्यात झाडांचच संवर्धन केलं आहे की काय असा प्रश्न पडला.... (अहो म्हणजे रिकामे पिंजरेच जास्त होते!) पुढे हत्ती दिसले. ते सुद्धा त्यांच्या घरात आरामच करीत होते. शरीर मोठ्ठ असेल, तरी नजरेस पडतच असं नाही. एवढा मोठ्ठा हत्ती सुद्धा सुमेधची नजर इतस्तत: शोधतच होती! नवलच आहे नाही! नंतर पुढे माणसांचे अनेक पूर्वज पिंजर्यात बंदिस्त दिसले; काही भलतासलता विचार करू नका, माकडांबद्दल बोलतोय मी. तिथे नेमकी त्यांची जुगलबंदी सुरू होती. काहीतरी हलत आहे या भावनेनेच सुमेध एकटक त्या माकडांकडे बघत राहिला... सुमेधच कशाला, आम्ही स्वत:सुद्धा त्यांच्याकडे पाह्ण्यात मग्न झालो होतो. खरं सांगायचे तर सुमेधला आम्हाला वाघोबा दाखवायचा होता. एकाने आम्हाला वाघाचा पिंजरा पुढे आहे असे सांगितले तरी, त्या वेड्या आशेवरच आम्ही त्या अजस्त्र बागेत फिरत होतो.... नंतर आम्हाला कोल्हा, अस्वल, एमू दिसले. पोपटासारखे सुंदर पक्षीही दिसले... त्यात एक अजब चालणारा प्राणीही दिसला... तो पक्षी होता की प्राणी हे अद्याप न कळलेलं गुढच आहे. सापही सुस्तावले होते. बहुदा त्यांचाही रविवार होता. त्यानंतर मात्र आम्हाला एक गंमत दिसली! पाण्यातून एक भला मोठ्ठा हिप्पो बाहेर आला, त्याला पाहून सुमेधबरोबर आमचे डोळे विस्फारलेलेच राहिले. एक हिप्पो बाहेर येतो न येतो तोच दुसरा हिप्पो बाहेर आला. काय धमाल आली ते दृश्य बघताना! लगेचच सुमेधलाही मी हिप्पो बोलायचे शिकवले... अगदी ’हिप्पो’ नाही पण ’पिप्पो’ बोलायला तो शिकला... (आत्ताही तो सारखा पिप्पो पिप्पोच करतोय!)
आता मात्र उद्यानाचा शेवट आला... इतक्यात? हा प्रश्न तुमच्या मनात कदाचीत आला असण्याची शक्यता आहे, पण तुम्ही स्वत: या उद्यानाला भेट दिल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. आम्ही घरीच निघालो होतो, पण एक भन्नाट दृष्य दिसले. मगर आणि हरीण बाजूबाजूला बसलेले दिसल्यामुळे आमचे हसू आम्हाला आवरेनासे झाले. थोडे फोटो काढून आम्ही बर्ड केज कडे आलो. फोटो काढण्याची हीच जागा काय ती आवडली. पण फोटो सोडून त्या पक्ष्यांच्या सौंदर्याकडे आम्ही पाहातच बसलो. खूपच आवडले ते पक्षी! नंतर उद्यानाबाहेर पडलो! मला लगेचच आठवण झाली ती भाऊ दाजी लाड संग्रहालयाची! आम्ही त्या गेटकडे नुसतं पाहिलं आणि आमचा विरस झाला. ६ दारांपैकी केवळ एक दार उघडं होतं. आता हाच आपला चान्स हे लक्षात येताच आम्ही तिथे गेलो... एखाद्या खजिन्याच्या बाहेर एखादा विशाल सर्प फुत्कार टाकत बसावा तसा एक रखवालदार आतमधे जाणार्या व्हिजीटर्सना अडवत होता. मगाचसारखी ह्याच्याशीही आम्ही हुज्जत घालायचा आमचा प्रयत्न फसला. फक्त बाहेरूनच काय ते संग्रहालय पाहिले आणि मनात भडकणारी आग शांत करून घेतली.
अशी ही आमची छोटी ट्रिप सक्सेसफूल झाली.... आम्ही घरी पोहोचलो ते पुढची ट्रिप ठरवूनच! मिशन तारापोरवाला मत्स्यालय!
Ranichi Baug (पाहिली राणीची बाग)
03:22:00
Nandan Bhalwankar
1 Comments
03:22:00 Nandan Bhalwankar 1 Comments
त्या दिवशी रविवार होता, सुट्टीचा दिवस असल्याकारणाने आमच्या फॅमिलीने कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. माझा पुतण्या - छोटा सुमेध हा बाहेर जाण्यासाठी सतत धडपडत असतो, त्यामुळे अम्ही त्याला घेऊन एखाद्या बागेत - राणीच्या बागेत जाण्याचा निर्णय घेतला... जिथे त्याला वेगवेगळे प्राणी-पक्षी पहायला मिळतील....
साधारणत: एका तासानंतर आम्ही सगळे तिथे पोहोचलो. मला पुढे जाऊन तिकीट काढण्याची जवाबदारी दिलेली होती, किंबहुना मी स्वत:हूनच ती वाटून घेतली होती. गेटकीपरला तिकीट कुठे मिळणार ते विचारले. त्याने हातानेच एका दिशेला जाण्याची खूण केली. मला वाटले होते, बाssपरे, किती लाईन असेल नी काय; पण थोडं पुढे गेल्यावर पाहिलं तर काय रांगेत जेमतेम पाच लोकं! वाह! काय मस्त वाटलं तेव्हा!
झरझर मी तिकीटे काढली आणि ’मी किती लवकर तिकीटे काढली’ या अविर्भावात बाकीच्यांची वाट बघत थांबलो. लगेचच बाकीचे आले. थोडं फोटो शूट झालं, पण बाग दीड तासात बंद होणार असल्याकारणाने स्वच्छंदी मनाला वेळीच लगाम घातला. नंतर थोडं पुढे गेलो तर बागेच्या आतमधे जाण्यासाठी हीss भलीमोठ्ठी रांग.... समोरच अजून एक तिकीट घर दिसलं. मला एकदम दचकायलाच झालं! मी नक्की तिकीटं तरी कसली काढली?? पाठी वळून बघितल्यावर कळलं की अरे मी चुकून बागेच्या प्रिमायसीस मध्येच स्थित ’भाऊ दाजी लाड’ या संग्रहलायाची तिकीटे काढली होती.... सगळे खो खो हसत सुटलो... आमचा छोटू सुद्धा याला अपवाद नव्हता बरं का... त्या तिकीटांचे पैसे अगदी थोडे असले, तरी थोडे का होईना वाया गेले या कल्पनेमुळे मी मनाशीच ठरवलं, बागेतून फेरी मारून आल्यावर या संग्रहालयाला भेट द्यायची.
मग मी राणीच्या बागेची तिकीटे काढली आणि आम्ही त्या अजस्त्र लाईनीचा एक भाग झालो. थोड्या वेळाने रांग पुढे सरकल्यावर आम्ही आतमधे जायच्या गेटपाशी आलो. ह्या सगळ्या प्रकारानंतर आणि वेळ अगदी थोडा राहिल्यामुळे आम्हाला आत जाण्याची अगदी घाई लागून राहिली. गेटच्या बाजूला पाहिले तर सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या! जणू काही प्लास्टिकचेच गेट बनवले आहे की काय असे मनाला चाटून गेले. तिकीट दाखवून आम्ही आत जाणार, तेवढ्यातच एका लेडी पोलिसने आम्हाला अडवले! "पाण्याची बाटली तुम्ही नाही नेऊ शकत!", धुसफुसतच तिने सांगितले. आता आमच्या लक्षात आले, त्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या का ठेवल्या आहेत ते. पण छोट्या सुमेधसाठी पाणी तर लागणारच! मग काय करणार? पोलिस ऐकेचना. शेवटी थोडी हुज्ज्त घातल्यावर बहुदा तीही कंटाळली आणि आम्हाला टपरवेअरची बाटली नेण्याची परवानगी मिळाली. सुटलो बाबा...
आत पहिले पाऊल टाकले आणि समोर पाहिलं तर तोंडाचा आsss झाला. एवढं मोठ्ठ पार्क, त्यात तीन ठिकाणी जाणारे तीन वेगवेगळे मार्ग, सगळं पाहून तरी कसं होणार? शेवटी जास्त विचार करण्यातच वेळ जाईल म्हणून जास्त लोकं ज्या मार्गाने पुढे जात होते, त्या गर्दीत आम्हीही नकळतपणे घुसलो. त्या बागेत अवाढव्य पिंजरे होते, पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्यात झाडांचच संवर्धन केलं आहे की काय असा प्रश्न पडला.... (अहो म्हणजे रिकामे पिंजरेच जास्त होते!) पुढे हत्ती दिसले. ते सुद्धा त्यांच्या घरात आरामच करीत होते. शरीर मोठ्ठ असेल, तरी नजरेस पडतच असं नाही. एवढा मोठ्ठा हत्ती सुद्धा सुमेधची नजर इतस्तत: शोधतच होती! नवलच आहे नाही! नंतर पुढे माणसांचे अनेक पूर्वज पिंजर्यात बंदिस्त दिसले; काही भलतासलता विचार करू नका, माकडांबद्दल बोलतोय मी. तिथे नेमकी त्यांची जुगलबंदी सुरू होती. काहीतरी हलत आहे या भावनेनेच सुमेध एकटक त्या माकडांकडे बघत राहिला... सुमेधच कशाला, आम्ही स्वत:सुद्धा त्यांच्याकडे पाह्ण्यात मग्न झालो होतो. खरं सांगायचे तर सुमेधला आम्हाला वाघोबा दाखवायचा होता. एकाने आम्हाला वाघाचा पिंजरा पुढे आहे असे सांगितले तरी, त्या वेड्या आशेवरच आम्ही त्या अजस्त्र बागेत फिरत होतो.... नंतर आम्हाला कोल्हा, अस्वल, एमू दिसले. पोपटासारखे सुंदर पक्षीही दिसले... त्यात एक अजब चालणारा प्राणीही दिसला... तो पक्षी होता की प्राणी हे अद्याप न कळलेलं गुढच आहे. सापही सुस्तावले होते. बहुदा त्यांचाही रविवार होता. त्यानंतर मात्र आम्हाला एक गंमत दिसली! पाण्यातून एक भला मोठ्ठा हिप्पो बाहेर आला, त्याला पाहून सुमेधबरोबर आमचे डोळे विस्फारलेलेच राहिले. एक हिप्पो बाहेर येतो न येतो तोच दुसरा हिप्पो बाहेर आला. काय धमाल आली ते दृश्य बघताना! लगेचच सुमेधलाही मी हिप्पो बोलायचे शिकवले... अगदी ’हिप्पो’ नाही पण ’पिप्पो’ बोलायला तो शिकला... (आत्ताही तो सारखा पिप्पो पिप्पोच करतोय!)
आता मात्र उद्यानाचा शेवट आला... इतक्यात? हा प्रश्न तुमच्या मनात कदाचीत आला असण्याची शक्यता आहे, पण तुम्ही स्वत: या उद्यानाला भेट दिल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. आम्ही घरीच निघालो होतो, पण एक भन्नाट दृष्य दिसले. मगर आणि हरीण बाजूबाजूला बसलेले दिसल्यामुळे आमचे हसू आम्हाला आवरेनासे झाले. थोडे फोटो काढून आम्ही बर्ड केज कडे आलो. फोटो काढण्याची हीच जागा काय ती आवडली. पण फोटो सोडून त्या पक्ष्यांच्या सौंदर्याकडे आम्ही पाहातच बसलो. खूपच आवडले ते पक्षी! नंतर उद्यानाबाहेर पडलो! मला लगेचच आठवण झाली ती भाऊ दाजी लाड संग्रहालयाची! आम्ही त्या गेटकडे नुसतं पाहिलं आणि आमचा विरस झाला. ६ दारांपैकी केवळ एक दार उघडं होतं. आता हाच आपला चान्स हे लक्षात येताच आम्ही तिथे गेलो... एखाद्या खजिन्याच्या बाहेर एखादा विशाल सर्प फुत्कार टाकत बसावा तसा एक रखवालदार आतमधे जाणार्या व्हिजीटर्सना अडवत होता. मगाचसारखी ह्याच्याशीही आम्ही हुज्जत घालायचा आमचा प्रयत्न फसला. फक्त बाहेरूनच काय ते संग्रहालय पाहिले आणि मनात भडकणारी आग शांत करून घेतली.
अशी ही आमची छोटी ट्रिप सक्सेसफूल झाली.... आम्ही घरी पोहोचलो ते पुढची ट्रिप ठरवूनच! मिशन तारापोरवाला मत्स्यालय!
Aniruddha BapuMukhi Naam Tuze Hati Gheuni Taal Ho
Mukhi Naam Tuze Hati Gheuni Taal Ho
Mukhi Naam Tuze Hati Gheuni Taal Ho
08:30:00
Nandan Bhalwankar
0 Comments
08:30:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuDattajayanti 2015 - Nandai and Suchitdada at Shree Gurukshetram
Dattajayanti 2015 - Nandai and Suchitdada at Shree Gurukshetram
Dattajayanti 2015 - Nandai and Suchitdada at Shree Gurukshetram
06:25:00
Nandan Bhalwankar
0 Comments
06:25:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuBapu Aai Dada at Shree Harigurugram
Bapu Aai Dada at Shree Harigurugram
Bapu Aai Dada at Shree Harigurugram
03:42:00
Nandan Bhalwankar
0 Comments
03:42:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuNandai during Shree Durga Bhagawati Aaradhana
Nandai during Shree Durga Bhagawati Aaradhana
Nandai during Shree Durga Bhagawati Aaradhana
00:48:00
Nandan Bhalwankar
0 Comments
00:48:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuAniruddha Bapu Nandai Suchitdada at Shree Gurukshetram
Aniruddha Bapu Nandai Suchitdada at Shree Gurukshetram
Aniruddha Bapu Nandai Suchitdada at Shree Gurukshetram
07:13:00
Nandan Bhalwankar
0 Comments
07:13:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Aniruddha BapuShree Yantra Mahabhishek Poojan at Shree Gurukshetram
Shree Yantra Mahabhishek Poojan at Shree Gurukshetram
Shree Yantra Mahabhishek Poojan at Shree Gurukshetram
22:28:00
Nandan Bhalwankar
0 Comments
22:28:00 Nandan Bhalwankar 0 Comments
शिवाजी पार्क - सकाळी ६:३० वाजता .....
23:16:00
Nandan Bhalwankar
0 Comments
23:16:00 Nandan Bhalwankar 0 Comments
आज बर्याच दिवसांनी भल्या पहाटे (सकाळी ६:३० वाजता) शिवाजी पार्क, दादर येथे जाणे झाले. आधीच कडाक्याची थंडी, मस्त आल्हाददायी वातावरण, नुकतच उगवलेलं सकाळचं कोवळं उन या सगळ्या निसर्गाच्या मिलाफामुळे एक जबरदस्त पॉझिटीव्हीटी जाणवली.... खूपच फ्रेश वाटलं. सकाळी मॉर्निंग वॉक घ्यायला डॉक्टर का सांगत असतात हे मला आज कळलं. सकाळी उगवणार्या त्या सोन्याच्या गोळ्याची लाली, ते कोवळं उन, त्याची गंमत ही न्यारीच. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू (Sadguru Shree Aniruddha Bapu) यांनीही त्यांच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे प्रभातसमयी उगवणार्या किरणांच्या उषेमध्ये अश्विनीकुमारांचे वास्तव्य असते. हे अश्विनीकुमार आपल्याला उत्तम आरोग्य प्रदान करतात आणि व्याधी नाहीशा करतात. अशा समयी त्या सूर्यनारायणाकडे पाहून, त्याला वंदून श्री गुरुक्षेत्रम् मंत्र (Shree Gurukshetram Mantra) म्हणण्याचे सुख हे अवर्णनीय असते! त्यातच सोने पे सुहागा म्हणजे आज पद्मश्री वसंतराव देशपांडे यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्क येथे एक संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळच्या सुंदर वेळी त्या श्रवणीय भावगीतांनी चार चाँद लावले. अशी ही उत्तम पहाटेची वेळ कुणीही चुकवू नये असे मनापासून वाटते....
Aniruddha BapuSuchitdada distributing pedhas
Suchitdada distributing pedhas
Suchitdada distributing pedhas
07:05:00
Nandan Bhalwankar
0 Comments
07:05:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Movie Reviewsदृष्यम्
दृष्यम्
00:40:00
Nandan Bhalwankar
0 Comments
00:40:00 Nandan Bhalwankar 0 Comments
हल्ली बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, विनयभंग यांसारख्या बर्याच घटना आपल्या कानावर येतात. वर्तमानपत्रे , न्यूज चॅनेल्सदेखील अशा बातम्या प्रसारीत करताना आपल्याला पहायला मिळतात. या आशयाचे अनेक चित्रपटही येऊन गेले आहेत. पीडीत स्त्री, आरोपी, कोर्ट, मिडीया हे सगळं चक्र त्यात अगदी परफेक्ट मांडलेलं दिसतं. हे सगळं पाहिल्यावर नकळतच आपल्याला चीड येते, संताप होतो आणि वाईट कृत्य करणार्या आरोपीला चांगलीच शिक्षा व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते. पण विचार करा, ज्या स्त्रीवर अत्याचार झाला आहे, तीच्या घरातील अख्खी फॅमिली अशा प्रसंगी तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली आणि त्या आरोपीला पार टोकाची शिक्षा दिली तर? ’दिव्याखाली अंधार’ या म्हणीप्रमाणे तो आरोपी पोलिस खात्याच्या अगदी उच्च पदाला असणार्या इन्स्पेक्टर जनरलचाच मुलगा निघाला तर? तर पुढे काय होते ते पाहण्यासाठी ’दृष्यम्’ हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आपण जरूर बघायला हवा.
’दृष्यम्’ मधील नायक हा एक केबल टी.व्ही. ऑपरेटर असून तो, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली अशा मध्यमवर्गीय परिवारातला, अत्यंत साधा, सज्जन आणि आपल्या फॅमिलीवर जीवापाड प्रेम करणारा पिता असतो. शाळेतर्फे एका नेचर कॅम्पला गेलेल्या त्याच्या मोठ्या मुलीचे बाथरूममध्ये लपविल्या गेलेल्या कॅमेरामधे व्हिडिओशूट घेतले जाते. हे शूट घेणारा हलकट मुलगा तिला ब्लॅक्मेल करतो आणि तिला अपरात्री घराबाहेर बोलावतो. या प्रकरणाने अधीच घाबरलेली अशी ती आणि तिची आई यांची त्या मुलाशी झटापट होते आणि यातच ती मुलगी या आरोपी मुलाला ठार करते. दुसर्या दिवशी तिच्या वडिलांना झाला प्रकार समजतो आणि पोलिसांपासून हा सारा प्रसंग लपविण्यासाठी सगळे पुरावे नष्ट करतो. जरी ते दोषी नसले, तरी हा आरोपी मुलगा नेमका पोलिसखात्याच्या इन्स्पेक्टर जनरलचा एकुलता एक मुलगा निघतो. आपल्या बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी मग ती इन्स्पेक्टर जनरल संपूर्ण पोलिस फोर्स ला हाताशी घेते, आणि मग या चित्रपटाला अफलातून रंग चढतो. एक निराधार, खरी, सज्जन फॅमिली आणि पूर्ण पोलिस दल यांची झालेली टक्कर, सिनेमातील नायकाने उभारलेले पुरावे, आकस्मिक धक्के देणारे प्रसंग, आपल्या हातून झालेल्या त्या आरोपी मुलाचा खून लपविण्यासाठी त्याने रचलेला डाव हे अगदी सॉल्लिड आहे. प्रेक्षक संपूर्ण चित्रपट अगदी स्वत: जगतो, त्या सिनेमातील फॅमिलीचा एक घटकच बनतो. अफलातून स्टोरी, पात्रांचा लाजवाब अभिनय, उत्तम चित्रीकरण यामधे प्रेक्षक अगदी चित्रपट संपेपर्यंत दंग होऊन जातो. पार चित्रपटाच्या शेवटपर्यंत आपण स्तब्ध होऊन हा सिनेमा बघत राहतो. सिनेमामधे शेवटी येणार्या ट्विस्ट ला तर तोडच नाही. असा थ्रिलर आणि हीट सिनेमा आपण नक्कीच बघायला हवा.
हल्ली सोशल मिडीयाची ताकद आपण सर्वजणच जाणतो. क्षणात एक गोष्ट वार्यासारखी पसरते. एक स्त्रीची अब्रू हेच तिचे सर्वोच्च आभूषण असते. या चित्रपटातील आरोपी जेव्हा तिचे व्हिडीओशूट सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देतो, तेव्हा त्या मुलीची झालेली निराधार अवस्था बघवत नाही. पण अशा वेळेस आरोपीला मिळालेला धडा हा योग्यच वाटतो. मध्यमवर्गीय माणूस जेव्हा पेटून उठतो, तेव्हा काय होऊ शकते याचा अंदाजही हा सिनेमा आपल्याला देतो. अशा अप्रतीम आणि अफलातून स्टोरीचा चित्रपट आपण कुणीही चुकवता कामा नये.
Movie ReviewsDeool Band Movie - Beyond 5 Stars
Deool Band Movie - Beyond 5 Stars
23:45:00
Nandan Bhalwankar
0 Comments
23:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments
या जगामधे विज्ञान आणि अध्यात्म यांचा नेहेमीच परस्परविरोधी संबंध लावण्यात येतो.विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ नेहेमीच अध्यात्माची शक्ती, तिची ताकद नाकारताना दिसतात. पण अशा वेळेस जिथे विज्ञानाची मर्यादा संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. असा हा अमर्याद परमेश्वरी कृपेचा स्त्रोत आपले कार्य चोख पार पाडतोच. साधारण अशाच धाटणीवर आधारीत असलेला ’देऊळ बंद’ हा चित्रपट अध्यात्म-विज्ञान यांच्या परस्पर जुगलबंदीचे अगदी परफेक्ट चित्रण दाखवतो.
अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेला एक बुद्धीमान भारतीय शास्त्रज्ञ बॉम्ब डिटेक्ट करणारे एक अतिप्रगत सॉफ्ट्वेअर बनवण्याकरता भारतात पाचारण केला जातो. विज्ञान आणि फक्त विज्ञानावरच श्रद्धा असल्यामुळे हा कट्टर नास्तिक असतो. देवाची भजने, सत्संग याचा मुळातच तीटकारा असल्यामुळे राहण्यासाठी देण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समधील देवाच्या देऊळाला तो पोलिसांच्या मदतीने कुलुप ठोकतो. पण या सगळ्यामधे त्याने बनवलेल्या सॉफ्ट्वेअरचा पासवर्डच तो गमावून बसतो, आणि यानंतर सिनेमाला मस्त रंग चढतो. या पासवर्डसाठी त्याने झिजवलेले अनेक तीर्थक्षेत्रांचे उंबरठे, अगदी पावलोपावली देवाने उभारलेले प्रसंग, देवाने केलेल्या योजना, मुळातच नास्तिक असल्यामुळे त्या शास्त्रज्ञाच्या प्रश्नांना देवाने दिलेली सडेतोड उत्तरे, या पासवर्ड शोध मोहिमेत वाटेत आलेला प्रत्येक प्रसंग, आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणार्या त्याच्या आईशी झालेली त्याची भेट, त्याच्या मागावर असणार्या आतंकवाद्यांपासून देवाने केलेले त्याचे रक्षण, आणि शेवटी त्याला गवसलेला पासवर्ड हे चित्रण अतिशय रंजक, पवित्र आणि रमणीय आहे. हाच कट्टर नास्तिक पुढे देवाचे अस्तित्व, त्याची ताकद मान्य करतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. "इफ सायन्स इज अ व्हेईकल, देन स्पिरिच्युऍलिटी ड्राईव्हज् इट" हे त्याचे उद्गारच सारं काही सांगून जातात. शास्त्रज्ञांनी ज्या गोष्टींचे शोध लावले, त्याची मुळात निर्मितीच त्या देवाने केली आहे हे शेवटी त्याला पटतं आणि आपली चूक उमगते.
नास्तिकतेवर आस्तिकता नेहेमीच भारी पडते. देवाचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरीही हा चित्रपट पाहून प्रत्येक नास्तिक हा जरूर आस्तिक होईल आणि देवाच्या नक्की प्रेमात पडेल. उत्तम कलाकार, त्यांचा सुंदर अभिनय, एक अतिशय वेगळा पण जबरदस्त विषय या सगळ्यामुळे हा चित्रपट अगदी हीट झाला आहे. तर असा हा देवाच्या अद्भुत, अतर्क्य, अगम्य लीलेचा आस्वाद घ्यायला लावणारा हा एक सुंदर सिनेमा आवर्जुन पाहण्यासारखा आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, चित्रपटांना जसे स्टार रेटींग दिले जाते, तसे या चित्रपटाला द्यायचे झाले, तर अनेक स्टार्सही कमीच पडतील. असा हा ५ स्टार्सच्या पलीकडला सिनेमा पाहण्याची संधी कुणीही दवडू नये.
Movie Trailer :
Aniruddha BapuWWW3 - The Third World War book by Dr. Aniruddha Joshi
WWW3 - The Third World War book by Dr. Aniruddha Joshi
23:40:00
Nandan Bhalwankar
0 Comments
23:40:00 Nandan Bhalwankar 0 Comments
Excellent #Book (#TWW3 - The #Third #World #War) by Dr. #Aniruddha Joshi (#Aniruddha #Bapu) .....
E-Copy and Print Copy is now available on www.aanjaneyapublications.com website..
Subscribe to:
Posts (Atom)
Interests
Total Blog Pageviews....
244181
God doesn't own a phone, but I talk to Him
He isn't on Facebook, but still He is my best friend
He is not on Twitter, but I still follow Him
- Aniruddha Only for you.... I am B.Tech. in Computer Technology from V.J.T.I., Mumbai and working with Reliance Foundation. For me my Sadguru - Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi, M.D. Medicine is the ultimate, he is my best'est' friend, philosopher and guide.
Nandan Bhalwankar
Archive
-
▼
2015
(
437
)
-
▼
December
(
52
)
- ३१ डिसेंबरची जत्रा
- #SPECIAL #ANNOUNCEMENT on Samir dada's blog
- GUT BACTERIA : GUT FLORA
- Ranichi Baug (पाहिली राणीची बाग)
- Mukhi Naam Tuze Hati Gheuni Taal Ho
- No title
- No title
- Dattajayanti 2015 - Nandai and Suchitdada at Shree...
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- No title
- Bapu Aai Dada at Shree Harigurugram
- Nandai during Shree Durga Bhagawati Aaradhana
- श्री वर्धमान व्रताधिराज रेसिपी बूक (प्रिंट कॉपी) ...
- Aniruddha Bapu Nandai Suchitdada at Shree Gurukshe...
- Shree Yantra Mahabhishek Poojan at Shree Gurukshetram
- शिवाजी पार्क - सकाळी ६:३० वाजता .....
- Suchitdada distributing pedhas
- दृष्यम्
- Deool Band Movie - Beyond 5 Stars
- WWW3 - The Third World War book by Dr. Aniruddha J...
- Aniruddha Bapu at Shree Harigurugram Thursday 17 N...
- Aniruddha Bapu and Suchitdada at Gurukshetram
- Aniruddha Bapu Nandai Suchitdada at Gurukshetram
- Aniruddha Bapu at Gurukshetram 4 Dec 2015
- Aniruddha Bapu Aniruddha Pournima 2015
-
▼
December
(
52
)
Multilingual Blogs
-
-
-
Global Hybrid Warfare6 years ago
-
-
-
-
Om Krupasindhu Shri Sainathay Namaha10 years ago
-
ପ. ପୂ. ସଦ୍ଗୁରୁ ଅନିରୁଦ୍ଧ ବାପୂ11 years ago
Some of My Favorite Stuff....
My Favourite Blog List
-
-
-
-
-
-
-
-
-
-
Testing facebook Embedding11 years ago
-
-
-
-
0 comments:
Post a Comment