🌻 आनंदी पहाट 🌻 शुभदायी पर्व प्रारंभ अपेक्षेची

07:37:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 सुर्योदय ते सुर्यास्त.. तो नित्य होत आहे हजारो वर्षे. याचा हिशेब ठेवण्यासाठी त्याची गणना सुरु झाली. प्रत्येकाची पद्धती वेगळी. जगात आज एक आंग्ल वर्ष समाप्त होत आहे.

        मग या गत वर्षातील घटनांचा उहापोह होणारच. कधी नव्हे एवढया अवघड कोरोना संकटाचा सामना जगाने या वर्षात केलाय. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे संकटाशी लढताना जग एक झाले. पण जेव्हा प्रगत राष्ट्रेही या लढाईत हतबल ठरली होती, तेव्हा भारताने जगाला मदत केली. जगातील प्रत्येक जीव हा आमच्यादृष्टीने शिव आहे त्याची मदत करणारच ही आमची संस्कृती. भारताने या संकटात आत्मनिर्भर होत जगाच्या मदतीत अभूतपूर्व योगदान दिलेय.

        जरी हा विषाणू कितीही मायावी वागला तरीही त्याचा आम्ही धैर्याने सामना केलाय, याचे कारण भारतीय संस्कृतीची जीवनशैली. भारतीय संस्कृतीच्या जीवनशैलीत सणवाराच्या निमित्य बदलत्या हवामानात प्राप्त होणारा सुयोग्य आहार यामुळेही प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत झाली. तसेच इथे डोंगर वृक्षवेली.. पशूंचे महत्व ओळखून त्यांची होणारी  जोपासना आणि शासन नियमांचे.. आदेशांचे पालनही महत्त्वाचे ठरलेय. सर्वांसाठी देशहीत.. 'मानवता' धर्मच सर्वोच्च आहे हे देशवासियांनी सिद्ध केलेय. 

        आजचा सूर्यास्त अमंगल आठवणी गिळंकृत करणार. उद्याचा अरुणोदय सर्वांच्या जीवनात नवे सूर अन नवे तराणे.. नव चैतन्य आणणार.

        या जीवनातील.. भवनातील हे मवाळ सूर आता कायमचे निघून जावोत, हीच प्रार्थना करुन सिद्ध होवू या उद्याच्या मंगलमय.. शुभंकर सूर्योदयासाठी. तो घेऊन येईल आपल्या जीवनात नित्य नूतन 'आनंदी पहाट'.

You Might Also Like

0 comments: