Adhyay 14 (अध्याय १४)

05:47:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 








रतनजी पारशी कथा 


जगी सर्व सुखी असा कोण आहे 
विचारी मना तूच शोधूनी पाहे 

पैसा, पोझिशन, श्रीमंती आणि प्रसिद्धी जरी असली तरी आयुष्यात सुख असतेच असे compulsory नाही. बापू म्हणतात पैश्याने सुखाची साधने विकत घेता येऊ शकतात. सुख नाही. त्यामुळेच रतनजी शेटजी सारखी माणसेही या जगात असू शकतात. बाहेरच्यांना श्रीमंती दिसते. पाहून डोळे दिपतात. पण त्या झगमगाटामागेही नैराश्येचा अंधार दडलेला आहे हे दिसून येत नाही. ते फक्त हा साईबाबाच जाणतो आणि तो अंधार दूर करू शकतो. बाकी कुणी नाही. 

परिपूर्ण केवळ हा साईच. बाकी मानव काही ना काही कारणामुळे अपूर्णच आहेत. काही ना काही कमी प्रत्येकात आहेच. अगदी गोऱ्या गोमट्या चंद्रावरही डाग आहेतच. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत अशीच प्रत्येकाची अवस्था. परंतु आपल्यातली अपूर्णता साईकृपा कशी भरून काढते ही गोष्ट ही कथा आपल्याला सांगते. 

हात त्याचा घास त्याचे 
माया ही केवळ त्याची 
त्याचा घास मुखी येता 
वैनी जाहली रे पूरी            

आपल्या कर्माचा भार आपल्याला किती त्रासदायक होतो ना ! ह्या प्रारब्धामुळेच हा त्रास आपल्या माथी येऊन आदळतो. परंतु हा साई वाईटातही चांगले कसे करतो ते म्हणजे ही कथा. शेटजींची पुत्रशोकाची कमी साईना भरून काढायची होती. तेवढेच नाही, तर या कमतरतेमुळेच शेटजींना साई लाभला. सद्गुरू लाभला ! केवढे हे भाग्य ! जे लोक सद्गुरू मिळावा याकरता तळमळत असतात, त्यांनाच माहीत गुरू लाभण्याचे भाग्य ! म्हणूनच आपण चांगले कर्म करीत राहायला हवे. मग दुख्खाचे डोंगर जरी असले, तरीही तो सद्गुरू संकटाचे संधीत रूपांतर करतो. ग्रेट !     

या पुत्रशोकासाठी उपाय म्हणूनच शेटजी दासगणूंकडे approach झाले. काम्यभक्ती. पहिली पायरी. सारेच सुरुवातीला स्वतःचा त्रास कमी व्हावा, सुखप्राप्ती व्हावी याकरताच सद्गुरुंकडे येतात. पण हा साई कनवाळू तरीही आपल्याला accept करतो.        

कभी चाहता नही 
मुझसे कुछ भी 
बस प्यार से 
देता रेहेता है ...  

दासगणू सारख्या साईभक्तावर मनापासून भक्ती करण्याचे फळ शेटजींना मिळाले. असे श्रेष्ठ साईभक्तच साईकडे जाण्याचा रस्ता दाखवतात. 

रतनजी पारशी हे सामान्य मानव आहेत. एवढी सारी श्रीमंती आणि पैसा असला की आपोआपच अहंकार येतो. मीच कुणीतरी मोठा असे वाटू लागते. हे सारे आपल्याही नकळत घडू लागते. पण त्याचेच परिणाम मग पुढे भोगावे लागतात. हा साई दक्षिणा रूपात हा अहंकारच मागतो आणि आपल्याला कर्जमुक्त करतो. 

खरे पाहता ह्या साईला आपल्याकडून कशाचीच आवश्यकता नाही. हा स्वतःच जगाचा चालक असताना ह्याला काय कमी असणार ? आणि जरी आपण ह्याला काही द्यायचे ठरवलेच, तरी आपण शुल्लक मानव ह्या ब्रह्माण्डाच्या स्वामीला काय देऊ शकणार ? हा साई तर सर्वात श्रीमंत ! अगदी सर्वार्थाने ! पण तरीही हा दक्षिणा स्वीकारतो. ते ही त्याबदल्यात आपल्याला त्याचे फळ सहस्त्र पटीने द्यायलाच. दक्षिणा घेण्यामागेही ह्याचा काहीच स्वार्थ नाही.            

यातून साईनाथांनी दानतच शिकविली आहे.  चित्रावीरा म्हणतात त्याप्रमाणे आपली "घे ना" (लोकांकडून सतत घेणे - स्वतः च्या फायद्यासाठी) बँक असते. त्यापेक्षा "दे ना" (आपण केलेले दान) बँक उघडली पाहिजे. त्याचा आपल्यालाच फायदा होतो. दानाचे महत्त्व ग्रंथराजात आहे. ते जरूर वाचावे.     

सद्गुरुतत्व हे एक आहे. बापूनी सांगितलेला पाय (3.14 or 22/7) अल्गोरिदम बघावा. त्याविषयी भरपूर लिहिता येईल आणि बरेच रेफ्रेन्स जोडता येतील. साईबाबा आणि मौलीबाबा कसे एकच आहेत हेच मनात ठसवले आहे. कदाचित म्हणूनच ही कथा १४ व्या अध्यायात आली असावी. (३.१४ मधील १४ ही संख्या). 

हा त्रिविक्रम भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही त्रिकाळी आपल्या सोबत असतोच. कुठल्या ना कुठल्या रूपात त्याचे आपल्यावर लक्ष असतेच. मौलीबाबा भेटले तेव्हा शेटजी साईभक्त नव्हते. तरीही साईनाथ त्याच्याकडून मौलीबाबा बनून दक्षिणेरूपी प्रारब्ध स्वीकारत होते. शेटजींचे आयुष्य सुखकर होण्यासाठी. हा बाबा प्रत्येक घडीला आपल्या लेकराला कसे सांभाळतो याचेच हे उदाहरण आहे. आपल्या आयुष्याच्या वर्तुळाकार परिघावर हा त्रिविक्रम कधी मौलीबाबा बनून तर कधी साईनाथ बनून सतत सोबत करीत असतो. हा परीघ जरी लहान मोठा झाला, तरीही परीघ / व्यास = ३. १४ हाच ratio constant राहणार आहे. कारण हा त्रिविक्रम शेवटी तो "एक" आहे. 

डॉ. निशिकांतसिंह नी खूपच छान माहिती दिली आहे याबाबत त्यांच्या ब्लॉग वर. त्याची लिंक : 

https://shrisaisaccharit.blogspot.com/2019/05/pi-algorithm-shree-sai-saccharit-adhyay-14-Aniruddha-Bapu.html 

तू तूच एक 
एकला समर्थ 
सांभाळिसी आम्हा 
वेळी अवेळी 

पिपा म्हणे माझे 
मोडके जीवन 
तूचि केले बापू 
सफळ संपूर्ण 

पुढे रतनजीना १२ मुले झाली. पण त्यातली ४ च जगली. १२ / ४ = ३. त्रिविक्रम. जे काही आपल्या आयुष्यात घडते हे सारे नाथसंविधच असते. नाथसंविध हाच तो त्रिविक्रम.   

बेसीकली हा साई आपल्या आयुष्यात नसणे हाच खरा रतनजीच्या आयुष्यातला पुत्रशोक. तो लाभला कीच हा शोक दूर होऊ शकतो. केवळ हा साईनाथच आपली रिकामी झोळी भरू शकतो. रतनजींची उखरी बाग साईनाथांनी फुलवली आणि त्यावर वंशवेलीवर गोड गोड फुले सुद्धा आली.   

आपण या बाबाकडे सतत काही ना काही मागतच असतो. तो ही एका आईप्रमाणे आपलया साऱ्या मागण्या पुऱ्या करतो, आणि त्याबदल्यात काहीही मागत नाही. हेच त्याचे लाभेवीण प्रेम !   

बिन चाहे कुछ तुझसे 
सब देते ही है वो 
हमराह कोई ऐसा है कहा ... 
मेरे बापू संग मेरे 
मै जहाँ हू वो वहा ...  

आपण नेहेमी ग्लास किती रिकामा तेच पाहतो. ग्लास किती भरलाय हे पाहात नाही. एक पुत्रशोक सोडला, तर रतनजींना देवाच्या कृपेने सारेच मिळाले होते. सारे सुख, ऐश्वर्य होते. आपल्या आयुष्यात जे काही घडते, हे सारे त्याचे नाथसंविध असते. याचा अर्थ आपण काहीच प्रयास कारायचे नाहीत असे नाही. 


पण सगळे प्रयास होऊनही जर आपल्याला हवे ते प्राप्त होऊ शकत नसेल, तर ते 'त्या'ची इच्छा म्हणून आयुष्यात पुढे जावे. We have to accept that and go ahead. त्यामुळे आपल्याला जे काही मिळाले त्यात संतोष मानून दुःख विसरायचा प्रयास करायचा. तेवढेच आपल्या हातात आहे. बाकी सारे तो परमात्मा सद्गुरू जाणतोच.          

प्रत्येक गोष्टीची एक उचित वेळ असते. ती कुठली हे फक्त तो बाबाच जाणतो. बाकी कुणीही नाही. म्हणूनच आपण चिंता करण्यापेक्षा त्या बाबाचे चिंतन करूया. योग्य वेळी तो सारे काही देतोच देतो.      

शेवटी एवढेच वाटते, आपल्या प्रारब्धामुळे जर का असे भोग असतील, तरीही हा परमात्मा त्यात बदल घडवून आणू शकतो. हाताच्या साऱ्या रेषाही बदलू शकतो. 'त्या' ला काहीच अशक्य नाही. 

जीवनाची भूमी जरी जाहली उजाड 
ह्याने नदी पाठविली फोडुनी पहाड 







0 comments: