ग्रंथ ठेऊन वाचण्यासाठी सुंदर छोटा टीपॉय ...

01:26:00 Nandan Bhalwankar 0 Comments



ग्रंथ ठेऊन वाचण्यासाठी सुंदर छोटा टीपॉय ... 


Know more / अधिक जाणून घ्या



0 comments:

ग्रंथ ठेवायला सुंदर आकर्षक कव्हर

01:22:00 Nandan Bhalwankar 0 Comments


ग्रंथ ठेवायला सुंदर आकर्षक कव्हर


Know more / अधिक जाणून घ्या




0 comments:

लेख आणि कविता

new dinosaur in jurassic world 3 | new dinosaur in jurassic world dominion

09:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments




1) ओवीरापटर 

ये अंडा चोर के रूप में अपनी अन्यायपूर्ण प्रतिष्ठा के अलावा, ओविराप्टर सभी डायनासोरों में सबसे अधिक पक्षियों में से एक होने के लिए जाना जाता है। इस थेरोपोड के पास एक तेज, दांत रहित चोंच थी


2) ड्रेडनोट्स 

ये 85 फीट (26 मीटर) लंबे और जीवन में लगभग 65 टन (59,300 किलोग्राम) वजन पर, ड्रेडनॉटस श्रानी सबसे बड़ा भूमि जानवर है जिसके लिए शरीर के द्रव्यमान की सटीक गणना की जा सकती है





3) Moros intrepidus

बाकी जानवर का बचा हुआ खाना खाते है 



4) पायरोरॅप्टर 

दिखने मी फिनिक्स जैसा लेकिन अति भयंकर 


5) अट्रोसिरॅप्टर 

दौडने मे इस्को कोई नाही हरा पाये .. खाना पकड ने के लिये तो बाप रे !

6) थेरीझिनोसॉरस  

भयंकर शकल वाला डरावना ... और उसके हाथ को देखो ... वो तो और भी भयंकर 


7) क्वेटाझेलकोटलस 

उडणे वाला जिराफ जैसी चिडीया फिल्म मे प्लेन को तबा करणे वाली 


8) गिगानोटोसॉरस 

एपिक डायनोसॉर ... इसे कौन हरा पायेगा 









search terms -
jurassic world dominion ,
jurassic world dominion trailer in hindi ,
jurassic world 3 ,
jurassic world dominion full movie information ,
jurassic world dominion full movie in hindi ,
jurassic world dominion release date , 
jurassic world dominion giganotosaurus , 
jurassic world dominion movie , 
jurassic world dominion 2022 , 
jurassic world dominion trailer 2022 , 
jurassic world dominion new trailer



 


 
 


0 comments:

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay karte) मधील अभिषेक च्या हस्ते गायनाबद्दल सर्टिफिकेट घेताना ...

03:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 






0 comments:

चला तर मग पक्षी संवर्धनात सहभागी होऊया Fashion Bird Feeder (Medium, Green)

08:08:00 Nandan Bhalwankar 0 Comments


चला तर मग पक्षी संवर्धनात सहभागी होऊया आणि चिमण्यांना वाचवूया. आपल्या प्रत्येकाच्या घरी bird feeder लावूया. 


Designer Hut Yellow Bird Feeder (Chabutra) For Birds Its Designer Yellow Bird Feeder made by Acrylic material with hook of jute. Bird Feeder use to hang on balcony ,Garden ,Park , Terrace , Tree, every where its easily hang bird feeder chabutra. Bird Feeder easily to clean and fill Our Just Click Fashion Bird Food Mix. Its Scratch Proof Bird Feeder Hut and Weather Proof Bird Feeder Specially made for this purpose. Birds Easily Identified Their Food And Enjoy Food Hang This Bird Feeder At Such Place Where Birds Easily Came And Eat. 

About this item

  • Designer Yellow Hut Bird Feeder (Make In India)
  • Its Scratch Free Bird Feeder
  • weathereffe
  • Easily Clean And Fill Bird Food
  • Attractive Looking Bird Feeder Hut For Birds

BrandJust Click Fashion
ColourGreen
MaterialAcrylic
Item Dimensions LxWxH10 x 8 x 2 Centimeters
Target SpeciesBird

0 comments:

गुढीपाडव्याचे महत्त्व आणि माहिती मराठीमध्ये | gudi padwa information in marathi

09:33:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 गुढीपाडवा - अत्यंत शुभ मुहूर्त 


साडे तिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा! (दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतिया हे तीन पुर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त). 

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. 



गुढीपाडवा - २०२२ कधी आहे ? 

या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे,  शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. 




Mango leaf toran - https://amzn.to/3DbnMBs

पाडव्याच्या दिवशी घराला लावायचे आंब्याच्या पानांचे तोरण .. https://amzn.to/3usvByF

copper plate for pooja - https://amzn.to/3Nq7oSn

ready made gudhi / गुढीची संपूर्ण तयारी - https://amzn.to/3Dhcxrg

रेडी मेड छोटी गुढी - https://amzn.to/3tFMuGT



प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवुन रावणासारख्या बलाढय शत्रुचा आणि इतर राक्षसांचा पराभव केला व आजच्याच दिवशी अयोध्येला परतले. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ अयोध्या वासियांनी आपापल्या दारात गुढया उभारून त्यांचे स्वागत केले होते. या गुढी पाडव्यापासुन राम जन्मोत्सवाला देखील सुरूवात होते आणि रामनवमीला रामजन्म केल्या जातो.

 गुढीपाडवा का साजरा करतात ? 

- गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली  कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. 

- तसेच इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे.  

- पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. 

- एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते. 




गुढीपाडवा - अजून विशेष महत्वाचा का ?

प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. 

नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून  चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.

चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.

कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे.




गुढी कशी उभारावी?


नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.

गुढीपाडवा - पोशाख आणि यात्रा 


गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे साडी लूक्स परिधान केलेल्या दिसतात. . महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.


महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणीदेखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठया रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक वेशभूषा केली जाते, लोझिम, ढोल ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.






0 comments:

Let's keep water or the birds this summer

02:18:00 Nandan Bhalwankar 0 Comments

Let's keep water or the birds this summer ...  


The havoc of summer is increasing. How much thirsty you are, so are the birds! That's why we put water in a clay plate in the window. 


The clay plate keeps the water cool even in summer. Birds also bathe. I feels amazing to watch, and it is indeed a precious moment to see good work done by ourselves.  


Purchase link: https://amzn.to/3wA8nZY


चला तर मग, ह्या उन्हाळ्यात पक्ष्यासाठी गॅलरीत पाणी ठेऊया... 

उन्हाळ्याचा कहर वाढतच चालला आहे । आपल्यालाच किती तहान लागते, तर पक्ष्याना किती लागत असेल ना ! म्हणूनच आम्ही खिडकीत मातीच्या थाळीत पाणी ठेवतो । मातीच्या थाळीमुळे पाणी उन्हातही थंड राहते । पक्षी अंघोळही करतात । ते पाहूनच सार्थक झाल्यासारखे वाटते आणि  चांगले काम घडले याचा वेगळाच आनंद मिळतो. 

विकत घ्यायची लिंक: https://amzn.to/3wA8nZY

0 comments:

चला आपण चिमण्यांना वाचवूया

07:22:00 Nandan Bhalwankar 0 Comments

Lets come forward to save this special bird. Sparrows. Lets hang nests at our house. Lets support sparrow conservation. 

चला आपण चिमण्यांना वाचवूया. त्यांची संख्या वाढवण्यामध्ये हातभार लावूया. आपल्या घरात चिमणीचे घरटे लावूया. (घरटे विकत घेण्याची लिंक खाली दिली आहे) 

Buy sparrow nest / घरटे विकत घेण्याची लिंक : https://www.amazon.in/Deskart-Balcony-Hummingbird-Kingfisher-Resistant/dp/B08NDWT5LH?keywords=sparrow+house&qid=1648044666&sprefix=sparrow+%2Caps%2C466&sr=8-5&linkCode=ll1&tag=nandanbhalwan-21&linkId=2422646769440fb3c364e50105fe2642&language=en_IN&ref_=as_li_ss_tl

0 comments:

Finance in simple terms | What is Finance?

21:28:00 Nandan Bhalwankar 0 Comments

Finance is a broad term that describes activities associated with banking, leverage or debt, credit, capital markets, money, and investments. Basically, finance represents money management and the process of acquiring needed funds. Finance also encompasses the oversight, creation, and study of money, banking, credit, investments, assets, and liabilities that make up financial systems.

  1. Finance encompasses banking, leverage or debt, credit, capital markets, money, investments, and the creation and oversight of financial systems.
  2. Basic financial concepts are based on microeconomic and macroeconomic theories. 
  3. The finance field includes three main subcategories: personal finance, corporate finance, and public (government) finance.
  4. Financial services are the processes by which consumers and businesses acquire financial goods. The financial services sector is a primary driver of a nation’s economy.

0 comments:

Russia-Ukraine crisis | Explosions heard in Kyiv as Russia presses Ukraine assault

21:21:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 

Ukraine has severed diplomatic relations with Russia after Moscow launched an all-out invasion of Ukraine by land, air and sea on Thursday, the biggest attack by one state against another in Europe since World War 2.


Multiple explosions were heard in Kyiv in the early hours of Friday, according to news agency AFP. These set off day two of shelling and fighting after Russian President Vladimir Putin announced the ‘military operations’ in Ukraine. Earlier, Ukrainian President Volodymyr Zelenskyy said 137 people, including 10 military officers, have been killed and 316 people injured so far.

Meanwhile, US President Joe Biden said Washington will intervene if Putin moves into NATO countries, stressing that if his Russian counterpart is not stopped now, he will be emboldened. The countries on NATO’s eastern flank, especially the Baltic states of Lithuania, Latvia and Estonia, all have received the first batches of US military troops and equipment.

In the wee hours of Friday, Ukraine said it lost control of the Chernobyl nuclear site, the site of the 1986 disaster, and the staff at the Chernobyl plant had been “taken hostage”World leaders have decried the invasion and announced sanctions on Russia. China, meanwhile, continues its support of the Kremlin with its customs agency approving imports of wheat from all regions of Russia.

0 comments:

Bunty Aur Babli 2 movie review

02:09:00 Nandan Bhalwankar 0 Comments

Watched #BuntyAurBabli2. enjoyed it a lot. What a twisting climax at the end! B&B 4.0 is outstanding.. bt afterall no one can beat original B&B. they hv proved "Baap Baap hota hai" at the end...




0 comments:

मकर संक्रात - तिळगुळ घ्या गोड बोला

21:57:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 "गोड बोला" म्हणजे नक्की काय ? तर दुसऱ्याच्या मनावर आघात होईल असे न बोलणे. मग वाद होणारच नाहीत. कोणी दुखावलेही जाणार नाही. ही काळजी प्रत्येकाने घेतली तर प्रत्येक दिवस मकर संक्रातच असेल, नाही का ?

0 comments:

गुरुचरित्र भाषांतरित🌹 अध्याय एकोणपन्नास

07:56:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

 श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारकाने सिद्ध्योग्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जयजयकार केला. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझ्यासाठी कृपासागर आहात. आपण मला प्रत्यक्ष श्रीगुरुचरित्र दाखवून कृतार्थ केलेत. या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत. त्यामुळे मी धन्य ,धन्य झालो. हा संसारसागर अनादीअनंत आहे. तो महाभयंकर आहे. तो जडजीवांना तरुन जाता येत नाही. आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते, त्याप्रमाणे हा संसारसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरूलाच शरण जावे लागते. त्याच्या कृपेने हा संसारसागर पार करता येतो. यासाठी गुरुभक्ती करावयास हवी. गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच. गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग आहे. या संबंधी स्कंदपुराणात ईश्वरपार्वती संवाद असून तो 'गुरुगीता' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला होता व त्याला शंकरांनी पार्वतीला गुरुमाहात्म्य सांगितले. गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले आहे. तो बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकवायचा आहे. तो कृपा करून मला सांगा."


नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तू लोकोपकारक ठरेल असा प्रश्न विचारला आहेस.त्याचे उत्तर मी देतो. तू ते एकाग्रचित्ताने श्रवण कर. रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले, "गुरुभक्ती कशी करावी ? गुरूचा महिमा काय आहे ते मला सांगा. येथे पार्वती ही साधक असून भगवान शंकर हे परात्पर गुरु आहेत. 'मला गुरुमाहात्म्य सांगा' असे पार्वती म्हणाली असता भगवान शंकर म्हणाले, "देवी तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस. सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. लक्षपूर्वक श्रवण कर.भगवान शंकर म्हणाले, तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्व तुला सांगतो. श्रीगुरूच सदैव ब्रम्ह होय, गुरुशिवाय दुसरे ब्रम्ह नाही, हे त्रिवार सत्य. वेदशास्त्र-पुराणे कितीही वाचली, व्रत-तप तीर्थयात्रा कितीही केल्या तरी संसारबंधनातून मुक्त होता येत नाही. शैवशाक्तादी विविध पंथ जीवांना, चुकीचा समज, गैरसमज करून देण्यास कारणीभूत होतात. साधकांच्या मनात भ्रम निर्माण करतात. यज्ञ, व्रत, तप, दानधर्म, तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जानीत नाहीत तोपर्यंत मूर्खांसारखे भटकत राहतात ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. आपल्या गुरूविषयी पूज्यबुद्धी श्रद्धा असली की मग गुरुभाक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही. म्हणून गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकांनी प्रयत्न करावा. या देहांत अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रुपात राहते. आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरु शब्दाने तो उदय दर्शविला जातो.. श्रीगुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांतून मुक्त होते. त्यामुळे देहधारी जीव ब्रम्हरूप होतो. श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून चरणतीर्थ मस्तकी धारण केले असता सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला प्राप्त होते. विविध तपांतून मुक्ती मिळते. सद्गुरुचरणतीर्थ सर्व तीर्थाचे माहेर होय. श्रीगुरूचरणतीर्थ पापहरक आहे. ज्ञानरुपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे. संसारसागरातून पार करणारे आहे. ते समूळ अज्ञान दूर करते. जन्मकर्मांचे निवारण करते.


ज्ञान-वैराग्यासाठी ते प्राशन करावे. गुरुचरणतीर्थ प्राशन करून श्रीगुरू आज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून श्रीगुरुमूर्तींचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा. श्रीगुरुचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ हीच गंगा व श्रीगुरु हेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत. श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ. गुरु हेच गयेचा नित्य स्मरण करावे. गुरुनामाचा जप करावा. गुरुआज्ञा मनःपूर्वक पाळावी. गुरुशिवाय दुसरी कोणतीही भावना मनात ठेवू नये. गुरु ब्रम्हरूप होय. ते गुरुकृपेनेच प्राप्त होते, म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे. चिंतन करावे. आपले घरदार, संपत्ती, विद्या, वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी. गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये. जे अनन्य भावाने, निष्ठेने गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ असते, म्हणून प्रयत्नपूर्वक श्रीगुरुची आराधना करावी. गुरुमुखी असलेली विद्या, गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही.


'गुरु' शब्दातील 'गु' अक्षराचा अर्थ अज्ञानरुपी अंधकार. 'रु' चा अर्थ ज्ञानप्रकाश. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रम्ह गुरु होय यात शंकाच नाही. 'गुरु' शब्दातील 'गु' कार मायादी गुण प्रकट करणारा असून 'रु' कार ब्रम्हाचे द्योतक आहे. गुरु हा मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा आहे. गुरुचरण श्रेष्ठ होत. ते देवांनाही दुर्लभ आहेत गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही, म्हणून गुरु संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरूला अर्पण करावे. श्रीगुरुची आराधना करावी. आपले सर्वस्व गुरूला समर्पण करावे. गुरुकृपा परमेश्वरप्राप्तीचे साधन आहे. काया-वाचा-मनाने सदैव गुरूची आराधना करावी. आपल्या गुरूला सर्वभावे शरण जावे. श्रीगुरूला साष्टांग नमस्कार घालावा. संसारवृक्ष आरूढ होऊन नरकार्णवात पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरुला नमस्कार करावा.


गुरु हाच ब्रम्हा, विष्णू, महेश्स्वरूप आहे. गुरूच परब्रम्ह आहे म्हणून अशा गुरूला नमस्कार करावा. गुरु हा जगाच्या उत्पत्तीचा हेतू आहे. तो संसारसागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे. अशा शिवस्वरूप गुरूला नमस्कार करावा. अज्ञानरुपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्ञानांजन घालून ज्याने दिव्यचक्षू उघडले व त्याला आत्मस्वरूपाचा निधी दाखविला त्या श्रीगुरुला सदैव नमस्कार करावा. गुरु हाच माता-पिता बंधू आहे. या गुरूच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते. त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते व त्याच्याच आनंदमयी स्वरूपाने सर्वजण आनंदित व सुखी होतात. जगाला अर्थ येतो तो गुरूमुळे. जीवन सार्थ होते ते गुरूमुळे. जग अशाश्वत असुअनहि नित्याचे वाटते ते गुरूमुळे. गुरु म्हणजे दैदिप्य्मान आत्मसूर्य. ज्याच्यामुळे हे जग चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला सजीवता प्राप्त होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरूला नमस्कार. श्रीगुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही. तो पूर्ण अभेदयोगी असतो. जगाचे मूळ कारण सद्गुरु. गुरुचे कार्य जगतरूपाने भासते. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे सर्व सामर्थ्यशाली शक्ती होय. गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्तरुप होय. श्रीगुरुचे चरण सुख-दुःखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात. सर्व आपत्तीतून तारून नेतात. शिव क्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही. गुरुचरण शिवशक्तीरूप असतात. शिव आणि शक्ती ह्यांच्या मिलापाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्रीगुरु. जो गुणरूपांच्या पलीकडे-म्हणजेच निर्गुण, निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते. गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे. चतुर्भुज नसूनही विष्णू आहे व चतुर्मुख नसूनही ब्रम्हदेव आहे. श्रीगुरुच्या कृपेमुळेच जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येते. तो दयासागर आहे. त्याच्या कृपेला भारती यावी म्हणून त्याला हात जोडून प्रणाम करावा. श्रीगुरुचे परमरूप विवेकरुपी चक्षूंसाठी अमृतासमान असते; पण मंदभाग्य असलेले जिब ह्या गुरुस्वरूपाला बघू शकत नाही. ज्या दिशेला चरणयुगल असतात त्या दिशेला दररोज भक्तिपूर्वक नमस्कार करावा. एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप होतात. श्रीगुरूगीता गुरुभक्तीयोगाचे शास्त्रच आहे. श्रीगुरुचा अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो. संसारवणवा नष्ट होतो. सच्चिदानंदस्वरूप त्याचा अवतार असतो. गुरु हा केवळ ब्रम्हविद्या देत नाही, तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतो. गुरुचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते. गुरु हा चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत आकाशदिशापेक्षा सूक्ष्म, निरंजन नादातीत असतो. सर्व चराचर सजीव-निर्जीव जग श्रीगुरुचे व्यापले आहे. गुरु हा साधकाला भक्ती-मुक्ती, भोग व मोक्ष देतो. तो आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मांतील संचित कर्माचे भस्म करतो. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही.


गुरुसेवा व गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही. गुरु हा सर्व जगाचा स्वामी असून तो सर्वव्यापी आहे. गुरुतत्व स्वयंभू आहे. गुरु हेच परमदैवत आहे. म्हणून गुरूला सदैव नमस्कार करावा. गुरूच्या चरणतीर्थात सप्तसमुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते. श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही. म्हणून गुरूची मनःपूर्वक पूजा करावी. गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही असे श्रुतिवचन आहे, म्हणून काया-वाचा-मनाने गुरूची नित्य सेवा करावी.


केवळ गुरुकृपेमुळेच ब्रम्हा-विष्णू-महेश जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करू शकतात, अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा. देव-गन्धर्वादीसुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत. गुरुध्यान हे सर्वप्रकारचा आनंद, सुख, भक्तीमुक्ती व मोक्ष देणारे आहे. म्हणूनच परब्रम्हस्वरूप गुरुचे स्मरण करावे. त्याचे स्तवन करावे. त्याला नमस्कार करावा, गुरु हा ब्रम्हानंदस्वरूप, ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, निर्लेप, सर्वसाक्षी भावावीत, त्रिगुणरहित असतो. तो नित्य बद्ध, निराकार, परब्रम्हस्वरूप आहे. तो आनंदस्वरूप,आनंददाता, ज्ञानस्वरूप, योगीश्वर, संसाररोगावर औषध देणारा वैद्य आहे. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही. हे शिवशासन आहे म्हणूनच तो परमकल्याणकारी आहे. अशाप्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठायी आत्मज्ञान आपोआप येते. गुरूने दाखविलेल्या मार्गानेच साधना करून चित्तशुद्धी करून घ्यावी.


भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात, "हे गुरुमाहात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करील तो घोर नरकात पडेल. बुद्धिमान शिष्याने गुरूशी कधीही खोटे बोलू नये. गुरु फसत नाही-फसतो तो शिष्य. गुरुकृपा-प्राप्त साधकाने निःशंकपणे साधना करावी. जेथे गुरुप्राप्ती आहे तेथे भीती असूच शकत नाही.


गुरुगीता गुरुभक्ती शिकविते. गुरुमहती पटविते. श्रीगुरूगीता श्रुतिस्मृतींचे सार होय. श्रीगुरुगीता म्हणजेच गुरुजप. गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरुउपदेशानुसार साधना करणे. गुरुसेवेने गुरुप्रसाद लाभला की आत्मसाक्षात्कार होतो. गुरुभक्ताला गुरुउपसानेनुसार शाश्वती लाभते. गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा उपाय आहे.


यानंतर पार्वतीने महादेवांना पिंड, पद, रूप व रूपातित म्हणजे काय असे विचारले असता भगवान शंकर म्हणाले, "कुंडलिनीशक्तीला पिंड म्हणतात. हंस म्हणजे पद. बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ज्याचा 'हंस:' मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूत दर्शन झाले आहे व जो निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त. साधकाला साक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो. गुरुकृपा - प्रसादाने त्याचे मन शांत होते. मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो. त्याला बसल्याजागी आनंद, शांती लाभते.


यानंतर भगवान शंकरांनी श्रीगुरूगीतेचे भक्तिपूर्वक पठणश्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले. श्रीगुरूगीतेच्या पठणश्रवणाने साधकाला नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. तो भव्यव्याधीतून मुक्त होतो. सर्वप्रकारचे पाप, ताप, दैन्य, दुःख नाहीसे होते. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व्याधी नाहीशा होतात. सर्व सिद्धींची प्राप्त होते. प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला, तरी साधक श्रीगुरूगीता जपाने रोगमुक्त होतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने योग्यस्थळी, योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतःच श्रीगुरुगीता पाठ करावा. त्यामुळे जीवन सार्थ, कृतकृत्य, यशस्वी व मंगलदायी होते. इच्छापूर्ती होते. गुरुप्रसाद लाभतो. श्रीगुरूगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र-पौत्र इत्यादींचा लाभ होतो. श्रीगुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. साक्षात चिंतामणी आहे. एका श्रीगुरूगीतेच्या उपासनेने सर्व देवदेवतांची उपासना होते. श्रीगुरूगीतेच्या पठणाने जीवाशिवाचे ऐक्य होते. त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते. असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात, मी सांगितलेले ते त्रिवार सत्य आहे. श्रीगुरूगीतेचे पठणश्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते.


अशाप्रकारे भगवान शंकरांनी श्रीगुरूभक्तीचे व श्रीगुरुगीतेचे माहात्म्य पार्वतीला सांगितले. सिद्धयोग्यांनी त्याचा आश्रय नामधारकाला सांगितला. सारांश, शहाण्याने गुरु नित्य भजावा. गुरुसेवेचे फळ अनंत आहे. श्रीगुरुला शरण जावे. श्रीगुरू संतुष्ट झाले असता त्रैमूर्ती संतुष्ट होतात. याला वेदशास्त्री संमती आहे. या कलियुगात वेदमार्ग लोप पावला. लोक मूर्ख झाले. पशुसमान वागू लागले. डोळे-कान असूनही अंध-बहिरे झाले आहेत, म्हणून शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे भवबंधनातून सुटका होईल. कैवल्यपदाची प्राप्ती होईल. या कलियुगात संत-सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, भूभार हलका करण्यासाठी श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींनी नावांनी घेतला. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. याविषयी शंका न धरता श्रीगुरुंना शरण जावे. त्यामुळे यमपाश तुटेल. सर्व पातकांचा क्षय होईल.


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गुरुमाहात्म्य - श्रीगुरुगीता' नावाचा अध्याय एकोणपन्नासावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

0 comments:

गुरुचरित्र अध्याय पन्नासावा

07:54:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्रीगुरुंनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका रजकाला 'तू पुढच्या जन्मी बैदुरनगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यतिरूपाने तुला भेटेन' असा वर दिला होता. ही कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवनधर्मात जन्मास आला व बेदरचा राजा झाला. तो सर्वप्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता. तो हीन जातीत जन्मास आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील, सुसंस्कृत, उदार अंतःकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानीत असे. सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राम्हणांवर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यात अनेक मठ-मंदिरे होती; पण तो यवन असूनही कुणाला कसलाही त्रास देत नसे. उलट, मठ-मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत. 'आपण यवन आहोत. आपला धर्म वेगळा, हिंदूंचा वेगळा. आपण त्यांच्या देव-ब्राम्हणांची निंदाच केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो.आपण आपल्या जातीधार्माप्रमाणेच वागले पाहिजे. त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते. ते ब्राम्हण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्यांची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष, पाषाण, लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात. ते मंद बुद्धीचे ब्राम्हण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधःपात होतो." यवन पुरोहित असे बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, "अहो, तुम्हीच उपदेश करता, की परमेश्वर अणुरेणुतृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो; सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे.


सर्व प्राणी, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी एकाच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी-मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गाई वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच, पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकाच आहे. 'नाना देही देव एक विराजे' हे सर्व सामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे मानून इतरांची निंदा कशासाठी करावयाची ? म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा -स्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो, म्हणून "आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांचे चूक असे माणू नये." असे बोलून राजानें यवनपुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला.


पुढे काही दिवसांनी त्या यवनराजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले; पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवनराजा आपल्याला भेटावयास येईल त्यांना असे वाटले. तसे झाले तर येथील ब्राम्हणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल म्हणून आपण आता गुप्त राहावे हेच योग्य. असा विचार करून श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, "यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा." श्रीगुरुंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले.


इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने फारच त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडीमात्र दुखणे बरे होईना. काय करावे, त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राम्हणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राम्हणांना म्हणाला, "माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य-हकीमांनी हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोस झाला आहे. आता यावर काय इलाज करायचा ?" त्यावर ते ब्राम्हण म्हणाले, "राजा, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात, त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषाच्या दृष्टीने कोटीजन्माची पापे नाहीशी होतात, तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार ?" त्यावर तो यवनराजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राम्हणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्रीगुरूचरणांची सेवा केली होती; पण काही पापांमुळे मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला आहे. त्याला माझा इलाज नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. " राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राम्हण म्हणाले, "महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थास जा व त्या तीर्थात स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल."


ब्राम्हणांनी असे सांगितले असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता, एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावने स्नान केले. त्याचवेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, "यतिमहाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरे होईल ?" त्यावर तो संन्यासी म्हणाला, "एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल." असे बोलून त्या सन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली.


पूर्वी अवंतीनगरीत एक ब्राम्हण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राम्हण. अत्यंत दुराचारी होता. मदोन्मत्त होता. ब्राम्हणकुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी ब्याभिचार करीत असे. तो स्नानसंध्या-पूजापाठ इत्यादी जो ब्राम्हणाचा आचारधर्म त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याकडे भोजन करीत असे.


एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभनावाचा एक महायोगी तेथे आला. त्याला पाहताच त्या ब्राम्हणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासंग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम भोजन दिले व पलंगावर झोपविले. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वाराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राम्हणाला व पिंगला वेश्येला वार्धक्याने मृत्यू आला.


त्या वृषभ योग्याची मनोभावे सेवा केल्यामुळे तो ब्राम्हण दशार्ण राजा वज्रबाहू व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले. त्या विषाने ती मेली नाही. पण तिच्या सर्वांगाला फोड झाले. तशाच स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्याने मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर व राजपुत्रावर औषधोपचार केले; पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मायलेकरे असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहवेनात. त्या फोडांनी तय दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलाबून सांगितले, "या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडून या." राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री-पुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी दुराचारी म्हणून लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसवून निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडले. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, यामुळे ती आक्रोश करत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन रानावनात भटकू लागली. अन्नपाण्याविना तिचे फार हाल होत होते. त्या घोर अरण्यात भटकत असता तिला काही गुराखी दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली, तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले, "तू अशीच पुढे जा. तेथे तुला एक मंदिर दिसेल. तेथे तुझी खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होईल." असे त्या गुराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरे वाटले. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन 'या गावाचा राजा कोण आहे ?' असे विचारले असता त्या स्त्रिया म्हणाल्या, 'पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील श्रीमंत आहे. तू त्याला भेट. त्याला आपली परिस्थिती सांग. तो तुला नक्की आश्रय देईल." त्या स्त्रिया असे सांगत होत्या, त्याचवेळी पद्माकाराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकाराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्नवस्त्राची, राहण्याची अवस्था केली.


त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी तय राजपुत्राला- म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला; पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तेथे प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगीशाला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासंग पूजा केली.


त्यावेळी त्या योगीशाने विचारले, "घरात कोण बरे रडत आहे ? काय झाले आहे ? " पद्माकाराने त्या मायलेकरांची हकीगत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, "तू विनाकारण का बरे शोक करतेस ? या जगात कोण जन्मास आला ? आणि कोण मेला ? सांग बरे. या जगात चिरंजीव कोण आहे ? जो जन्मास येतो त्याला एक न एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगुर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यातील बुडबुडा, त्याप्रमाणे दे जग क्षणिक आहे, म्हणून शहाण्या मनुष्याने जन्म-मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई-वडील, पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रम्हदेवाने लिहिलेली ललाटरेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस ? कोणाची तू माता होतीस ? कोण तुझा पुत्र होता ? सांगता येत नाही ना ? मग तू विनाकारण शोक का बरे करतेस ? तेव्हा शोक आवर व भगवान सदाशिवला शरण जा." त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजाविले तरी, सुमतीचे दुःख कमी झाले नाही. ती म्हणाली, "योगीराज, मी या व्याधीने मरणयातना भोगत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र मरण पावला आहे. अशा परीस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू ? मला आता मरण आले तर बरे होईल ."


सुमतीचे दुःख पाहून ऋषभ योग्याला तिची दया आली. त्याने थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले व त्याच्या मुखातही घातले. त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकरांच्या शरीराला लावले. आणि काय आश्चर्य ! दोघेही रोगमुक्त झाली. शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली.


दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभ योग्याने दोघांना वर दिला, "तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल." त्या योग्याने सुमतीला वर दिला, 'तुझा पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला फार मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षा अधिककाळ राज्य करील." असा वर देऊन तो ऋषभ योगी एकाएकी निघून गेला.


ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, "हे राजा, चिंता करू नकोस. सत्पुरुषाच्या कृपाप्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल, यावर तू पूर्ण विश्वास ठेव." त्या संन्याशाने असे सांगितले असता यवनराजाने नमस्कार करून विचारले, "ते सत्पुरुष कोठे आहेत ? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो." त्यावर तो संन्यासी म्हणाला, "गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा व त्यांचे दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल." हे ऐकताच तो यवनराजा श्रीगुरुंच्या दर्शनाला निघाला. मजल-दरमजल करीत गाणगापुरात आला. त्याने गावातील लोकांना विचारले, "येथे एक थोर संन्यासी आहेत असे ऐकतो. आता ते कोठे आहेत ?" असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, "अहो, आता काही खरे नाही. हा यवन श्रीगुरूंची चौकशी करतो आहे. आता हा काय करील सांगता येत नाही." अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, "अरे, बोला ना ! मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ते आता कोठे आहेत ते सांगा." मग लोक म्हणाले, "श्रीगुरू नित्य मध्यान्हकाळी भीमा-अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की मठात परत येतात. आता ते संगमावर आहेत." हे ऐकताच यवन राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेण्यात बसून श्रीगुरुंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्रीगुरुंना पाहताच तो मेण्यातून खाली उतरला, पायी चालत चालत श्रीगुरुंच्या समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "काय रे रजका ! तुमची माझी भेट पूर्वी झाली होती. आता खूप वर्षांनी परत आला आहेस !" श्रीगुरू असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतली. त्याचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरे केलीत ? मी अनाथ झालो. मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो. मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होतात तेव्हा मी आपणास ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही, अशी माझी पूर्ण खात्री होती मग आपण मला अज्ञानसागरात का बरे लोटून दिलेत ? आता माझा उद्धार करा. यासाठी मी आपणास शरण आलो आहे. आता मला हा जन्म पुरे !


श्रीगुरू त्याला म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व इच्छा, वासना पूर्ण होतील. " तेव्हा राजा म्हणाला, "स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे. त्याच्या असह्य वेदना होत आहेत. आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे." राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, "अरे, तो फोड कोठे आहे दाखव बरे !" राजा पाहतो तो काय ? तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, "स्वामी, मला आपण रोगमुक्त केलेत. मला राजपद व सर्व ऐश्वर्ये देऊन माझी गत्जान्मातील इच्छा पूर्ण केलीत, ही सगळी केवळ आपली कृपा ! आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "अरे, आम्ही आहोत तापसी संन्यासी ! आम्ही तुझ्या नगरात कसे येणार ? तेथे तर हिंसादी पापकर्मे चालू असतात. तेथे गोहत्या होत असते. जीवहिंसा हे महापाप अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही." राजा म्हणाला, "हे सर्व घडते. माझा पूर्वीचा जन्म रजकाचा, पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले, अनेक प्रकारची सुखे मला मिळाली; पण एकदा मला पुत्रपौत्र समजून आलात तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करीत राहीन." राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्रीगुरुंनी विचार केला, "आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार तेव्हा आता या कलियुगात जास्त काऴ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा येथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील. तेव्हा आता गुप्त होणेच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीयात्रा करू व या राजाचीही इच्छा पूर्ण करू." असा विचार करून ते मठाकडे निघाले. राजाने त्यांना मेण्यात बसविले. त्यांच्या पादुका हातात घेऊन तो पायी चालू लागला, तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तू ब्राम्हणाची सेवा करतो आहेस असे तुझ्या लोकांनी पहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यात बस." पण राजाने ते मानले नाही. 'मी आपला दासानुदास आहे.' असे म्हणून तो चालतच निघाला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर्य दाखविले. श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तुझ्या या लवाजम्याबरोबर जायचे तर उशीर होईल माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल. तू पुढे जा. मी तुझ्या नगरीत येईन." असे सांगताच राजा निघून गेला. मग श्रीगुरू शिष्यांसह अदृश्य झाले व मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले.


श्रीगुरू आल्याचे समजताच सायंदेव साखरेचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते. नागनाथाने श्रीगुरुंना आपल्या घरी नेउन त्यांची यथासंग पूजा केली व मोठी समाराधना केली. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवन राजा मला पापविनाशी तीर्थावर भेटावयास येणार आहे. मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल. तुम्हा ब्राम्हणांना त्याचा उपद्रव होईल." असे सांगून व त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तेथे आला. त्याने श्रीगुरुंना पालखीत बसवून वाजतगाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राम्हणादी हिंदूंना आनंद झाला; पण यवनांची राजाची निंदा केली. राजाने श्रीगुरुंना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राम्हणांना व याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्रीगुरुंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले, "आता तू संतुष्ट झाला आहेस न ? तुझी आणखी काही इच्छा आहे काय ? असेल तर सविस्तर सांग." राजा म्हणाला, "स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान मला द्या." श्रीगुरू म्हणाले, "तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल्य पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल." असे सांगून श्रीगुरू गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले. श्रीगुरुंना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्रीगुरू त्यांना म्हणाले, "माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजानही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व ब्राम्हणांना त्रास होईल, म्हणून मी प्रकटरूपाने श्रीशैल्य यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त, सूक्ष्म देहाने मी येथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा." असे सांगून लौकिकार्थाने ते श्रीशैल्य यात्रेला निघाले. असे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला सांगितले.


ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, "श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना, आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छाकामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापुर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरास जावे. तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथे गेले असता मनातल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतात. धन, धान्य, पुत्र-पौत्र इत्यादी जे हवे असेल ते प्राप्त होते."


सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्रीगुरूचरित्राचे भक्तिभावाने, निष्ठेने श्रवण-पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील."


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'पूर्वजन्मातील रजकाची कथा' नावाचा अध्याय पन्नासावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


0 comments:

गुरुचरित्र अध्याय एकावन्न

07:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक शिष्य सिद्ध्योग्य चरणांना वंदन करून म्हणाला, "यवनराजाने श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना त्याच्या बिदर नगराला गेले होते. तेथून श्रीगुरू गाणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "बाळा, आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो. ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक. ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात." श्रीगुरू यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले. परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला, की आता हा पसारा खूप वाढला आहे. लोकांना खरा परमेश्वर समजावा. नुसती व्यक्तीची पूजा असू नये. आता आपण गुप्त होऊन अवतारसमाप्ती करावी. मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण श्रीशैल्यपर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले. प्रस्थानाची सर्व तयारी झाली. श्रीगुरू शिष्यांसमवेत श्रीशैलयात्रेला म्हणून निघाले. त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले. ते श्रीगुरुंच्या चरणी पडून म्हणाले, "स्वामी, आम्हाला सोडून आपण का बरे जाता ? स्वामी, तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात. तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात. तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात. आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का ? तुम्हीच आमचे माता-पिता सर्व काही आहात. आमच्यावर कृपा करा. आम्हाला सोडून जाऊ नका."


सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली असता श्रीगुरू त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले, "भक्तजन हो, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही. मी याच गाणगापुरात, नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन, याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन. मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी शैल्य्यात्रेला जात आहे. मी प्रातःकाली कृष्णानदीत स्नान करीन. कृष्णा-पंचगंगा संगमावर औदुंबरक्षेत्री अनुष्ठान करीन. संगमावर पुन्हा स्नान करीन. मध्यान्हकाळी मठात येईन. तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन. तुम्ही कसलही चिंता करू नका. आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत. जे लोक आमची भक्ती करतात, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत. त्यांच्या सर्व कामना, इच्छा त्वरित पूर्ण होतील. हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे. अमरजा संगमावर जो अश्वथवृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील. मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे. अश्वत्थाची पूजा करून मठात येत चला व तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा. विघ्नहर्त्या चिंतामणी श्रीगणेशाची पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल. आमची दररोज त्रिकाल आरती करावी म्हणजे सर्व कार्ये सिद्धीला जातील." अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून, त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती श्रीशैल्ययात्रेसाठी निघाले. सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले. त्यावेळी त्यांना श्रीगुरू मठातच आहे असे दिसले.


श्रीगुरू आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले. त्यांनी शिष्यांना सांगितले, " माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा, मी या नदीतून श्रीशैल्यपर्वतापर्यंत जाईन व मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहीन." श्रीगुरुंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती, कमळ, मालती, कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली. त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवले. मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, "आता तुम्ही गावात परत जा."


हे ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले. श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, "आम्ही गाणगापुरातच मठात असू. तुम्हाला दर्शन देऊ. कसलीही चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू, याची खात्री बाळगा." असे सांगून श्रीगुरू उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले. आता मी निजस्थानी जातो. तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो." असे ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीत गुरु होता. बहुधान्य नाम संवत्सर होते. त्या दिवशी माघ वद्य प्रतिपदा होती. वार शुक्रवार होता. शिशिरऋतू होता.


श्रीगुरू निजानंदी बसले, त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले, "आम्ही निजधामाला जात आहोत. तेथे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसादपुष्पे प्रवाहात वाहत येतील. ती तुम्ही घ्या. आमची नित्य पूजा करीत जा. त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. आम्हाला गायन खूप आवडते. ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो. आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही. त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल. त्याला पुत्रपौत्र प्राप्त होतील. तो निरामय शतायुषी होईल. जे कोणी आमचे चरित्र श्रवण-पठण करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल. याविषयी संदेह नसावा." असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरू एकाएकी गुप्त झाले.


सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले. ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, "आम्ही पैलतीरी होतो. तेथे आम्ही श्रीगुरुंना पाहिले. संन्यासी वेषात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता. त्यांनी स्वतःचे नाव श्रीनृसिंहसरस्वती असे सांगितले. त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे. "आम्ही कर्दळीवनी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू." त्यांनी जाताना असेही सांगितले की, तुम्ही आता तुमच्या घरी जावे. वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे. प्रसादपुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून श्रीगुरू एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसादपुष्पे वाहत आली. तू चार शिष्यांनी घेतली.


सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले, "ते चार प्रमुख शिष्य कोण ?" त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "श्रीगुरुंचे अनेक शिष्य होते. श्रीगुरुंनी त्यांना संन्यासदीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठविले. त्यातील कृष्णसरस्वती, बालसरस्वती व उपेंद्रसरस्वती व माधवसरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले. श्रीगुरू निजधामाला गेले त्यावेळी सायंदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदीब्राम्हण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही ती पुष्पे काढून घेतली. ते पुष्प आजही माझ्याकडे आहे. त्याची मी नित्य पूजा करतो." असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत, अपूर्व आहे. तो अपार आहे. त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला. नामधारका, साक्षात कामधेनू असेलेले श्रीगुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले. आता तुझे दैन्य, दारिद्र्य पळून गेले असेच समज. हे श्रीगुरूचरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण-पठण करतील ते लक्ष्मीवंत होतील. त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्यांच्या मातृ-पितृ उभयपक्षी महानंद होईल. त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल."


असे हे श्रीगुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले. ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला. त्याच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण झाल्या.


ग्रंथकार सरस्वती म्हणतात, "नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण-पठण करतील. त्यांना धर्मार्थकाममोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील, म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात, "श्रोते हो ! सर्व इच्छा, कामना पूर्ण करणाऱ्या या श्रीगुरूचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने, श्रद्धेने श्रवण-पठण करा. तुमचे सदैव कल्याण होईल."


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन' नावाचा अध्याय एकावन्नावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

0 comments: