Adhyay 2 (अध्याय २)

05:59:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


धूळभेट कथा 


या कथेमध्ये हेमाडपंतांनी सांगितलेला त्यांचा प्रवास हा आपल्या प्रत्येकाचा आहे. सद्गुरू हाच आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. कथेमध्ये साईना भेटण्याआधीचे दाभोलकर जेव्हा साई भेटल्यावर पुढे हेमाडपंत होतात तेव्हा त्यांच्यात होणारा आमूलाग्र बदल हा आपण प्रत्येकाने स्वानुभवात अनुभवालाच असणार. अगदी नक्की. ही कथा आपल्याला साईनाथांकडे जाण्याआधीचे आपण आणि साईनाथांच्या भक्तीमार्गातले आपण असा आपल्यामधीलच  difference आपल्याला सांगते. 


झोपलो होतो ढोंग करुनी,
बहिरा हि झालो होतो बोळे घालूनी,
कवाडी बंद होती चारी बाजूला,

तरी कसा बापू माझा येतची राहिला


आधी शिरडीलाही जाण्यासाठी का-कु करणारे दाभोलकर साई भेटल्यावर स्वतः ला पूर्णपणे विसरतात (मी पणा चा  विसर पडतो) आणि साईंची धूळभेट घेतात. 

प्रथम पाहिले तुला       
आकर्ण नयन फाकले 
रोखून तू पाहता 
सर्व भान हरपले  

बापू भेटला ज्या क्षणी 
मन हे जाहले उन्मनी 

हेमाडपंत शिरडीला जायला निघणार तोच त्यांच्या कानावर मित्राच्या मुलाची मृत्यूची वार्ता येते. त्या मुलात किंवा सभोवतालच्या परिस्थितीत दोष काढण्यासारखे काहीही नसताना हे घडले म्हणून त्यांच्या मनात कुतर्कांचे ढग अजूनच घनदाट होतात. 

पण हे सुद्धा का होते? तर मुळात सद्गुरू या संकल्पनेविषयीच मनात संशय आणि संभ्रम असल्यामुळे नियतीने अशा गोष्टी त्यांच्या कानावर आणल्या. पण एकदा का सद्गुरूंनी जवळ ओढायचे ठरवले, की ही नियतीच काय, तर कुणीही  काहीही करू शकत नाही. साईंनी पुढे दुसऱ्या मार्गाने हेमाडपंतांना आपल्या जवळ ओढलेच! 

हा साईनाथ आपल्याला वारंवार अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. दाभोलकरांनी त्या संधीचे सोने केले. आपण एक पाऊल उचलल्यावर पुढील ९९ पाऊले 'तो' उचलतो. आणि म्हणूनच दाभोलकरांना एक फकीर शिरडीकडे जाण्याचा योग्य तो मार्ग दाखवतो आणि दाभोलकर शिरडीत पोहोचू शकतात. 

ज्याप्रमाणे नदी विविध नागमोडी वळणे घेत घेत, आपली वाट काढत आपोआप सागराच्या दिशेने प्रस्थान करते आणि शेवटी त्या सागरात विलीन होते, अगदी त्याचप्रमाणे एक भक्त त्या साईसागरात विलीन होतो... अगदी कायमचा ! त्याला सागररूपी सद्गुरू मिळतो.

दिल खो गया हो गया किसी का
अब रास्ता मिल गया ख़ुशी का

रिश्ता नया रब्बा दिल छू रहा है
खींचे मुझे कोई डोर तेरी ओर 
तेरी ओर, तेरी ओर, तेरी ओर, हाय रब्बा



आपल्या आयुष्या गुरू का हवा?

खरचं सोपं उत्तर आहे…..

१) संरक्षण कवच म्हणून
२) योग्य मार्ग दाखवण्यासाठी
३) आयुष्या अधिकाधिक सुखी, सुंदर करण्यासाठी
४) चुकलो तर दम देण्यासाठी
५) धडपडण्या आधीच भक्कम आधार देण्यासाठी
६) दुःखात मायेने जवळ घेण्यासाठी
७) आनंदात कौतुक करण्यासाठी

ही list कधीच न संपणारी आहे.....


ज्यावेळी त्या परमात्म्याकडून स्फूर्ति होते आणि आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होते तेव्हा जो ताबडतोब क्षणाचा ही विलम्ब न करता त्या दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करून स्वताच जीवन सुधरऊन घेतो तोच खरा श्रद्धावान.

ती गुरु माउली एवढी प्रेमळ आहे की ती अश्या  संध्या, कप्प्या आपल्या जीवनात वारंवार पुर्वतच राहते..

आणि ह्याच best example  आपण सुनदरकांडा मधे बघतोच.. ज्यावेळी हनुमंताची शेपुट जाळण्याची आज्ञा रावण त्याच्या सैनिकाना देतो त्यावेळी हनुमान बाप्पा त्याची शेपुट वाढवत नेतो..ते ह्यासाठीच की त्या लोकांना अक्कल यावी.. जर हणुमन्तामधे एवढी ताकद आहे तर मग त्याच्या रामा मधे किती ताकद असेल, पण ते मुर्ख राक्षस ही गोष्ट समजू शकत नाही आणि ते आग लावतात आणि स्वताच आयुष्य गमावून बसतात..

तेच दुसरया बाजुला विभीषण….
रावण ज्यवेळी त्याला त्याच्या दर्बारातुन हाकलून लावतो त्यावेळी कसला ही विचार न करता लागलीच विभीषण तिथून निघून सरळ त्याच्या रामाकडे येतो. आणि आपण बघतोच की जी गोष्ट रावणाला 10 शिर देऊन नाही मिळाली तीच विभिषणाला मात्र फ़क्त त्या रामाला शरण गेल्याने मिळाली..

जो संपति सिव रावनहि दीन्हिदिएँ दस माथ।
सोइ संपदा बिभीषनहि सकुचि दीन्हि रघुनाथ।।

हीच ती वेळ आणि हाच तो क्षण जो आपल्या आयुष्याचा एक चांगल्या अर्थाने turning point ठरू शकतो.

दिलेल्या कप्पिचा योग्य वापर करून आयुष्य विभीषण, हेमाड्पंतान्सरख…सुन्दर करायच का रावणा सारखा सगळ काही गमावून बसायच हे शेवटी आपल आपल्यालाच ठरवायच असत कारण कर्मस्वातान्त्र्य प्रत्येकाला दिल आहे.
आणि हेच आपल्या लाडक्या मीना वैनिनी आपल्याला किती सहज आणि सोप्या भाषेत सांगितला आहे…

जे आले ते तरुनी गेले
जे न आले ते तसेच राहिले
अनिरुद्धाचा झाला तो उरला
दूजा दुखातची रुतला


------------------------------------------------------





हेमाडपंत नामकरण कथा 


सद्गुरुंकडे येण्याआधी आपण प्रत्येक जण स्वतःला ग्रेट समजत असतो. फक्त मलाच सगळं येतं आणि मलाच सगळं कळतं असाच प्रत्येकाचा समज असतो. मी म्हणेन तीच पूर्व दिशा असे म्हणून आपण स्वतःच्याच कोषात गर्क असतो. हेच खरे अज्ञान! .... आणि यामुळेच 'वाद' निर्माण होतात. मी म्हणतो तेच समोरच्याने मान्य केले पाहिजे या अहंकारी हुकूमशाहीतूनच वादावादी जन्म घेते.....  

हेमाडपंत येथे आम्हाला दाखवून देत आहेत की सद्गुरूंच्या चरणधुळीत लोटांगण घालून लोळण्याचे सुख मिळाल्यानंतरही आम्ही आमच्या अहंकारापोटी वादावादीच्या दलदलीत लोळण्यात कसे सुख मानतो.... हेच ते दुर्दैव आणि मूर्खपणा  !


बाबांचे दर्शन होऊनही हेमाडपंतांचा अहंकार पूर्णपणे गेलेला नाही. प्रत्येक भक्ताची सुरुवातीला अशीच स्थिती असते. नको तिथे नको ती चतुराई दाखवण्यात अनेक जण धन्यता मानतात. पण खरे तर ही चतुराई नसून 'अती हुशारीच' असते... 

मोर पिसारा फुलवून नेहेमी आपल्यातली कला दाखवायला जातो. त्याला त्यात अगदी धन्यता वाटते; परंतु बघायला गेलं तर तो स्वतःचीच लाज उघडी करत असतो. आपणही बऱ्याचदा मोराप्रमाणेच आपली 'कला' दाखवायला जातो.          

सगळे लोक माझ्याकडेच बघत आहेत, मला demand आहे, मी प्रसिद्ध झालो आहे, सगळे माझेच ऐकत आहेत अशा अविर्भावात आपण वावरत असतो. परंतु ह्या स्वप्रसिद्धी आणि आत्मस्तुतीचा काहीही फायदा नसतो. उलट त्याने आपलाच घात होत असतो हे ही आपल्याला काळत नाही. 

मांजर डोळे मिटून दूध पीत असतं, त्याला वाटतं आपल्याला कुणीच बघत नाही. पण हा त्याचा गोड गैरसमज असतो. ह्या साईला काही कळत नाही आणि दिसत नाही अशी गोष्टच नाही. एवढे जरी आपल्याला कळले, तरी पुरे. साईनाथांचे "वाड्यात कसली वादावादी चालू होती?" हे वाक्य याचीच प्रचिती आहे. 

साईनाथ पण ग्रेट आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द हा गहन अर्थाने भरलेला असतो. म्हणूनच त्यांनी 'हेमाडपंत' असा शब्द वापरला आहे. 


हेमाडपंत या नावाचा इतिहास :

देवगिरीचे राजे यादव तेच दौलताबादचे जाधव 👈🏻 ह्यांच्या घराण्यात  तेराव्या शतकातील म्हणजे १२५९ ते १२७४ पर्यंत राजे राजा महादेव व राजा रामदेवराय यांचा *" हेमाद्री "* नावाचा प्रधानमंञी होता.....
हा स्मार्त ऋग्वेदी ब्राम्हण होता.....
अस्सल राजकारणी ,
उत्तम व्यवस्थापक ,
उत्तम वादविवादपटू 
   आणि 
प्रतिभावंत विद्वान लेखक म्हणून प्रसिद्ध होता.....
" चतुवर्ग चिंतामणी " , 
" आयुर्वेद रसायन " 
     तसेच
हेमाडपंती बखर यासारखे विद्यमान ग्रंथाचे लेखन याने केले.....
मोडी लिपीचा वापरही यानेच सुरू केला......

   हा
हेमाद्री
संस्कृत भाषेमध्ये हेमाद्रीपंत 
      तोच
मराठी भाषेत हेमाडपंत.....


यावरूनच साईनाथांनी किती perfect उपमा दिली आहे हे समजते. 

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते.... आपण स्वतःला अगदी कितीही हुशार, ग्रेट समजलो, तरी हा साऱ्याचा 'बाप' आहे हे पण लक्षात ठेवायला हवे. आपली सारी लबाडी ह्याच्यापुढे फिक्कीच..... आणि आपल्या या अती-हुशारीला ताळ्यावर आणणारा सुद्धा हाच. तसेच आपल्यातल्या ह्या अति-हुशारीचे 'त्या'च्यावरच्या अति-प्रेमात रुपांतर करणाराही हाच !!  हे केवळ यालाच जमू शकतं, बाकी कुणालाही नाही.   

       


0 comments: