Adhyay 50 - chapter 50
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
पंचतन्मात्रा अहंकारी ।
पंचमहाभूतें त्यामाझारीं ।
पंचमहाभूतांचिया उदरी ।
जग निर्धारी जन्मलें ॥
अ. ५० / ओ. १५९
या ओवीमध्ये उत्पत्तीक्रम सांगितला आहे.
सर्वात आधी दत्तगुरू - परम तत्वापासून सत्व, रज आणि तम या ३ तत्वाची उत्पत्ती झाली. हाच विश्वातील Electron Proton Neutron चा पाया आहे. ह्याच्यामुळेच 'प्रकृती' जन्मास आली.
आता उत्पत्तीचा क्रम पुढीलप्रमाणे ->
१) प्रकृती पासून महत्त्व
२) महत्वापासून अहंकार
३) अहंकारातून पुढील निर्माण झाले ->
३-१) पाच तन्मात्रा (शब्द, स्पर्ष, रूप, रस, गंध)
३-२) पाच ज्ञानेंद्रिये (श्रोत, त्वचा, नेत्र, रसना, घ्राणेंद्रिय )
३-३) पाच कर्मेंद्रिये (वाणी, हात, पाय, उपस्थ, गुदा)
३-४) मन
आणि या पाच तन्मात्रा पासूनच पंचमहाभूतांची आणि पर्यायी या जगाची निर्मिती झाली
१) अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही शब्दांमध्ये कॉमन शब्द आहेत ते म्हणजे - ज्ञान. कारण ते असतेच. ज्याप्रमाणे अंधार म्हणजेच प्रकाशाचा अभाव, त्याचप्रमाणे ज्ञानाचा अभाव म्हणजेच अज्ञान. *खरे अज्ञान म्हणजे काय हे साध्या सोप्या उदाहरणाद्वारे साईनाथ या कथेत समजावून सांगत आहेत.*
२) *या जगामध्ये आपण अनेक जण बघतो जे स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा टेंभा मिरवण्यातच धन्यता मानतात आणि स्वतःचा अहंकार / अभिमान जपतात. मी ही याला अपवाद नाही. पण बहुतेक साईनाथ या फुकटच्या ज्ञानाच्या अभिमान / अहंकारालाच 'अज्ञान' म्हणत आहेत असे वाटते.*
लोका सांगे ब्रह्मज्ञान
आपण कोरडे पाषाण
ही म्हण आपण सार्यानीच एकलेली असेल. तोंडातून मोठमोठे शब्द बोलायचे, जगाला ज्ञान पाजळायचे आणि कृती मात्र अज्ञानाप्रमाणे करायची. हा 'दिखाऊपणा' साईनाथाना आवडत नाही असे या कथेतून दिसते.
३) नानासाहेब चांदोरकर हे खरोखर एक विद्वत्तेने श्रेष्ठ भक्त आहेत. आपल्या भक्ताला त्याच्याकडच्या गुणांचा आणि विद्वान असल्याचा गर्व होऊ नये म्हणूनच साईनाथ त्यांना भागवदगीतेतील श्लोकाचा अर्थ सांगत असावेत असे वाटते.
नाना तोंडातल्या तोंडात पूटपुटत असणारे श्लोकही साईनाथ बरोबर हेरत आहेत आणि त्याद्वारे एक मोठी शिकवण साऱ्यांनाच देत आहेत. *साईनाथ पण ग्रेट आहेत. इतके perfect timing केवळ याचेच. केवळ हाच इतक्या सहजपणे आपल्या विचारांना आणि कृतीला योग्य दिशा आणि उचित वळण लावू शकतो. बाकी कुणालाही हे जमणे शक्य नाही.*
४)
२० व्या अध्यायात दासगणूंना पडलेल्या कोड्याची गोष्ट येते. ईशावास्य उपनिषदासारख्या कठीण प्रश्नाचे उत्तर एका अति सामान्य मोलकरणीद्वारे साईनाथ देतो. *हा ही सामान्य आणि याचे प्रश्नांना उत्तर द्यायचे मार्गसुद्धा तसेच साधे सोपे.*
शेवटी एवढेच वाटते -
*खरे पाहाता हा साईनाथ, हा बापू म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान. तरीसुद्धा हा स्वतः स्वत:चा / स्वतःकाडील ज्ञानाचा अजिबात गवगवा न करता त्याचे काम अगदी चोखपणे करत असतो. किंबहुना स्वत: कडे लघुरूप घेणेच पसंत करतो. हेच आपण त्याच्याकडून शिकायला हवे. कारण तेच खरे ज्ञान.*
0 comments:
Post a Comment