Dhwani (ध्वनी प्रयोग)

07:33:00 Nandan Bhalwankar 0 Comments

(हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.  

हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  

मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.


 


श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीची पहिली पायरी आहे. श्रवण करण्यासाठी ध्वनी लागतोच. म्हणजेच आपण जो ध्वनी ऐकतो, तो खूपच महत्तवाचा आहे. आपल्या शरीरासाठी ते एक input आहे. शरीरही त्यानुसारच output देते. 

म्हणूनच अध्याय ३ मधील रोहिल्याच्या गुणसंकीर्तनाच्या ध्वनीचा importance आपल्याला जाणवतो. नाम मनात घेण्यापेक्षा ते मोठ्याने घेण्याचा एक फायदा म्हणजे नाम उच्चारले जाताना त्याचवेळेस श्रवणभक्तीही होते. एकाच वेळी दुहेरी लाभ मिळतो. 

ज्ञानदेवा मौन 
जपमाळ अंतरी 
धरोनी श्रीहरी 
जपे सदा ... 

हा नामाचा पवित्र ध्वनी सतत उत्पन्न व्हायला हवा. जेव्हा बाहेर नाम घेणे शक्य नाही तिथे किमान मनात तरी हा ध्वनी चालू हवा. 

ह्या प्रयोगात दाखवल्याप्रमाणे घड्याळाची टिकटिक विशिष्ट अंतरानंतर ऐकू येत नाही. त्यासाठी ध्वनी एकाच दिशेने वाहणे आवश्यक आहे. यासाठीच या प्रयोगात जशी रबरी नळी वाहक म्हणून वापरली आहे, तशीच आपल्या विश्वासाची आणि अनन्यतेची नळी कायम आपल्याकडे हवी. यामुळेच आपण "त्या"च्याशी अधिकाधिक जोडले जाऊ शकू. त्याच्याशी या नळीसारखे कायमचे कनेक्शन जोडले जाऊ शकेल. 

ह्या प्रयोगात घड्याळाची टिकटिक ही अंतरात्म्याची त्या परमात्म्याला घातलेली साद आहे. बापू म्हणतात तसे ह्रदयाचे धडकणे (लब-डब) ही परमशिवाला घातलेली हाक आहे. म्हणूनच रोहिल्याप्रमाणे त्याला कायम हाक मारून भक्तीभाव चैतन्यात रममाण होऊया !!  


0 comments: