1D - सूर्यप्रकाशाच्या दिशेने रोपट्याची वाढ

11:40:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

*प्रँक्टिकल 1 - डी जीवनविकास*



*प्रात्यक्षिक :- सुर्य प्रकाशाच्या दिशेने रोपट्याची वाढ*


*प्रश्न :- प्रयोगाच्या आधारे शास्त्रीय व आध्यात्मीक तत्व भावार्थ सहित स्पष्ट करा ....*


*साहित्य*:- एका बाजूस एक भोक पाडलेले खोके ,
कुंडीत सरळ वाढ झालेले छोटेसे रोपटे , पाणी.


*कृती :-* कुंडीवर खोके ठेवायचे. खोके असे ठेवायचे की सुर्यप्रकाश ज्या बाजूला आहे तीकडे भोक येईल व सुर्यप्रकाश कुंडीपर्यंत जाऊ शकेल. रोज कुंडीत आवश्यकते नुसार पाणी घालत रहायचे....


*निरीक्षण :-*
१) रोपटे वाढते पण वाढता वाढता त्याची दिशा बदलते.
२) रोपटे थोडे तिरपे पण भोकाच्या दिशेने वाढते , जिथून सुर्यप्रकाश आत येतो.


*अनुमान :-* खोके सर्व बाजूनी बंद असले तरी एका भोकामुळे फक्त सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. त्यामुळे भोकातून आत येणारा जीवनदायी सूर्यप्रकाश व प्राणवायू यामुळे झाडाची वाढ तिरपी होत असून ती भोकाच्या म्हणजेच प्रकाशाच्या दिशेकडे होते.












0 comments: