Adhyay 1 (अध्याय १)

01:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

साईचरित्राची सुरुवातच मुळी अद्भुत रसाने होते. अतर्क्य / अनाकलनीय गोष्टीत प्रत्येक मानवाला रस (interest) असतोच. आणि मग त्याची अधिक गोडी चाखावी असे वाटून साईचरित्र वाचण्याची ओढ निर्माण होते. हेच ते परमेश्वराचे चुंबकीय आकर्षण ! आपल्यालाही कळत - नकळत आपल्याला स्वतः कडे आकर्षून घेणारे व कायमचे स्वतः जवळ ठेवणारे !



माझे मन एका निमिषात अनेक विचार करते. सैरावैरा धावते. त्याचे नम: होणे आवश्यक असल्याने अध्यायाच्या सुरुवातीलाच हेमाडपंत वंदन करताना दिसत आहेत. परमेश्वराजवळ जाऊन त्याचे होण्याकरता शारण्यभाव हवा, आणि तो या नमनानेच प्राप्त होतो.  




प्रथम अध्यायात हेमाडपंतांनी सर्वांना नमन केले आहे. 


हेमाडपंतांना बाबांना पाहून सर्व देवांची आठवण येत आहे. 
सर्व देव तुझ्यामध्येच आहेत. 

हेमाडपंत बाबांना गणाधीश म्हणतात. गणेशाच्या ठायी असलेले सर्व गुण हेमाडपंतांना बाबांच्या ठायी दिसत आहेत.  

ओव्या नीट वाचून समजून घ्यायचा आपण स्वतः प्रयास करायचा. 

महाधर्मवर्मन डॉ. योगिंद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांचे अध्यायांवरील निरूपण वाचलेत तर आपणास सविस्तर माहिती मिळू शकेल व संकल्पना अधिक स्पष्ट होतील. त्याचा जरूर लाभ घ्या. 

ते समजून घेण्यासाठी आम्ही सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयास करत आहोत.







गहूदळण कथा  


काही मुद्दे : 



- कोणतेही कर्म फळाकडे बघून केले की त्याचे उचित फळ प्राप्त होत नाही. बायांनी दळताना लोभाचा विचार केल्यामुळे त्याचा भरडा तयार झाला.



- सद्गुरुंच्या कार्यात पूर्ण प्रेमाने / क्षमतेने / पूर्ण प्रेमाने सहभागी व्हायला हवे.



- आपल्या प्रत्येकाच्या मनात भीतीची महामारी असते व आपल्या मनाला शांतत्व देणारा हा एकमेव डॉक्टर आहे.  साऱ्या गोष्टी मनावरच अवलंबून असतात. मनाचे सामर्थ्य प्रदान करणारा माझा सद्गुरू व डॉक्टर बापू सामर्थ्यदाता ! 



- चण्डिकाकुलाच्या तसबिरीमध्ये बाळ बापू आईच्या चरणांवर बसून विश्वाचे दळण दळीत आहे. कष्ट सोसत आहे. 

चण्डिकाकुलाची तसबीर आपण सर्वांनीच पाहिली आहे. बाळ बापु आईच्या चरणांजवळ बसून विश्वाचे दळण दळत आहे. कष्ट सोसत आहे. आपण सारेच जाणतो. यात सप्तसुरांचाही प्रवास आहे. हनुमान चालिसा ते दत्तबावनी सा पासून नी पर्यंतचा सप्तसुरांचा प्रवास !  

हनुमंताचे वास्तव्य महाप्राणाच्या रूपात माझ्या मेरुदंडात आहे तर सद्गुरू दत्तबाप्पा माझ्या सहस्त्रार चक्रात विराजमान आहेत. सहस्त्रार चक्रात विराजमान असणाऱ्या सद्गुरुला भेटण्याकरिता माझी सप्तचक्रे शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता आपल्याला आपल्या लाडक्या बापूरायाने श्रीशब्दध्यानयोग अर्चना व मुद्रांचा अभ्यास दिला आहे.


- ही गहूदळणाची कथा हा साईचरित्राचा उगम आहे. म्हणूनच या कथेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या सर्वांच्या साईचरित्राच्या अभ्यासाची ही कथा सुरुवात आहे. ही कथाच संपूर्ण साईचरित्र आपल्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणणार आहे ते सांगते. 

बाबांनी गहू दाळणाकरता घेतलेले जातं हे एक प्रकारचं त्यांचं हत्यारच आहे, एक प्रकारचा फिल्टर आहे, जो आपला जीवनप्रवास सफळ संपूर्ण करतो, विगतीकडून सुगतीकडे नेतो. या साईचरित्राच्या अभ्यासाने आपला संपूर्ण कायापालट होऊ शकतो. हीच या साईचरित्राची ताकद आहे. 


बाबांच्या आज्ञेने वेशीवर टाकलेले गव्हाचे पीठ ही लक्ष्मणरेषाच आहे. महामारीरूपी रावण तिचे उल्लंघन करूच शकत नाही. हेच ते बाबांचे आपल्याला दिलेले सुरक्षाकवच. protection.


साईचरित्रातील जाते हे circular / वर्तुळाकार असते. हाच तो आपला जन्म-मृत्यूचा फेरा. या एकेका फेऱ्यामध्ये आपण वाईट वागून गहूरूपी प्रारब्ध निर्माण करतो. यातूनच पाप उत्पन्न होऊन महामारीस कारण ठरते. मग आपल्यासाठी तो साईनाथ स्वतः कष्ट घेऊन आपले प्रारब्ध जात्यात भरडायला बसतो. किती हे कारूण्य !

जन्म-मृत्यूचा लपंडाव हा मायेचा सारा 
मुक्त करा हो साईनाथा नको येरझारा 
साई नको येरझारा.. 


या करोना व्हायरस ने जवळपास प्रत्येकाच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. या व्हायरसने व्यापक स्वरूप धारण केल्यावर तर प्रत्येक जण अगदी पुरता घाबरलेला वाटत आहे.

सध्या साईचरितावर आधारित पंचशील परीक्षा देखील सुरू आहेत. साईचरित्राचा उगमच मुळी बाबांच्या गहू दळण लीलेमुळे झाला. 


१) साईनाथांनी जात्यात गहू भरडले. शिरडीवर पुढे येणारी गहूरूपी महामारीच भरडली. सध्या या करोना व्हायरस ने अख्ख्या जगात थैमान माजवले आहे. हा बापूसाईच त्याच्या लीलेद्वारे ह्या गहूरूपी करोना व्हायरस चे समूळ उच्चाटन करू शकतो. बाकी कुणालाही हे शक्य नाही. 


२) महामारी शिरडीत प्रवेशच करू नये म्हणून बाबांनी शिरडीच्या शिवेवर पीठ नेऊन टाकायाला सांगितलेले. बाबांना पुढे येणाऱ्या संकटांची आधीच चाहूल लागली होती. बापूंनी सुद्धा कित्येक वर्षे आधी आपल्या सर्वांना पुढे येणाऱ्या भयावह संहारक रोगांविषयी पूर्वकल्पना दिली होती. हा बापूसाईच पुढे काय वाढून ठेवले आहे हे जाणू शकतो, आणि आपल्या लेकरांच्या प्रेमाखातर त्यांना आधीच सूचित करू शकतो. बाकी कुणी नाही.


३) संकटाचा नाश होण्याकरता बाबा स्वतः दळण दळायला बसले. आपले डॅड सुद्धा आपल्यासाठी, त्याच्या लेकरांच्या सुखासाठी असेच अहोरात्र झटत असतात. तपश्चर्येला बसतात. आपल्यावर एवढे प्रेम केवळ हाच करू शकतो. बाकी कुणीही नाही.


४) बाबांनी येणाऱ्या संकटासाठी आपण काय करायला हवे ते दळणाच्या लीलेद्वारे दाखविले. श्रद्धा (स्थिर चाक), सबुरी (फिरते चाक), अनन्यता (खुंटा) या त्रयीचा सुयोग्य वापर करून सेवा भक्तीच्या उपक्रमात गहूदळण कथेतील ४ बायकांप्रमाणे उत्साहाने पुढाकार घ्यायला हवा हे दाखविले. 
आज बापूंनीही रामराज्याच्या प्रवचनातून शताक्षी प्रसादाम, वॉटर थेरपी, कढीपत्ता, सूर्यप्रकाशाचे महत्व, व्हिटॅमिन "D" intake ह्या सर्वांचे अतिशय सोप्या शब्दात विश्लेषण केले आहे. त्याच प्रमाणे रोजचे एक तास चालणे, सूर्यनमस्कार ह्या सर्वांचे महत्व बापूंनी वेळोवेळी सांगितले. आपल्याला सुदृढ आरोग्याचा खजिना हा Self Health वरील व्याख्यान स्वरूपात दिला.  


५) कथेतील ४ बायांना साईनाथांनी पीठ शिवेवर टाकायला सांगितले म्हणजे महामारी शिरडीत प्रवेशच करू शकणार नाही हा विश्वास होता. बाबांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असतेच, हा विश्वास होता. 


आज आपण सारे ह्या विश्वासाच्या आधारावर तर जगतो आहोत. आपला बाप बसला आहे, जो सगळ्यांपेक्षा  'बाप' आहे, मग करोना व्हायरस का असेना... आज बाकी लोकांसारखी आपल्यात या करोना व्हायरस ची पराकोटीची भीती नाही. आज आपल्याला 'बापू'रूपी आधार आहे. एक कवच आहे. 


मी बाकींच्यांना बघतो तर एक वेगाळ्याच प्रकारच्या 'करोना' भयाने त्यांना ग्रासले आहे. ह्या विषाणूची लागण मला होईल का? झाली तर माझे काय होईल? बाकीचे या रोगामुळे मरतात तसे मी मरेन का? सतत याच विवंचनेत मला बाकी लोकं दिसतात.


करोना व्हायरसची त्यांना लागण होईल की नाही ते माहीत नाही, पण त्यांच्या मनाला already या भीती रूपी करोना व्हायरस ने ग्रासले आहे. केवळ हा बापू, जो मन:सामर्थ्यदाता आहे, त्याच्या सावलीखाली आपल्याला भय नाही. Love You Dad! 


शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते - 


असो कुठलाही रोग 
अथवा व्हायरस करोना....  

कशाला आता चिंता हवी,
आपला डॅड आहे ना...... 


























0 comments: