Adhyay 10 (अध्याय १०)

05:38:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 





साईनाथांचे अरुंद फळीवर शयन


कुणी प्रसिद्ध कलाकार किंवा नट असतो त्याचे असंख्य followers असतात. तो प्रत्येक क्षणाला काय काय करत असतो, कसा राहातो, काय खातो, कसा उठतो-बसतो वैगरे साऱ्याच गोष्टींची नोंद त्याचे चाहते कुतुहलापोटी घेत असतात.  त्यात त्यांना भारी interest असतो.... 
अगदी याचप्रमाणे हा सदगुरू परमात्मा जेव्हा एका सर्वसामान्य माणसाच्या देहात वावरत असतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक कृती आणि क्रियेबद्दल प्रत्येकाच्याच मनात कुतूहल असते. बहुतेक याचसाठी हेमाडपंत साईचरित्रामध्ये साईनाथांच्या प्रत्येक लीलेबद्दल वाचकांना भरभरून सांगत आहेत. म्हणूनच साईनाथांच्या शयनाबद्दलही या अध्यायात आपल्याला वाचायला मिळत आहे.         

हा साईनाथ जरी दिसताना नुसता एकटा दिसत असला, तरी त्याला अख्या विश्वाचा संसार सांभाळायचा आहे. विचार करा. आपल्याला स्वतःचा संसाराचा गाडा हाकायलाही नाकी नऊ येतात. किती पातळ्यांवर गोष्टी सांभाळायला लागतात. त्यातही बरे-वाईट दिवस असतातच. मग ह्या साईबाबाला तर अख्या ब्रह्माण्डाची काळजी वाहायची आहे... केवढे ओझे असेल ना ह्याच्या डोक्यावर !! 

मग एवढा व्याप असताना आराम नको का ? हा जरी परमात्मा असेल, तरी शेवटी एका मानवाच्या रूपातच आला आहे ना.. मानवी देहाची सारी limitations ह्यालाही असणारच ! किंबहुना ती तो पाळतोच ! पण ह्याचे सारे काही हटके ! अगदी ह्या कथेत दिलेले त्याचे शयन सुद्धा निराळेच आहे. 

कथेतील वर्णन वाचून अचंबित व्हायला होते. आठ सिद्धी ज्याच्या पायाशी लोळण घेतात असा हा साईनाथ. मग ह्याला काय अशक्य ? नाही का ?

आकाशाची करी तू पृथवी 
अग्नीसी करी जल 
पिपा जाणतो सर्व अशक्य 
तुझ्या हातीचा मल 

परब्रह्माचा अभयहस्त तू 
परांबेचा सूत ... 

हे जाणल्यावरच ही कथा वाचल्यावर पडणाऱ्या मनातल्या साऱ्या प्रश्नांना उत्तरे मिळतात.  

वास्तविक पाहाता साईबाबा सामान्य माणसाप्रमाणे झोपू शकले असते. परंतु साईनाथांच्या प्रत्येक कृतीमागे खूप गहन अर्थ दडलेला असतो. म्हणजेच ह्या सगळ्या कथेत नक्कीच मोठा अर्थ दडलेला आहे. 



१) अष्टसिद्धी वर सत्ता असल्याकारणाने हा हवा तेव्हा हवा तसा बनू शकतो. ह्याला कसले आले वजन ? बेसिकली जगाचे सारे नियमच ह्याच्या चरणाशी असताना ह्याला अशक्य ते काय ? म्हणूनच इतक्या अरुंद आणि हलक्या फळीपेक्षाही हलक्या जागी हा निवांत झोपू शकतो.  

गुलाबफुलांच्या पाकळयांवरी 
झुलतो अनिरुद्ध 
ह्याचा भार ना होई कुणा  

२) हा दिसताना जरी एका जागी दिसत असला, तरी ह्याचा संचार सगळीकडेच असतो. 

ऐसी नाही कुठली जागा 
जिथे ह्याचा वास नाही   

३) लोकांना आश्चर्य का वाटते ? आणि त्यांना साईनाथ झोपाळ्यावर कधी चढत हे का समजत नाही ? कारण ते साईनाथांच्या देहाची एका सामान्य माणसाच्या देहाशी तुलना करतात. आणि इथेच चुकतात.       

ह्याचा देह जरी एक मानवी देह असेल, तरी शेवटी तो परमेश्वर आहे. त्याला काय बंधन असणार ! मानवी देहाचे नियम ह्याला apply कसे बरे करणार ? हा साईनाथ केवळ ह्या एका देहापुरता मर्यादित नाही, तर तो अमर्याद आहे. 

वैनी म्हणे डोळा राही 
इतुका लहान 
विश्व व्यापूनिया उरे 
इतुका महान ... 

ह्याच्या लीला आपल्या आकलना पलीकडच्याच आहेत. आपल्या अल्प बुद्धीने त्या मोजताच नाही येणार. जमणारच नाही. कारण हा निराळाच आहे. unique आहे. 

हा येतो कधी नी जातो कधी      
ह्याचा नाही ठाव लागला ... 

४) हा जरी दिसताना निद्रिस्त दिसत असला, तरीही हा कायम जागा असतो. हे केवळ ह्यालाच जमू शकतं. हा जागा आहे म्हणून तर जग चालू आहे ... नाहीतर सगळीकडे हाहाक्कारच माजेल.   

५) ह्या चिंध्या म्हणजे मानवाचे प्रारब्ध आणि पापे. त्यावर हा आरूढ होऊन निवांत पहुडला आहे. सर्वांच्या काळज्या, समस्या केवळ हाच डोक्यावर घेऊ शकतो आणि त्यांच्यावर झोपून त्या चिंता आणि काळज्यांनाच भार बनतो. (त्यांचा नाश करतो. )    

६) ह्याच्या माथ्याशी आणि पायथ्याशी सतत तेवत राहणाऱ्या पणत्या हे हा निद्राधीन असतानाही कार्यशील आहे ह्याचेच प्रतीक आहे. 


खरे पाहाता हा निद्रिस्त झाला की सारे काही संपलेच ! नाही का ? आपण फक्त एक लक्षात ठेवायला हवे. हा आपल्या आयुष्यात निद्रिस्त होणे म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, अशुभत्व, रावण / वृत्रासुर ह्यांची आपल्या जीवनात entry होणार हे निश्चित समजावे. म्हणूनच ह्याचे चरण कायम पकडून ठेवूया. मग कसलीही भीती नाही. ह्याचा कायम active सहभाग आपल्या जीवनात यावा / हा आपल्या आयुष्यात कायम 'जागा राहावा' यासाठी आपण काय करायला हवे हे बाबांनीच आधीच सांगून ठेवले आहे. 

मग जो गाई वाडेकोडे 
माझे चरित्र माझे पवाडे 
तयाचिया मी मागेपुढे 
चोहीकडे उभाची ... 

मग कशाची चिंता ? जेव्हा हा आपल्या जीवनात 'जागा असतो' तेव्हाच आपण नीट 'जगू शकतो'...  नाहीतर आपण आडवेच.   
     
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा 
श्वासासंगे येत राहा ... 
               




--------------------------------------------


सद्गुरू महिमा 



याच्या भावार्थासाठी खालील व्हिडीओ सोबतच मालिकेतील ह्याच्यापुढील सगळे व्हिडीओज बघावे.  












0 comments: