Adhyay 13 (अध्याय १३)

05:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 



भीमाजी पाटील कथा - क्षयरोग 


भीमाजी. नावातच "भीम" आहे. डोळ्यासमोर येते ती सुखसंपन्नता. नावाप्रमाणेच भीमाजी सदा आनंदी होता. त्याची दानतही खूपच होती. म्हणजेच एकंदरीतच सारेच छान होते. आपण नेहेमी म्हणतो. माझे सारे चांगले असताना किंवा मी नेहेमी चांगले वागत असताना माझे कधी वाईट होणार नाही. पण असे नसते. ह्या जन्मात एखादवेळेस आपण चांगले वागलोही असू. पण आधीच्या २ जन्मात काय काय केले आहे ते आपल्याला माहीत नसते. कारण बापू म्हणतात त्यानुसार आपण आधीच्या २ जन्माचे पाप आणि पुण्याचे गाठोडे सोबत घेऊन इथे आलेलो असतो. म्हणूनच इतके सगळे व्यवस्थित असतानाही भीमाजीला खोकल्याचा क्षयरोग का व्हावा ह्याचे उत्तर मिळाले. 

भिमाजीला झालेला क्षयरोग म्हणजे प्रारब्धाचे ओझे होते. त्याचे भोग होते. ते भोगावेच लागतात. हे कर्माचे ओझे फक्त हा त्रिविक्रम सद्गुरूच दूर करू शकतो. बाकी कुणीही नाही, कारण कुणामध्येही तेवढी ताकदही नाही. म्हणूनच इतर वैद्य, हकीम आणि बाकी सारे शक्य उपाय भीमाजीचा रोग बरे करू शकले नाही. त्यासाठी हा साईनाथच हवा.  

ओझी वाहतो कर्माची 
भार वाढतची राहे 
बापूराया धाव घे रे 
मायबापा धाव घे.... 

"संकटी पावता एक साई" ह्या तत्व अनुसार शेवटी बाबांनीच भीमाजीला नवजीवन दिले. 

भीमाजीला आधी साई आठवला नव्हता. परंतु ह्या जन्मात त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी त्याच्या नक्कीच कामी येणार होत्या. बाबा यासाठी स्वतः भीमाजीकडे धावला. डोक्यात नाना चांदोरकरांना पत्र धाडावयाची दिलेली बुद्धी ही बाबांचीच लीला. बाबांना भीमाजीसारख्या भल्या माणसाला आपल्याकडे खेचायचे आहे. त्याचे भाग्य उजळायचे आहे. 

"बरी वाईट क्रिया ईश्वर सूत्रधारी" याचा अर्थ बाबांनी भीमाजीला क्षयरोग दिला असे नाही. अजिबात नाही. हा बाबा कधीच कुणाचेही वाईट करत नाही. भीमाजीला कर्मगतीने आणि प्रारब्धभोगांनी हा रोग होणारच होता, परंतु हा साई वाईटातूनही चांगले कसे करतो ते असे. संकटाचे संधीत रूपांतर करतो. या रोगाच्या निमित्ताने का होईना भीमाजीला हा बाबा आठवला. सद्गुरू लाभणे हीच नरजन्माला मिळालेलं सर्वोच्च गिफ़्ट आहे. तेच बाबांना भीमाजीला द्यायचं होतं. 

नानांनी सुद्धा अगदी प्रेमळ मनाने आणि कळकळीने भीमाजीची मदत केली आहे. त्यामागे त्यांचा काहीच स्वार्थ नाही. हे करून स्वतःचा उदो उदो व्हायला हवा अशी अजिबात इच्छा नाही.            

भक्तांची हाक ऐकून हा प्रेमाने भरलेला बाबा धावला नाही असे कसे होईल ? 

असा कसा तूच एक धावणारा 
भक्तिवेड्या पामरांना तारणारा .. 

ज्याअर्थी भिमाजी नानांना ओळखत आहेत, त्याअर्थी त्यांनी बाबांविषयी भीमाजीला नक्कीच सांगितले असणार. एक अखेरचा प्रयास म्हणूनच भीमाजीला बाबा आठवले. पण तरीही बाबा रागावले नाहीत. ह्याचे बाहू सदैव आपल्याला कवेत घ्यायला तयार असतात. 

असो पाप किती किंवा पुण्य गाठी 
ह्याची नाही गणना हो त्याला 
ऐकोनि पाझरे त्याचे अंतरंग 
प्रेमे साद तयासी हो घाला 

मग कसा तो कुठूनही 
येईलच तो अवचित 
वासरांसाठी प्रेमे जशी 
धेनु येई हो हंबरीत ... 

कलियुग म्हंटले की प्रॉब्लेम हे आलेच. प्रत्येकालाच एक आधार हवा आहे. भीमाजीला सुद्धा साईरुपातला एक भक्कम आधाराची गरज आहे. Sai is the only solution ! almost प्रत्येकाचीच सुरुवात अशीच होते. माझे प्रॉब्लेम सुटावे हीच इच्छा धरलेली असते. 

पण जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हाच हा का आठवायला हवा ? आपण इतर वेळी ह्याला आठवतो का ? हा परमात्मा म्हणजे कुणी जीनी किंवा आपण म्हणू तसे वागणारा आणि प्रॉब्लेम सोडवणारे मशीन नाही. ह्याच्यावर मनापासून प्रेम करायला हवे. ह्या प्रेमापुढे सारे प्रॉब्लेम नगण्य होतात. हीच त्या प्रेमाची ताकद.             

हा साईनाथ आणि मशीदमाई हीच आपली हक्काची जागा. इथे सगळे लाड होतात. हिच्या सावलीत प्रॉब्लेम टिकूच शकत नाही. साईनाथ तेच जीवनाला हरलेल्या भीमाजीला सांगत आहेत. त्याचा आत्मविश्वास जागा करीत आहेत. उदी लावून, छान आशीर्वाद देऊन एका जागी आश्रय घेण्याची आज्ञा करीत आहेत. 

ती जागा सुद्धा साई प्रेमाच्या ओलाव्याने चिंब भिजली आहे. तिथे ह्या साईनाथाने भीमाजीला कुशीत घेतले आहे. बाबा एकदा नाही, तर दोनदा स्वप्नात येऊन छातीतल्या क्षयरोगाला धपाटे घालून त्याचा मुळासकट नायनाट करत आहेत. डॉक्टर राजीव कर्णिकांचा अनुभव आठवला. बापूंनी स्वप्नात येऊन झाडूने फुफ्फुसे साफ केली होती. भीमाजीसारखेच मरणाच्या दारातून बाहेर काढले !      




भिमाजी बरा झाल्यावर नानासाहेबांचेही उपकार स्मरत आहे. त्यांना विसरला नाही. नानांनी काय केले, सारी तर बाबांची किमया असे म्हणाले नाहीत. हल्ली तर लोक उपकार केले असता अपकारच परत देतात. कुणालाही मदत करायला जावे तर भीतीच वाटते. use and throw धोरण अवलंबितात सारे. भीमाजी पाटील खूप काही शिकवीत आहे.   
    
शेवटी एवढेच वाटते. भीमाजीला बाबा लाभला तसा आपल्याला हा बापू लाभला आहे. ह्या कलियुगातला हाच सहारा!   

सभी सहारा ढूंढ रहे है 
देगा किसे कोई कैसे सहारा 
हर मुशकील का हल है प्यारे  
अनिरुद्ध सेतू सबसे न्यारा ... 

ह्या सेतूवरूनच आपल्याला चालायचे आहे. बाकी तो संभाळणार आहेच ! आपल्या आयुष्यात रामराज्य येणारच ! अगदी नक्की. कारण बापू आपल्या आयुष्यातील रावण मारणारच आहे !

पिपा जाणतो हाच निवारा 
तारक हा आम्हा 
आमुचा एकचि जीवनत्राता ...    


-----------------



बाळा शिंपी कथा - हिवताप  


भिमाजी पाटलांसारखीच गत. हिवताप झालेला, पण औषधाने सुद्धा हार मानली. आता वाली कोण ? तर हा बाबाच. बाळा ने साईमाउली कडे धाव घेतली. लेकरू शेवटी आपल्या आईकडेच धावतं अगदी तस्संच. आपणही काहीही जरी झालेले असले, मग ते छोट्यातले छोटे आजारपण का असेना... आपण लगेच सूचितदादांकडे धाव घेतो. दादांचा शब्द हा रामबाण इलाज. तोच final. Whenever we are in despair, all the roads of sorrow and helplessness.. all end at Suchitdada's feet.          

साईमाऊलीने अगदी लग्गेच उपाय सांगितला. बाबा त्या काळी वैद्यकीदेखील करायचे. एक सद्गुरूच नाही, तर एक डॉक्टर म्हणूनही तेवढेच नावाजलेले होते. तसे पाहाता हिवताप आणि दहीभात, काळं कुत्र, त्याला तो भात खाऊ घालणे या दोन्ही गोष्टींचा दूरदूरही संबंध नाही. बाबा बाळाला औषध सुद्धा देऊ शकले असते, त्याने त्याचा रोगही नक्की बरा झाला असता. पण बाबांनी त्याला वेगळा उपाय सुचवला. 


१) बाबा कुठलीही गोष्ट उगाचच करणार नाहीत. त्यामागे कारणं निराळीच असतात. बाळा शिंप्यानेही बाबांचा शब्द प्रमाण मानून लगेचच त्यादिशेने पावले उचलायला सुरुवात केली. "हे केल्याने काय होणारे? माझा रोग कसा बरा होणार? साईनाथ असे काय बोलत आहेत? लोक काय बोलतील?" वैगरे प्रश्न त्याच्या मनालाही शिवले नाहीत.  बाबांवरचा त्याचा प्रचंड विश्वास यात दिसून येतो.          

२) "बाबा तुम्ही हे असे का सांगत आहात? मला औषध द्या ना ... हा उपाय नको" वैगरे गोष्टी बाबांनाच सुचवल्या नाहीत. बाबांची आज्ञा कुठलेही तर्क-कुतर्क न लढवता पाळली. ग्रेट !

३) माझा बाबाच मला या रोगातून मुक्त करू शकतो हे मनाशी पक्के माहीत आहे.    



बाबांनी जी गोष्ट करायला सांगितली आहे ती करण्याकरता काही इतर गोष्टींची गरज पडत असेल, तर त्या आपसूक होणारच आहेत हे आपल्याला माहिती हवे. बाळाच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत होते. 

दहीभात रेडी मिळेल का? 
मंदिराबाहेर काळं कुत्रं मी भात घेऊन जाईन तेव्हा असेल का?  
ते कुत्रं माझ्याकडे येऊन मी दिलेला भात खाईल का? 

हे असे प्रश्न मनात येताच कामा नये. पण आपण सामान्य मानव. संकटात मन घाबरलेले असते. त्यामुळे असे होऊ शकते. हा बाबा तरीही आपल्यावर रागवत नाही. ह्याचे प्रेम सगळ्यापलीकडे !!   
    
बाबांचा संकल्प झाला की ती गोष्ट घडून येणारच ही काळ्या दगडावरची रेघ. बाबांच्या तोंडून आले म्हणजे गोष्टी तशा पुढे दिसणारच. हा साई त्रिविक्रम काळही वाकवू शकतो. कधीकधी तर नसलेल्या गोष्टीही दिसू लागतात. ज्याने हे अख्खे विश्व निर्माण केले, त्याला भविष्यकाळ विणायला किती वेळ लागणार ?     

बाबांचे उपाय हे निराळेच असतात. डोळ्यात बिब्बे घालून बरा केलेला डोळा हे कधी कुणी ऐकले होते ? बाबांच्या शब्दाची ताकद. त्यांनी जे सांगितलेलं पाळलं त्याचा बेडपार झालाच. तसेच बाळाने त्या कुत्र्याला दहीभात खाऊ घातल्यावर हा बराही झाला. 

श्रद्धाहीन माणसे याला योगायोग किंवा अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतील. पण गाढवाला गुळाची चव काय ? त्यांना कधीच समजू शकणार नाही. 

बाळाच्या बाबतीत सगळे असे आपोआप समोर येत होते ते पहा. घरी गेल्यावर समोरच झाकून ठेवलेला भात, बाजूला दह्याची वाटी, मंदिरात गेल्यावर त्याच्याकडेच समोरून शेपूट हलवत चालत येणारा कुत्रा (जसे काय तो बाळाच्या हातचा दहीभातच खायला आला आहे), तो ही काळ्या रंगाचा.... हे सगळे योगायोग कसे काय असू शकतील ? हे घडवून आणले जात आहे असेच काहीसे वाटावे असे !

एखादे नाटक बसवल्यासारखे सगळी पात्र कशी ठरवल्याप्रमाणे वागतात अगदी तस्सेच इथे घडत आहे. ह्या बाबाची पण कमाल आहे! उपाय सांगणारा हा बाबाच, तो उपाय करण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते ते सारे काही देणाराही हा बाबाच, तसेच उपाय केल्यावर रोगाला मिटवणारा देखील हा बाबाच ! आपण निमित्तमात्र ! 

मायबापही बोलून दावती केले उपकार 
परके जन तरी उपकारासी करिती अपकार 
करूनी सर्व हा मूक राही 
हपापला ना हा माना .... 
ह्याचा भार ना होई कुणा 

हा केलेले उपकार कधीच बोलून दाखवत नाही. कारण तो त्याचा सहजभाव आहे. संकटात असलेल्या पामरांना तारणे हे तो अगदी आनंदाने करतो. आपल्या लेकरांना आनंदित बघण्यासाठी तो तळमळत असतो. 

आपण साप आणि बेडकाच्या कथेत वाचलेलेच आहे. ऋण, वैर, हत्या हे कल्प अंतीही चुकत नाही. ते फेडावेच लागते. बहुतेक बाळा शिंप्याचे काळ्या कुत्र्याकडे आधीच्या जन्मात काहीतरी ऋण फेडायचे राहिले असेल. त्याचाच परिणाम हा झालेला हिवताप असू शकतो. त्याला दहींभातरूपी राहिलेलं कर्ज फेडून बाळाचा हिवताप गेला असावा असे मला वाटते. 

आपल्याला तर मोठे झाल्यावर लहानपणी काय केले आहे ते ही आठवत नाही. म्हणजेच ह्या जन्माचे गणितही आपल्याला समजत नाही. मग मागचा जन्म काय आठवणार ? पण हा साई आपले आधीचे अनेक जन्म जाणतो. आपण किती "पानी कम" आहोत हे केवळ ह्यालाच ज्ञात असते. त्यामुळेच आपल्यासाठी काय उचित आणि आपण काय करणे गरजेचे आहे हे याच्याशिवाय कुणाला समजणार ?  नाही का ?

शेवटी एवढेच वाटते. हा साईनाथ मनसामर्थ्यदाताच नाही, तर सर्वसामर्थ्यदाता आहे. म्हणूनच ह्याच्या पायी अंबज्ञ राहू. यातच आपले हीत आहे. 

अनिरुद्ध नामे असे ज्यास गोडी 
तोचि सुखे राही सर्वकाळ ...                             



-----------------



बुट्टी कथा - उलटी आणि जुलाब 



हा साईनाथ अजबच आहे. सदगुरू आणि डॉक्टर दोन्हीही भूमिकेत अगदी अव्वल आहे. ह्याचा हात बाकी कुणीच धरू शकणार नाही. ह्याला बरा करता आला नाही असा रोग नाही आणि ह्याने सांगितलेल्या उपायांनी रोग पळून गेला नाही असे होणे नाही. जगातल्या इतर कुठल्याच डॉक्टरकडे ही ताकद नाही. अखेर साईनाथ हाच ultimate आहे!  


बुट्टींचीही इतर भक्तांसारखीच कथा आहे. उलट्या आणि जुलाबाने पार खंगून गेलेले. औषधांनी रोगापुढे शरणागती घेतली. शेवटी औषधे काय, मानवनिर्मितच. त्यांची शक्ती ती किती ! नुसत्या औषधांनी काही होत नसते. त्याला ईश्वरी कृपेची जोड मिळाली की अशक्याचे शक्य होते. हा परमात्मा आणि मोठी आई जगदंबा काहीही करू शकते. बुट्टीनाही असाच परमेश्वरी कृपेचा अनुभव आला. 

शब्द तुझे जरी दुरून ऐकले 
नशीब आमुचे तरी फळफळले .. 

बाबांचे शब्द म्हणजे व्रजलेपच ! त्यात अफाट ताकद आहे. अगदी अशक्याचे शक्य होते सगळे ! 

हा ग बोले जेव्हा 
मन नाचे तेव्हा 
हा ग नाचे जेव्हा 
मन थांबे तेव्हा 
ह्याचा शब्द मला 
येई फळा 
जैसा वज्रलेपा ग जैसा वज्रलेपा 
म्हणूनी पुन्हा पुन्हा ऐका ... 

बाबांना आपल्या प्रत्येकाचीच काळजी. लेकरांचे क्लेश दूर करावे हीच याची इच्छा ! इथे बाबांचे शब्द हेच बुट्टीच्या त्रासावर औषध बनले. त्यांनी नुसते म्हंटले आणि जुलाब आणि उलटीला थांबावेच लागले. पुढे आपण वाचतो की ह्याच बाबांच्या शब्दानी शाम्याच्या अंगातील विषालाही खाली उतरावेच लागले.   

११ व्या अध्यायात आपण बाबांची पंचमहाभूतांवर सत्ता आहे हे वाचतो. बेसिकली हे सारे वाचून एक आपल्याला समजते की ह्या बाबाची साऱ्यावरच सत्ता आहे. मग तो शरीरातला रोग का असेना ! ह्याच्या शब्दाचा दरारा, त्याची ताकदच एवढी की सारेच त्यापुढे फिके.    

इथे एक महत्तवाची गोष्ट समजते ते म्हणजे बाबांनी दोनदा सेम गोष्ट बुट्टींना सांगितले आहे. 
पहिल्यांदी - बुट्टीना 
दुसऱ्यांदी - बुट्टींमधील जुलाब आणि उलटीला 
  
पहिली आज्ञा बुट्टीना होती. कसे प्रेमाने आणि तितक्याच काळजीने बुट्टीना सांगत आहेत !  तर दुसरी आज्ञा जुलाब आणि उलटीला. 

बघायला गेलं तर उलटी आणि जुलाब ह्या दोन अशा गोष्टी आहेत की ज्या uncontrollable आहेत. त्या शरीरातून बाहेर काढाव्याच लागतात. दुसरा पर्यायच नसतो. त्यांची कळ सहनच होत नाही. असे दोन्ही होत असताना माणूस एका जागी स्वस्थ उभा राहूच शकत नाही. just impossible !       

आणि अशा दोन न थांबणाऱ्या आणि आपल्या control बाहेरील गोष्टीना केवळ हा साईच लगाम घालू शकतो. हे आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे. कुणी ठरवले तरी त्या दोन गोष्टी थांबवू शकत नाही. बुट्टी खरोखर ग्रेट आहेत. साईनाथांवर अफाट विश्वास आहे ! एखादा म्हणाला असता असे थांब म्हणून का उलटी आणि जुलाब थांबणार आहे ! कळ आली की बाहेर येणारच ! पण नाही. साईनाथांवर विश्वास ठेवला म्हणूनच हे शक्य झाले. जुलाब आणि उलटी झालीच नाही. किती ग्रेट !

शरीरात होणारे जुलाब आणि उलटी म्हणजेच शरीरातील imbalance च. हा साईनाथ पंचमहाभूतांचा स्वामी आहे. मानवी शरीर सुद्धा पंचमहाभूतांनीच बनले आहे. म्हणूनच त्यातील होणारे चुकीचे बदल हे फक्त हा साईच, ते देखील केवळ त्याच्या शब्दांनीच control करू शकतो.             
मानवामध्ये उलटी आणि जुलाब रूपी अनेक दुर्गुण असतात. सतत ते त्यांचे डोके वर काढायचा प्रयत्न करत असतात. माणसाला आतून पोखरतात. दुर्बल मनुष्य त्याच्यापुढे पार थकून जातो. अशा वेळेस हा साईच त्याच्या शब्दांची छडी उगारून ह्या दुर्गुणांना आपल्या शरीरातून पार हाकलून लावतो.        

शब्द ह्याचा जेथे घुमतो 
राक्षसही मरती 
अनिरुद्ध राजा ... 

बघा, म्हणजे या साईचा शब्द किती मोलाचा आहे ! आज आपले केवढे भाग्य आहे की गेले २० वर्ष बापूचा शब्द ह्या कानांनी ऐकायचे भाग्य लाभले ! बापूची प्रवचने म्हणजे खजिनाच. तो कायम लुटून नेऊया आणि आपले जीवन सुधारण्याचा प्रयास करूया ... 

   
-----------------



बुट्टी कथा - पटकी कथा  
       

एक विश्वास असावा पुरता .... विश्वास. प्रचंड ताकद आहे या शब्दात. सारे काही यावरच अवलंबून आहे. या एका शब्दामुळे आयुष्यात अनेक चमत्कार घडून येतात. अशक्याचे शक्य होऊन जाते. एकदा का ह्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, की मग हा आपल्यासाठी काय वाट्टेल ते करतो. बुट्टींनीही ह्याचाच अनुभव घेतला. 

शिरडीत आलेल्या पटकीच्या साथीने बुट्टीना घेरले. पुन्हा उलटी आणि जुलाब. पुन्हा औषधे काही कामी येईना. साऱ्याचे solution शेवटी बाबाच !

स्वतः वैद्य असूनही डॉ. पिल्ले नी सुद्धा बाबानाच विचारले. बाबा जे सांगतील तेच ह्याला औषध, हे पिल्लेना बरोबर ठाऊक होते. बाबांना विचारण्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटला नाही. लोक काय म्हणतील याची पर्वा केली नाही. तसेच स्वतः आधी प्रयत्न करून पाहिला. तरीही गुण येईना तेव्हाच बाबांकडे गेले. प्रयास न करताच बाबांकडे धावले नाहीत. 

पण ह्या बाबांचे इलाज सगळेच विचित्र. संतांघरची उलटी खूण असे हेमाडपंत म्हणतात ते उगाच नाही. पटकी आणि अक्रोड बदाम पिस्ते यांचे सख्य असतानाही अक्रोड बदाम पिस्ते खाल्ल्यानेच पटकीला आराम पडला हे आश्चर्यच. ह्या बाबाला काहीही वाकवण्याची ताकद आहे. ग्रेट ! डोळे सुजल्यावर बिब्बा डोळ्यात घालणे हा इलाज केवळ साईच सुचवू शकतील. बाकीच्यांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे हे सगळे !

शरीराचे सारे नियम ह्याच्या पायाशी लोळण घेत असताना ह्या बाबाला काय अशक्य, नाही का ? पण मग हा असे उपाय का सांगतो ? ते त्यालाच माहीत.   



-----------------



आळंदीच्या स्वामींची कथा  

       

साईभक्तांच्या आयुष्यात घडणारे चमत्कार ही त्या साईप्रेमाची जादू असते. बाकीच्या लोकांना ते चमत्कारिक खेळ वाटतात कारण त्यांना साईप्रेमाची जादू माहितीच नाही. खरेच त्यांना अभागीच म्हणायला हवे. साईनाथांचे शब्द आणि त्या शब्दांचे वजन किती भारी आहे हे आपण ह्या साऱ्या कथेत पाहतोच. आळंदीच्या स्वामीनासुद्धा त्याचा मस्त अनुभव आला. 

शब्द ह्याचा मोलाचा 
ठेवी भरोसा तू ह्याचा 
कैवारी सार्याचा 
आमचा बापूराया ... 

साईनाथांची सूचना, त्यांचा शब्द इतका वजनदार आहे की कर्णरोगाचा ठणका तत्क्षणी बरा झाला. At that moment ! वाचून थक्क व्हायला झाले. एवढे कुणाच्या बापाला जमणार आहे !

नितांत मधुरा ह्याची वाणी 
कधीही न जाई वाया 
आमुचा एकची जीवनत्राता ...   

अनुभव इतक्यात थांबत नाही. पुढे जाऊन तर चक्क कानाला आलेली सूजही जणू काही गायब झाली ! ही सारी याच्या आशिर्वादाची किमया. हे आळंदीचे स्वामी साईंकडे स्वतःचा प्रॉब्लेम सोडवायलाच आलेले, पहिल्यांदीच आलेले, आधी भक्तीची किती गाठोडी आहेत हे माहीत नाही, त्यात काम्यभक्ती, पुन्हा साईदर्शनाला कधी येतील ते माहीत नाही.. परंतु असे असतानाही साईनाथांची कृपा झालीच. हा साईनाथ केवढे लाभेवीण प्रेम करतो ना ! 

आज प्रत्येक जण दुसऱ्यासाठी काहीही करताना पहिला स्वतःचा स्वार्थ बघतो. दुसऱ्यासाठी चांगले करताही त्यात माझा फायदा काय आहे हे पाहणारी माणसेही असतात. विचार करा. कोणत्याही डॉक्टरने हा कर्णरोग बरा करायला काही ना काही फी तर घेतलीच असती. At least doctor चे opinion घ्यायलाही काहीतरी चार्जेस द्यावेच लागतात. त्यातूनही व्याधी, रोग पूरा जाईलच ह्याची काहीच गॅरेंटी नाही.        

पण हा साई सगळ्यापेक्षा न्यारा. स्वतःचा तीळमात्र फायदा न पाहता हा फक्त देतच राहतो. कारण तोच त्याचा स्वभाव ! 

बस चाहता है, वो मेरी खुशी 
वो सारी बलाये लेता है   
कभी चाहता नही मुझसे कूछ भी 
बस प्यार से देता रेहेता है ...            


इथे अजून एक महत्तवाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बाबांनी शस्त्रक्रिया न करता तुझे सगळे बरे होईल असे सांगितले नाही. आपल्याला medical treatment ही घ्यायचीच आहे. बाबांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलेले नाही. पण असे असतानाही ह्याच्या कृपेने आपल्या जीवनात चमत्कार घडतात.       

जिथे विज्ञानाच्या मर्यादा संपतात, तिथे ह्या साईचे सुदर्शन चक्र, त्याचे कार्य चालू होते. शस्त्रक्रिया करूनही जे साध्य झाले नाही, ते साईंच्या केवळ एका दर्शनाने होऊ शकले ! आणि इथे तर चक्क कानाची सूज जणू एकदम गायबच झाली ! खरेच ग्रेट !


   
  


-----------------



हरदा शहरातील गृहस्थ - पोटशूळ कथा  


मोठी आई महिषासुरमर्दिनी ही सर्वरोगनाशिनी आहे. कुठलाही रोग ती बरी करू शकते एवढी ताकद तिच्यामध्ये आहे. तिची ही ताकद स्थूल रूपात परमात्मत्रयी स्वरूपात आपण अनुभवू शकतो. साई हा सुद्धा तिचाच पुत्र. 

दहा दिशांनी विसकटलेली 
जीवनाची घडी .... 

अशीच ह्या कथेतील गृहस्थानप्रमाणे आपली अवस्था झालेली असते. आपल्या  कर्माने मिळालेल्या भोगांमुळे फार त्रास होत असतो. कोण वाली हेच जगभर फिरत हिंडत असताना साईकृपेने हा साई आपल्याला मार्ग दाखवतो आणि चिडीच्या पायाला दोर बांधून खेचून आणतो... आपलाच उद्धार करण्यासाठी. 

मानव शारीरिक व्याधीने जितका खंगून जात नाही तितका मानसिक थकून जातो. डॉक्टर एखादवेळेस शरीराचे क्लेश थांबवू तरी शकतात. पण ह्या मनाला झालेले क्लेश आणि जखमा कोण दूर करणार ? त्यासाठी हा साईनाथच हवा. मन:सामर्थ्यदाता ! 

भरलेल्या रात्री अन चढत्या दुपारी 
साधी नाही एकटी देव करितो सोबत ... 

दादा देई मज छाया जेव्हा दुपार तापते ... 

पोटशूळाने ह्या गृहस्थांना चौदावे रत्न दाखवले. पार त्रास दिला. पण शेवटी साईकृपा झाली आणि ह्यांना मार्ग सापडला. 

आला सहज हस्त तुझा 
मस्तकावरी माझ्या ... 

ह्याचा हस्त शिरावरी 
कैसी उरेल आता भीती ... 

बाबांचा हात मस्तकावर पडला आणि उदीच्या प्रभावाने तत्क्षणी मनाला उभारी आली. ही मनाची उभारी म्हणजे खरी positivity ! ती केवळ हा बाबाच त्या क्षणी प्रदान करू शकतो. खरे पाहाता त्या घडीलाच रोगाला ओहोटी लागली होती.  

पिपा म्हणे माझ्या रानी 
ह्याने फुलविला मळा...                   

ही शिरडी ही पावन भूमी आहे. इथे सगळे अशक्याचे शक्य होते. शिरडी म्हणजे बाबांचे भौतिक वलय, त्यांची प्रभा. साईनाथांच्या पवित्र स्पंदनांच्या ताकदीमुळे पुढे ह्यांचा पोटशूळ पार नाहीसा झाला.     

हा साईनाथ कुठे राहतो ? तर शिरडीत. ह्या कलियुगात कलिपुरुष हा direct मानवाच्या मनावरच आघात करतो. त्यामुळेच हा बाबा मनसामर्थ्यदाता बनून आपल्याला जपतो. याकरताच आपण काय करायला हवे ? बापूंनी सांगितले तसे ह्या बाबालाच आपल्या मनाच्या केंद्रभागी विराजमान करायला हवे. म्हणजेच आपले मन हे आपोआपच "शिरडी" होते. आणि ह्या शिरडीत फक्त आणि फक्त मनाला सामर्थ्यच प्राप्त होते. 

सुख शांती देण्या आला 
माझा अनिरुद्ध ...          




-----------------



काका महाजनी - जुलाब कथा  


माझे एक नातेवाईक आहेत. सहाजिकच बापूंबद्दल सारी माहिती आहे. त्यांचा मुलगा एक special child आहे. प्रत्येकालाच झटक्यात आणि विना मेहेनतीत इलाज हवा असतो. बापूंबद्दल ऐकून मला म्हणाल्या "तुमच्या बापूंनी ह्याला बरे केले तरच मी मानेन". बघा, आपण देवाची कशी परीक्षा बघायला जात असतो. पण यात शेवटी आपणच फेल होतो. आपण सद्गुरूकडे जाणे ही सद्गुरूची गरज नसून आपली गरज हेच आपल्याला समजत नाही. शेवटी चमत्कार तिथे नमस्कार. आणि म्हणूनच या चमत्काराच्या बेसिस वरच देवाची परीक्षा घेतली जाते.     


आपण सामान्य माणसे आहोत. संत नाही. तुकाराम महाराजांच्या मुलाचे लंगडे पाय विठ्ठलाने बरे केले. मान्य. पण आपण असे बोलण्याच्या आधी तुकाराम आहोत का हे पडताळून बघायला हवे. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. असो. 

काका महाजनी. एक थोर भक्त. बाबांवर पराकोटीचा विश्वास. सारे काही बाबाच. मला जुलाब झाले आहेत हे बाबा जाणतातच हा प्रचंड विश्वास दिसून येतो. इथे त्यांनी बाबांची परीक्षा घेतलेली नाही. बाबा अंतर्यामी आहेत हे ते जाणतच होते. त्यावर त्यांना शंका नव्हती, उलट १०८ % विश्वास होता. श्रेष्ठ भक्तांचे हे लक्षण आहे. मी असलो असतो तर पहिला बाबांकडे इलाजाकरता धावलो असतो. पण काका महाजनी हे खरोखर ग्रेट आहेत. 

हे सगळे करताना त्याना कुणालाही स्वतःचा मोठेपणा दाखवायचा नव्हता. बाबांना जेव्हा वाटेल तेव्हा ते स्वतः मला इलाज सांगतील हा पूर्ण विश्वास होता. तसेच रोजचे  सारे सेवा कार्य ते जुलाब होत असतानाही चोख पार पाडत होते. जुलाबामुळे होणारा कुठलाही त्रास बाबांच्या सेवाकार्याच्या आड त्यांनी येऊ दिला नाही. सेवेला स्वतःच्या तब्येतीपुढेही priority दिली. बाबांची सेवा आणि त्यांचे कार्य आपल्यामुळे अडायला नको हीच मनात पवित्र इच्छा होती. त्यामागे बाबांवरचे अफाट प्रेम दिसून येते. आणि मग असे असताना ह्या बाबाला काही समजणार नाही असे कसे होईल? नाही का ? 

ह्या बाबाला काही ठाऊक नाही असे काहीच नाही. ह्याची नजर पोचू शकत नाही अशी जागाच नाही. मनात काय चालले आहे हे ही ह्याला माहिती. काकांना बाबांनी मस्त अनुभव दिला. काकाच्या साईप्रेमाला बाबांनी दिलेली ही पोचपावतीच आहे.  

जया मनी जैसा भाव                         
तया तैसा अनुभव ...  
          
जुलाब यायला लागल्यावर पोटात जोरदार कळ येते. कुदळीचा घाव म्हणजेच ती  कळ. ती कळ आलेली पाहताच बाबा खवळले. त्यांनी केलेला शिवीगाळ हा त्या कळीला आणि जुलाबालाच आहे. काकाचा तर बाबांनी हातच पकडला. दम भरला. बाबांचा हा शिवीगाळ, रुद्रावतार हा त्या रोगावर असतो. त्यालाच रोग घाबरतो आणि शरीरातून पार लांब पळून जातो.          
धनीच करतो श्वानाचे रक्षण 

उलटी ही खूण ह्याच्या घरीबाबांकडे सारेच उलट. संतांघरची उलटी खूण. जुलाबात कोण शहाणा भुईमुगाचे दाणे खायला देईल ? पण बाबांनी दिले. प्रकृतीचे सारे नियमच वाकवले आहेत बाबांनी. ह्याचा शब्द आणि इच्छा हेच औषध असल्याकारणाने जुलाब थांबलाच. 

बाबांनी दाणे देतानाही ते नीट साफ करून दिले आहेत. भक्तांची एवढी काळजी केवळ हा बाबाच घेऊ शकतो. आणि थोडेथोडके नाहीत, तर तब्बल किलोभर दाणे खाऊ घातलेत ! इथे तर बाबांनी भूईमुगाचा गुणधर्मच बदलला आहे. विषाचे जणू अमृतातच रूपांतर व्हावे तसे. 

गुरुपौर्णिमेला बापू उदीप्रसाद देत असत. बापूंचा हस्तस्पर्ष केलेली उदी ग्रहण करायला मिळत असे. इथेही बाबा आधी स्वतः पाणी ग्रहण करीत आहेत. मग तेच  तीर्थरूपी पाणी काकांना प्यायला सांगत आहेत. मग असे तीर्थरूपी औषध घेतल्यावर जुलाब थांबला नाही असे होईल का ?           

बाबांचे टायमिंग पण अचूक आहे. बरोबर कुदळीच्या पहिल्या घावालाच रुद्रावतार धारण केलाय. असे की जुलाब पहिल्या कळीतच थांबलाच पाहिजे. कुदळ हाती घेतलेला तो कामगार म्हणजेच तो रोग. शरीराच्या फरशीवर कुदळीचे घाव घालण्याआधीच बाबांनी त्या रोगालाच पोबारा करायला लावले. मस्तच. 

शेवटी एवढेच वाटते. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून सगळेच रामभरोसे टाकून चालणार नाही. आपलेही efforts, प्रयत्न त्याला लागतात. माझा बापू आहे तर मी औषधाच्या गोळ्या घेणार नाही. त्याला बरे करायचे असल्यास तो करेल नाहीतर मी तसाच मरेन हे वाक्य म्हणजे अति शहाणपणाचे आहे. त्याची परीक्षा घेण्याइतपत आपण नक्कीच मोठे झालो नाही आणि होणारही नाही. काकांची गोष्टच वेगळी आहे. पण तरीही त्यांनी बाबांना सांगितले असते तर बाबांनाही उगाच कष्ट घ्यायला लागले नसते. आपल्या अशा वागण्याने उगाचच आपल्याला आणि पर्यायी त्या बाबाला कष्ट देऊ नये असे मनापासून वाटते. 



    




















0 comments: