Adhyay 20

05:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments


हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 




' तेन त्यक्तेन भुज्जीथाः ' या महावाक्याविषयी माझे विचार 


साईचरित्रातील २० व्या अध्यायात दासगणूंना पडलेल्या कोड्याविषयीची कथा आपण वाचतो.  त्याग करूनच त्याचा उपभोग तो तरी कसा घ्यायचा? हाच त्यांचा प्रश्न साईनाथांनी एका मोलकरणीद्वारे अगदी सोप्या पद्धतीने सोडवला. कठीणातील कठीण प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे करून आणि ते ही प्रात्यक्षिक दाखवून समजावून सांगणे ही साईनाथांची हातोटीच. 

दासगणूंना पडला तसा  कुणालाही हा प्रश्न पडू शकतो. बेसिकली त्याग करायला कुणालाच नको असतो. प्रत्येकालाच कशाचा ना कशाचा हव्यास असतोच. आणि या हव्यासापोटीच आपले नुकसान होत असते. कथेतील ती पोरगी ज्याप्रकारे नव्या साडीचा त्याग करते आणि गरीबी श्रीमंती प्रमाणे मिरवते हे कधी आपल्याला या आपल्यातीलच असणाऱ्या मोहामुळे जमतच नाही. 


या कथेतील मोलकरणीची पोरही आपल्याला खूप काही समजावून सांगते. (म्हणूनच आपण कधीच कुणालाही तुच्छ लेखू नये.)  


१) तिला आपल्या गरिबीची लाज नाही. 


२) ज्या परिथितीत आहे त्या परिस्थितीतही आनंदी आहे. 


३) मी गरीब आहे, मी काय करणार, माझे नशीबच फुटके असा विचार करून ती उदास होऊन दुख्ख कवटाळून बसत नाही. त्यासाठी तिने देवाला दोष दिला नाही. 


४) नवी साडी मिळाल्यावर तिला गर्व नाही. त्याचाही पूर्ण आंनद तिने catch केला आहे. 


५)  नवी साडी मिळाल्यावर ती बाकीच्यांना तुच्छ लेखत नाही. 


६) आपल्याकडे जे आहे त्यातच ती खरी आनंदी आहे. नवी साडी मिळाली म्हणून हुरळून गेली नाही. (लगेच झाडावर चढली नाही). तिला त्याचा फाजील गर्वही झाला नाही.  


७) नव्या साडीचा त्याग करून पुन्हा आपली जी परिस्थिती आहे, त्याला साजेशा पोषाखातच पुन्हा येऊन तेवढ्याच आनंदाने जल्लोषात सहभागी झाली.  


ही पोरगी खरोखर ग्रेट आहे. इतकी समज आणि ताकद ह्या साईनाथावरच्या प्रेम आणि विश्वासातूनच येऊ शकते. हा confidence त्यामुळेच मानवाला मिळू शकतो.     


शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. बापू, आई, दादा आणि त्यांचे लाभेवीण प्रेम तर आपल्याला कशाचाही त्याग न करता आपल्याला प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रेमाचा पुरेपूर उपभोग आपण घेत आहोत. खरेच, बापू कोई तुमसा नही.... 


नाही त्यागावी दारा 
नाही सोडावे घरा 
तरीही पावावे परमार्था 
अनिरुद्ध  नामे.    


ती मोलकरीण परिस्थितीने जरी गरीब असली, तरी मनाने आणि विचारांनी खूपच श्रीमंत आहे. म्हणजेच शरीरावर जुने, फाटलेले कपडे असो वा नसो, पण तिच्या मनाची आणि विचारांची चादर इतकी रेशमी भरजरी आणि मजबूत आहे की ती ईशावास्य उपनिषद च्या कठीण प्रश्नाचे उत्तरही अगदी सहजपणे दिलेले आहे. 

basically कुणालाही underestimate कधीच करु नये. कारण प्रत्येक मानवाकडे काही ना काही special आहेच. 

हा बापू खूपच सोपा आहे. अध्यात्म, परमार्थ खूपच साधे आहे. काही संधीसाधूंनी ते स्वतः चे खिसे भरायला उगाचच कठीण केले आहे. ह्या बाबालाही साधेपणाच आवडतो. हा नेहेमी लघुरुपताच घेतो. 

पारसवी देई साले आवडी नितांत 
राजगृह सोडूनी धावे रंगे गोकुळात



-----------------------------





1)   प्रत्येक श्वासाबरोबर सद्गुण आत घेतले पाहिजेत व उच्छवासाबरोबर दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे. 

2)   आपण स्वेच्छेने अन्न खातो.  मल आपोआप तयार होऊन विसर्जित करण्याची सोय हा करतो. 

      आपण कानाने,  मनाने व डोळ्याने आत घेतलेल्या गोष्टींचा वारंवार उच्चार करतो व साठवून ठेवतो. त्यांचाही त्याग करायला हवा.   त्याकरिता यज्ञ करणे आवश्यक आहे.  म्हणजे त्याची राख होईल. 

3)   शरीरात नवीन पेशी तयार होण्याकरिता जुन्या पेशींचा नाश होणे आवश्यकच असतें. 

     याचे एक खूप छान उदाहरण आहे. 

      त्याग करून त्याचा उपभोग घे.

       आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते.  पण उचित वेळ येताच ती बाळाचा पोटातून  त्याग करतेच.   म्हणजे बाळाला पोटातून बाहेर येऊच देते.

     का? 


     कारण  बाळ पोटातच ठेवले तर ती बाळाच्या बाललीलांचा अनुभव कशी घेऊ शकणार?  म्हणूनच प्रथम  त्याग करून मगच उपभोग घेणे शक्य होते.  हे एक खूप छान उदाहरण त्येन त्यक्तेन भुज्जीथा: चे बापूंनी पितृवचनात सांगितले होते. 


तेन त्यक्तेन भुज्जीथा:

       त्याग करून त्याचा उपभोग घे.


आपल्याला बापूरायाने स्वतः तपश्चर्या करून मोठ्या आईकडून  प्राप्त झालेला स्वस्तिक्षेम संवाद त्याच्या  बाळांसाठी मुक्तहस्ते दिला.  त्यामुळेच आज आपण थेट चण्डिकाकुलातील कोणत्याही आप्तांशी सहजपणे संवाद साधू शकतो.  आणि आपण जेव्हा हा संवाद साधतो ना तेव्हा बापूराया किती प्रेमाने आपल्याकडे पाहत असतो.  (हो! डोळे बंद करून संवाद साधायचा असतो.  पण घरी अनिरुध्द टीव्ही च्या माध्यमातून  संवाद साधताना असे वाटले की बराच वेळ झाला नेट वीक झाले की काय म्हणून पहिले तेव्हा बापूरायाच्या  प्रेमळ आणि कौतुकाने भरलेल्या  वेगळ्याच  नजरेची  अनुभूती आली.)  बापूरायाने स्वतः  त्याग करूनच बाळांना दिलेला हा  संवाद कौतुक म्हणून आज  उपभोगत आहे असे मला वाटते.  

      आता एक व्यवहारातील उदाहरण पाहू. 

      आपल्याला सर्फची जाहिरात आठवत असेल :-

उसकी साडी मेरे साडीसे 
सफेद कैसे? 

म्हणजेच कोणत्याही वीरेचे आपल्या अंगावर कितीही भारी आणि भरजरी साडी असली तरी दुसरीने नेसलेल्या साडीकडे लक्ष जातेच (माझ्या मैत्रिणीं हसत आहेत.  त्यांना पटणारच!)

      आपण आणलेली साडी बहीण,  मैत्रीण,  वन्स  यांना आवडली तर खरंच द्या.   आपण दिलेली साडी दुसऱ्याच्या अंगावर पहिली तरी खूप समाधान वाटते,  आनंद मिळतो.  मी अनुभव घेतला आहे. 

      माझी बहीण अलकावीरा हिला साड्या घेण्याचा शौक आहे पण नेसण्याचा नाही.  थोडे दिवस कपाटात ठेवते आणि मला देते.   खरं सांगू आम्ही भेटतो तेव्हा आवर्जून मी तिच साडी नेसते  आणि तिच्या डोळ्यातील आनंद मला खूप काही देऊन जातो.  हेही त्याग करून त्याचा उपभोग घे याचे सुंदर उदाहरणं. 

      जुने ते सोने अंतर्गत आपण कोल्हापूर मेडिकल कॅम्पला पहिल्या दिवशी कपडे,  गोधड्या,  जीवनावश्यक वस्तू व औषधे यांचे वाटप करतो.   दुसऱ्या दिवशी मेडिकल चेकअपला येताना बरेच जण तेच कपडे घालतात,  साड्या नेसतात तेव्हा खूप आनंद होतो.  हे ही एक सुंदर उदाहरण म्हणता येईल तेन त्यक्तेन भुज्जीथा: चे. 




- चित्रावीरा चाबुकस्वार 




0 comments: