Adhyay 3 (अध्याय ३)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
Adhyay 3 (नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा)
रोहिल्याची कथा
१) वाल्मिकीने राम , राम म्हणण्याऐवजी मरा मरा असे उफराटे नाम घेतले ,
त्याचाही उद्धार झाला.
त्याचाही उद्धार झाला.
२) भगवंताच्या नामाने प्रल्हाद तरला.
३) समुद्रावर सेतू बांधताना नामाने पाषाणसुद्धा तरले.
४) वर्तमान परिस्थितीत नामस्मरणासारखी दुसरी सोपी भक्ती नाही. अन्य काहीही न करता म्हणजे दुसरे खडतर मार्ग न अवलंबिता केवळ नाम घेतल्याने भगवंत संतुष्ट होतो.
.... याचप्रमाणे कथेतील रोहिला या नामस्मरणामुळेच साईबाबांचा लाडका झाला.
आपण एखादे तत्व सोपे करून समजाऊन सांगण्यासाठी ज्याप्रमाणे कथा सांगतो, तसंच नामसंकीर्तनाचे महत्त्व आपल्या मनात ठसवण्यासाठी साईबाबा ही रोहिल्याची कथा सांगत आहेत.
आपल्या प्रत्येकालाच त्या साईला प्राप्त करून घ्यायचे असते. हाच आपल्या आयुष्याचा आणि नरजन्माचा मुख्य aim असतो. सध्याच्या धकाधकीच्या आणि फास्ट युगामध्ये कुणालाच कशासाठीही वेळ नसतो. पण मग प्रपंचासोबतच परमार्थ सफल करायचा तरी कसा? साईंनी याचेच उत्तर या कथेतून आपल्याला समजावून सांगितले आहे.
कलियुगाच्या प्रभावाने मनुष्यातील सत्त्वगुणाचे प्रमाण कमी झालेले असते , त्यामुळे त्याची परमार्थातील साधने आचरण्याची कुवतही कमी झालेली असते. म्हणूनच अशा सामान्य माणसासाठी हा भगवंत अकारण कारूण्याने परमार्थ अधिकाधिक सोपा करत असतो. हे सर्व केवळ तो आमच्यावरील लाभेवीण प्रीतीपोटीच करत असतो... किती हे प्रेम !
हा साईनाथच आपली अडचण समजू शकतो आणि म्हणूनच केवळ आपल्या प्रेमापोटी आपलाच परमार्थ अधिकाधिक सफल करण्यासाठी अधिकाधिक सूट देत असतो.
भगवंताचे नामस्मरण करताना माझ्या आणि भगवंताच्या मधे कुठलीच गोष्ट येत नाही. अगदी माझा आवाजही 'त्या' भगवंताच्या आणि माझ्यामध्ये कधीच येत नाही. उलट तो घोगरा आवाज घोगरा असो की किरटा असो तो आवाज भगवंतापर्यंत पोहोचतोच. जेव्हा ह्या आपल्या जन्मतःच असलेल्या घोग-या स्वरात हा रोहिला नामगजर करायचा तेव्हाही त्याचा स्वर कधीच त्याच्या आणि बाबांच्या आड आला नाही. कारण
त्या भगवंताला आवडतो तो शुद्ध भाव.
त्या भगवंताला आवडतो तो शुद्ध भाव.
हे सगळे वाचून एखादा म्हणू शकेल की सद्गुरुंना स्वतःचे गुणसंकीर्तन किंवा स्वतःची स्तुती करवून घ्यायला आवडते की काय? तर नाही.
सर्वात आधी मला स्वतः ला कळले पाहिजे की नामस्मरण करणे ही माझ्या सद्गुरूंची गरज नसून माझी गरज आहे. कलीयुगात नामस्मरणामुळेच रोहिलीला आपल्या जीवनातून सहजतेने लांब ठेवता येते, आणि आपण भक्तीभाव चैतन्यात राहू शकतो.
बघा, हा साईच आपल्याला आपले बोट धरून भक्तीभाव चैतन्यात कसे राहायचे आणि आपला उद्धार कसा करायचा हे शिकवत आहे. चला मग, ह्या क्षणापासूनच आपल्याला जमेल तसे आणि जमेल तितके नामसंकीर्तनात गुंग होऊया..
तुझ्यासारखा तूच देवा
वेळोवेळी संकटातूनी तारिसी मानवा....
केशवा माधवा
तुझ्या नामात रे गोडवा
नाम आहे आदी अंती नाम सर्व सार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नामे तरीले पतीत, तरीले पाषाण नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाममय झाला चोखा, ब्रम्ही लीन झाला अजामेळ पापराशी, वैकुंठासी गेला तेथे उभे पंढरीचे घेउनी आकार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाम जपो वाचा नित्य, श्वासांतही नाम नाममय होवो देवा माझे नित्य कर्म नामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

----------------------------------------------------------
मग जो गाई वाडेंकोडें |
माझें चरित्र माझे पवाडे |
तयाचिया मी मागें पुढें |
चोहींकडे उभाचि ||३/१२||
अध्याय ३ ओवी क्रमांक १२
१+२=३
त्रिविक्रम भक्तांच्या मागेपुढें चोहीकडे असतोच.
त्यासाठी कोणतीच अट नाही.
Unconditional Love
वेद आले पाहिजेत असेही नाही.
उपनिषदामध्ये आपण वाचतो की मोठया आईवरील प्रेम व विश्वासामुळे साधे शब्द सुद्धा मंत्र होतात.
मी तों केवळ पायांचा दास |
नका करुं मजला उदास |
जोंवरी या देहीं श्वास |
निजकार्यास साधूनि घ्या ||४०||
पायांचे दास होऊन राहणे म्हणजे मुंगी होऊन साखर खाणे.
बाबा तंव वदती प्रत्युत्तरीं |
मिळेल मेली तयासी नोकरी |
करावी आतां माझी चाकरी |
सुख संसारी लाधेल ||७६||
बाबा हेमाडपंतांना स्पष्टपणे सांगतात माझी भक्ती कर.
ओवी क्रमांक ७६ ते १०७ बाबांच्या मुखीचे बोल मन लावून वाचावे.
लाग्याबांध्यावीण विशेषीं |
कोणी न येई आपुलेपाशीं |
श्वान सूकर कां माशी |
हडहड कुणासी करुं नये ||८१||
ओवी क्रमांक ८१ = ८+१=९
बाबा आपल्याला नवअंकुर ऐश्वर्ये प्रदान करण्यास तयारच असतात.
नामस्मरणाचे महत्त्व बाबांनी रोहिल्याच्या मायिक (काल्पनिक) कथेतून ठसविले आहे. बाबांची आगळीवेगळी पद्धत.
गुरुभजना जो पाठिमोरा |
तो एक अभागी पापी खरा |
भोगी जन्ममरणयेरझारा |
करी मातेरा स्वार्थाचा ||१६९||
गुरुभजन - नामस्मरण नाही केले तर जीवाची जन्ममरणाच्या फे-यातून सुटका होणे कठीण होते. याकरिता मिळालेला नरजन्म सार्थकी लावा.
कृपण वावरो कवण्याही गांवा |
चित्तासमोर पुरलेला ठेवा |
जैसा तयासी अहर्निशी दिसावा |
तैसाचि वसावा साई मनीं ||१८५||
१+८+५=१४=१+४=५
पंच ज्ञानेंद्रियांनी व कर्मेंद्रियांनी फक्त साई आठवावा व मनी ठसवावा.
आगळेवेगळे उदाहरण देऊन बाबांनी नामस्मरणाचे महत्त्व ठसविले आहे.
नामस्मरणाचे महत्त्व ग्रंथात बापूंनी लिहिले आहे ते कृपया वाचावे.
✍️ चित्रावीरा चाबुकस्वार
वाशी उपासना केंद्र
----------------------------------------------------------
नामसंकीर्तनाचे महत्त्व सांगणाऱ्या या अध्यायातील ओव्या
केलिया मल्लीलेचें लेखन । होईल अविद्यादोषनिरसन । भक्तीभावें करितां श्रवण । प्रपंचभान मावळेल ॥३॥
उठतील श्रवणसागरावरी । भक्तिपेमामृताच्या लहरी । बुडिया देतां उपराउपरी । येतील करीं बोधरत्नें” ॥४॥
वरी एक सांगतों शामा । प्रेमें घेईल जो मन्नामा । तयाच्या मी सकल कामा । पुरवीं प्रेमा वाढवीं ॥११॥
मग जो गाई वाडेंकोडें । माझें चरित्र माझे पावडे । तयाचिया मी मागें पुढें । चोहींकडे उभाचि ॥१२॥
जे जे भक्त मजकारणें । असतील विनटले जीवें प्राणें । तयांसी या कथाश्रवणें । आनंद होणें सहजीच ॥१३॥
कोणींही केल्या माझें कीर्तन । तयासी देईन आनंदघन । नित्य सौख्य समाधान । सत्य वचन मानावें ॥१४॥
जो मजलागीं अनन्य शरण । विश्वासयुक्त करी मद्भजन । माझें चिंतन माझें स्मरण । तयाचें उद्धरण ब्रीद माझें ॥१५॥
माझें नाम माझी भक्ती । माझें दफ्तर माझी पोथी । माझें ध्यान अक्षय चित्तीं । विषयस्फूर्ती कैंची त्या ॥१६॥
कृतांताच्या दाढेंतून । काढीन मी निजभक्ता ओढून । करितां केवळ मत्कथा श्रवण । रोगनिरसन होईल ॥१७॥
कथा करा सादर श्रवण । त्यावरी करा पूर्ण मनन । मननावरी निदिध्यासन । समाधान पावाल ॥१८॥
‘अहं सोहं’ जाईल विरोन । उन्मन होईल श्रोतियांचें मन । चित्त होईल चैतन्यघन । अनन्य परिपूर्ण श्रद्धेनें ॥१९॥
‘साई साईति’ नामस्मरण । करील सकल कलिमल दहन । वाणीश्रवणगतपापभंजन । एक लोटांगण घालितां” ॥२०॥
कृतयुगीं जें प्राप्त ‘ध्यानें’ । त्रेतीं ‘यजनें’ द्वापारीं ‘अर्चनें’ । तें प्राप्त सर्व ‘नामसंकीर्तनें’ । गुरुभजनें कलियुगीं ॥२७॥
मी तों केवळ पायांचा दास । नका करूं मजला उदास । जोंवरी या देहीं श्वास । निजकर्यास साधूनि घ्या ॥४०॥
साईनाथांच्या कथा । ज्या गोडीनें हिणवितील अमृता । भवसागरींचे दुस्तर पंथा । अति सुतरता आणितील ॥४६॥
धन्य धन्य या संतकथा । श्रवणद्वारें अंतरीं रिघतां । बाहेर निघे देहाभिमानता । द्वंद्ववार्ता नुरेचि ॥४७॥
जंव जंव यांचा ह्रदयीं साठा । तंव तंव विकल्प पळे बारा वाटा । ज्ञानसंचय होय लाठा । उतरे ताठा देहाचा ॥४८॥
बाबांच्या शुद्ध यशाचें वर्णन । प्रेमें तयाचें श्रवण । होईल भक्तकश्मलदहन । सोपें साधन परमार्था ॥४९॥

कृतयुर्गी ‘शम-दम’ । त्रेतीं ‘जयन’ द्वापारीं ‘पूजन’ । कलियुगीं ‘नामकथाकीर्तन’ । स्वल्प साधन परमार्था ॥५३॥
ब्राम्हाणादि चारी वर्ण । सर्वांसी साधन गुरुकथाश्रवण । असो स्त्री शूद्र वा जातिहीन । हें एक साधन सकळांतें ॥५४॥
असेल जयाचे पुण्य पदरीं । तोच या कथा श्रवण करी । कोणास येतील निद्रालहरी । तयांही श्रीहरी जागवील ॥५५॥
व्हावे विषयभोग अनवरत । ते न लाभतां ते दीनचित्त । तयांसीही हें संतकथामृत । विषयनिर्मुक्त । करील ॥५६॥
योग याग ध्यान धारणा । करूं जातां प्रयास नाना । आयास नलगे या कथाश्रवणा । एका अवधानावांचून ॥५७॥
ऐसी ही साईची कथा निर्मळ । परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ । जळतील पंचमहापापें प्रबळ । जातील समूळ विलयाला ॥५८॥

वाचतां परिसतां भक्तिभावें । सहज साईचें ध्यान व्हावें । सगुणरूप डोळां दिसावें । चित्तीं ठसावें द्दढतर ॥६१॥
येणें घडावी सद्नुरुभक्ति । पावावी संसारीं विरक्ति । जडो गुरुस्मरणीं प्रीति । होवो मति निर्मल ॥६२॥
येणें घडावी सद्नुरुभक्ति । पावावी संसारीं विरक्ति । जडो गुरुस्मरणीं प्रीति । होवो मति निर्मल ॥६२॥
“कुठेंही असा कांहींही करा । एवढें पूर्ण सदैव स्मरा । कीं तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा । मज निरंतरा लागती ॥१४३॥
येणें निदर्शित ऐसा जो मी । तोचि मी सर्वांच्या अंतर्यामीं । तोचि मी ह्रदयस्थ सर्वगामी । असें मी स्वामी सकळांचा ॥१४४॥
भूतीं सबाह्याभ्यंतरीं । भरूनि उरलीं मी चराचरीं । हें सकळ सूत्र ईश्वरी । सूत्रधारी मी त्याचा ॥१४५॥
मी सकळ भूतांची माता । मी त्रिगुणांची साम्यावस्था । मीचि सकलेंद्रियप्रवर्ता । कर्ता धर्ता संहर्ता ॥१४६॥

एवंच पावन साईचरित्र । वाची तयाचें पावन वक्त्र । श्रोतयांचे पावन श्रोत्र । होईल पवित्र अंतरंग ॥१७९॥
प्रेमें करितां कथाश्रवण । होईल भवदु:खांचें हरण । ओळेल साई कृपाघन। प्रकटेल संपूर्ण शुद्धबोध ॥१८०॥
लय विक्षेय कषाय । रसास्वाद हे श्रवणा अपाय । दूर सारा हे अंतराय । श्रवण सुखदायक होईल ॥१८१॥
नलगे व्रत उद्यापन । नलगे उपवास शरीरशोषण । नलगे तीर्थयात्रापर्यटन । चरित्रश्रवण एक पुरे ॥१८२॥
प्रेम असावें अकृत्रिम । जाणिलें पाहिजे भक्तिवर्म । सहज लाधेल परमार्थ परम । नासेल विषम अविद्या ॥१८३॥
नलगे इतर साधनीं शीण । करूं हें साईचरित्र श्रवण । संचित आणि क्रियमाण । अल्पप्रमाणही नुरवूं ॥१८४॥

0 comments:
Post a Comment