Adhyay 32 (अध्याय ३२)

01:38:00 Nandan Bhalwankar 0 Comments




4 सुबुद्धाच्या कथेविषयी माझे विचार



साईनाथांना विहिरीत उलटे टांगलेले बघून काळजात अगदी चर्र होते. मनात येते असे का बरे केले असेल गुरूनी?

याचे उत्तर एक हिंदी सिनेमातील गाणे देते.

प्यार करने वाले
प्यार करते है शान से
रस्ता नही आसान
देना पडता है इम्तिहान
चाहे कुछ भी हो अंजाम

म्हणजेच हे सद्गुरुतत्व, हा सद्गुरू भक्तान्ची परिक्षा बघत असतो. यावरूनच सच्च्या भक्ताच्या गुरूभक्तीचा कस लागतो. 

यामागे भक्ताला त्रास व्हावा असा त्याचा हेतू नसून भक्ताला अधिक संपन्न आणि सामर्थ्यवान बनवण्याची गुरूची प्रेमळ आणि निर्मळ इच्छा असते. 

यामागे भक्ताची भक्तीमार्गात प्रगतीच साधली जाते. आणि अशी प्रगती केवळ हा गुरूच करू शकतो.

माझेच उदाहरण देतो. मला शालेय जीवनात गणित विषय कठीण वाटायचा. समजायचे नाही नीट. एकदा माझ्या आईने दोन पट्ट्या मारल्या. लगेच गणित आले. हळूहळू गोडी निर्माण झाली आणि चक्क हा विषय सोपा वाटू लागला. एवढेच काय, तर त्या वर्षी मला गणितात100 पैकी 100 मार्क मिळाले. 

छडी लागे छम विद्या येई घम घम

आईची ही छडी बाळाच्या उन्नतीसाठीच असते. बाळाने सद्धा ही गोष्ट समजून घ्यायला हवी. आई मला मारते म्हणून रागावून बसला किन्वा आईवरच शंका उपस्थीत केली तर यश मिळणार कसे? साईनाथांना  जरी उलटे टांगलेले तरीसूद्धा त्यांना ब्रह्मानंद झाला आहे. 

स्वत: सद्गुरू जेव्हा एका भक्ताच्या भूमिकेत प्रवेश करतो, तेव्हा तो कसा वागतो हे आपण शिकायला पाहीजे. हाच तो 32व्या अध्यायातला खजिना. 

मनाच्या जंगलामधे पर्वताच्या उंच शिखरावर त्या किरातरूद्राचे निवासस्थान असते. तो मनातील हिंस्त्र श्वापदे मारतो.

सद्गुरू कोणाच्याही रूपात येऊ शकतो. 4 सुबुद्धंच्या कथेत हा भगवान श्री किरातरूद्र्च त्या वणजार्याच्या रूपात त्या चौघांना भेटायला आला. भक्तांची एवढी काळजी तो सद्गुरुच घेऊ शकतो. बाकी कुणीही नाही. 

या जंगलात माझी 4 बाळे भटकत आहेत. भूक तहानेने या जंगलात व्याकूळ झाली असतील म्हणून तो सद्गुरूच धाऊन आला. हा त्रिविक्रम म्हणूनच प्रेमस्वरूप आहे

पण आपणच बाकीच्या 3 सुबुद्धांप्रमाणे वागत असतो. देवाची विंनन्तीसुद्धा ऐकत नाही आणि म्हणूनच आयुष्याच्या जंगलात संकटाचा चकवा लागतो. हाच तो जन्म मृत्युचा फेरा.यातून फक्त आणि फक्त सद्गुरूच तारून नेऊ शकतो

वर वर पाहता सद्गुरूची कृती विचित्र वाटू शकते. पण त्यामागे त्याची कळकळ आणि त्याचे प्रेम आपण पाहायला हवे. त्यामागे आपलच हीत आहे हे ज्याने जाणले, तो जिंकला.



स्वतः सदगुरू साईनाथ एक उत्तम भक्त कसे, याविषयी माझे विचार


स्वत: अमर्याद असणारा परमात्मा त्रिविक्रम एक मर्यादित मानवी देह का धारण करतो? तर ८४ लक्ष योनींमधील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या मानवाने स्वविकास कसा साधायचा, जीवन सार्थकी कसे लावायचे, काय काय वागायचे, काय काय वागू नये, काय योग्य आणि काय अयोग्य हे त्या परमात्म्याला मानवास प्रात्यक्षिक दाखवून समजावून सांगायचे असते, आणि त्याद्वारे मानवाचे भलेच करायचे असते. 

... आणि मानव स्वतःचा जीवनविकास आणि उद्धार एक उत्तम भक्त बनल्याशिवाय करूच शकत नाही. यासाठीच स्वतःच मूळ सद्गुरू असणारा तो परमात्मा एक मानव उत्तम भक्त कसा बनू शकतो हे आपल्या आचरणाद्वारे आपल्यासारख्या विगत भक्तांना समजावून सांगत असतो आणि दाखवत असतो. केवढे हे प्रेम!

१) साईचरित्रामध्ये साईनाथ एका गर्विष्ठ आणि भ्रमिष्ट जव्हारअलीचाही शिष्य झाला. अर्थात तो ही त्याचा उद्धार कारण्यासाठीच. पण त्यातही साईनाथांनी मनोमन त्याची चाकरी स्वीकारली. सेवा केली.   

२) अल्ला मालिक हा सदैव त्यांचा जप सुरू असे. याद्वारे नामस्मरणाचे महत्व ठसवले. 


३) मशिदमाई वर त्यांचे अलोट प्रेम असे. तिचे सदैव साईनाथ गुणसंकीर्तन करीत असत. 


४) चार सुबुद्धांच्या कथेत तर आपण साईनाथांच्या त्यांच्या गुरुंविषयीच्या भावना तर आपण जाणतोच.    



आपण साईनाथांना साईचरित्रामधून अजून अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयास करतोय, पण आज बापू आई दादा आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यांना आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो, भेटू शकतो, त्यांचा शब्द ऐकू शकतो, त्यांच्याशी प्रत्यक्ष / मनात बोलू शकतो, त्यांचे कसे आचरण आहे हे याची देही याची डोळा जाणून घेऊन स्वत: मध्ये त्यांच्याच कृपेने उचित ते बदल घडवून आणू शकतो. ही संधी आता आपण दवडता कामा नये असे मनापासून वाटते.       




-----------------------------


गोखले बाई - पुरणपोळी कथा 



उपवास... मला स्वतःला कधीही करायला न जमलेली गोष्ट. बापूनी प्रवचनांमधून उपवास ह्या शब्दाचा खरा अर्थ सांगितला आहे. परमेश्वराजवळ बसून केलेले त्याचे चिंतन असा अर्थ आहे. परंतु आपण सामान्य मानव. आपल्या मनात एका क्षणात खंडीभर विचार गर्दी करून असतात. पुष्कळ वेळा इच्छा असूनही नामस्मरणात किंवा उपासनेत मन लागत नाही. 
त्यात पोट भरले नसताना तर मन लागणे शक्यच नाही. अर्धे किंवा त्याहीपेक्षा जास्त लक्ष भूकेमध्येच गुंतलेले असताना मन लागणार तरी कसे ? मग उपवास आपण ज्या कारणासाठी करतो, ते कारण तो हेतू सफल होणार तरी कसा ? नाही का ? 

म्हणूनच आपल्याला जे झेपेल आणि जसे शक्य होईल तसेच परमेश्वराचे चिंतन करावे. मन आणि लक्ष नसताना केलेल्या नामस्मरणाचा काय उपयोग ? त्यापेक्षा उपवास न करता का असेना, परंतु प्रेमाने आणि भावाने केलेले थोडेसे नामस्मरणही हा स्वीकारतो आणि संतुष्ट होतो. पूर्ण एकाग्रतेने आणि तन्मयतेने केलेले नामस्मरण आपल्यालाही वेगळाच आनंद देऊन जाते. 

ह्या परमेश्वरालाही दुसऱ्या कश्याचीही अपेक्षा नसते. तो आपल्या मनातील भाव आणि प्रेम हेच स्वीकारतो. बाकी कसलेही कर्मकांड आणि थोतांड, नियम याहीपेक्षा त्याच्यावर केलेले प्रेम सर्वोच्च ठरते. शिवाय परमेश्वरालाही उपाशी पोटी असलेला आपला भक्त पाहून कसा बरे संतोष होईल ? नाही का ? 

बाबांना भेटायला आलेल्या गोखले बाईंचेही बाबांवर खूप प्रेम आहे. या प्रेमानेच त्यांनी उपवास धरला आहे. त्यामागे कुठचाही दिखाऊपणा नाही. हा साई सारे काही जाणतोच. म्हणूनच अगदी प्रेमाने ते गोखले बाईंची समजून काढीत आहेत. त्यांना उपवास सोडून पुरणपोळ्यांचा बेत करून त्या ग्रहण करायला सांगत आहेत. बाईनीदेखील त्याचा प्रेमाने स्वीकार केला आहे. 

उपवास करणे काही गैर नाही. त्यामागे शास्त्र आहेच. परंतु मन लागत नसताना उपास केल्याने काय होणार ? त्यापेक्षा आपण जे जे म्हणून प्रेमाने आणि भक्तीभावाने करू शकतो ते ते केले की हा साई संतुष्ट होणारच आहे.  






    













 




  













0 comments: