Adhyay 33 (अध्याय ३३)

10:02:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

----  





नारायण मोतीराम जानी -विंचू दंश कथा
आणि 
नानासाहेब चांदोरकर - ग्रंथीज्वर कथा  

शब्द तुझे जरी 
दुरून ऐकले 
नशीब आमुचे 
तरी फळफळले 

बाबाच्या शब्दाचा प्रत्यय नारायणरावांना आला. नोकरी सोडून धंद्यात चांगला जम बसला. आनंदाश्रम वसतीगृह बांधून इतरांच्या आयुष्यात आनंद पेरल्याने त्यांचे आयुष्य सुद्धा सुखाने भरून गेले. ह्यांना आलेला पुढचा उदीचा अनुभव खरोखर अफलातून आहे. 
मनातील साईप्रती असणारा श्रद्धायुक्त प्रेम भाव काहीही चमत्कार करू शकतो याचा साक्षात दाखलाच आहे. ह्या श्रद्धेमुळेच उत्तबत्तीची काजळीही उदीचे कार्य करू शकते हेच दिसून आले. ह्या कथेत खालील गोष्टी आपल्याला समजतात. 

- नाराणरावाच्या मित्राला एकाएकी विंचू चावला आहे. महाभयंकर वेदना देणारी गोष्ट. ती देखील अशी अचानक उभी राहिली. संकटे ही अशीच येतात. पाठीमागून आपण बेसावध असताना खूप मोठा आघात करतात. परंतु अशा अवकाळी आलेल्या संकटाना उदीचे शस्त्र वापरले तरच आपला बेडापार होतो. वेदनेला आराम पडतो. 

- उदी हे तिचे कार्य करतेच. परंतु प्रत्येक वेळी ही उदी आपल्याकडे उपलब्ध असेलच ह्याची गॅरेंटी नाही. परंतु ह्याच्याकडे कोणतेच जाचक नियम नाहीत. नियम फक्त प्रेमाचाच. मग सारी चक्रे फिरायला लागतात. ह्या प्रेमासाठी उदबत्तीची काजळी सुद्धा उदी बनली. उदीचे कार्य करू शकली. हा साई काहीही करू शकतो. फक्त प्रेमाने ह्याला हाक मारायची खोटी.. हा धावत येतोच !

- अगदी विज्ञानाचे सारे नियम वाकवून अशक्य गोष्ट शक्य होताना इथे आपण बघू शकतो. वेदनेची जळजळ सुद्धा पार दूर पळाली आहे. औषधालाही जे लगेच करणे शक्य नाही ते कार्य ह्या उदीरूपी काजळी ने केले आहे. 

म्हणजेच जिथे पूर्ण श्रद्धेने अगदी काजळीचा वापरही उदीचे कार्य करतो आणि उदीही औषधाचे काम करते. 

नाना चांदोरकरांचा अनुभव तर ग्रेटच. 
- नानांकडे उदी नाही 
- जमिनीवरची मातीचा उदी म्हणून वापर केला 
- ज्याला आजार झाला आहे तो कोसो दूर आहे 
- आजारी रुग्णाला प्रत्यक्ष उदी किंवा उदीरूपी मातीही लावली नाही  
- नानांची पत्नी जिला कोणताच आजार झाला नाही तिलाच आजारी रुग्ण मानून रस्त्यावरची माती लावली आहे. 

हा सगळा प्रकार किती चमत्कारिक आहे !! अगदी कुठल्या चित्रपटातही असा प्रसंग आपण पाहिला नसेल असा प्रसंग इथे घडत आहे. ही आहे श्रद्धेची ताकद. ही ताकद ह्या कथांमधून अगदी जाणवली.    



-------------------------

नाना चांदोरकर - मुलगी बाळंत होण्याचा अनुभव 




असो पाप किती किंवा पुण्य गाठी 
ह्याची नाही गणना हो त्याला 
ऐकोनि पाझरे त्यांचे अंतरंग 
प्रेमे साद तयासी हो घाला 
मग कसा तो कुठूनही 
येईलच तो अवचित 
वासरांसाठी प्रेमे जैशी 
धेनु येई हो हंबरीत 

आपल्या सर्वांनचा वाली एकच. हा बाबा. संकटकाळी आपण कुणाला हाक मारणार ? आपल्या हक्काच्या माणसालाच ना ! एक लेकरू ज्याप्रमाणे आपल्या आईकडे झेपावतं, भीती वाटल्यावर आईच्या कुशीत शिरतं अगदी तसेच नाना बाबांना गाह्राणे घालत आहेत, हाक मारीत आहेत. मग हा बाबा धावत येणार नाही असे कसे होईल ? त्याला सुद्धा आपल्या लेकराची तितकीच काळजी आणि ओढ असतेच ! त्याने आपल्या लेकराकडे झेप घेतलीच !

हाकेसरशी घाई घाई 
वेगे धावतची पायी 
आली तापल्या उन्हात 
नाही आळस मनात 
माझी रेणुका माउली ... 

साई आणि भक्त यामध्ये कुणीही मध्यस्थी करणारा नाही. त्याची गरजही नाही. हा आपल्या भक्तांची प्रत्येक हाक ऐकतोच ! म्हणूनच तर ह्या मोठ्या आईने कानाला शंख लावला आहे. 
  
स्मरताची उपायांना धाडणारा 
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ... 

एकदा ह्या बाबांची इच्छा झाल्यावर सगळी चक्रे आपोआपच फिरायला लागतात. म्हणूनच तर बापूगीरच्या मनात अचानकच आपल्या गावी जाण्याची इच्छा झाली. ह्या योगायोगांना काहीच अर्थ नाही. बाबांना हवे म्हणूनच ते घडून येतात. हा बाबाच सारे नाथसांविध ठरवतो.  

पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवायला जसा कबुतरांचा वापर केला जायचा, अगदी तसाच बाबांचा हा बापूगीर उदी,आरती प्रसाद नानांकडे घेऊन जाणार होता. त्याच्याकडे त्याने प्लॅन केलेल्या यात्रेपुरतेच पैसे होते. मग नानांच्या गावी जायचे म्हणजे एक्स्ट्रा पैसे लागणार होते. परंतु बाबा असताना काय चिंता ? बाबांचे सारे प्लॅनिंग आधीच ठरलेले होते. त्यात अडचणी येतीलच कशा ? आणि समजा जरी आल्याच तरी हा बाबा सारे काही सांभाळून घेतोच ! 

नानांकडे जाण्यासाठी बापूगीरची पैसे नसताना सोय व्हावी याकरता हा विश्वाचा राजा बाबा स्वतः शिपाई, टांगेवाला सुद्धा बनला !! भक्तांसाठी हा काहीही करतो याचेच हे उदाहरण. 

कबीराचे शेले विणले 
गोरोबांचे बाळ दिधले 
भागीरथी साठी आणिली 
स्वर्गाहून गंगा ऐका पांडुरंगा 

खरे पाहायाला गेले तर बाबाने ही सारी लीला का बरे केली असेल ? ते करायची काय गरज ? बाबा शिरडीत बसूनही नानाच्या मुलीला आराम देऊ शकले असते. बापूगीर ला पाठवायची काय गरज ? त्याची उत्तरे शोधायचा प्रयास करू. 

- हा बाबा परमात्मा असला तरी मानव रूपात आलेला आहे. मानवाच्या साऱ्या मर्यादा पाळूनच हा त्याचे कार्य करतो. बाबांनी कुठल्याही चमत्काराशिवाय उदी आणि आरती बापूगीर बरोबर पाठवली आहे. एक सामान्य मानव ज्याप्रकारे हे सारे करेल, बाबांनी देखील तसेच केले आहे. 

- बापूगीरला बाबांनी फक्त आज्ञा केली. नानांकडे का जायचे हे सविस्तर सांगितलेले नाही. तरीही काहीही प्रश्न न विचारता स्वतः ठरलेला प्लॅनही त्याने बाबांच्या शब्दाखातर बदलला. खरेच ग्रेट ! बाबांनी असे करून बापूगीरची परीक्षाच पाहिली आहे. त्यात तो आगदी व्यवस्थित उत्तीर्ण झाला आहे.   
 
- ह्याचेच फळ बाबांना बापूगीरला अनुभवरूपात द्यायचे होते. म्हणूनच टांग्याची आणि शिपायाची लीला केली. अस्तित्वात नसलेली गोष्टही बाबांनी उभी केली. हा आलेला अनुभव पाहून बापूगीर आणि नाना दोघेही थक्क झाले आहेत. 

- बाबांना या कथेद्वारे संजीवनी उदी आणि आरतीचे चे महत्त्व समजावून सांगायचे होते.  

या कथेतील बापूगीर प्रमाणेच साक्षात साई सोबत असतानाही आपण त्याला ओळखू शकत नाही. त्याच्यासोबत जेवतो, गप्पा गोष्टी आराम करतो पण हाच तो साई हे जेव्हा कळते तेव्हा फक्त त्याने केलेल्या लीलेमुळे भारावलेल्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिलेले असतात. देव मामलेदारांकडे तर बाबा आधी सांगून त्याप्रमाणे येऊन जेऊन गेला तरीही त्यांना पत्ता लागत नाही. तशीच गत. आपल्या प्रत्येकाचीच.        
   
शेवटी एवढेच वाटते. बापूगीर प्रमाणे विश्वास आणि प्रेमाची दोन नाणी आपल्याजवळ असली की हा काहीही आयुष्यात कमी पडू देत नाही. सारे नाथसंविध ठरवतो. जीवनाचा प्रवास सुखकर करतो. जिथे जिथे म्हणून कमी आहे ती ती कमी भरून काढतो. हा आपले ओझे वाहणारा शिपाईसुद्धा बनायला कमी करत नाही. 

हा प्रवास आपल्या प्रत्येकाचाच आहे. परंतु हा सोबत असला की सारे ओझे हलके वाटू लागते. हाच आपला सारथी बनतो. योग्य दिशा दाखवतो. इतके प्रेम फक्त त्याचेच. बाकी कुणाचेच नाही. लव्ह यू डॅड. 
        



-------------------------
  
नारायणरावांची कथा 
  
हा बाबा जरी आपल्याप्रमाणेच एका सामान्य मानवाच्या देहासारखा दिसत असला तरीही तो परमात्मा आहे. त्याला शरीराची चौकट नाहीच. मेघाच्या कथेत सांगितल्यानुसार हा सर्वकाही आहे. दिशा, काळ, आकार ह्यांच्या पलीकडचा असा हा बाबा. नारायणरावांची ही कथा बाबांच्या निर्वाणानंतरची आहे. म्हणजेच बाबा तेव्हा देहधारी नव्हते. तरीही बाबा त्यांच्या वचनानुसार भक्तांसाठी धावत आलेच! 

जरी हे शरीर गेलो मी टाकून 
तरीही धावेन भक्तांसाठी 

म्हणजेच हे पंचमहाभूतांच्या शरीरापुरतेच बाबा सिमीत नाहीत. ते अनंत आहेत. देह ठेवल्यावरही त्याचे भक्तांवर लक्ष आहे. भक्तांसाठी बाबांचा जीव तळमळत आहे. नारायणरावांना होणारा त्रास त्यांनी स्वत: न सांगताही बाबांना कळला आहे. आणि हा बाबा लगेच धावलाच. ते ही शरीर धारण केलेले नसतानाही. 

बाबा देहधारी असताना नारायणराव वर्षातून दोनदा शिरडीस जायचे. परंतु आता बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. अशी तीन वर्षे गेली. बाबांच्या दर्शनाला खंड पडला. परंतु हा बाबा नारायणरावांना विसरला नाही. स्वतः स्वप्नात त्याना भेटायला आला आणि इतकेच नाही तर त्याना झालेल्या दुखण्यावर अभयवचन देऊन त्यांना असाध्य दुखण्यातून मुक्तीही दिली आहे ! ग्रेट !

मुळात साई, राम, कृष्ण, स्वामी हे म्हणजे सद्गुरुतत्वच ! ते एक आहे आणि कालानुरूप मानवरूपात भक्तांना उध्दरण्यास या धरणीवर जन्म घेतं. हा सद्गुरू त्रिविक्रम कायमस्वरूपी आहेच ! मानवरूपात जन्म घेतल्यावर त्याचे सारे नियम हा पाळतो म्हणूनच देह ठेवतो. परंतु कायम भक्तांसोबत असतो आणि त्याना सहाय्य करीत असतो. हा अनादी अनंत आहे. 

विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं हे आपण जाणतोच. विज्ञानापेक्षाही हा बाबा भारीच ! कारण ह्या विज्ञानाचा निर्माताही हा बाबाच ! नारायणरावांच्या दुखण्याला सारे  वैद्यकीय उपाय थकले. मग ह्या बाबालाच धावत यावं लागलं आणि निर्वाणानंतरही आणि ते सुद्धा स्वप्नात सांगितलेला त्या बाबाचा शब्द फळलाच.
 
शब्द सावळ्याचा खरा 
घेई संकटी उडी 
तरी भक्त हा आपुल्या 
जरी कोसळल्या दरडी .. 
माझा बापू बापू हा आसरा 
जेव्हा जीव होई घाबरा ... 

शेवटी कितीही जरी म्हंटलं तरीही त्या बाबाचे सांगून साकार रूपातले याची देही याची डोळा स्वरूपातील दर्शन हे वेगळेच ! समाधीशी त्याची तुलना होऊच शकत नाही. अगदी कितीही जरी म्हंटलं की समाधी म्हणजेच बाबा तरीही ह्या भक्तीवेड्या मनाला त्याला प्रत्यक्षच पाहण्याची ओढ असते. माझ्या मते म्हणूनच नारायणराव जे आधी बाबांच्या दर्शनाला दरवर्षी जात होते, त्याला समाधी ठेवल्यावर खंड पडला. कदाचित नारायणरावांप्रमाणे माझेही असेच झाले असते. परंतु तरीही हा बाबा रागावला नाही. त्याच्या मूळ स्वभावानुसार प्रेमाने धावत आलाच !

असा कसा तूच एक धावणारा 
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ... 






--------------------

अप्पा कुलकर्णी छबी कथा 
  
असो पाप किती किंवा पुण्य गाठी 
त्याची नाही गणना हो त्याला 
ऐकोनि पाझरे त्याचे अंतरंग 
प्रेमे साद तयासी हो घाला... 
कधी कसा तो कुठूनही 
येईलच तो अवचित 
वासरांसाठी प्रेमे जैशी 
धेनु येई हो हंबरीत ...    
 
या कथेमध्ये सद्गुरू आणि भक्ताचे किती सुरेख bonding आणि प्रेम दाखवले आहे ! हा बाबा भक्तांनी प्रेमाने आठवण काढली की लगेच त्यांच्याकडे धावत येतो. 

कुलकर्णीना बाबांची सुंदर छबी मिळाली होती. त्याचीच त्यांचे कुटुंबीय अगदी मनोभावे पूजा अर्चा करीत असे. ती केवळ छबी नसून प्रत्यक्ष साईच आहेत हाच त्यांचा भाव असे. पूजेला जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याने ते नित्यनेयमाने, भक्तीप्रेमभावाने बाबांना आळवत असत असत. मनात शुद्ध प्रेम असल्यावरच हे शक्य होऊ शकते.     
   
फक्त तुझ्या डोळ्यांमध्ये 
रोज रोज पाहत होतो 
चित्र नव्हे तूचि असशी 
एवढेच मानत होतो .. 

बाबांचे प्रत्यक्ष दर्शन केव्हा होऊ शकेल अशी त्यांच्या मनामध्ये नेहेमी तळमळ असे. ही तळमळ, बाबांची प्रेमाने काढलेली आठवणच बाबांना त्यांच्या घराच्या दिशेने खेचून घेऊन आली. फार मोठी गोष्ट आहे ! इथे साक्षात बाबाच कुलकर्णींना भेटायला आला आहे. केवढे हे भाग्य !     

देव मामलेदारांच्या कथेत हा साई दुसऱ्या रूपात आला होता. पण इथे तर नखशिखांत जणू साईच वाटावा अशा रूपात हा बाबा आलेला. अगदी कुणालाही ओळखता यावा अशा प्रकारे आलेला. आपल्या घरी असे प्रत्यक्ष बापू आले तर किती मस्त वाटेल ना ! सौ कुलकर्णीनीसुद्धा एक रुपया - अनन्यता - एकनिष्ठता बाबाना अर्पण केली. असा हा दुग्धशर्करा योग सर्वांनी आपल्या ह्रदयात साठवला.   

परंतु कामामुळे बाहेर जावे लागल्यामुळे कुलकर्णीचा मात्र हा दुर्लभ असा क्षण हुकलाच. पण ह्या बाबाने कुलकर्णीना वंचित ठेवले नाही. त्याची दर्शनाची पिपासा पूरी करून घेतलीच. प्रत्यक्ष दर्शन हुकल्यावर कसे वाटते हे आपण प्रत्येक जण जाणतोच. कुलकर्णीना बाबांच्या दर्शनाची ओढ आणि दर्शन चुकल्याची रुखरुख लागून राहिली आहे. ते तसेच उपाशी पोटी बाबांना शोधायला निघाले आहेत. परंतु उपाशी पोटी कुणाचे काय लक्ष लागणार ? नाही का ? हा बाबा पण अवलिया आहे. पोटाचे खळगे भरल्यावर लगेच दर्शन दिले.            

बघायला गेलं तर सौ कुलकर्णीच्या अनन्यतेच्या एक रुपयाची सर कशालाच येऊ शकणार नाही ? कुलकर्णीना मात्र त्याची लाज वाटली. इथे किती रूपये देतो हे महत्वाचे नसून कोणत्या भावाने ते अर्पण करीत आहोत ते महतवाचे आहे. परंतु ह्या बाबाने कुलकर्णीची दहा रुपये दक्षिणा देण्याची इच्छाही पूर्ण करून घेतली. आपल्या इत्थंभूत कृतीच्या खबरा ह्याला असतातच. 

एकंदरीत कुलकर्णीचे एकूण ११ रुपये बाबाने स्वीकारले. हे ११ रुपये म्हणजेच ११ वी दिशा. मनाची दिशा. कुलकर्णीनी आपले मन बाबाना अर्पण केले आहे. ग्रेट !    






--------------------

बाळाबुआ सुतार कथा 


आपण रोज अनेक व्यक्तीना बघतो. अगदी रस्त्यातून चालताना, travel करताना कित्येक लोक आपल्या नजरेसमोरून जातात. आपण थोडीच कुणाला लक्षात ठेवतो ? आणि लक्षात ठेऊ तरी कसे शकतो ?  ते पॉसिबलच नाही. कारण आपण 'मानव' आहोत. हा साई जरी एक 'मानव' दिसत असला तरी हा परमात्मा आहे हे कसे विसरून चालेल ? प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट ह्याच्या रेजिस्टर मध्ये नमूद होतेच ! ह्याचे हे रेजिस्टरही ह्याच्याप्रमाणेच अनंत अफाट आहे.  

जनम जनम का नाता 
है तेरा मेरा 
याद राहा प्रभू तुमको 
मै भूला बिसरा 

माणसाला कालची गोष्ट धड आठवत नाही. तर ४ वर्षापूर्वी बाबांच्या छबीला नमस्कार केला असल्याचे बाळाबुआच काय, तर कुणालाही आठवणे शक्य नाही. फक्त साईच हे जाणू शकतो. असे हे बाबाचे बोला ऐकून समोरचा आश्चर्याने गार पडेल. केवढी ही मेमरी ! बाबांकडॆ भक्तांची रीघ लागलेली असताना फक्त बाळाबुआनी फक्त एकदाच केलेला नमस्कार (तो ही बाबांच्या फोटोला, प्रत्यक्ष बाबांना नाही) सुद्धा बाबांनी लक्षात ठेवला. आपल्या इत्थंभूत कृतीच्या खबरा बाबांना माहीत असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.         

बाळाबुआबद्दल कथेमध्ये त्यांचा उल्लेख अर्वाचीन तुका ( हल्लीचे तुका) असा केला आहे. म्हणजेच त्यांची भक्ती केवढी असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. खरेच ग्रेट ! इतकी भक्ती असल्यामुळेच सुंदर अनुभव येतात. बाबा ह्या भक्तीलाच भुलतो. ह्या भक्तीमुळेच बाळाबुआ परेंत फोटो रूपात स्वतः बाबा पोचला !    

ह्या बाबाला काही मोठमोठ्या गोष्टी भक्तांनी कराव्यात अशी अपेक्षा नसते. त्यापेक्षा जे कराल ते पूर्ण प्रेमाने आणि शुद्ध भावाने करा अशीच बाबांची इच्छा असते. बाळाबुआंनी केवळ एकदाच, तो ही फोटोला मनोभावे केलेला नमस्कारही बाबांपरेंत पोहोचला. बाळाबुआ आणि बाबा यामध्ये इतर कुणीही नाही. इतर कुणी कशाला खुद्द बाळाबुआंनी केलेला नमस्कारही बाबांना प्रत्यक्ष सांगितला नाही. तरीही हा बाबा साऱ्याचा साक्षीदार आहेच.        

फोटोच काय, तर बाळाबुआंनी अगदी मनात जरी नमस्कार केला असता तरीही तो ह्या बाबापरेंत पोचलाच असता. ह्याला कशाचीही, कोणत्याही उपचाराची गरज नसते. ह्याला लागते ते फक्त शुद्ध प्रेम आणि भोळा भाव. 

ह्या गणेशोत्सवाला बापूंनी उच्चारलेले वाक्य आठवले. मी तुमची सदैव आठवण काढीत असतो ! ह्या वाक्यात फक्त प्रेम आणि प्रेमच भरले आहे. तशीच प्रेमाने आठवण ह्या कथेत बाबांनी बाळाबुआ कडे केलेली दिसते. बाबांच्या व्यापकतेला आणि मेमरीला काय म्हणावे ! त्याला शब्दच नाही. 

बापूराया रे बापूराया 
कधी न पडावा देवा 
विसर मला रे
तुझा विसर मला ... 





--------------------------

हरिभाऊ कर्णिक कथा 


सद्गुरुतत्व एक आहे या वाक्याचे याची देहि याची डोळा उदाहरण म्हणजेच ही कथा. कुठे शिरडीत राहणारे साई आणि कुठे नाशिकात राहणारे संत. आपल्यासारख्या सामान्य मानवाच्या डोळ्यांना दिसताना जरी ते दोघे भिन्न वाटत असले, तरीही ते शेवटी एकच आहेत. अख्ख्या साई चरित्रात अशी कित्येक उदाहरणे आहेत..  हे तत्व समजावून सांगणारी अनेक कथा आपण पाहतो.       

सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति   

हेच खरे. शरीराने वेगळे असले तरी ते एकाच तत्वाची दोन रूपे आहेत हे माहीत हवे. म्हणूनच तो एक रुपया बाबांना दिला काय किंवा त्या नाशिकच्या संताना दिला काय, तो शेवटी त्या सद्गुरुतत्वाला मिळणारच. काय कनेक्शन आहे !! 

हा बाबा भक्तांच्या मनातील दडून राहिलेली पवित्र इचछा नुसती ओळखतच नाही, तर ती अगदी चमत्कारिकरीत्या पुरीही करून घेतो. शेवटी भाव महत्त्वाचा. कर्णिकांच्या मनातील एक रुपया द्यायची इच्छा बाबांनी जाणली. ह्या बाबाला सगळे काही माहित असते. अगदी मनात बोललेले सुद्धा हा जाणतोच. त्यामुळेच कर्णिकांचा भाव बाबांच्या लक्षात आला. 

खरे पाहाता कर्णिक पुन्हा बाबांना तिथे तो रुपया देऊ शकलेही असते. परंतु माधवरावांच्या शब्दावर आणि पर्यायी बाबांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळेच हा सुंदर अनुभव बाबांनी कर्णिकांना दिला. 

हरिभाऊंना अनन्यतेचा हा रुपया बाबाना अर्पण करावयाचा होता. त्याचा बाबा स्वीकार करणार नाहीत असे कसे बरे होऊ शकेल ? हा बाबा प्रेमाला भुललाच आणि मस्त अनुभव आला. यासारखेच उदाहरण ह्या साईचरित्राचे लेखक हेमाडपंताचेही आहे. साईरुपात ज्या ३ वस्तू दाभोलकराना दिल्या, त्या बापूने आप्पानकडे मागितल्या. खरेच ग्रेट ! 

राम कृष्ण एक जरी दोन काया 
ऐसा विठूराया अनिरुद्ध !! 




  

 

           

  

     

 




       





   

      
     
   


         






  
  



 

     


  




 


    

 

 



   
     
      






0 comments: