Adhyay 39 (अध्याय ३९)
भगवदगीतेतील श्लोकाच्या आधारे नानासाहेब चांदोरकरांना बाबांनी दिलेल्या अनुग्रहाच्या कथेविषयी माझे विचार :
१) अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही शब्दांमध्ये कॉमन शब्द आहेत ते म्हणजे - ज्ञान. कारण ते असतेच. ज्याप्रमाणे अंधार म्हणजेच प्रकाशाचा अभाव, त्याचप्रमाणे ज्ञानाचा अभाव म्हणजेच अज्ञान. खरे अज्ञान म्हणजे काय हे साध्या सोप्या उदाहरणाद्वारे साईनाथ या कथेत समजावून सांगत आहेत.
२) या जगामध्ये आपण अनेक जण बघतो जे स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा टेंभा मिरवण्यातच धन्यता मानतात आणि स्वतःचा अहंकार / अभिमान जपतात. मी ही याला अपवाद नाही. पण बहुतेक साईनाथ या फुकटच्या ज्ञानाच्या अभिमान / अहंकारालाच 'अज्ञान' म्हणत आहेत असे वाटते.
लोका सांगे ब्रह्मज्ञान
आपण कोरडे पाषाण
ही म्हण आपण सार्यानीच एकलेली असेल. तोंडातून मोठमोठे शब्द बोलायचे, जगाला ज्ञान पाजळायचे आणि कृती मात्र अज्ञानाप्रमाणे करायची. हा 'दिखाऊपणा' साईनाथाना आवडत नाही असे या कथेतून दिसते.
३) नानासाहेब चांदोरकर हे खरोखर एक विद्वत्तेने श्रेष्ठ भक्त आहेत. आपल्या भक्ताला त्याच्याकडच्या गुणांचा आणि विद्वान असल्याचा गर्व होऊ नये म्हणूनच साईनाथ त्यांना भागवदगीतेतील श्लोकाचा अर्थ सांगत असावेत असे वाटते.
नाना तोंडातल्या तोंडात पूटपुटत असणारे श्लोकही साईनाथ बरोबर हेरत आहेत आणि त्याद्वारे एक मोठी शिकवण साऱ्यांनाच देत आहेत.
साईनाथ पण ग्रेट आहेत. इतके perfect timing केवळ याचेच. केवळ हाच इतक्या सहजपणे आपल्या विचारांना आणि कृतीला योग्य दिशा आणि उचित वळण लावू शकतो. बाकी कुणालाही हे जमणे शक्य नाही.
४)
२० व्या अध्यायात दासगणूंना पडलेल्या कोड्याची गोष्ट येते. ईशावास्य उपनिषदासारख्या कठीण प्रश्नाचे उत्तर एका अति सामान्य मोलकरणीद्वारे साईनाथ देतो. हा ही सामान्य आणि याचे प्रश्नांना उत्तर द्यायचे मार्गसुद्धा तसेच साधे सोपे.
शेवटी एवढेच वाटते -
खरे पाहाता हा साईनाथ, हा बापू म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान. तरीसुद्धा हा स्वतः स्वत:चा / स्वतःकाडील ज्ञानाचा अजिबात गवगवा न करता त्याचे काम अगदी चोखपणे करत असतो. किंबहुना स्वत: कडे लघुरूप घेणेच पसंत करतो. हेच आपण त्याच्याकडून शिकायला हवे. कारण तेच खरे ज्ञान.
------------------------
बुट्टीच्या वाड्याची कथा - स्वप्नदृष्टांत
स्वप्न म्हंटले की प्रत्येकाला तो भास आहे आणि सारे मनाचे खेळच वाटतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण तर आपण ऐकलीच आहे. परंतु बाबांच्या बाबतीत हे सारे काही खोटे ठरते. कारण हा बाबा जेव्हा स्वप्नात येतो तेव्हा तो प्रत्यक्षातच आलेला असतो. त्याच्या स्वताच्या इच्छेने. म्हणूनच त्याला नुसतं स्वप्न असं न म्हणता तो स्वप्न दृष्टांत ठरतो.
कुणाला हे सांगितले तर समोरची व्यक्ती त्याला योगायोगाचे लेबल लावून मोकळे होतात. स्वप्न वैगरे थोडेच खरे असते ? चला, हे जरी मानले, पण मग सेम स्वप्न, ते ही परस्परपूरक, दोन व्यक्तींना एकाच वेळेस पडले, तर मात्र त्याला काय म्हणावे ? त्याला कसा योगायोग म्हणता येईल ? पण आपल्याला तर माहितीच आहे. Coincidences are God's way of remaining anonymous. साईनाथच हे सारे घडवून आणत आहेत.
प्रत्येक कार्याचा कर्ता करावीता हा बाबाच आहे. सारे काही बाबांच्या इच्छेनेच घडून येते. बाबांना वाडा बांधून घेऊन त्यातच आपली समाधी असावी असेच वाटत आहे. त्यासाठीच ही सारी लीला बाबांनी घडवून आणली.
बाबांच्या प्लॅनिंग ला खरोखर सलाम. बुद्धीस्फुरणदाता केवळ हा बाबाच. बुट्टीच्या डोक्यात आधी हा विचार टाकला. इतकेच नाही तर स्वप्नात येऊन त्या विचाराला पुष्टी दिली. ते पण दोघांच्या. थोडक्यात तो मनातला विचार पक्का आणला. पुढे प्रत्यक्ष सामंती देऊन वाडा बांधायचा श्रीगणेशाही करायला सांगितला. सारे काही हा बाबाच घडवून आणतो. आपण फक्त निमित्तमात्र असतो. नाथसंविध प्रमाणे सारे काही घडून येत असते.
असंख्य क्रीडा लीला करूनी
पुरविसी सत्कामा
पुढे वाड्याचे बांधकाम सुरू असताना बाबा रोज लांबून ते पाहात. त्यात हव्या त्या सूचनाही करीत. म्हणजेच बाबांना architect चेही ज्ञान असल्याचे दिसून येते.
आपण आपले सारे प्रयास करायचे. बाकी जिथे मग मानवी ताकद कमी पडेल तिथे हा परमेश्वर उभा आहेच आणि वेळोवेळी सांगणारही आहेच.
बाबांनी सदैव माझीच मंदिरे बांधा असा आग्रह कधीच धरला नाही. किंवा मी सोडून इतरांना पूजायचे नाही असे अजिबात म्हंटले नाही. वाड्यात श्रीकृष्णाच्या मूर्त्या बनवून घ्यायला स्वतः बाबांनी सांगितले आणि त्यानुसार परवानगीदेखील दिली.
हा बाबाच सारे काही योग्य करून घेणार होता. फक्त हा आपल्याला अनेक सुवर्ण संधी देऊन त्याच्या मौल्यवान कार्यात सहभागी करून घेऊन आपलेच पाप धुऊन हलके करतो. एका दगडात अनेक पक्षी मारतो.
एवढे सारे करून हा मात्र स्वतः त्याचे क्रेडिट अजिबात घेत नाही. नामानिराळा राहतो. शेवटी वाड्यातच समाधी घ्यायची बाबांची इच्छा होती. समाधी बांधल्यामुळे त्या वाड्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. तो अजरामर झाला.
0 comments:
Post a Comment