अध्याय ४३ (Adhyay 43)

04:35:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

 
वझे नावाच्या भक्ताची कथा 


मुखीचा गजर मनामधे जावो 
अरे सरत्या क्षणाला तूचि आठवो ... 

बाबा हे काळाच्या वर आहेत. काळालाही वाकवणारे आहेत. त्यांनी ही देहाची चौकट कधी सोडायची हे ही स्वतः तेच ठरवतात. ते स्वतः एक आदर्श आहेत. वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे ही त्यांच्याकडूनच शिकावे. 

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ... 

साईनाथ नुसते बोलत नाहीत तर "आधी केले मग सांगितले" ह्या तत्वानुसार तसे वागतात देखील. निर्वाणाच्या काही दिवस आधी स्वतः रामायणाचे पारायण सुरू केले आहे. बाबा आणि राम यांच्यामधे काहीच फरक नाही. तरीही भक्तांनी कसे वागले पाहिजे हे ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवत असतात. म्हणूनच त्यांनी रामायणाचे पारायण सुरू केले आहे. 

पण वझेंनी ठरवलेले पारायण पूर्ण केली नाही. अर्धवट सोडले आहे. असे होता कामा नये. हा बाबा आपल्यासाठी अगदी सारे काही करत असतो परंतु आपलीच झोळी फाटकी असे असता कामा नये.  

शेवटी एवढेच वाटते. हे साईचरित्र म्हणजे बाबाच्या प्रत्येक कृतीचा आरसाच. त्यात आपण डोकावून आपले मन स्वच्छ करून घेऊया. तेच पारायणाचे फळ !


------------




बाबांच्या निर्वाणानांतर भक्तांना आलेली जाग    


मराठीभाषेत एक म्हण आहे. वरातीमागून घोडे. हा बाबा जेव्हा देहरूपात वावरत होता तेव्हा कुणालाच जाग आली नाही. मग सगळे जागे झाले. एखादी व्यक्ती गेल्यावरच तिची किंमत समजते त्याप्रमाणे बाबा आता देहरूपाने आपल्यात नाहीत हा विचारही कुणालाच सहन होत नव्हता. 

का असं होतं ते कळत नाही. हा बाबा जेव्हा आपल्याशी बोलत होता, आपल्यात वावरत होता तेव्हा मात्र आपण आपल्याच धुंदीत होतो. अहंकाराच्या नशेत होतो. पण आता बाबा नाही तर त्यांची कमी प्रकर्षाने जाणवत आहे. भयंकर वादळी पाऊस आल्यावर जसे आपण आपल्या घराखाली सुरक्षित असतो, तसेच संकटात ह्या बाबाचे छत्र, त्याची सावली जाणवते. पण आता हा बाबा नसताना पोरके झाल्यासारखेच वाटते. 

सकाळी आला उपाशी गेला 
दुपारी आला उपाशी राहिला 
रातीस आला उपाशी निजला 
तरी कसा बापू माझा येतची राहिला ... 

हा नेहेमी आपल्यासाठी झटत राहिला ... तरी पण "उठून बसण्या दमलो नाही हीच काय ती सेवा घडली" अशीच आपली गत असते. हा बाबा तेदेखील स्वीकारतो. आपल्या प्रत्येकाला ओळखून विशेष सवलती देतच राहातो. देह सोडल्यावरही भक्तांच्या भल्यासाठी कायम उभा असतो. आपल्या अस्तितवाची जाणीव करून देतो ! 

म्हणूनच एवढेच वाटते .... 

जे आले ते तरुनी गेले 
जे न आले ते तसेच राहिले 
अनिरुद्धाचा झाला तो उरला 
दूजा दुःखातचि रुतला ... 









 








 


 




















 


  

0 comments: