Adhyay 6 (अध्याय ६)

05:57:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


रामनवमी उत्सवाचे वर्णन आणि त्यामागील भावार्थ 


हा अख्खा अध्याय रामनवमी उत्सवाचे वर्णन करतो. 

ज्यांना ज्यांना अजून साईनाथ नक्की कोण आहेत हे माहीत नाही, ते अजूनही साईनाथाना एक 'मुसलमान' म्हणूनच मानतात. 'राम' हे हिंदू दैवत. मग त्यांचा नेहेमीचा प्रश्न असतो - "हा मुसलमान साई हिंदू धर्माचे सण उत्सव साजरा का बरे करतो?". 
... हे वाचून कदाचित आपल्याला राग येईल, आश्चर्य वाटेल... तसेच हसायाला सुद्धा येऊ शकेल. कारण अशा लोकांना हा परमात्मा जात-पात, धर्म या सगळ्यांच्या पलीकडे आहे. साई आणि राम हे एकच आहेत हे मुख्य तत्वच त्यांना माहीत नसतं. हे त्यांचे दुर्दैव ! असो.

पण मग हा रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे साईनाथांचा काय बरे हेतू असावा ?  आपण साईनाथांचे नाव घेऊन याचे उत्तर शोधण्याचा प्रयास करू. 

१) उत्सव म्हंटला की डोळ्यासमोर येतो तो आनंद. अगदी प्रत्येक गोष्टीत तो ठासून भरलेला असतो. साईनाथ हा उत्सव साजरा करून भक्तांना हा आनंद grab / catch करायला सांगत आहेत. (जसे भक्तीभाव चैतन्य ३१ डिसेंबर २०१९ ला बापूंनी सांगितले) ... खरेच hats off to Sainath ! 

२) रामनवमी उत्सवाचा गाभा म्हणजे रामजन्म ! प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात हा राम जन्माला यावा आणि त्यांचा भाग्योदय व्हावा हीच बाबांची इच्छा असावी. हा रामच मग आपल्यामध्ये असणाऱ्या रावणाचा आणि कलीचा वध करतो. आणि आपली प्रगती करतो. 

३) ही जात-पात आणि धर्म दुय्यम आहे... सद्गुरूतत्व, त्रिविक्रम हा एकच आहे, हेच साईनाथांना याद्वारे भक्तांना समजावून सांगायचे असावे.

४) ह्या रामनवमी उत्सवात सहभागी झाल्याने आपले गतजन्मीच्या पापांचे भर्जन होते. ही सुसंधीच साईनाथांना उपलब्ध करून द्यायची होती. 

जीवनाच्या नदीला बांधुनिया घाट 
अनिरुद्ध माझा धुतो अपराध... 

५) उत्सवात सर्व पवित्र स्पंदने एकत्रित येतात. भक्तीभाव चैतन्याच्या लाटा उसळत असतात. एक प्रकारचा जल्लोष असतो. हा साईनाथ याद्वारे त्याच्या भक्तांवर आपला कृपावर्षाव करीत असतो. 

याचप्रमाणे एक महत्तवाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. साईनाथाना त्या काळी लोक मशिदीत राहणारा एक मुसलमानच मानीत असत. मग साईचरित्रामध्ये कित्तीतरी भक्तांची उदाहरणे येतात, जे धर्माने हिंदू आहेत. असे असूनही हे भक्त एका "मुसलमान" गुरूच्या पायी वाहिले होते. असे करण्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची भिती किंवा कमीपणा वाटला नाही. खरेच हे सारे सर्वश्रेष्ठ भक्तच आहेत ! खरेच ग्रेट !!    


आता आपण ह्या रामनवमी उत्सवाचे वर्णन ऐकूया आणि त्यामागचा भावार्थ जाणून घेऊ ... 

ह्या साईनाथांची जी योजना असते ती सफल होतेच. हेच फक्त सत्य. ह्या रामजन्माच्या कथानकाच्या सुरुवातीलाच साईनाथ एका दगडात दोन पक्षी मारत आहेत. कसे ? 

१) गोपाळ गुंडांना पुत्रप्राप्तीचा लाभ देऊन त्यांच्यावर कृपा केली. 
२) याचेच फलित म्हणून गोपाळ गुंडांकरवी ह्या उत्सवाची पायाभरणी केली. 

इथे कुणाला वाटू शकते की गोपाळ गुंडामुळे हा रामनवमी चा उत्सव साजरा होऊ शकला.... पण... ही सारी त्या साईंची लीला आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणूनच गोपाळरावांच्या मनात उरूस / यात्रा भरवण्याचे आले. 'ह्या'च्या मनात जे आले ते by hook or by crook होणारच आहे. कारण तेच योग्य.    

चांगल्या कामात आडवे येण्याची अनेक विघ्नसंतोषी माणसांची वृत्ती असते. किंबहुना काही चांगले करायला गेले की वाईट माणसे त्यांच्या स्वभावगुणांनुसार आडवी येतातच, जसा कुलकर्णी आला. आपणही हे बऱ्याच वेळा अनुभवले असेल. पण ह्या साईनाथाच्या इच्छेपेक्षा काहीच मोठे नाही. नियतीलाही याचे ऐकावेच लागते. चांगल्या कामात अशी आडवी येणारी माणसेच शेवटी कायमची "आडवी" होतात. हीच त्या साईनाथांची ताकद. शेवटी उत्सवाला परवानगी मिळालीच.  

बघायला गेले तर साईनाथाला काहीच अशक्य नाही. ही कुलकर्णी सारखी माणसे विघ्न बनून आडवी येतात. पण हा साईनाथ त्यांचा बरोबर बंदोबस्त करतो. आपल्या प्रगतीच्या आड येण्याची आपलीच स्वतःमधील वृत्ती आणि आपले दुर्गुण हाच तो कुलकर्णी. हा आळसच आपले पुष्कळ नुकसान करीत असतो. अशा वेळी हा साईनाथ मध्ये पडून आपल्यातल्याच ह्या दुर्गुण रूपी कुलकर्णीला बरोबर वठणीवर आणतो. जीवनाची गाडी रुळावर आणतो.      

साईनाथांच्या planning ला पण सॅल्यूट ! १९११ साली सुरू केलेला हा रामनवमीचा उत्सव आजही अखंड सुरू आहे... हा साईनाथच बुद्धीस्फुरणदाता आहे. ह्याला जे हवे ते तो करवून घेतोच. आणि म्हणूनच जागेश्वर भीष्म यांच्या डोक्यात ही रामजन्म या कल्पनेचा उगम झाला. काका महाजनी सुद्धा मनात आल्यावर लगेच काहीच ठरवत नाहीत. बाबांची आज्ञा हेच प्रमाण यावर ठाम आहेत. ग्रेट !

आपण एक पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की साऱ्या काही गोष्टी आपोआप घडत चालल्या आहेत. रामनवमी उत्सव, रामजन्म, भजन-कीर्तन, सुंठवडा, पाळणा हे सारे काही जणू काही बाबाच घडवून आणीत आहेत. 

हा बाबा सारं काही जाणतो. अगदी मनातलं सुद्धा ओळखतो. म्हणूनच भीष्म स्वतः विसरले असतानाही बाबांनीच त्यांना बाबांना विचारण्याची आठवण करून दिली. सारं काही करवून घेणारा हा साईच ! आपण केवळ निमित्तमात्र !

पुढे पाळणा बांधला म्हणून बाबांनी काका महाजनीना बोलावणे पाठवले. "बाबा काय म्हणतील ?" या चिंतेने त्यांना घेरले होते. यात काही मुद्द्यांचा अभ्यास करावासा वाटतो. 

१) हा साईनाथ कधीच कुणावर उगाचच रागावणार नाही हे माहिती हवे. म्हणजे असे नसते भय मनात उत्पन्नच होत नाही.    

२) साईनाथ केवळ माझी काही चूक झाली म्हणूनच फक्त बोलावतात हा विचार मनात आणू नये. हा साईनाथ कौतुक करायला सुद्धा सर्वांच्या पुढे असतो.   

३) साईनाथांवर पूर्ण विश्वास हवा. जर त्यांनी आपण काही योजले असूनही ते करू नये सांगितले, तर आपण तसेच केले पाहिजे. कारण त्यातचखरे हीत असते.     
                               
४) बाबांची आपल्याला आदरयुक्त भीती ही हवीच. पण म्हणून बाबांपासून सतत घाबरत राहून जगणे हे योग्य नाही असे वाटते.   


बाबानी गळ्यात हार घालणे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या लेकराना साईबाबानी दिलेली ही प्रेमळ पोचपावती आहे. हा साईनाथ आपले जेवढे कौतुक आणि लाड करतो तेवढे कुणीच करणार नाही. ह्याला आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कृतीचे कौतुक असते. गळ्यात घातलेला हार म्हणजे साईप्रेमाची पोचपावतीच आहे. बाबा प्रत्येकाला त्याचे क्रेडिट देतातच. अगदी नक्की. बाबा भीष्मांना देखील विसरले नाहीत. असा हा ’हार’ गळ्यात पडल्यावर काका महाजनी ’जिंकले’ !!

पुढे कथेमधे साईनाथांच्या क्रोधाचे वर्णन येते. साईनाथांचा क्रोध हा श्रद्धावानांसाठी मंगलकारक (त्यांच्या आयुष्यात रामजन्म घडवणारा) आणि श्रद्धाहीनांसाठी विनाशकारी (रावणरूपी वृत्तींचा नाश करणारा) असतो. या क्रोधातच अनेक पापे आणि असुरी वृत्ती मारल्या जातात. साईनाथांचे शिव्याशाप हे त्या वाईट वृत्तींना असतात. या द्वारे बाबांनी रामजन्माचा पाळणा सुद्धा योग्य वेळ आल्यावरच सोडून घेतला. साईनाथांची लीला अगाधच.
---------------------------------------------

रामजन्माच्या आख्यानातच एक लघुकथा येते ती बाळाबुआ सातारकर यांची. हा बाबा किती आपल्यावर लक्ष ठेऊन असतो नाही ! मनात साईदर्शनाची इच्छा झाल्यावर साईनाथांनी सातारकरांना बोलावून घेतले सुद्धा ! या गोष्टीतून बरेच काही शिक्ण्यासारखे आहे:

१) महामारीच्या साथीमुळे बाळाबुआंचे नुकसान झाले. पण साईनाथांनी त्यांचे झालेले हे नुकसान भरून काढलेच, शिवाय पुढच्या ४ वर्षांच्या कार्यक्रमांची बिदागी सुद्धा एकाच या वर्षी मिळवून दिली.

कभी चाहता नही
मुझसे कुच भी
बस प्यार से
देता रेहेता है....

हा साईनाथ सदैव मुक्त हस्ताने देतच राहतो. आपण केलेल्या अल्प प्रयांसाठीसुद्धा हा अनेक पटींनी फळ देऊन आपल्यावर कृपा करतो.

२) हा साईनाथ मनकवडा आहे. आपल्या मनात काय चालू आहे हे केवळ हाच जाणतो आणि लगोलग आपल्या मनातली इच्छा पूरी करून घेतो. ग्रेट !

३) बिदागी बद्दल काही खात्री नसतानाही बाळाबुआ कीर्तन करायला तयार होतात. हेच ते साईप्रेम ! ... आणि मग ह्या प्रेमाखातर हा साई सगळं भरभरून देतो...


---------------------------------------------

हा साईनाथ वरून दिसताना जरी कोपिष्ट दिसला, तरी त्याचे हृदय हे लोण्याचा गोळा आहे. हा जरी रागावला, तरी त्याचा राग लगेच निवळतो आणि तितक्याच प्रेमाने तो प्रतिसादही देतो....



 
    

 

                
         
  





     


    
   

  









            
       


0 comments: