Adhyay 8 (अध्याय 8)

05:56:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

नरजन्माचे माहात्म्य 



जन्म माझा का कशासी 
प्रश्न पडतो जड जीवांसी 

आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी हा प्रश्न पडतोच. मी जन्माला आलो आहे त्याचे नक्की कारण काय हे उत्तर आज आपल्याला या बापूरूपात सद्गुरू लाभला त्यामुळे शक्य झाले आहे. बाकी लोक अख्खा जन्म ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यातच फुकट घालवतात. 

८४ लक्ष योनींमध्ये फक्त मानवानेच एवढी प्रगती केलेली आपण पाहातो. का ? कारण मानवाला देवाने सद्सदविवेकबुद्धी रूपी सर्वोच्च गिफ़्ट दिले आहे. हे गिफ़्ट बाकी कुणालाही मिळाले नाही. काय योग्य आणि अयोग्य हे आपल्या मानवाखेरीज बाकी कोणत्याही योनीला कळत नाही. (पण काय करणार... कळतंय पण वळत नाही. मानव चुका करायचा काही थांबत नाही. )

याशिवाय मानवाला कर्मस्वातंत्र्याचेही वरदान प्राप्त झाले आहे. बाकीच्या योनी ह्या "भोगयोनी" आहेत. जन्माला यायचे - स्वभावगुणाप्रमाणे वागायचे - शेवटी मारायचे. एवढेच काय ते त्यांना ठाऊक. बाकी आयुष्यात प्रगती नाही आणि प्रगती कशी करायची हे देखील समजत नाही. अशा आयुष्याचा काय फायदा ?      

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात , 
      
संसार तो सभी पशू पक्षी भी करते है 
लेकिन जो देश का संसार करता है वही भगवान को प्यारा होता है 
    
हा मानवाचा जन्म हा मोठ्या भाग्याने मिळतो. ही एक प्रकारे मिळालेली संधीच आहे. याद्वारेच आपण आपली प्रगती साधून घेऊन कायमचे त्याच्या वैकुंठात निवासस्थान मिळवायला हवे. साधनाताई, मीनावैनी यांचा आपल्या सगळ्यांना आदर्श आहे.      

यातूनच आपण ह्या नरजन्माचे महत्त्व जाणून घेऊ शकतो. सहजासहजी हा जन्म मिळत नाही. म्हणूनच खालील अभंग आपल्याला या जन्माचे महत्त्व अगदी ओरडून सांगतो. 

तो हा मिळाला नरजन्म 
सांडू नको ऐसा व्यर्थ ... 

आपण बापूंचे खूप ऋणी आहोत की ज्यांच्यामुळे at least आपल्या सर्वांना हे सारे माहीत आहे. आपण किती लकी आहोत हे आता आपण जाणून घेऊ.       

भोगयोनी (लेव्हल १)
मानवयोनी (लेव्हल २)
सद्गुरुप्राप्ती (लेव्हल ३)

सध्या आपण या तिसऱ्या लेव्हल ला या बापूकृपेनेच आहोत. मानवजन्म आणि त्यात सद्गुरुप्राप्ती हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. ह्या संधीचे नक्कीच आपण सोने करूया.    

ऐसा नरजन्म आम्ही फुका दवडतो 
तरी कसा बापू माझा येतांचि राहतो ... 



---------------------



साईनाथांनी भिक्षा मागणे 


हा subject वाचूनच एक नेहेमी प्रश्न पडतो. हा साई तर ब्रह्माण्डाचा स्वामी. ह्याला कशाची आणि काय कमी असणार ? आणि मुळात भिक्षा मागायची गरजच काय ? पहिल्या अध्यायात साईनाथांना पीठ दळायला बसलेले पाहून बायांच्या मनामध्येही असेच आलेले.... 

पण... साईनाथांच्या प्रत्येक कृतीमागे एक गहन अर्थ दडलेला असतो. आपल्या बुद्धीला सीमा आहेत म्हणूनच आपण तो अर्थ जणू शकत नाही. 

म्हणजेच या भिक्षा मागण्यामागेही काहीतरी मोठा अर्थ नक्कीच दडलेला असणार. तोच आपण जाणून घेऊया. 

या कथेच्या सुरुवातीलाच साईनाथांच्या स्वभावगुणाचे अनेक पदर उलगडत जातात. मी पाहिलेला बापू या पुस्तकात ज्याप्रमाणे बापू कसे एक अफाट आणि अलौकिक व्यक्तिमत्व आहे हे आपण जाणू शकतो, अगदी त्याचीच आठवण येते. शेवटी दोघेही एकच. 

टमरेल :

साईनाथांचे भिक्षापात्र म्हणजे हे टमरेल. मोठी आई महिषासूरमर्दिनी ज्याप्रमाणे आपल्या शंखाच्या द्वारे भक्तांचा अतिसूक्ष्म आवाजही ऐकू शकते, अगदी त्याचप्रमाणे साईनाथ या "टमरेल" द्वारे भक्तांचे सारे काही स्वीकारत आहे. 

हा साईअनिरुद्धच ultimate आहे. भक्तांची प्रत्येक कृती, कर्म, आहार, विहार, आचार,  विचार, पाप, पुण्य सारे काही ह्याच्याजवळ येऊन पोहोचते. म्हणूनच या टमरेलात सारे काही एकाच ठिकाणी जमा होत आहे. 

.... आणि त्यानंतर हा साई ते सारे स्वतः प्राशन करीत आहे. याद्वारे पुष्कळ गोष्टी आपल्याला समजतात. 

१) ह्या साईनाथांपासून काहीच लपून राहात नाही. 

२) ह्याचे टमरेल अनंत आहे आणि ह्याची ग्रहण करण्याची क्षमताही अनंत अफाट आहे. 

३) आपले सारे काही हा स्वतः स्वीकारत असल्यामुळे आपले पुण्य-पाप सुद्धा ह्याच्याकडेच जाते... विचार करा... कलियुगात जन्माला आलेल्या प्रत्येकाचे मिळून केवढे पाप असेल.. त्यात आपण आपल्याच स्वैराचार आणि कर्मस्वातंत्र्यामुळे अजून भर घालतच राहातो. 

आणि एवढे सारे पाप / जहाल विष हा स्वत: प्राशन करतो. आपले भोग स्वत: वर घेतो... पण आपल्यावर सुखाची छाया धरतो... 

जळीताची आग बापूची सोसतो ... 

... आणि म्हणूनच आपण आतातरी आपल्या कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग थांबवायला हवा. आपल्यामुळे ह्या बापूला त्रास होतो... 

याचप्रमाणे आपले पुण्य देखील याच्याकडेच जात असल्याने आपल्या चांगल्या कृतींनी याला अधिकाधिक आनंद देऊया. 

४) हा साईनाथ सगळे स्वतः प्राशन करत असल्याने प्रारब्धाचे सारे नियम वाकवून आणि त्यात श्रद्धावानासाठी सूट देतो. केवढे हे त्याचे प्रेम आणि माया !

५) याद्वारे साईनाथांनी एका पित्याप्रमाणे आपल्या सर्वांचीच जबाबदारी घेतली आहे हे समजते 

६) हे असे सारे मिश्रण, हा काला असा ग्रहण करणे एका मानवाला शक्य नाही. याद्वारे त्यांचे एक वेगळेपण अगदी जाणवते. एक मानव रूपातील परमात्माच हे करू शकतो. 

७) हा साईनाथ स्वतः चालून आपल्याकडे चालत येतो.... भिक्षा मागायला. तेवढेही कष्ट याने आपल्याला ठेवले नाहीत. 

इतुके सोपे जीवन केले 
बसल्या जागी देव आले 
उठून बसण्या दमलो नाही 
हीच काय ती सेवा घडली 

८) हा साईनाथ जे आपण देऊ ते स्वीकारायला तयार असतो. म्हणजेच तो  आपल्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता हा आपल्यावर अफाट प्रेम करत असतो. शिवाय कसलाच आग्रह धरत नाही. 

आपण जसे असू तसे ह्याला प्रिय आहोत. आपण किती पापी किंवा पुण्यवान आहोत यावर हा मला स्वीकारायचे की नाही हे ठरवत नाही. केवढे हे याचे विशाल मन !

मै जो भी हू, और जैसा हू 
वो मुझको अपना लेता है 
कभी चाहता नही, मुझसे कूछ भी
वो ही सबकूछ निछावर करता है ...   


९) हे सगळे करण्यामध्ये ह्याचा स्वतःचा काहीच फायदा नाही. हा फक्त अनंत हस्ताने "देणे" जाणतो... आणि घेताना आपली पापे घेतो... हा निराळाच आहे बाबा... 

१०) हा साईनाथ सगळ्यांमध्ये वाटून खातो. प्राणीमात्रांना आपलेसे करून घेतो. हड हाड करत नाही. तसेच सर्वांना सामावून घेतो. दया, क्षमा आणि प्रेम हे यांच्यात आटोकाट भरले आहे... ग्रेट !

.... विचार करीत जावे तसे अनेक पैलू आपल्याला सापडतील.. कारण मुळात हा अनंत आहे. आणि असा सद्गुरू लाभला हे खरोखरीच आपले भाग्यच म्हणावे लागेल. 

या साईनाथाप्रमाणेच आपल्या प्रत्येकाकडेच टमरेल असते...याचीच बाळे आपण..   पण आपण मात्र लोकांचे वाईट गुण, लोकांनी मला दिलेला त्रास, त्यांची वाईट वागणूक ह्याचाच साठा आपल्या टमरेलात करत असतो. आणि मग शेवटी तेच ग्रहण करतो. याऐवजी थोडे चांगले ग्रहण केले तर यात आपलाच फायदा आहे. नाही का ?. बाकी सारे साईनाथ जाणतोच. 


-----------------  


बायजाबाई

तात्या कोते पाटील यांची आई. बाबा लहान वयात शिरडीत आले. त्यामुळे बायजाबाईंनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले.  

स्वतः खूप श्रीमंत असूनही बाबांनी अन्न ग्रहण करावे म्हणून दुपारी रान तुडवत त्यांना शोधण्याकरिता डोक्यावर पाटी घेऊन त्यात भाकरी भाजी घेऊन जात. बाबांच्या पाया पडत व त्यांना दोन घास खाण्याचा आग्रह करत. त्यांचे बाबांवर लाभेविण प्रेम होते. आईला त्रास नको म्हणून मग बाबा गावात येऊन राहू लागले.

देव कधीच काही विसरत नाही. आमरण तिचे प्रेम लक्षात ठेवले. प्रत्येक स्त्रीला तिचे बाळ हेच सर्वस्व असते. हे ओळखून बाबांनी तिच्या बाळाचे कायम कल्याण केले. रात्री द्वारकामाईत तात्या बाबांबरोबर झोपत. हा क्रम तात्यांचे लग्न होईपर्यंत सुरु होता.

तात्यांचे मरण सुद्धा बाबांनी स्वतःवर घेऊन आपला देह ठेवला.

बाबा पाच घरी भिक्षा मागत त्यात एक बायजाबाईंचे घर होते. बाबा भिक्षा मागत म्हणजे प्रारब्ध मागत. ज्याचे भोग माझ्या लाडक्या भक्तांना भोगायला लागू नयेत. केवढे हे अकारण कारूण्य व लाभेविण प्रिती!  




खुशालचंद

जातीने मारवाडी असणारे खुशालचंदांचे काका बाबांचे नि:स्सीम भक्त होते. ते साईपदी विलीन झाल्यावर बाबांनी खुशालचंदांवर तेवढेच प्रेम केले. बाबांनी त्यांचेही कल्याण केले. खुशालचंद बाबांना वाजतगाजत घरी घेऊन जात. जुन्या आठवणींना उजाळा देत. तसेच बाबांना अल्पाहार देत. 

या दोन्ही गोष्टी एकामागोमाग हेमाडपंतांनी लिहिण्याचे कारण म्हणजे घरातील एका व्यक्तीने मनापासून बाबांची भक्ती केली तर बाबा त्यांचे सर्व कुटुंब सांभाळतात.

आपण प्रत्येकाने बाबांचे होऊन राहिले पाहिजे. 



चित्रावीरा चाबुकस्वार                   






   
     

             

       


   
        

















0 comments: