Adhyay 46 (अध्याय 46)
गयावळ कथेविषयी माझे विचार
तू पक्ष्यात तू प्राण्यांत
सर्वाम्च्या र्हदयात
चेतन तूचि अचेतन तूचि
तू अवघ्या विश्वांत
आई ही लेकराची सर्वतोपरी काळजी घेत असते. मग ती मनुष्ययोनी असो, प्राणीयोनी असो किंवा पक्षीयोनी असो. टी.व्ही. वरती डिस्कवरी चॅनेल वर आपण अनेकवार हे प्रत्यक्ष पाहिलेही असते.
घार हिंडते आकाशी
लक्ष तिचे पिलापाशी
आई जरी पिलापासून दूर असली, तरी तिचे पूर्ण लक्ष आपल्या बाळाकडेच असतं. आपले बाळ सुखात आहे ना, बाळावर काही संकट तर आलेले नाही ना, किंवा येऊ घातले नाही ना हेच विचार आईच्या मनात असतात. संकटाची नुसती चाहूल लागताक्षणीच आई तिच्या पिल्लांना आपल्या पंखांखाली घेते आणि संकट येण्याआधीच त्यांचे संरक्षण करते. आपल्यावर इतकं प्रेम आणि आपले रक्षण फक्त ही सद्गुरूमाऊलीच करू शकते.
गयेमधे ग्रंथिज्वर असेल ही शाम्याच्या मनातील भीती बाबांनी ओळखली आणि शाम्या जाण्याआधीच त्या ग्रंथिज्वराचे निवारण केले. आणि hatsoff to साईबाबा! बाबांचा प्लॅन चक्क १२ वर्षापूर्वीच तयार होता! आपले लेकरू १२ वर्षांनंतर गयेला जाणार आहे आणि तेव्हा तेथे ग्रंथिज्वर असेल म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी तसबीर रूपात बाबा चक्क १२ वर्षे आधीच गयावळाच्या घरी जाऊन पोचले.
साईनाथांनी हेमाडपंतांना ३ वस्तू दिलेल्या. "मी या वस्तू स्वत: मागायला येईन" असे साईनाथ म्हणालेले. नंतर पुढे साईनाथ बापू होऊन त्या ३ वस्तू मागायला आले. हा त्याने दिलेले वचन पाळतोच. यातही पुढे साईनाथ बापू होऊन येणार आणि त्यांचे प्रगटीकरण कार्यहेतु साईनाथांनी ही योजना आधीच करून ठेवलेली! Really Great!
यावरूनच डॉ. नयनावीरा यांचा अनुभव आठवला - तो त्यांच्याच शब्दांत =>
मी डॉ. नयनावीरा परदेशी, २००९-१० मध्ये माझं चांदवड येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बापू कृपेने अॅडमिशन झालं. पुढे काॅलेज सुरू झाले आणि राहण्यासाठी त्याच संस्थेची हॉस्टेल निवडली. आपल्याला माहीत आहे बाहेर गावी शिकायला जाणे हा विषय निघाताच स्वतः सोबत अगदी घरच्यांचाही जीव कासावीस होतो.. कसे होणार...? कसे राहणार..? रूममेट वगैरे असे नानाविध प्रश्न मनात गोंधळ निर्माण करतात. त्यावेळी माझी व घरच्यांची परिस्थितीही अशीच झालेली.
ठरल्याप्रमाणे होस्टेला राहण्यासाठी गेली. माझी फॅमिली ही सोडवायला आलेली. सोबत बापूंचा मोठा फोटोही नेलेला. सर्वांना सोडून राहवे लागेल यामुळे फार अपसेट होती, रडू यायचं.. अशातच रूम उघडून देण्यात आला. रूम उघडताच बापूंचा फोटो कुठे ठेवणार अशी नजर भिरकवत रूममध्ये प्रवेश केला.
सर्वांना आश्चर्य वाटेल त्या रूममध्ये अगोदरच आई बापू दादांचा लहान फोटो होता. आई ,बापू व दादा आधीच आपल्या लेकीसाठी जाऊन पोहोचले होते. तू एकटी नाहीयेस बघं आम्ही तिघेही आहोत तुझ्या सोबत इथे! जणू हे पटवून देण्यासाठीच. केवढे आपल्या बापूंचे हे अनिरुद्ध प्रेम! आई-बापू-दादांचा फोटो पाहून आम्ही थोडे relaxed झालो.
-----------
हा साईनाथ कुणाच्याही रुपाने आपल्या मदतीला येऊ शकतो. ह्याचे मार्ग आपल्या आकलनापलिकडचेच. गयावळाच्या कथेत तो फोटोरूपाने मदतीला घाऊन आला.
ह्याचे मार्ग त्रिनाथांसीच ज्ञात (त्रिविक्रमाची १८ वचने)
जिथे जिथे आपण जातो हा बापूराया आपल्या सोबत असतोच असतो. कधीकधी तर आपल्याही आधी जाऊन हा सैदव आपल्यासाठी तत्पर कसा असतो ह्याची खूणही पटवून देतो.
चालता लागली उन्हाची सावली
सद्गुरू माऊली सांगाती ये (अभंग)
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरोनिया (अभंग)
आपण बर्याचदा अनुभवले असेल. ज्यावेळी आपण एखादया दुःखात असू आणी नेमक त्याच वेळी अचानक कुणीतरी याव आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करावा / किंवा आपल एखादं काम आडुन राहीलय आणि आपण सहजच कुणापाशी तरी तो विषय काढावा आणि लगेचच आपले काम व्हावे. हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचे ’त्या’चे मार्गच आहेत.
हा आपल्यासोबत आहेच हा विश्वास हवा. मग मी कितीही सामान्य भक्त का असेना. ह्याचे आपल्यावर पूर्ण लक्ष असतेच. एका अनुभवात वाचलेले. हा तर आपल्याशी कनेक्टेड असतोच. पण आपण त्याच्याशी किती कनेक्टेड आहोत यावर सगळे अवलंबून असते.
-------------------
दोन शेळ्यांची कथा
ह्या बाबाच्या प्रत्येक कृतीमागे गहन अर्थ दडलेला असतो. बाबांनी असे का केले ? ते असे का बरे वागले ? वरवर पाहात असेच आपल्याला वाटते. परंतु हा बाबा आपल्या प्रत्येकाचाच; एवढेच काय तर प्रत्येक जीवाचा फक्त हा जन्मच नाही तर याआधीचे त्याचे कित्येक जन्म अगदी लीलया बघू शकतो. प्रत्येक जन्मात कुणी काय केले आहे याचा सारा हिसाब किताब त्याला पाठ असतो. पण आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी काय ठाऊक ? म्हणूनच आपल्यासारख्या भक्तांना प्रश्न पडतात. आणि आपले हे असे प्रश्न ऐकून बाबाही निवांत असतात. खरे कारण त्यांनाच माहीत असते ना !
एकीकडे आपण म्हणतो की बाबांना फसवणे कुणालाच शक्य नाही. ह्याच्यापुढे कुणाची लबाडी टिकू शकणार ? पण मग दोन रुपयांच्या शेळ्या बाबांनी चक्क ३२ रुपयाला विकत घेतल्या ? असे का ? बाबांना त्या व्यापाऱ्याने फसवले की काय ? की बाबाचा हे करण्यामागे काही उद्देश आहे ? येस. प्रश्न पडतात. त्यांचीच उत्तरे आपल्या परीने जाणून घ्यायचा प्रयास करूयात.
१) ह्या दोन शेळ्यांच्या पुनर्जन्माविषयी बाबा सोडून कुणालाही माहीत नाही. अगदी त्या शेळ्यांनासुद्धा काहीच माहीत नाही. किंबहुना बाबा सोडून कुणालाच ते माहीत असण्याची कुठलीच शक्यता नाही.
२) एवढ्या शेळ्यांपैकी बाबांनी अशाच दोन शेळ्या निवडल्या ज्या आधीच्या जन्मात त्यांच्याजवळ, त्यांच्या सहवासात होते.
जनम जनम का नाता
है तेरा मेरा
याद राहा प्रभू तुमको
मै भूला बिसरा
ह्या बाबाची प्रेम, माया ममता केवळ त्या त्या जन्मापुरती मर्यादित नसून पुढील जन्मातही बाबा तेवढ्याच मायेने आपल्याला जवळ घेतो त्याचे हे उत्तम उदाहरण.
३) बाबांनी नुसत्या शेळ्याच निवडल्या नाहीत तर त्यांचे आपापसात काय नाते आहे हे देखील बाबा जाणून आहेत. तसेच आधीच्या जन्मात त्यांचे काय कर्म आहे आणि कशामुळे त्याना मृत्यू आला याचीही खडानखडा माहिती बाबांना आहे
४) बाबांच्या सहवासाचे फळ हे दोन भावांच्या केवळ मानवजन्मातच नाही तर पुढील शेळीच्या जन्मातही त्यांना मिळाले. त्यांना बाबांजवळ घेऊन आले.
५) बाबाने ज्याला आप्त मानले त्याच्यासाठी हा बाबा काहीही करायला तयार असतो. शेळींना विकत घेताना बाबांनी पैशाकडे बघितले नाही. दोन रुपये असो की १६ रुपये, हा बाबा मग काहीही विचार न करता आपल्या भक्ताला जवळ ओढतोच !
६) जो ह्या बाबाचा आहे त्याची, त्या शेळीची किंमत इतरांप्रमाणे २ रुपये न राहाता डायरेकट १६ रुपयांपरेंत जाऊन भिडते. हाच तो त्रिविक्रमाच्या प्रेमाचा गुणाकार !
७) बाबांचे हे प्रेम नुसते दिखाव्यापुरते नाही. त्यांना खरोखरीच त्या शेळयांप्रती attachment आहे. म्हणूनच "आपला माणूस भेटला" ह्या आनंदापुढे बाबांना पैशाचे ते काय मोल ?
ह्या कथेमुळे कुठे ना कुठे आपल्याला नरजन्माचे महत्त्व आपोआपच स्पष्ट झालेले दिसून येते. नरजन्माचा उचित फायदा अगदी नगण्य जीवच करून घेतात. बाकी तर पशूप्रमाणेच जीवन जगतात. तीव्र क्रोध आणि त्यामुळे होणारी भयंकर क्रिया ही आयुष्यला कुठे नेऊन ठेवते याचेही ही कथा उदाहरण आहे. तीव्र क्रोधाच्या भूमिकेत येऊन अविचाराने केलेली कृती ही पशूसमानच असते आणि त्यानुसारच आपल्याला पुढील जन्म मिळतो.
आपण बोलता बोलता कधी कधी म्हणतो. काय तू शेळी आहेस ! शेळी हे दुबळे जनावर समजले जाते. शक्तीहीन आणि कुणीही अगदी सहज फायदा घेऊ शकेल असेच असते. बघा ! आधीच्या मानव जन्मातील एकदम aggressive असणारे दोघे भाऊ पुढील जन्मात शेळी बनले आहेत ! हीच ती कर्मगती. प्रारब्ध.
आपल्यास भोगावा लागणारा त्रास हा आपल्यामुळेच उत्पन्न होतो. आपणच प्रारब्धाचे डोंगर जमा केलेले असतात. मानव जन्मात साक्षात बाबा जवळ असताना, सद्सदविवेकबुद्धी असतानाही मातीच खाल्ली. त्याचे परिणाम पुढील जन्मातही भोगावे लागले. बाबांपासून पुन्हा त्यांच्याच कर्मप्रारब्धामुळे दूर झाले.
या सगळ्यामध्ये बाबांची क्षमा प्रकर्षाने जाणवते. चक्क मनुष्यवध करूनही बाबांनी त्या भावांना टाकले नाही. शेळी झाल्यावरही बाबांनी त्यांना प्रेमाने कुरवाळले, थोपटले. खरेच ग्रेट ! इतकी क्षमा फक्त त्या बाबांचीच ! बाकी कुणाचीच नाही !
पिपा म्हणे नका विटंबु हा जन्म ...
या कथेचे सार मला हेच समजते की अतिरिक्त क्रोध त्या माणसाचेच आयुष्य किती उध्वस्त करतो हे इथे प्रकर्षाने बघायला मिळते. क्रोध हा सर्वांनाच येतो. कारणंच अशी घडतात की भयंकर त्रास होतो. पण तरीही या क्रोधालाच कंट्रोल करायाला जमायला हवे, जेणेकरून पुढचे सारेच नुकसान टाळता येऊ शकेल. भोग कमी होतील.
देवा.. मी शांत आहे ... मला अजून शांत कर ...
नाथसंविध.
0 comments:
Post a Comment