जीवन विकास प्रयोग - इलेक्ट्रिसिटी

01:07:00 Nandan Bhalwankar 0 Comments



जीवन विकास प्रयोग - इलेक्ट्रिसिटी

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला वेळच नसतो. आणि म्हणूनच आयुष्यात shortcut अवलंबिले जातात. 'आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय काही मिळत नाही' असा युक्तिवाद सांगणारे पुष्कळ लोक आपण बघतो. कधीकधी आपणही त्या लोकांपैकीच एक असतो. पण हे असे shortcuts पुढे जाऊन अडचणच निर्माण करतात. 

shortcut म्हणजेच कमी मेहेनतीत किंवा विना मेहेनतीत जास्तीत जास्त कार्यभाग साधणे आणि आपला फायदा / स्वार्थ साधणे. 


तुम्ही जोर मारू लागा 
दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा 


ही साईनाथांची वाणी आपण जाणतोच. बापूही प्रवचनात अनेकवार सांगतात. मेहेनतीशिवाय या जगात काहीही प्राप्त होऊ शकत नाही. हा आपल्या प्रयासांनीच संतुष्ट होतो. 


आपल्याला आपल्या ताकदीपेक्षाही जास्त केवळ हाच पुरवू शकतो. हेच त्याचे आपल्यावर असणारे प्रेम आणि त्याची कृपा.


या मोहमायेच्या जगात अनेक प्रलोभने आपल्या अवती-भोवती असतात. आपण प्रत्येक जण याच मोहांना बळी पडतो. या क्षणाला कदाचित मला माझा फायदा जरी दिसत असेल, तरी पुढे जाऊन आपल्याला मोठा फटका बसू शकतो याचेच भान आपण ठेवत नाही. 


उदाहरणच द्यायचे झाले तर आजकाल अनेक जण डोंगराच्या कड्याच्या अगदी टोकाला उभे राहून सेल्फी काढताना दिसतात. संपूर्ण आयुष्यच जणू पणाला लावतात. आणि मग पाय घसरून जीव गमावून बसतात. सेल्फी हा एक मोहाचाच प्रकार आहे. 


आज बापू आहेत म्हणून आपल्याला चांगल्या-वाईटातील फरक लगेच समजतो. ही पण त्याचीच कृपा. आपण वाईट वागताना १० वेळा विचार करतो. बापू बघत आहेत ही जाणीव / त्याचा प्रेमाचा धाकच आपल्याला वाईट वागण्यापासून रोखतो. 


आपल्या जीवनाच्या सर्कीटमधे हा फ्युज रूपाने काम करतो. हा जर नसेल, तर आपल्या जीवनाचे सर्कीट या आपणच घेतलेल्या चुकीच्या shortcut मुळे जळून जाते आणि आग लागू शकते. 


हा फ्युज रूपाने आपल्यावर आपल्याच चुकांमुळे येणारी संकटे स्वतः झेलतो आणि स्वतः जळून जातो. हा घाव स्वतः सोसतो. आपल्याला त्याची झळही बसू देत नाही. आपल्यावर एवढे प्रेम तर आपण स्वत: सुद्धा करीत नाही.


साईचरित्रातील लोहाराणीची कथेतील मुलीचे भोग स्वतः भोगले, तसेच खापर्डे बाईंच्या कथेतही आपण बघतो. साईनाथांच्या पोटावर गाठी आल्या आहेत. 

संकटावर मात करा रे आज्ञा हा करितो 
संकट येता भक्तांआधी पुढे उभा ठाकितो 


जळीताची आग बापूची सोसतो 
तरी कसा बापू माझा येतचि राहतो.  

'तू प्यार का सागर है', हा त्रिविक्रम मुळी प्रेमस्वरूपच आहे. हा आपल्या जीवनाच्या सर्कीट मध्ये फ्यूजही बनायला तयार आहे. गरज आहे आपण त्याचे बोट घरून चालण्याची. बाकी माग तो सगळे बघायला सर्व समर्थ आहे. 


नाही जर वाणी नाम तुझे
नाही जर हाती काज तुझे 
मग काय उरले जीवनी या सखया 

0 comments: