Chapter / Adhyay 30 (अध्याय ३०)

03:13:00 Nandan Bhalwankar 0 Comments


हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  

मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

सप्तशृंगी माता - नवस कथा 



सप्तशृंगी माता ही मोठी आईच. तिचा पुत्र साईनाथ. साईबाबा. अख्या विश्वाचा डोलारा सांभाळणारे. काकाजी वैद्यांना आईने स्वप्नात येऊन बाबाचरणी जायला सांगितले. किती हे भाग्य ! परंतु काका ते समजू शकले नाहीत. भलतीकडेच गेले. परंतु आईने माधवरावांकरवी अगदी सहज साईकडे जाण्याचा रस्ता खुला केला. हे सारे आपोआपच घडत जातं. मोठ्या आईची इच्छा म्हणूनच. 


सुरुवातीला समजले नाही तेव्हा काकाजींनीदेखील स्वप्न तसेच सोडून दिले नाही. त्यांना जेवढे म्हणून समजले आणि योग्य वाटले ते ते सारे त्यांनी केले. इथे एक महत्तवाची गोष्ट समजली ती म्हणजे वणीला सप्तशृंगी समोर उभे राहून मनातच बोलल्यावरही देवीने लगेच स्वप्नात दर्शन देऊन बाबा म्हणजेच साईनाथ हे स्पष्ट केले. म्हणजेच आपल्या लेकरांवर तिचे लक्ष असतेच आणि आपले गाऱ्हाणे ही मोठी आई तिच्या शंखाने ऐकतच असते. तिला कुठल्याही मिडीयमची गरज लागत नाही. अगदी ह्रदयात घातलेली अतिसूक्ष्म हाकही तिला ऐकू जाते.    


आईने कसे परस्पर जुळवून आणले पहा. काकाजींना साईचे दर्शन हवे होते तर माधवरावांना सप्तशृंगी आईच्या चरणी नवस फेडायला जायचे होते. हे सारे नाथसंविधच ! हा सारा खेळ, एवढे  केवळ तीच करू शकते !  


सप्तशृंगी आईने सांगितल्याप्रमाणे साईबाबांची भेट जोपरेंत होत नव्हती तोपरेंत त्यांचे मन थाऱ्यावर नव्हते. शांती नव्हती. केवळ बाबांची भेटच त्यांना ती मनःशांती प्रदान करू शकणार होती. हा साईनाथ असाच धगधगणाऱ्या मनाला शांती देतो. अनिरुद्ध एव शांतीदाता .. 


नवस म्हणजे काय हे आपण चोळकरांच्या कथेत पाहिलेलेच आहे. नवस जरी केला, तरी तो फेडावा लागतो. आपले काम झाले की नवस विसरला असे चालत नाही. ती प्रेमळ गुरुमाऊली ते ही पोटात घालते. माधवरावांची आई चक्क ३० वर्षे नवस फेडायला विसरली होती !!  एवढी वर्षे जाऊनसुद्धा माधवरावांवर काही अरिष्ट ओढावले नाही ही साईकृपाच. आपल्या आईने आठवण करून देऊनही माधवराव पुन्हा नवस फेडायला विसरले.  


परंतु आपण जरी विसरलो, तरीही ह्या बाबाला आपली काळजी असते. नवस फेडायचा राहिल्यामुळे आपल्या लेकराला काही होऊ नये अशीच त्याची इच्छा असते. म्हणूनच ज्योतिषीरूपात येऊन बाबांनीच नवसाची आठवण करून दिली. माधवरावांनी आता क्षणाचाही विलंब न लावता लगेच नवस फेडायला साईचरणी गेले. माधवरावांच्या मनातील भावाला सुद्धा सॅल्यूट ! साई आणि सप्तशृंगी अलग नाहीत हा ठाम विश्वास आहे ! एक सच्चा भक्तच असा विचार करू शकतो. ग्रेट ! 


वर लिहिल्यानुसार हा साईनाथ आणि सप्तशृंगी भिन्न नाहीतच. मायलेक. खरे पाहाता साईनाथ माधवरावांचा नवस तिथेच शिरडीलाच फेडून घेऊ शकले असते. परंतु साईंची लीला अगाध. काकाजी वैद्य आणि माधवराव यांची परस्परपूरक गरज लक्षात घेता सारे सेटिंग साईनाथांनी लावले आहे. म्हणूनच बाबांनी त्याना वणीला सप्तशृंगीकडेच पाठवले आहे. तसे केल्याने दोघांचीही कामे झाली. माधवरावांचा नवसही फिटला आणि शिरडीला बाबांकडे यायला माधवरावांची सोबतही झाली. बाबा ग्रेट ! एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. पुढे बाबांचे दर्शन मिळाल्यावर काकांच्या मनाची शांती पार दूर झाली. 


अजून एक महत्तवाची गोष्ट म्हणजे ही कथा ३० व्या अध्यायात येते. ह्याची फोड केली तर ३ म्हणजे त्रिविक्रम साईनाथ आणि ० म्हणजे ती आदिमाता. शून्यानाम शून्यसाक्षिणी. म्हणजेच ३० एकत्रितरित्या आदिमातेसह तिचा पुत्र साईनाथ असा आहे. ह्या अध्यायात आदिमाता सप्तशृंगी आणि तिचा पुत्र साईनाथ ह्यांची लीलाच आहे. हे सारे अभ्यासल्यावर अजून एक गोष्ट समजते ती म्हणजे ह्याच कारणासाठी आपण अंघोळीच्या वेळी ३० मिली त्रिविक्रम जल घेतो ! तुससी ग्रेट हो ! 


मी तुम्हांसी साहाय्य करीन निश्चित 

मात्र माझे मार्ग त्रिनाथांसिच ज्ञात 


ह्या त्रिविक्रमाच्या वचनाचा काकाजी तसेच माधवराव ह्या दोघांना प्रत्यय आला. दोघांचेही काम लक्षात घेता दोघानाही एकमेकांची गरज होती, जी बाबांनी ओळखून भागवली आणि प्रत्येकालाच कृतकृत्य केले. शेवटी एवढेच वाटते की हा त्रिविक्रम आणि त्याची आई ह्यांचे आपल्या आयुष्यात आगमन झाले की चमत्कारांची आणि अनुभवांची रांगच लागते. कारण हे चमत्कार म्हणजेच त्याचे आपल्यावर असलेले प्रेम ! 



-------

     

खुशालचंद आणि पंजाबी ब्राहमण रामलाल ची कथा 



ह्या दोन्ही कथामंध्ये बाबा स्वप्नात येऊन आपल्या भक्तांना कसे बोलावून घेतो आणि बाबाच्या मनीची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी जे जे म्हणून हवे असते ते ते अगदी आओपाप कसे घडून येते हे सांगितले आहे. 


रामलाल ने तर बाबाना आधी कधीही पाहिलेले नाही. तरीही हा बाबा स्वप्नात आला. रामलाल ना काहीच कळेना. शेवटी बाबाच छबीरूपात त्याच्याकडे धावत आला आणि त्याला खेचले. 


प्रॅक्टिकल बुक मधील प्रयोग सूर्यप्रकाशाच्या दिशेने रोपट्याची वाढ ह्याची वरील दोन उत्तम उदाहरणे आहेत.   


   




 

 





          



0 comments: