Other Articles (इतर लेख)
*आला रे हरी आला रे....*
_कधी कसा तो कुठूनही_
_येईलच तो अवचित_
_वासरांसाठी प्रेमे जशी_
_धेनु येई हो हंबरीत..._
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकालाच एक आधार हवा आहे. आणि तो बापू, आई, दादाच.
बापूला बघावं, त्याला न्याहाळावं असे आपल्या प्रत्येकालाच वाटत आहे.. आणि येस... बापू आज सर्वांपर्यंत पोचलाच..
_मज न लागे गाडीघोडी ।_
_विमान अथवा आगिनगाडी ।_
_हांक मारी जो मज आवडी ।_
_प्रकटें मी ते घडी अविलंबें ।।_
_(॥साईचरित्र अध्याय ४०, ओवी ३२॥)_
*हा प्रेमाखातर धावत येतोच!*
बापू आपल्याला प्रत्येक वेळी आधार देत होता, देतोय आणि देतच राहील.
आजच्या कोरोना व्हायरस च्या भीतीच्या वातावरणातील आपला आधार म्हणजे हा बापूच !
_टाकूनियां मजवरी भार ।_
_मीनला जो मज साचार ।_
_तयाचे सर्व शरीरव्यापार ।_
_मी सूत्रधार चालवीं” ॥२००॥_
_(॥साईचरित्र अध्याय २८, ओवी २००॥)_
*_रूप तुझे मग भरून पाहता_*
*_चित्त विसावे धरी शांतता_*
फक्त बापूच नाही, तर आई आणि दादांना पाहून अंगात नुसता उत्साह आणि आनंद संचारला होता. अगदी जाणवत होतं ते !
*इस बगिया का हर फूल खिला*
*अनिरूद्ध तेरे आने से....*
हा अभंग अगदी प्रत्येक जण जगला... अनुभवला.
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.... अशीच अवस्था झाली. सोने पे सुहागाच.
*बापूंच्या I am there with you always... सर्व श्रद्धावानांचे मंगलच करणार आहे या शब्दांनी मनातली भीतीची महामारी पार मारली गेली.*
*_पिपा जाणतो हाच निवारा_*
*_तारक हा आम्हा..._*
*ह्या बापूसाईचे गहूदळण रूपी सुदर्शन चक्र करोनारूपी महामारीची झळ श्रद्धावानांच्या आयुष्याला पोहोचूच देणार नाही. सारे काही मंगलमयच करणार आहे.*
आता कशाला चिंता करायची? नाही का?
_____
Ambadnya,
नंदनसिंह भालवणकर,
दादर केंद्र
प्लेझंट सरप्राईज ...
गुरुवार, आपला श्री हरिगुरुग्रामला जायचा वार. ऑनलाईन उपासना सुरू होती. नेहेमीप्रमाणे आरती साईबाबा झाल्यावर दर्शन सुरू होणार असे वाटले. कारण तसेच नॉर्मल रूटीन गेले कित्येक महिने आपण सारेच अनुभवत होतो.
पण .... अचानक कानावर "आय लव्ह यू माय डॅड" ची धून वाजली आणि अंगावर अक्षरश: रोमांच आले.. एकदम सारे वातावरण पालटले. नंतरची प्रदक्षिणा म्हणजे "सोने पे सुहागा" च ! आज साईचरित्रातील अध्याय २ आठवला.
कधीं ऐकिली नाहीं देखिली।
मूर्ति पाहूनि द्दष्टि निवाली।
तहान भूक सारी हरपली।
तटस्थ ठेलीं इंद्रियें॥१३९॥
साई दर्शन लाभ घडला।
माझिया मनींचा विकल्प झडला।
वरी साई समागम घडला।
परम प्रकटला आनंद॥१४४॥
खरोखर आज मला जाणवलं, हेमाडपंतांनी जेव्हा साईनाथांना पाहिलं असेल तेव्हा त्यांना काय झालं असेल ! खूपच छान अनुभव होता तो !
इस बगिया का हर फूल खिला
अनिरुद्ध तेरे आने से ....
बोन्साय स्पोर्टस खेळण्याचा आगळावेगळा आनंद ...
रविवार सकाळ म्हंटली की मस्त लोळत अगदी उशीरा उठायचे हा माझा मी स्वत:ला जणू नियमच घालून ठेवलेला... पण काल आमच्या दादरच्या उपासना केंद्रात उद्या बोन्साय स्पोर्ट्स आहेत असे सूचनेत ऐकले आणि मनोमन ठरवले की कितीही झाले तरी जायचेच.
सकाळी अलार्म वाजला आणि नेहेमीप्रमाणे त्याची 'कटकट' वाटू लागली.. बोन्साय ला जाऊ की नको जाऊ की नको असे करता करता आळस झटकून शिवाजी पार्कला पोचलोच.
तिथे गेल्यावर जी धमाल आली म्हणून सांगू.. ती शब्दातीत आहे.. आनंद आनंद आणि आनंदच... येस. तो तिथे येऊनच अनुभवायला हवा. लहानांपासून ते वयाने ज्येष्ठ श्रद्धावानांपर्यंत सारे जमले होते. तळ्यात मळ्यात, फ्रिसबी, डोज बॉल, कृष्ण असे खेळ खेळून मजा मस्तीची सार्यानीच पार लयलूट केली.
प्रत्येक जण खेळात स्वतःचे वय विसरला. ठरवले नसतानाही पुढच्या रविवारी सर्वानी बोन्साय खेळण्यासाठी जमायचेच हे ठरवूनच टाकले. सप्तसंघ सेवकांनाही हा उपक्रम केंद्रात चालू केल्याबद्दल मनापासून अंबद्न्य म्हणावेसे वाटते.
हास्य, आनंद, त्यात आपसूकच होणारा व्ययाम, सकाळच्या उन्हात खेळल्यामुळे मिळणारे व्हिटॅमिन डी, श्रद्धावानांमध्ये तयार होणारे बॉण्डिंग या साऱ्या गोष्टी आपोआप बोन्साय स्पोर्ट्स खेळून मिळाल्या.
भक्तीभाव चैतन्यात बापूंनी सांगितले त्याप्रमाणे आज मी हा आनंद grab / catch केला. आपण सगळेच ते करू शकतो. गरज आहे तिथे उपस्थित राहण्याची.
---------------------------------------------------------------------------------
करोना व्हायरस वर कविता
पसरली करोनाची दहशत...
सारे देश अवघे पडले चिंतेत
आले अवेळी मोठे संकट...
Dad ने वेळेआधीच केले सुचित
पुढेही तशीच परिस्थीती उद्भवली
काळाची पाउले आधीच ओळखून
आम्हावर कृपेची सावली धरली
आधुनिक काळानुरूप उपासना
अनिरूद्ध टीवी वर आली
दर गुरूवारची हरिगुरूग्रामची वारी
घर बसल्याही करण्या शक्य झाली
अवतरले अख्खे हरिगुरूग्राम माझ्या घरी
पुन्हा आनंदी आनंद झाला
कोमेजल्या माझ्या जीवाला
अंकुर नवा फुटला
असो करोना अथवा
रोग भीषण भयकारी
आहे खंबीर Dad माझा
सर्वपेक्षा लै भारी
---------------------------------------------------------------------------------
सबुरी म्हणजे काय ? याबद्दल माझे विचार :
आजचा जमाना instant गोष्टींचा आहे. सगळं काही अगदी लग्गेच आणि ताबडतोब हवे असते. पण नेहेमीच असे अधीर होऊन चालत नाही. थोडा patience हा ठेवावाच लागतो. नाहीतर होणारी कामेही बिघडतात. हा patience हीच सबुरी.
भक्तीमार्गामध्ये भगवंतावरचा विश्वास हीच सबुरी. आणि इथेच आपण कमी पडतो. मलाही ही सबुरीच ठेवायला अजून जमत नाही.
आपल्या प्रत्येकाचीच आपल्या सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा असते. ही सबुरीच सतत वाढवत न्यायला हवी. गहूदळणाच्या अध्यायातही बाबा जे जाते फिरवत आहेत ते सबुरीचेच. हल्लीचा काळ अतिभयंकर आहे. सगळीकडे युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. अशा काळात ही सबुरीच आपल्याला तारून नेणार आहे.
हा त्रिविक्रम स्वतःच 'प्रेम'स्वरूप आहे. ह्याचे तर आपल्यावर प्रचंड प्रेम असतेच. आपण ह्याच्या प्रेमाला किती प्रतिसाद देती हे मात्र आपल्यावरच अवलंबून असते. ह्याच्यावर अधिकाधिक प्रेम करणे म्हणजेच आपली सबुरी वाढवत नेणे होय, एवढेच माझ्या अल्प बुद्धीला समजते.
- नंदनसिंह भालवणकर,
दादर उपासना केंद्र
सबुरी विषयी साई चरित्रातील ओव्या:
१) श्री ॥ च्या चरणीं जें मागणें असेल तें शिरडींत अगर जगाच्या पाठीवर कोठेंही राहून भक्तिभावानें आणि विश्वास ठेवून मागावें. सबुरी असूं द्यावी.
२) वादावादी नाहीं बरी । नको कुणाची बरोबरी । नसतां श्रद्धा आणि सबूरी । परमार्थ तिळभरी साधेना ॥अ २ / १९२॥
३) अध्याय १९ मधील काही ओव्या
निष्ठा आणि सबूरी दो न । हेच ते पैसे, नव्हते आन । म्यां ते तेव्हांच टाकिले देऊन । तेणें मज प्रसन्न गुरुमाय ॥५२॥
धैर्य तीच गे बाई सबूरी । सांडूं नको तिजल दूरी । पडतां केव्हांही जडभारी । हीच परपारीं नेईल ॥५३॥
पुरुषांचें पौरुष ती ही सबूरी । पाप ताप दैन्यता निवारी । युक्तिप्रयुक्तीं आपत्ति वारी । बाजूस सारी भय भीती ॥५४॥
सबूरीवरी यशाचा वांटा । विपत्ती पळवी बारा वाटा । येथ अविचाराचा कांटा । नाहीं ठावुका कोणाही ॥५५॥
सबूरी सद्नुणांची खाणी । सद्विचाररायाची हे राणी । निष्ठा आणि ही सख्या बहिणी । जीव प्राण दोघींसी ॥५६॥
सबूरीवीण मनुष्यप्राणी । स्थिति तयाची दैन्यवाणी । पंडित असो कां मोठा सद्नुणी । व्यर्थ जिणें हिजवीण ॥५७॥
गुरु जरी महा प्रबळ । अपेक्षी शिष्यप्रज्ञाच केवळ । गुरुपदीं निष्ठा सबळ । धैर्यबळ सबूरी ॥५८॥
कोणा अपरिचिता हातीं धरून । निरोप देती पाठवून । स्वस्थ न बसवे का भाकर खाऊन । सबूरी धरून रहावें ॥२३०॥
४) अध्याय २२
ईश्वर जगाचा सूत्रधारी । तयाच्या आज्ञेंत वर्तती सारीं । हो कां विखार विंचू तरी । आज्ञेबाहेरी वर्तेना ॥२३२॥
म्हणवूनि प्राणि मात्रांवरी । प्रेम आणि दयाच करीं । सोडीं साह्स धरीं सबूरी । रक्षिता श्रीहरी सकळांतें ॥२३३॥
५) अध्याय २३
असावें निर्मळ श्रद्धाबळ । वरी प्रज्ञेचें बळ प्रबळ । सबूरीची जोड अढळ । परमार्थ सबळ तयाचा ॥१९२॥
६) अध्याय २६
“कां त्या संकल्पविकल्पलहरी । शांत झाल्या कां आतां तरी । ठेवील निष्ठा धरील सबूरी । तयासी श्रीहरी रक्षील” ॥८३॥
७) अध्याय ३२
नका सांगूं गुप्तार्थ परी । बसा खा भाकर तुकडा तरी । पाणी प्या जा तदनंतरीं । राखा सबूरी अंतरीं ॥५०॥
---------------------------------------------------------------------------------
’श्री’ म्हणजे लक्ष्मी, शोभा, कीर्ति, प्रतिष्ठा, सौंदर्य इत्यादी. मंत्र शास्त्रात नामस्मरणाचे महत्व आहेच, पण त्याला ’श्री’ जोडले तर लक्ष्मी, शोभा, कीर्ति, प्रतिष्ठा, सौंदर्य इत्यादी प्राप्त होतात.
अगदी सोपं उदाहरण म्हणज ’राम’ आणि ’श्रीराम’, या दोन्ही नावामध्ये राम ऐवजी श्रीराम म्हणणे जास्त श्रेयस्कर असते (श्रीराम जय राम जयजय राम). तसेच कृष्ण ऐवजी ’श्रीकृष्ण’ म्हणणे जास्त श्रेयस्कर असते (श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे) इत्यादि.
श्रीहरिगुरुग्राम
चित्तें कारा हरिगुरुचिंतन । श्रवणें करा चरित्रश्रवण ।
मनें करा ध्यानानुसंधान । नामस्मरण जिव्हेनें ॥९५॥
चरणीं हरिगुरुग्रामागमन । घ्राणीं तन्निर्माल्याघ्राणन ।
हस्तीं वंदा तयाचे चरण । डोळां घ्या दर्शन तयाचें ॥९६॥
ऐशा या सकल इंद्रियवृत्ति । तयांकारणें लावितां प्रीति ।
धन्य तया भक्तांची स्थिति । भगवद्भक्ति काय दुजी ॥९७॥
भगवंताची भक्ती करणे म्हणजे नेमके काय हे या अध्याय ३९ मधील ओव्या आपल्याला सांगतात.
मानवाच्या सर्व इंद्रियांद्वारे त्याला जगाचे ज्ञान होत असते. या सर्व इंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. बाहेरील परिस्थितीमुळे या पेशीत वेगवेगळे संदेश निर्माण होतात, जे बुद्धीपर्यंत पोचवले जातात....
आणि म्हणूनच मानवाने त्याच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे, त्या इंद्रियाच्या क्षमतेनुसार आणि कार्यानुसार भगवंताला आठवणे / अधिकाधिक जाणून घेणे हीच भक्ती, असे मला वाटते. हाच तो मन ते बुद्धीचा प्रवास.
ह्या ओव्यामध्येच हरिगुरुग्राम हा शब्द आला आहे. ही अशी जागा / नैमिषारण्य आहे की जिथे बापूंची स्पंदने / प्रेम / सहवास / कृपा अगदी ठासून भरलेली असतात. आपल्या प्रत्येक इंद्रियाने ह्या सर्व गोष्टी स्वीकारण्याची नामी संधी बापूकृपेने आपल्याला प्राप्त झाली आहे.
हरिगुरुग्राम मधे बापू प्रत्यक्ष उपस्थित असतातच. 'बापू' म्हणजेच 'श्री'. म्हणूनच ते श्रीहरिगुरुग्राम.
---------------------------------------------------------------------------------
साईनाथांचे हे वचन मीनावैनींनी आधीच त्यांच्या अभंगात सोपे करून सांगितले आहे...
जे आले ते तरुनी गेले
जे न आले ते तसेच राहिले
अनिरुद्धाचा झाला तो उरला
दुजा दु:खातची रुतला
शिरडी म्हणजेच शैलधी. बुद्धीचे टोक. आपण त्या साईनाथांकडे खेचले जाणे / आपले पाय शिरडीला लागणे हाच तो मन ते बुद्धीचा प्रवास.
शेवटी एवढेच वाटते, आपण स्वत: ठरवले म्हणजे थोडीच आपण शिरडीत जाऊ शकतो? मुळात साईनाथांची इच्छा असते म्हणूनच आपले पाऊल शिरडीत पडू शकते, आणि आपल्या उद्धाराला सुरुवात होते. हेच त्या साईनाथांचे आपल्या आयुष्यात पडलेलं पाऊल. आपण पाऊल टाकणारे कोण? नाही का...
विश्वावरचे पाऊल तुझे
चालतची राही सतत
जिथे ते पडेल तिथे
आनंदवन फुलवत..
---------------------------------------------------------------------------------
'श्री' या शब्दाचा अर्थ

शिरडीस ज्याचे लागतील पाय... टळती अपाय सर्व त्याचे, ... यावर माझे विचार
साईनाथांचे हे वचन मीनावैनींनी आधीच त्यांच्या अभंगात सोपे करून सांगितले आहे...
जे आले ते तरुनी गेले
जे न आले ते तसेच राहिले
अनिरुद्धाचा झाला तो उरला
दुजा दु:खातची रुतला
शिरडी म्हणजेच शैलधी. बुद्धीचे टोक. आपण त्या साईनाथांकडे खेचले जाणे / आपले पाय शिरडीला लागणे हाच तो मन ते बुद्धीचा प्रवास.
शेवटी एवढेच वाटते, आपण स्वत: ठरवले म्हणजे थोडीच आपण शिरडीत जाऊ शकतो? मुळात साईनाथांची इच्छा असते म्हणूनच आपले पाऊल शिरडीत पडू शकते, आणि आपल्या उद्धाराला सुरुवात होते. हेच त्या साईनाथांचे आपल्या आयुष्यात पडलेलं पाऊल. आपण पाऊल टाकणारे कोण? नाही का...
विश्वावरचे पाऊल तुझे
चालतची राही सतत
जिथे ते पडेल तिथे
आनंदवन फुलवत..
---------------------------------------------------------------------------------
नायमात्मा बलहिनेन लभ्य:| अनिरुद्ध एव बलदाता|| या महावाक्याविषयी माझे विचार
आयुष्यात अनेकदा बरेच कठीण प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटते - संपलं सारं... आयुष्याची दिशा, मार्ग हरवतो. मन कमकुवत होते. इथे सांगितलेली बलहीनता केवळ शारिरीक दृष्ट्याच नाही, तर मानसिक दृष्ट्याही आहे.
...आणि म्हणूनच हा अनिरुद्ध मन:सामर्थ्यदाता आहे. जो कमकुवत / बलहीन मनाला बल / सामर्थ्य / आधार देतो.
यातून अजून एक अर्थ माझ्या अल्प बुद्धीला समजतो. आपल्यात जी काही ताकद आहे, ती या अनिरुद्धामुळेच आहे; कारण तोच आपल्या ताकदीचा मूळ स्रोत आहे. (आपण गर्व करणारे कोण?)
एका अभंगात वरील वाक्य आपण आधीच अनुभवले आहे....
पिपा म्हणे माझे
मोडके जीवन (बलहीनता)
तूचि केले बापू
सफळ संपूर्ण (बलदाता)
---------------------------------------------------------------------------------
Aniruddha TV = लेकरांसाठी धावत येणारा माझा बापू
कधी कसा तो कुठूनही
येईलच तो अवचित
वासरांसाठी प्रेमे जशी
धेनु येई हो हंबरीत...
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकालाच एक आधार हवा आहे. आणि तो बापूच. बापूला बघावं, त्याला न्याहाळावं असे आपल्या प्रत्येकालाच वाटत आहे.. आणि येस... बापू अनिरुद्ध टीव्ही च्या माध्यमात सर्वांपर्यंत पोचलाच..
मज न लागे गाडीघोडी ।
विमान अथवा आगिनगाडी ।
हांक मारी जो मज आवडी ।
प्रकटें मी ते घडी अविलंबें ।।
(॥साईचरित्र अध्याय ४०, ओवी ३२॥)
मुळात हा स्वतः:च 'अनिरुद्ध' आहे. ह्याला कोण बरे रोखणार आणि रोखू शकणार! हा प्रेमाखातर धावत येतोच!
तुम्ही कोणी कुठेंही असा ।
भावें मजपुढें पसरितां पसा ।
मी तुमचिया भावासरिसा ।
रात्रंदिसा उभाच ।।
(॥साईचरित्र अध्याय १५, ओवी ६७॥)
बापू आपल्याला प्रत्येक वेळी आधार देत होता, देतोय आणि देतच राहील. आजच्या कोरोना व्हायरस च्या भीतीच्या वातावरणातील आपला आधार म्हणजे ही उपासनाच. हीच आपली लस आणि उपाय.
अनिरुद्ध टीव्ही वरची रोजची उपासना करून मनाला एक प्रकारचा आधार वाटतो, आपला डॅड सतत आपल्या जवळच आहे हा विचार एक वेगळ्याच प्रकारचे सुख देऊन जातो.
बाबांचें ऐका उत्तर ।
‘माझिया प्रवेशा नलगे दार ।
नाहीं मज आकार ना विस्तार ।
वसें निरंतर सर्वत्र ॥१९९॥
(॥साईचरित्र अध्याय २८, ओवी १९९॥)
टाकूनियां मजवरी भार ।
मीनला जो मज साचार ।
तयाचे सर्व शरीरव्यापार ।
मी सूत्रधार चालवीं” ॥२००॥
(॥साईचरित्र अध्याय २८, ओवी २००॥)
आता कशाला चिंता करायची? नाही का?
---------------------------------------------------------------------------------
साईचरित्राचा ११ वा अध्याय आणि आत्ताचं निसर्ग वादळ...
कोरोना चे थोडे झाले की लगेच पुन्हा या निसर्ग नावाच्या वादळाचे थैमान सुरू झाले... साईचरित्राचा अध्याय ११ वा आठवला. या अध्यायात बाबानी कशा प्रकारे शिरडीत आलेल्या अवकाळी वादळाला थांबवले ते आपण वाचतो.
अति भयंकर होता समय । नभ समग्र भरलें तमोमय ।
पशुपक्षियां उद्भवलें भय । झंजा वायु सूटला ॥११५॥
झाला सूर्यास्त सायंकाळ । उठली एकाएकीं वावटळ ।
सुटला वार्याचा सोसाटा प्रबळ । उडाली खळबळ दुर्धर ॥११६॥
त्यांतचि मेघांचा गडगडाट । विद्युल्लतांचा कडकडात ।
वार्याचा भयंकर सोसाट । वर्षाव घनदाट जोराचा ॥११७॥
मेघ वर्षल मुसळधारा । वाजूं लागल्या फटफट गारा ।
ग्रामस्थांसी सुटला भेदरा । गुरांढोरां आकांत ॥११८॥
अशा या वादळाला कोण थोपवून धरणार? उत्तर सांगायला हवे का? ह्या बापूसाईची पंचमहाभूतांवरही सत्ता आहे. ह्याने ठरवले तर वादळच काय, परंतु प्रलय सुद्धा थांबेल.
पाऊस सर्वस्वी नरमला । वाराही मंद वाहूं लागला ।
गडगडाट जागींच जिराला । धीर आला पशुपक्ष्यां ॥१३६॥
एवढी ताकद फक्त त्या साईचीच. आपण फक्त त्या बाबाच्या आणि मोठी आई मशीदमाईच्या आश्रयाला उभे राहूया, त्यांचे चरण घट्ट पकडूया... कारण...
ह्याच्या प्रेमाचा रे पूर बुडत्याला तारण्यास...
हा बापूसाई केवळ बाहेर दिसणारीच नाही, तर मनात असंख्य वादळे असतात, त्यानाही हाच शांत करू शकतो.
तुझे रूप आठवता होई जीवाला शांतता
भीती भविष्याची जाई तुझी भक्ती आचरिता
हा बापूसाई सर्वसमर्थ आहे. ह्याच्याइतका ताकदवान कुणीच नाही. ही गोष्ट आपण मनाशी पक्की केली, की सगळ्या चिंता दूर होतात.
- नंदनसिंह भालवणकर, दादर केंद्र
0 comments:
Post a Comment