General
सकाळची शिवाजी पार्कातील फेरी...
पहाट, सकाळ, मस्त वातावरण, थंडगार वातावरण, कोवळा सूर्यप्रकाश, हिरवेगार झाडी, आणि त्यात मस्त गाणी ऐकत वॉक घ्यायचा, आहाहा.....सुदर वाटतं ना विचार करून ! शिवाजी पार्क मधील अशी सकाळची फेरी घेताना खूपच सुंदर वाटतं.....सगळं कसं अगदी फ्रेश आणि ताजंतवानं वाटतं,....
सुरुवातीला लागतं ते, लहान मुलांसाठी खेळण्यासाठीचं पार्क, नंतर बघायला मिळते ती व्यायामशाळा, नंतर नाना-नानी पार्क, स्काऊट हॉल, उद्यान गणेश, शिवाजी महाराजांचा डौलदार पुतळा, क्रिकेट प्रेमींसाठीचा क्लब, आणि समर्थ व्यायाममंदिर...
खालील फोटो पाहून तुम्हाला याची अगदी कल्पना येईल...
खालील फोटो पाहून तुम्हाला याची अगदी कल्पना येईल...
असाच एक अनुभव सांगतो, एक दिवस अगदी पहाटे उठणं झालं, सूर्यही उगवला नव्हता. हवेत एक वेगळ्याच प्रकारचा गारवा जाणवत होता. थोड्या वेळाने सूर्योदयाला सुरुवात झाली, आता आकाश तांबूस-पिवळे दिसू लागले होते. तेवढ्यात कालीमातेच्या मंदिरात मंगल, पवित्र घंटानाद ऐकू येऊ लागला. तिथे आरती सुरु झाली होती. वा! समोर श्री गणेश, कालीमाता आणि वर आकाशात उगवता सुर्य, मस्त ! अशी ही पहाट अगदी प्रत्येकाने अनुभवावी असे मनापासून वाटते.
0 comments:
Post a Comment