बापू - Related
समिरसिंह दत्तोपाध्ये - इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन..
आज सकाळीच मोबाईल उघडला आणि माझ्या ईमेल मध्ये ’इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन’ असा एक मेल आला होता. पाहाताक्षणीच अतिशय आनंद झाला! मी मराठी शाळेत शिकल्यामुळे मनात लहानपणापासूनच इंग्रजी भाषेची थोडी भितीच बसली होती. आपल्याला अस्खलित इंग्रजी बोलता येईल का असं सतत वाटायचं. तेव्हापासून एक चांगलं इंग्रजी बोलण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पुस्तक शोधत होतो. हल्ली तर इंग्रजी ही जागतीक व्यवहाराची भाषा झाली आहे. त्यामुळे अस्खलित इंग्रजी बोलणे ही काळाची गरज निर्माण आहे. रामराज्याच्या प्रवचनात प. पू. बापूंनी इंग्रजी भाषेचे महत्त्व सांगितलं होतं. तेव्हाच ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अॅण्ड लिंग्विस्टिक्स’ बद्दल कळले आणि खूप मस्त वाटले. स्वत: प. पू. नंदाईने लिहीलेल्या ह्या पुस्तकांचा संच मला वाटतं प्रत्येक जण खरेदी घेऊन त्याची स्वत:ची प्रगती करून अस्खलित इंग्रजी बोलू लागेल! आज दादांची ही पोस्ट पाहून आता मला खात्री झाली आहे की मी एक दिवस नक्की चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकेन. अंबज्ञ!
0 comments:
Post a Comment