तृतीय विश्वयुद्धाची सुरूवात - Starting of Third World War
मला आज माझ्या शाळेच्या वेळेची आठवण झाली. त्यावेळी इतिहाच्या पुस्तकामधे पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाची कहाणी वाचून त्यावर सखोल अभ्यासही केलेला होता. त्यावेळी हे सारं वाचून युद्धाची तीव्रता आणि त्याचे भीषण परिणाम याचा पुसटसा अंदाजही आला होता. पण त्यावेळी तो इतिहास होता. सार्या घडून गेलेल्या गोष्टी होत्या. परिक्षेच्या दृष्टीने आम्ही त्याचा अभ्यास एक गोष्ट म्हणूनच केला होता. पण आता आपल्या बाह्य जगामधे घडणार्या घटनांचा प्रवाह हा शेवटी तिसर्या जागतीक विश्वयुद्धात येऊन सामाविष्ट होणार आहे अशीच सारी चिन्हे दिसत आहेत.
पूर्वी पुस्तकात वाचलेले कथानक आता वास्तवात, आपल्या समोर घडताना बघून विश्वयुद्ध म्हणजे काय याची कल्पना येऊ लागली आहे. दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरूद्ध धैर्यधर जोशी यांनी याच तिसर्या महायुद्धाबद्दल ’तृतीय महायुद्ध’ या त्यांच्या पुस्तकात अगदी सविस्तर मांडलेलेच आहे. कालच वाचनात आले की अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने सिरियावर क्षेपणास्त्रानी हल्ला चढवला. या हल्ल्याचे पडसाद जागतिक पटलावरती उमटायला सुरूवातही झाली आहे. एकीकडे अमेरिका, ब्रिटन,फ्रान्स, इस्त्रायल, जपान, तुर्की तर दुसर्या बाजूला रशिया इराण आणि चीन असे चित्र दिसत आहे. भविष्यामधे या सार्याचे किती भयंकर परिणाम दिसतील हे येणारा काळ सांगेलच, पण तृतीय विश्वयुद्धाची सुरूवात झालेलीच आहे असे वाटते. अशा या जागतीक घडामोडींचे अपडेट्स दैनिक प्रत्यक्ष आम्हा वाचकांना उपलब्ध करून देत आहे याबद्दल दैनिक प्रत्यक्ष चे मनापासून आभार.
0 comments:
Post a Comment