इंटरनेट ‘रहो कनेक्टेड’
॥ हरि ॐ॥
इंटरनेट ‘रहो कनेक्टेड’
इंटरनेट! हा शब्द कुणाला माहित नसेल, तर नवलच! आजकालच्या युगात इटंरनेट म्हणजे एक मूलभूत गरज बनली आहे. पूर्वी शाळेत असताना अन्न, वस्त्र, निवारा या मानवांसाठी असणार्या बेसिक गरजा आहेत, असे शिकवले जाई. आता यामध्ये थोड्याच कालावधीत इंटरनेटचा देखील समावेश झाला, तर काही नवल नाही. आज या जगावर या विस्तृत इंटरनेटचे जाळे पसले आहे. जग अगदी जवळ आले आहे ते का, तर याच इंटरनेटमुळे. आज जगामध्ये अगदी लहानसहान कामांपासून ते मोठमोठ्या उलाढालीमध्ये या इंटरनेटचा महत्त्वाचा वाटा असतो. अगदी प्रत्येक वयोगटाची व्यक्ती आज या इंटरनेटचा दैनंदिन कामांसाठी या इंटरनेटचा उपयोग करून घेताना आपण पाहातो. इतर कशाला, अगदी आपण स्वतःकडे जरी पाहिलं तरी आपल्याला लगेच लक्षात येईल की इंटरनेटविना आपले काय होईल. काही मोबाईलवेड्या व्यक्तींसाठी हे इंटरनेट म्हणजे जगण्याचे रसायनच झाले आहे. तर असे हे इंटरनेट. ज्याने जवळपास अख्खे जग आपल्या खिशात टाकले आहे. परवाचीच गोष्ट! घरी ऑफिसचे काम करीत असतानाच माझ्या वयोवृद्ध आजोबांनी मला विचारलं, ‘काय रे काय करतो आहेस?’ मी सहज म्हणालो, ‘‘हो, ऑफिसचे काम करतो आहे.’’ ‘घरून’? आजोबांचा पुढला प्रश्न. मी म्हणालो, ‘‘हो, इंटरनेट वापरून.’’ त्यानंतर त्यांनी जो प्रश्न मला विचारला, त्याने मी जवळ जवळ निरूत्तरीतच झालो. आजोबांचा प्रश्न होता, ‘इंटरनेट म्हणजे काय रे, मला पण दाखव.’ इंटरनेट. आता कसं काय दाखवणार, ते असतंच. पण ’असं हे इंटरनेट’ असं दाखवता येणार नाही. हा विषय जरी तेवढ्यापुरता असला, तरी या ‘इंटरनेट’ या शब्दाचा खरा अर्थ मला नंतर गवसला. आमच्या उपासना केंद्रावर शनिवारी परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे भक्तांना आलले अनुभव लावले होते. अनुभव सांगणार्या व्यक्तीची एक मौल्यवान वस्तू रस्त्यावर पडून हरवली होती. सहाजिकच त्या व्यक्तीला खूप दुःख झाले होते. तिने बापूंना मनोमन प्रार्थना केली आणि खरच, अगदी सिनेमात घडतं तसं तब्बल एका आठवड्याने त्या व्यक्तीला तिची ती हरवलेली वस्तू अगदी चमत्कारीकरित्या परत मिळाली. इतका रहदारीचा रस्ता, त्यावरून इतके लोक रोजचे ये-जा करत असतात, सफाई कामगार दररोज येऊन केर-कचरा साफ करीत असतात. शिवाय भिकारी, इतर मुलं यांचा रोजचा वावर त्या रस्त्यावर असताना देखिल पूर्णतः चमत्कारिकरित्या अनुभव सांगणार्या व्यक्तीला तब्बल आठवड्याने कचर्यामध्ये तिला तिची मौल्यवान वस्तू फक्त बापूच परत मिळवून देऊ शकतो. आपण विचार केल्यावर कळतं की अनुभव सांगणार्या स्त्री ने विश्वासाने मनापासून केलेली प्रार्थना बापूंनी ऐकली. आणि तिला तिची वस्तू परत मिळवून दिली. इथे तिने आपल्या मनात घातलेली आर्त हाक बापूंपर्यंत कशी पोहोचली? उत्तर एकच. हेच ते इंटरनेट. पण साधेसुधे नाही. तर, देवाचे इंटरनेट! बापूंना, आपल्या सद्गुरुला त्याच्या भक्ताने मारलेली हाक तत्क्षणी ऐकू येतेच. मग अगदी त्या भक्ताने बापूंच्या फोटोसमोर बसून प्रार्थना जरी केली असेल किंवा मनात जरी काही बोलला असेल. कशी जात असले ही हाक. कदाचित, ह्या देवाच्या इटंरनेटमुळे. आपण मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये वाचलेलंच असेल की हे विश्व जेव्हा उत्पन्न झालं, तेव्हा परमात्म्याने या विश्वाची, अनंत ब्रह्मांडांची स्थापना केली. त्यावरील जीवंत सजीव सृष्टीची स्थापना केली. म्हणजेच काय, या सृष्टीत जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचे त्या परमात्म्याशी त्या आदिमाता चण्डिकेशी स्वतंत्र नाते आहे. त्या जीवाची जेव्हा या विश्वात उत्पत्ती झाली, तेव्हाच त्याचे या परमात्म्याशी, त्याच्या आईशी इंटरनेट कनेक्शन जोडले गेले. अगदी आपोआपच. त्या परमात्म्याच्या आपल्यावरील असणार्या असीम प्रेमामुळे. असेच हे इंटरनेट, दिसत नाही. पण सतत जाणवते. पण हे इंटरनेट आपल्यापर्यंत पोचण्यासाठी मिडीयम काय? फक्त विश्वास.
एक विश्वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा॥
देवाची मदत मिळवण्यासाठी, त्याच्या इटंरनेटला आपण कायम जोडलेले राहण्यासाठी फक्त आपला या देवावर असणारा विश्वासच कामी येतो. आपण जेव्हा विश्वासाने, प्रेमाने त्याला हाक मारतो, तेव्हा तो येतोच. वरील अनुभवात त्या व्यक्तीने अगदी प्रेमाने, अगदी विश्वासाने बापूंना मारलेली हाक बापूंपर्यंत पोहोचली आणि तिला प्रचितीसुद्धा आली. हाच तो विश्वास! आपण जेव्हा संकटात असतो, तेव्हा आपली अवस्था खूपच बिकट झालेली असते. ‘मला देव यातून का बाहेर काढत नाही किंवा देवाने यात मला का ढकलले, माझं नशिबच वाईट’ या अशा शब्दात आपण देवाशी बोलत असतो. तो करूणामय परमात्मा आपली ही अवस्था बघून निश्चितच आपल्यापर्यंत मदत धाडण्याचा प्रयास करत असतो; पण आपण आपल्या कुतर्कांनी, वाईट विचारांनी तयाचे हे सहाय्य धुडकावून लावत असतो आणि संकटात अधिकच रूतत जातो. त्यापेक्षा ‘‘माझा देव मला यातून नक्कीच बाहेर काढणार आहे’’ असा विश्वास सर्व संकटांना भारी पडतो. हे श्रीमद्पुरुषार्थ ग‘न्थराजातही नमूद केलेले आहे. इथेही देवाची मदत, त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी विश्वासच कामी येतो. देवाचा भक्त संकटात सापडला आहे आणि देव कधी आला नाही असे होणे नाही. इथे आत्ताच झालेल्या ‘आत्मबल’ समारंभातील दोन ओळी आठवतात.
असो पाप किती किंवा पुण्य गाठी त्याची नाही गणना हो त्याला
ऐकोनि पाझरे त्याचे अंतरंग, प्रेमे साद तपासी हो घाला
मग कसा तो कुठूनही येईलच तो अवचित
वासरांसाठी प्रेमे जशी धेनु येई हो हंबरित.
इथे अजून एक अनुभव आठवतो. पुण्यातील एक बापूभक्त आडवाटेने गाडी चालवत असताना त्याच्या गाडीत बसलेले पिशाच्च परमपूज्य बापू ज्याप्रकारे बाहेर हाकलवून भक्ताचे रक्षण करतात हे हे ऐकून अजूनही अंगावर शहारे येतात. अशा अनपेक्षित भयानक प्रसंगात त्रिपुरारि त्रिविक‘म लॉकेट आणि बापूंना मारलेली कळकळीची हाक बापूंपर्यंत पोहाचली आणि बापूंची लीला त्याच्या मदतीला धावून आली. हेच ते इंटरनेट. भक्ताची हाक आणि परमेश्वराची मदत यांची देवाणघेवाण करण्याचे मिडीयम. ज्यांना इंटरनेटबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याना इटंरनटेची उपयुक्तता, त्याची ताकद याचा नक्कीच अंदाज असतो. आजच्या घडीला इंटरनेटशिवाय जगणं म्हणजे काय याची कल्पनाही कुणाला करवणार नाही. थोडा वेळ जरी इंटरनेट नसलं, की आपला जणू काही जगाशी संबंधच संपला असेच वाटू लागते. बेसिकली इंटरनेट हे आपल्या जगण्याचं रसायन. आपल्या सार्या सामान्य मानवाला आजच्या भीषण कलियुगामध्ये जर तग धरून राहायचे असेल, तर भगवंताचे प्रेमाने घेतलेले नाव, भक्ती आणि सेव ह्याच गोष्टी आपल्याला तारणार आहेत, आपला उद्धार करणार आहेत. आजच्या जमान्यात परमात्मा, बापू आणि त्याचे नामच आपल्या जगण्याचे रसायन आहे. भगवंताच्या नामाशिवाय जगण्याची कल्पनाही करवणार नाही. इथे एका अभंगाच्या ओळी आठवतात.
जशी पेरात हो साखर, तसा देही परमेश्वर
जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी
आपणही बर्याच वेळा अनुभव घेतला असेल, जेव्हा आपल्या मनात नैराश्यजनक विचार येतात, जेव्हा आपल्याला उदास वाटतं, जेव्हा हा आपण दु:खात बुडलेलो असतो, तेव्हा रामनाम वही लिहायला घेतली की एक वेगळ्याच प्रकारचा आधार मिळतो. मनःशांती मिळते. आपण आपल्या दुःखातून बाहेर येतो. हीच ताकद असते परमेश्वराच्या नामाची. त्यातच आपले परमभग्य की आपल्याला सगुण-साकार रूपात बापू बघायला मिळतात त्यांचा शब्द, त्यांचे रूप डोळेभरून साठवता येते. आय.टी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) मध्ये जसे इटंरनेट, तसं जीवनामधे बापूनाम. त्यामुळेच आपल्याला अर्थ आहे. जगामध्ये ज्याप्रमाणे इटंरनेट शिवाय हाऽहाकार माजेल, त्याप्रमाणे भगवंताच्या नामाशिवाय जगणे म्हणजे रसाशिवाय जीवन. आजच्या कठीण काळामध्ये परमेश्वराचे नामस्मरण जितके म्हणून करता येईल तितके आपण केले पाहिजे. त्यानेच आपले कल्याण होणार आहे. नामाची ताकद अफाट आहे. वाल्या कोळीचा झालेला वाल्मिकी याचीच साक्ष देतो.
मरा मरा उलटे म्हणता
राम प्रगटला जिव्हेवरचा
जन्माआधीच अवतार चरिता
जाहला लिहिता रामाची
असे हे भगवंताचे नामरूपी रसायन आपण सर्वांनीच प्राशन केले पाहिजे. आपण बर्याच वेळा ऐकलं असेल इंटरनेटचे जाळे सार्या जगावर पसरलेलं आहे. जगातील एका कोपर्यावर असेला मनुष्य दुसर्या कोपर्यात असणार्या मनुष्याशी अगदी विनाकष्ट संवाद साधू शकतो. कशामुळे, तर या इंटरनेटमुळे. असाच जेव्हा कुणी बापूभक्त त्याच्या तारणहार बापूला अगदी मनापासून हाक मारतो तेव्हा बापू येतोच आणि त्या भक्ताला संकटातून बाहेर काढतोच. अगदी बापूंनी स्वतः ग्वाही दिलेली आहे. तुम्ही साता समुद्रापार जगाच्या कुठल्याही कोपर्यात असा, तो कृपाळू परमेश्वर त्याच्या भक्ताला वाचवायला आणि त्याचे संकटापासून संरक्षण करायला येतोच. अशा वेळेस भक्ताने मारलेली हाक मग ती अगदी क्षीण का असेना किंवा अगदी मनातही तो बोललेला का असेना त्याच्या बापापर्यंत ती कुठल्याही मिडीयाशिवाय पोहोचते. मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये आपल्या मोठ्या आईच्या शंखाचे वर्णन केले आहे. भक्तांनी घातलेल्या हाकेचा अगदी सूक्ष्म आवाजही टिपतो. त्यावेळेस अशा भक्ताला कुठल्याही माध्यमाची आवश्यकता नसते. हवे असते ते फक्त प्रेम आणि विश्वास. असे हे देवाचे इंटरनेट. त्याचे जाळे अगदी चराचरात पसरलेले असते. आपला जितका जास्त विश्वास, भाव, तितकेते देवाचे इंटरनेट जास्त घट्ट होत जाते. आणि म्हणूनच देव आपल्या भक्तासाठी अगदी कुठेही पोहचू शकतो. कधी कधी वाटते की देवाने संपूर्ण चराचरात एक असे वाय-फाय नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे की ज्याला पासवर्ड असेल प्रेमाचा, ज्याची रेंज असेल भक्तीची आणि ज्याची कनेक्टिव्हीटी स्ट्राँग होईल देवावरील विश्वासाने. हे वायफाय अगदी मोफत उपलब्ध असते. जो त्याचा उपयोग करतो, तो तरून जातो आणि ज्याला माहिती असूनही त्याचा वापर करीत नाही, तो खरोखरच अभागी. अगदी ज्याला हवे तयाने या वायफायशी कनेक्ट व्हावे आणि या मस्त दुनियेत स्वतःला झोकून द्यावे. भौतिक जगामधील इंटरनेट, वायफायची उपयुक्तता आणि महत्त्व सार्यांनाच ठाऊक आहे. कधी कधी या इटंरनेटवर आपण इतके dependent असतो की त्यावाचून आपले कामच थांबून राहते. आपल्यापैकी अनेक जणांनी यचा अनुभव घेतला असेल. इंटरनेट न मिळणे हा प्रकार पुष्कळ ऑफिसेसमधे कॉमन झाला आहे. असे हे भौतिक जगाचे इंटरनेट. कायम ऑन. आपल्याला हवे तेव्हा आपण कनेक्ट होऊन अगदी मोकळेपणाने देवाशी संवाद साधू शकतो. दर गुरुवारी आणि उपासनेच्या ठिकाणी होणारा ‘श्रीस्वस्तिक्षेम संवादम्’ हे इंटरनेटचे उत्तम उदाहरण. हा संवाद म्हणजे जणू काही प्रत्यक्ष चण्डिकाकुलाशी आपण केलेले video conferencing च. नाही का? याशिवाय अगदी रोजच्या लाईफमध्येसुद्धा आपल्याला इतके अनुभव येतात, की काय बोलावे. सकाळी बापूंच्या फोटोसमोर किंवा अगदी मनात प्रकट झालेली इच्छा आपण बोलून दाखवतो आणि संध्याकाळपर्यंत ती पूर्णही झालेली असते. हेच ते बापूंचे आपल्यावर असणारे प्रेम. या इंटरनेटमुळे एक गोष्ट नक्की. आपल्याला बापूंशी काही बोलायचे असेल, तर अगदी प्रत्यक्ष बापू समोर असण्याची आवश्यकता नसते. अगदी आपण मनातूनही त्यांच्याशी संवाद साधू शकतो. मी मुंबईत राहतो, त्यामुळे गुरुवार किंवा इतर उत्सवांमध्ये सहभागी होण्याची, बापूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते. पण मुंबईबाहेरील श्रद्धावान दैनंदिन कामामुळे ते करू शकत नाहीत. अशा वेळेसअनिरुद्ध टीव्ही (http://www.aniruddha.tv) या वेबसाईटवरून दरगुरुवारचे थेट प्रक्षेपण घरबसल्या इंटरनेटच्या सहाय्याने ते पाहू शकतात. गुरुवारचे बापूंचे दर्शन, गजर अनुभवू शकतात. या शिवाय सोशल मिडिया, ब्लॉग, इतर वेबसाईटस् यांवरसुद्धा ते अपडेट्स पाहू शकतात. अशाप्रकारे भौतिक जीवनातील इंटरनेटमुळेसुद्धा आपण बापूंशी, त्यांच्या कार्याशी कनेक्टेड राहू शकतो. आपल्यापैकी अनेक जणांनी इंटरनेटचा स्पीड खूपच कमी येतोय ही तक्रार केली असेल. त्यामुळे बर्याच वेबसाईट लोड होताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि इंटरनेट पाहण्याची मजा निघून जाऊ शकते. पण देवाचे इंटरनेट, अगदी झटपट, अगदी अॅक्युरेट! कोणत्या भक्ताला कधी काय हवे आहे हे परफेक्ट ठाऊक असते त्याला आपल्यावर होणारा कृपेचा वर्षाव हे या इंटरनेटद्वारेच आपल्याला प्राप्त होतो, नाही का? आणि या देवाच्या इंटरनेट स्पीडविषयी न बोललेलंच बरं. या स्पीडला मोजणारं परिमाणच अस्तित्त्वात यायचं असेल अजून! तर असे हे असते देवाचे आगळे-वेगळे इंटरनेट. अगदी अतर्क्य आणि अद्भुत. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. देवाने, त्याच्या लाडक्या भक्तांसाठी हे अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. हे वापरून आपण आपला उद्धार केला पाहिजे. आणि तयाचे बोट धरून चालले पाहिजे. काय मग, राहायचंय ना कनेक्टेड या देवाच्या नेटशी?
॥ हरि ॐ॥
0 comments:
Post a Comment