Aniruddha Bapu experience

08:01:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 *हरि ॐ आई!*


५ आणि ६ नोव्हेंबर हे दोन दिवस सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहेत आणि त्यामुळेच हे दोन दिवस प्रत्येकीच्या आयुष्यात अविस्मरणीय झाले आहेत.

या दोन दिवसांच्या आत्मबल महोत्सवासाठी आईने घेतलेली अथक मेहनत आठवते.  

बायका एकत्र नांदू शकत नाहीत हे वाक्य नंदाईच्या कृपेने सर्वानी खोटे करुन दाखविले.  एक दोन नाही तर तब्बल १५०० बायका चक्क सहा महिने एकत्र नांदल्या आणि इतिहास घडला!

आईने प्रत्येकीला तिच्यातील ती ला भेटविले जी लपून बसली होती.   माझ्याकडे काय आहे व मी काय करु शकते हे आईच जाणू शकते.  त्याप्रमाणे ती संधी देऊन बदल घडविते. *तोच आत्मबल ते आत्मबदल* 

आत्मबल महोत्सवाच्या सरावा दरम्यान एक दिवस आईला यायला खूप उशीर झाला.  आई आल्यानंतर अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाच्या साथीला कडाडणा-या वीजाही होत्याच.  घड्याळात नऊ वाजले होते.  प्रत्येकीला घरी जायची घाई होती.  पण आईने बोलायला सुरूवात केली आणि बोलतच राहिली.  घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता.  त्यादिवशी आईने सर्व जणींची चांगलीच कानउघाडणी केली.  टिचर ताया आलेल्या नसल्या आणि तुमचा पूर्ण ग्रुप आलेला असला तर स्वत:च्या स्वत: सराव करा.  वेळ फुकट घालवू नका.  आई बरेच बोलली.  बाहेर पाऊस, वीजा आणि आतमध्ये शब्दांचा पाऊस आणि आईच्या प्रत्येक शब्दागणिक तिच्या प्रत्येक लेकीच्या मनात पडणारा विजेचा प्रकाश!  खूप उशीर झाला होता.  आईच्या लेकी लांब लांब रहाणा-या होत्या.

*श्रीहरिगुरुग्राम येथून निघायला प्रत्येकीला १०:३० ते १०:४५ वाजले.  कुर्ला स्टेशनला जायला रिक्षा लगेच मिळाली. कुर्ला स्टेशनला पोहोचलो तेव्हा कळले जेवढा वेळ आई बोलत होती तेवढा वेळ पावसाचे पाणी भरल्यामुळे  ट्रेन बंद होत्या.  त्यावेळी आमच्या डोळ्यात पाणीच आले.  हे ही लक्षात आले की आई जे बोलली ते आपल्याला नव्हते तर त्या पावसाला होते.  आई लाडक्या लेकींवर कधी रागवेल का?  कधीच नाही.  खरच आई बापू मामा आपली सतत काळजी वहात असतात.  आपल्याला त्रास होऊ नये म्हणून झटत असतात.*

आईची बोलायची एक वेगळी स्टाईल आहे.  माझ्या लेकी आता एवढ्या चपळ झाल्या आहेत की दोन मिनीटात त्या इंग्रजीच्या वर्गात जातील. मग काय!  सगळयाजणी पटापट ऊठून इंग्रजीच्या वर्गात जायच्या देखील!  

आईचे दत्तबाप्पा, मोठी आई म्हणणे एवढे प्रेमळ असायचे की अजूनही माझ्या कानात तो आवाज मी आठवण काढताच  गुंजतो.  *I am proud mother but at Her Lotus Feet* हे वाक्य पण ऐकायला खूप भारी वाटे.  

आठवणी त्या आठवायच्या ज्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.  आत्मबल महोत्सवाच्या स्मृतींचा गंध तर आईच्या प्रत्येक लेकीच्या मनात कायम दरवळतोय.

आई आपली लवकरच भेट होवो हिच आजी व बाबांच्या चरणी अनंत कोटी नमस्कारसहीत विनम्र प्रार्थना!

कासवी आपल्या पिल्लांचे पैलतीरी राहूनही भरणपोषण करते तसेच तुम्ही आम्हांला या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सांभाळत आहात. आई तुझी कृपा आम्हां सर्व जणींवर अशीच कायम राहो.

*श्रीराम ! अंबज्ञ! नाथसंविध्!*
✒️ चित्रावीरा चाबुकस्वार 
      आत्मबल १३ वे पुष्प
      ०५/११/२०२१

You Might Also Like

0 comments: