शिवाजी पार्क - सकाळी ६:३० वाजता .....

23:16:00 Nandan Bhalwankar 0 Comments

आज बर्‍याच दिवसांनी भल्या पहाटे (सकाळी ६:३० वाजता) शिवाजी पार्क, दादर येथे जाणे झाले. आधीच कडाक्याची थंडी, मस्त आल्हाददायी वातावरण, नुकतच उगवलेलं सकाळचं कोवळं उन या सगळ्या निसर्गाच्या मिलाफामुळे एक जबरदस्त पॉझिटीव्हीटी जाणवली.... खूपच फ्रेश वाटलं. सकाळी मॉर्निंग वॉक घ्यायला डॉक्टर का सांगत असतात हे मला आज कळलं. सकाळी उगवणार्‍या त्या सोन्याच्या गोळ्याची लाली, ते कोवळं उन, त्याची गंमत ही न्यारीच. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू (Sadguru Shree Aniruddha Bapu) यांनीही त्यांच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे प्रभातसमयी उगवणार्‍या किरणांच्या उषेमध्ये अश्विनीकुमारांचे वास्तव्य असते. हे अश्विनीकुमार आपल्याला उत्तम आरोग्य प्रदान करतात आणि व्याधी नाहीशा करतात. अशा समयी त्या सूर्यनारायणाकडे पाहून, त्याला वंदून श्री गुरुक्षेत्रम्‌ मंत्र (Shree Gurukshetram Mantra) म्हणण्याचे सुख हे अवर्णनीय असते! त्यातच सोने पे सुहागा म्हणजे आज पद्मश्री वसंतराव देशपांडे यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्क येथे एक संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळच्या सुंदर वेळी त्या श्रवणीय भावगीतांनी चार चाँद लावले. अशी ही उत्तम पहाटेची वेळ कुणीही चुकवू नये असे मनापासून वाटते....







You Might Also Like

0 comments: