General

३१ डिसेंबरचे वेध....

02:43:00 Nandan Bhalwankar 1 Comments


डिसेंबरची सुरुवात झाल्याझाल्याच आपल्याला वेध लागतात, ते नववर्षाच्या आगमनाचे. "एक वर्ष केती झरकन निघून गेले नाही..." असे बहुदा आपल्यातील प्रत्येक जण म्हणत असतो. सरत्या वर्षामध्ये आपण काय काय केले, याची उजळणी, आठवण करत हा डिसेंबर महिनाही निघून जातो. अगदी नाताळ पासूनच न्यू इयर सेलिब्रेशनला सुरुवात होते, डिसेंबचा शेवटचा आठवडा आपण संपूर्ण मस्ती, धमाल, पार्टीज, मजा घेत असतो. नव्या वर्षाचे नवे संकल्प केले जातात, आणि नव्या फ्रेश आठवणींच्या आधारे नव्या वर्षाची सुरुवात होते. सगळीकडे रोषणाई, मस्त हसतं-खेळतं वातावरण, खाद्यपदार्थ, किती मस्त वाटतं नाही!

ह्या सर्वात आपल्या बापू (Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi) भक्तांसाठी तर पर्वणीच मिळालेली आहे. मात्रृवात्सल्य उपनिषद आपल्याला बापूंमुळे उपलब्ध झाले आहे (http://samirsinh-dattopadhye.blogspot.in/2012/12/the-matruvatsalya-upanishad-most-sacred.html). २०१३ सालाच्या सुरुवातीला बापूंनी हे अत्यंत सुंदर असं गिफ्ट दिलं आहे. ’प्रत्यक्ष’ मधील अग्रलेखांची मालिका, त्यामधील पार्वती-शिव यांचे विवाहाचे वर्णन, चण्डिका श्रीविद्या, माता शिवगंगागौरी यांचे विवाहसोहोळ्यादरम्यानचे वर्णन, त्याचबरोबर गुरुवारी बापूंनी केलेले प्रवचन यासगळ्याबरोबरच चण्डिका श्रीविद्या, माता शिवगंगागौरी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झालेले श्री मात्रृवात्सल्य उपनिषद, सगळं काही विचार करण्यापलिकडेच आहे. बापू आपल्याला इतकं देत आहेत ना, खरच श्रीराम!

आता सन २०१३ ला सुरुवात होत आहे. ह्यावर्षीचा दैनिक प्रत्यक्ष मध्ये प्रसिद्ध झालेला - ’आरंभ नव्या सहस्त्रकाचा’ (http://samirsinh-dattopadhye.blogspot.in/2012/12/the-beginning-of-new-millennium.html) ह्या विशेषांकात गेल्या बारा वर्षांमध्ये जगात काय काय बदल झाले आहेत, याचे वर्णन व विश्लेषण केले आहे. बापूंनीही प्रवचनात सांगितल्याप्रमाणे कठीण काळाला सुरुवात होत आहे, पण आपल्याला काळजी करण्याचे काहीच कारण नाही, मोठी आई, बापू, आई, दादा आपल्या पाठी उभेच आहेत, सदैव...

सो, Happy New Year to all my friends....May Bapu Aai Dada bless you !!!

You Might Also Like

1 comments:

Anonymous said...

whoah this blog is fantastic i really like studying your posts.
Stay up the great work! You understand, a lot of individuals are looking
around for this info, you could help them greatly.