प्लेझंट सरप्राईज ...
प्लेझंट सरप्राईज ...
गुरुवार, आपला श्री हरिगुरुग्रामला जायचा वार. ऑनलाईन उपासना सुरू होती. नेहेमीप्रमाणे आरती साईबाबा झाल्यावर दर्शन सुरू होणार असे वाटले. कारण तसेच नॉर्मल रूटीन गेले कित्येक महिने आपण सारेच अनुभवत होतो.
पण .... अचानक कानावर "आय लव्ह यू माय डॅड" ची धून वाजली आणि अंगावर अक्षरश: रोमांच आले.. एकदम सारे वातावरण पालटले. नंतरची प्रदक्षिणा म्हणजे "सोने पे सुहागा" च ! आज साईचरित्रातील अध्याय २ आठवला.
कधींऐकिलीनाहींदेखिली।
मूर्तिपाहूनिद्दष्टिनिवाली।
तहानभूकसारीहरपली।
तटस्थठेलींइंद्रियें॥१३९॥
साईदर्शनलाभघडला।
माझियामनींचाविकल्पझडला।
वरीसाईसमागमघडला।
परमप्रकटलाआनंद॥१४४॥
खरोखर आज मला जाणवलं, हेमाडपंतांनी जेव्हा साईनाथांना पाहिलं असेल तेव्हा त्यांना काय झालं असेल ! खूपच छान अनुभव होता तो !
इस बगिया का हर फूल खिला
अनिरुद्ध तेरे आने से ....
- नंदनसिंह भालवणकर,
दादर उपासना केंद्र
0 comments:
Post a Comment