नेवेद्य खरोखरच देव खातो का ? .... याविषयी माझे विचार
हा भगवंत एखाद्याचा जसा भाव तसा त्याला पावतो.
जर आपल्याला वाटत असेल की "ही नुसती भगवंताची मूर्ती आहे, ह्यात थोडीच देव राहातो?", तर देव त्यासाठी त्या मूर्तीत कसा बरे असू शकेल? त्याचप्रमाणे जर एखाद्याने "ही नुसती मूर्ती नसून हा प्रत्यक्ष देवच आहे" या भावनेने आपण नैवेद्य अर्पण करत असू तर त्या क्षणी देव तिथे त्या मूर्तीत प्रत्यक्ष येतोच येतो.
वरील उदाहरणाप्रमाणेच "हा नैवेद्य देव कसा काय खाईल?" असा मनात विचार आला म्हणजेच आपण समजून जावे की "हा देव नसून ही केवळ देवाची मूर्ती आहे" असाच आपला भाव आहे, आणि देव त्यानुसारच फळ देणार. याउलट "देवा मी प्रेमाने तुला मनापासून हा नैवेद्य अर्पण करतोय, पोटभर खा हा ..." असा जर भाव असेल, तर देव तो नैवेद्य संपवतोच आणि तो प्रसन्न होऊन त्याला तृप्तीचा ढेकर येतोच.
मग कुणी बुद्धीभेद करणारा म्हणेल की बघा, दाखवलेला नैवेद्य तर आहे तसाच आहे, कुठे संपलाय ? पण हा नैवेद्य म्हणून काय खातो, हे आपण लक्षात घेतले तर साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
हा भक्तीचा भुकेला
ह्याला नैवेद्य प्रेमाचा...
नैवेद्य अर्पण करताना ज्या भक्तीभावाने आणि प्रेमाने त्या देवाला आळवतो आणि आठवतो तो भाव आणि प्रेमच हा देव ग्रहण करतो.
एखादवेळी हा देव अगदी त्या व्यक्तीने देवाला अर्पण केलेले नैवेद्याचे ताट संपूर्ण ग्रहण करून, किंवा थोडे खाऊन एक सुंदर अनुभवही देऊ शकेल. बाकीचे लोक ह्याला चमत्कार म्हणू शकतील, पण ही प्रेमाची जादू आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे.
बापू कुबेर प्रीतीचा...
हा भक्तिप्रेमाचा आणि भावाचाच हावरा आहे. एवढे जरी कळले तरी सगळ्या प्रश्नांची आणि चमत्कारांची उत्तरे मिळतात.
0 comments:
Post a Comment