संत जनाबाई

11:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments

संत  जनाबाई  निधन  (१५ मे ,१३५०) 


गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका शूद्र  जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.

अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. 
नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. 

वारकरी सांप्रदायामध्ये संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या .त्यांनी जवळपास ३५० रचना केल्या त्या पैकी काही नामदेवांच्या समजल्या जातात.त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असुदे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्माला आलेल्या जीवाला पांडुरंगाची व संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे.

जनाबाईने लिहिलेल्या अभंगांपैकी काही अभंग सोबत दिले आहेत. जनाबाई थोरच आणि ते  गाऊन त्यांना  चिरंतन करणारे गायक / गायिका देखील तेव्हडेच तोलामोलाचे .
भारतरत्न पं.भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी,किशोरी आमोणकर,आशा  भोसले,अनुराधा  पौडवाल यांनी संत जनाबाईंचे  अभंग  गाऊन ते चिरंजीव केले गायलेल्या अभंगांपैकी  थोडे सोबत देतो आहे.
१) संत भार पंढरीत 
२) दळीता कांडिता   
३) ज्याचा सखा हरी 
४) जनी म्हणे पांडुरंगा  
५) धरिला पंढरीचा चोर  .

वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेल्या संत परंपरेतील थोर जनाबाईंना विनम्र अभिवादन.

प्रसाद जोग.सांगली.

You Might Also Like

0 comments: