प्रत्यक्षचा न्यू इयर विशेषांक - पंढरपूर भावयात्रा !
दिनांक १ जानेवारी २०१६. नवीन वर्षाचा पहिलावहिला दिवस. या सुंदर दिवशी सकाळी उठल्यावरच पाहिला तो म्हणजे आपल्या दैनिक प्रत्यक्षचा न्यू इयर विशेषांक - पंढरपूर भावयात्रा ! २००१ साली झालेल्या या भावयात्रेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी मला मिळाली होती. त्यामुळे या विशेषांकातील लेख वाचायची खूप उत्सुकता होती.
सुरूवातीलाच अत्यंत सुंदर शब्दांत वर्णिलेले योगिंद्रसिह जोशींचे आर्टिकल मनाला स्पर्षून गेले. त्यानंतर त्या ’मंतरलेल्या’ ४ दिवसांच्या भावयात्रेत झालेल्या वेगवेगळ्या इव्हेंटस्ची अत्यंत सुंदर शब्दांत माहिती बाकीच्या लेखात वाचायला मिळाली. मला अजूनही आठवते ते म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर खेळण्यात आलेला दांडिया... त्याची आठवण अजूनही मनांत ताजी आहे. दोन दिवसांपूर्वी कोरडी ठणठणीत असलेली चंद्रभागा त्यादिवशी अचानक भरून वाहायला लागली होती ! ते सुद्धा ऐन मे महिन्यामधे ! त्यानंतर कालियामर्दनाचा सोहोळा, त्यापाठोपाठ झालेली हंडी अजूनही लक्षात राहिली आहे. सत्संगातील ’या विश्वाच्या भाग्याकरीता अनिरूद्ध आला’ हे गाणं अजूनही कानांत गुंजत आहे.
ही भावयात्रा झाली तेव्हा मी खूप लहान होतो, तिथल्या सगळ्या जीवंत आठवणी मी प्रत्यक्षपणे अनुभवूनही त्यातील काही आठवणींवर माझ्या मनामधे काळाचा पडदा पडला होता. पण या प्रत्यक्षच्या न्यू इयर विशेषांकामुळे या सर्व आठवणींचा सागर मनामधे खवळला आणि त्यातील एकेका आनंदाच्या लाटेवर मी स्वार झालो. हा सारा मौल्यवान आठवणींचा खजिना प्रत्यक्षमुळे आमच्यासारख्या वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रत्यक्षला मनापासून अंबज्ञ !
#pandharpur #bhavayatra #pandharpur bhavayatra #Aniruddha Bapu #Aniruddha #Bapu
#pandharpur #bhavayatra #pandharpur bhavayatra #Aniruddha Bapu #Aniruddha #Bapu
0 comments:
Post a Comment