हे एक गिफ्ट 🎁 आहे आनंदी आणि सकारात्मक संकल्पांचं.ईतरांनाही द्या

07:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 1)सकाळी उठल्यावर काही मिनिटं स्वतःसोबत घालवेन.(Me time)


⚘2)मी नियमित वेळेत पाणी पिण्याची शिस्त पाळेन.


⚘3)दिवसातला थोडा वेळ निसर्गाच्या सहवासात घालवेन.फुलं,पक्षी,कोवळा सूर्यप्रकाश,हिरवी झाडं,मोकळा वारा यांच्यासोबत काही मिनिटं घालवेन.


⚘4)कामाच्या व्यस्ततेतही प्रत्येक तासाला थोडं स्ट्रेचिंग करुन शरीराची लवचिकता वाढवेन.


⚘5)पौष्टिक आहारासाठी नवनविन रेसिपी शोधून स्वतःची हेल्दी रेसीपीज ची एक वही तयार करेन आहाराचा दर्जा आणखी चांगला करेन.


⚘6)रोज काही मिनिटं सेल्फ हेल्प स्वमदत पुस्तक वाचेन.


⚘7)रोज थोडं चालेन,जीने असतील तर पाय-यांवर चालेन,लिफ्टचा वापर कमी करेन.


⚘8)रोज एकदातरी खळखळून हसण्याचं निमित्त शोधेन.


⚘9)रोज आवडती उत्साह आनंद देणारी गाणी/वाद्य संगीत नक्की ऐकेन,त्यासाठी वेळ काढेन.


⚘10)नियमित लेखन करेन(चार ओळी सुध्दा चालतील)भावना,विचार,अनुभव लिहून काढेन.


⚘11)कामं करताना एक तासानं ब्रेक घेईन,दीर्घ श्वास घेत थोडी क्षणभर विश्रांती घेऊन परत कामाला लागेन.


⚘12)मित्रमैत्रिणींसाठी Friends  आठवड्यातला/महिन्यातला ठराविक वेळ राखून ठेवेन आणि प्रत्यक्ष नक्की भेटेन.


⚘13)घरातल्या लहान मुलांचं ऐकण्यासाठी वेळ आणि कान देईन,त्या वेळात सूचना सल्ले न देता फक्त ऐकेन.


⚘14)नको त्या वस्तू/अडगळ वेळोवेळी दूर करेन,नकारात्मकता साठवून ठेवणार नाही.


⚘15)दिवसभर उत्साही रहाण्यासाठी छान पोशाख करेन,फ्रेश रहाण्याच्या टिप्स शोधेन आणि प्रयत्न करेन.


⚘16)आनंदी रहाण्याची सवय लावून घेईन,नकारात्मक चर्चेत,गाॅसिपमधे सहभागी होणार नाही.


⚘17)नियमित काहीतरी नविन शिकण्याचा प्रयत्न करेन,सराव करेन त्यात पारंगतही होईन. 


⚘18)तक्रार करणं,दोष देणं,चुका शोधणं,जज करणं सोडून गुणांचं कौतुक करेन,चांगलं शोधण्याचा प्रयत्न करेन.


⚘19)दररोज उद्याच्या तयारीसाठी वेळ काढून सज्ज होईन,ऐनवेळची गडबड आणि ताण टाळून कामं करेन.


⚘20)रोज कृतज्ञता व्यक्त करेन,जे आहे त्याला धन्यवाद देईन.


⚘21)भरपूर पुरेशी झोप आणि विश्रांती कोणताही अपराधीभाव मनात न ठेवता घेईन.


⚘22)सकाळी आणि रात्री झोपताना स्वतःला सकारात्मक सूचना affirmations देईन.

©कांचन दीक्षित

You Might Also Like

0 comments: