अनिरुद्ध असता पाठी
अनिरुद्ध असता पाठी,
खुले आम्हा मैदान
डाळींबाचे दाणे भरवी,
नसे कुठले बंधन
उघडे आम्हा हे मळे कर्माचे
सेवा रूप धाक असो
क्षणभर पिंजऱ्यात राहुन
भोगु भोग प्रारब्ध आमचे
आतही दाणे ,बाहेरही दाणे
आमच्या नशिबी पिंजरा नसे
हे फक्त बापुच जाणे
कसे होते कर्म माझे
फळ मात्र तोच देतो
सोलून डाळींब मला
बापुच माझा मला भरवितो
त्याचेच सारे कष्ट...
त्याचीच ही इच्छा...
कृपे अनिरुद्ध...
डाळिंब खातों...
आशिष फक्त बापुंचा....
श्रीराम
अंबज्ञ
आशिषसिंह देशपांडे
वाळुज उपासना केंद्र
0 comments:
Post a Comment