स्वामी कथा

07:43:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 || स्वामी लीला ||


अक्कलकोट मध्ये स्वामींलीला सुरू होत्या... असंख्य लीलांचे अभिव्यक्ती होत होती.. अनेक पात्र स्वामींच्या दरबारात होते.. प्रत्येक पात्राचे एक विशिष्ट प्रयोजन होते.. ह्यात आपण कसे जीवन घडवावे आणि कसे असू नये ह्याचे स्पष्ट मार्गदर्शन दडलेले होते.. ह्यातील एक पात्र म्हणजे सुंदराबाई... सुंदरबाई ही स्वामी चरित्र मधील एक असे पात्र की जे आपल्या मनातील नकारात्मक.. गोष्टींचे प्रतिनिधित्व करत होती.. सुंदराबाईचा स्वभाव हा चिडखोर.. लोभी होता.. स्वामींना जो कोणी दक्षिना देई.. प्रसाद देई.. त्या सर्व गोष्टी सुंदराबाई लंपास करत.. जर कोणी भाविक आला तर त्याच्या समोर केविलवाणा चेहरा करत.. आणि त्याच्याकडून पैसे घेत.. कपडे घेत.. असे तिचे प्रकार सुरू होते.. ह्यातूनच तेथील सेवक-यांना विनाकारण त्रास देने.. अपमानित करणे.. असे प्रकार सुरु होते.. आता सुंदरबाईचे अतीच होत होते.. आणि म्हणून अनेक सेवेक-यांनी मामलेदार.. कारभारी ह्यांच्याकडे अनेक तक्रारी अर्ज केले होते... परंतु राणीसाहेब आणि सुंदराबाई ह्यांचे चांगले संबंध असल्याने.. सुंदराबाईवर कारवाई करण्याचे कोणाचेच धाडस होत नव्हते.. परंतु ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ हा स्वामी नियम आहे.. आणि ह्या नियमाप्रमाणे सुंदराबाईच्या चुकीच्या.. लोभी कर्माचे फळ परिपक्व होत होते.. आणि स्वामी महाराज सुंदराबाईस सतत संकेत देत होते.. जसे एके दिवशी सुंदराबाई खारका वाटत होती.. तेव्हा स्वामी बोलले “अग.. खारका वाटू नको बरे.. पुढे लींब्याकडून मागून घ्याव्या लागतील..” परंतु बाईस स्वामींचे संकेत काही समजत नव्हते.. ह्यासह असेच एके दिवशी बावडेकर पुराणिकांनी एक जरी काठी छाटी आणली होती.. ती रंगवून स्वामींच्या अंगावर घालण्यासाठी सुंदराबाईकडे दिली.. आणि सुंदरबाईने स्वामींच्या अंगावर घातली असता.. स्वामींनी परत तिच्या अंगावर टाकली.. तेव्हा बाईने पुन्हा महाराजांना घातली.. तेव्हा स्वामींनी पुन्हा तिच्या अंगावर टाकली आणि बोलले “अगं.. पुढे छाटी मिळायची नाही.. आताच पांघरून घे..!! ” खरतर स्वामी तिला स्पष्ट संकेत देत होते.. जर कोणी फळ फळफळाव आणला तर स्वामी तिला बोलत.. “ अगं.. खाऊन घे... तुला पुन्हा खायला भेटणार नाही..!! ”. असेच एकदा राणीसाहेब स्वामींच्या दर्शनाला आल्या असता... स्वामी त्यांना बोलले..“ आज पर्यंत सुंदराबाईस आम्ही सांभाळले.. आता या पुढे तुम्ही सांभाळा !! ” त्यावर राणी साहेबांनी “ ठीक आहे स्वामी.. आम्ही सांभाळतो ” असे उत्तर दिले.. परंतु राणीसाहेबास ह्याचा अर्थ समजला नाही.. असो. थोडक्यात सुंदराबाईस स्वामी महाराज सतत संकेत देत होते.. परंतु अहंकाराने सुंदराबाईची भावनिक संवेदना नाहीश्या झाल्या.. तिचे डोळे लोभाने आंधळे झालेले.. कान तिरस्काराने बहिरे झालेले.. असल्याने स्वामींचे संकेत तिला काहीच समजत नव्हते.. आणि म्हणूनच तिचा स्वामींच्या दरबारात भक्त मंडळींना तापदायक ठरणारा प्रकार सुरूच होता.. स्वामी भक्त हो !! कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते असे म्हणतात.. आणि ती वेळ आली.. तेथील तेथील सेवेक-यांनी आता थेट कलेक्टरांना तक्रार केली.. आणि कलेक्टरसाहेबांचा श्री नानासाहेब बर्वे कारभारी ह्यांस बाईला काढून टाकून.. तिच्या खोलीची जप्ती करण्याचा थेट हुकूम आला.. परंतु बाई स्वामींच्या दरबारातील अतिशय जेष्ठ आहे.. तिच्यावर कारवाई केल्यास स्वामींचा कोप होईल.. आणि जर कारवाई न करावी तर इकडनं कलेक्टर साहेबांचा हुकुम आलेला आहे.. आणि ह्या संभ्रमात त्यांचे सात-आठ दिवस गेले.. आणि ह्याच संभ्रमित मनस्थित असतांना एके दिवशी बर्वे कारभारी स्वामींच्या दर्शनाला आले.. स्वामींचे दर्शन घेऊ लागले.. तेव्हा स्वामीनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले " काय रे.. असाच हुकुम बजावातोस का ?" स्वामींनी असे बोलताच नानासाहेब बर्वे कारभारी ह्यांस.. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला.. आणि त्यांस जरा धीर आला.. पुढे दुसरेच दिवशी बर्वे ह्यांनी फौजदारा बोलावून बाईस दूर करावे असा हुकुम दिला.. आणि ते चार शिपाई सोबत घेवून सुंदरबाईकडे आले. त्या दिवशी महाराज ओंडकरांच्या वाड्यात होती.. सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले.. तेव्हा कारभारी सुंदराबाईस बोलले “आजपर्यंत आम्ही तुम्हाला मातोश्री प्रमाणे मानले..हल्ली आम्ही सरकारचा हुकुम बजावतो आहे.. येथे माझा उपाय नाही.. आपण महाराजांजवळ बसू नये..चालते व्हा.. आपणही आता इतर लोकांसारखे दर्शन घेत जावे.. या पुढे महाराजांजवळ राहण्याची सरकारची तुम्हांस परवानगी नाही..!! ” हे बोलणे ऐकून सर्व प्रथम बाईस हि थट्टा आहे असे वाटले.. आणि ती हसू लागली.. परंतु त्या नंतर फौजदारांनी पुन्हा सांगितले कि “ उठा.. उठा लवकर..!! ” आता सुंदराबाईस वाटले कि, खरोखर हुकुम आलेला आहे.. तेव्हा ती फौजदारांस आणि स्वामींना प्रार्थना करू लागली


परंतु तरीही त्यांनी ऐकले नाही.. शेवटी बाई स्वामींना बोलली “स्वामी तुम्ही तरी फौजदारास कहीतरी सांगा..!! ” परंतु महाराज एकही शब्द बोलले नाही.. आता बाई उठत नाही हे बघुन फौजदार शिपायास बोलले “अरे काय बघता.. बाईस ओढून बाहेर घालवून द्या !!” त्यानंतर शिपाई आले असता.. आता बाईने मोठाच आक्रोश मांडला.. मोठ मोठ्याने रडत बोलु लागली कि , “मी दगडावर डोके फोडून घेईल.. माझा जीव देईल.. ” वगैरे आणि तिने महाराजांचे पाय धरले.. आणि बोलु लागली “महाराज आज पर्यंत आपण माझे मुला प्रमाणे पालन पोषण केले.. आणि आज मला हा प्रसंग आला आहे.. आपणच काहीतरी सांगा !!” स्वामी भक्त हो !! खरतर स्वामींनी तिला ह्यापूर्वीच विविध संकेत देवून सुधारण्याची संधी दिली होती.. आता स्वामी काय सांगणार.. स्वामींनी शिपायाकडे बघितले आणि बोलले “ अरे.. काय पाहतोस रे ? ”. स्वामींनी असे बोलताच फौजदारास धीर आला.. आणि त्यांनी बाईला फराफरा ओढून बाहेर नेले.. त्या नंतर बाईच्या खोलीची जप्ती केली.. त्यात बऱ्याच काही गोष्टी सापडल्या.. हरबरे,,तेले..लुगडी..छांटया.. जोडे.. भांडी..गुडगुडी.. वगैरे सर्व जप्त केले.. त्यात पेढे-बर्फी-खारीक वगैरे जिन्नस अक्षरशः कुजून गेले होती.. पुढे जप्त झालेल्या त्या सर्व मालाचा लिलाव झाला आणि आलेला पैसा स्वामींच्या दरबार सेवेसाठी जमा केला.. थोडक्यात पूर्वपुण्याईने सुंदराबाईला स्वामींची सेवा भेटली.. पण पुण्य सांभाळण्यासाठी पुण्यच हवे असते.. आणि सुंदराबाई मात्र इथे नापास झाली.. अहंकार आणि लोभाने ती आंधळी झाली.. आणि स्वामी सेवेपासून दूर गेली..

 बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!


You Might Also Like

0 comments: